Marathi News Updates: राज्यात गेल्या काही दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरण गाजत आहे. एका गर्भवती महिलेला पैशांअभावी उपचार नाकाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केला आहे. यानंतर राज्यभरातून रुग्णालयावर टीकेची झोड उठली आहे. दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य आणि इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे.
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठी भाषेबाबतचा मुद्दा पुन्हा एकदा हाती घेतला आहे. यावरून मुंबईतील काही उत्तर भारतीय संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात राज ठाकरेंच्या पक्षाची मान्यता रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. यासह राज्यातील ताज्या घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊया.
Maharashtra News Live Today, 9 April 2025 : महाराष्ट्र लाईव्ह न्यूज अपडेट्स
प्रशांत कोरटकरला दिलासा, कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी तेलंगणातून अटक केली होती. मागील काही दिवसांपासून तो तुरुंगात होता. यानंतर आज कोल्हापूर सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर केला आहे.
राज्याचे कॅबिनेट मंत्री आशिष शेलार हे पाकिस्तानी क्रिकेटपटूंसह काम करणार असे वृत्त सामना वृत्तपत्रा छापल्यानंतर, शेलार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "हे लोक डोक्यावर पडलेले आहेत. यांचा मेंदू आता बद्ध झालेला आहे. त्यामुळे ते अशा बातम्या छापत आहेत. जावेद मियाँदाद कोणाच्या घरी बिर्याणी खायला आला होता हे आम्ही विसरलेलो नाही."
Deenanath Hospital : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अडचणी वाढणार? महिला आयोगाकडून पोलीस आयुक्त व मेडिकल काउन्सिलला कारवाईचे आदेश
तनिषा भिसे यांच्या मृत्यूमुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय चौकशीच्या फेऱ्यात अडकलेलं असतानाच आता त्यांचा अडचणी अजून वाढल्या आहेत. कारण यात आता महिला आयोगानेही उडी घेतली आहे. तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर रुग्णालयाने जी अंतर्गत चौकशी केली होती तिचा अहवाल रुग्णालयाने सार्वजनिक केला होता.मृत तनिषा आणि भिसे कुटुंबीयांची वैयक्तिक माहिती त्यांच्या परवानगीशिवाय सार्वजनिक केली. त्यामुळे मानसिक त्रास झाल्याची तक्रार सविता भिसे यांनी राज्य महिला आयोगाकडे केली होती. याची महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून पुणे पोलीस आयुक्त, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
कॉमेडियन कुणाल कामराने काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबणात्मक गाणे सादर केले होते. यानंतर राज्यभरात हे प्रकरण गाजत आहे. अशात आता शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) शिवसेना संजय निरूपमय यांनी मोठा आरोपी केला आहे. ते म्हणाले की, "या प्रकरणात मातोश्रीचा सहभाग आहे. कुणाल कामराने पैसे घेऊन, एकनाथ शिंदें यांच्यावरील विडंबनात्मक गाणे सादर केले आहे."
मनसेच्या वतीने रामकुंडात उड्या घेत प्रदूषण मुक्तीसाठी आंदोलन
मनसेच्या वतीने नाशिक मध्ये रामकुंडात उड्या घेत गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी आंदोलन करण्यात आले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील नद्यांच्या प्रदूषणाचा मुद्दा आपल्या सभांमध्ये उपस्थित करतात मनसे कार्यकर्त्यांनी देखील आता आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.
पंढरपूरहून वारी निघणार, ती थेट लंडनला जाणार… तब्बल २२ देशातून प्रवास करत…
नागपूर : अवघ्या देशभरात सुप्रसिद्ध असलेले पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि तेथील वारीची, संत परंपरेची गाथा आता जगभरात पोहोचणार असून काही वर्षात लंडन येथे श्री विठ्ठल रुक्मिणीचे भव्यदिव्य मंदिर साकारण्यात येणार आहे. विष्णू मनोहर आणि व्यवस्थापन तज्ज्ञ व एलआयटी विद्यापीठाचे प्रधान सल्लागार मोहन पांडे हे नागपूरकर या मंदिर समितीचे सदस्य व भारतातील समन्वयक आहेत.
गणेश नाईकांचा पुन्हा शिंदेच्या ठाण्यात ‘जनता दरबार’ तर नाईकांच्या पालघरमध्ये सरनाईकांचा ‘ शिवसेनेचा लोकदरबार’
ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात पुन्हा एकदा वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार भरविला जाणार आहे. ठाण्यातील चौका-चौकात गणेश नाईक यांच्या जनता दरबाराचे फलक झळकू लागले आहेत. हिरानंदानी मिडोज येथील डाॅ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ११ एप्रिलला हा जनता दरबार भरणार आहे. डाॅ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह हे प्रताप सरनाईकांच्या मतदारसंघात आहे.
तुम्हीही फोटो ‘घिबली’ करताय का?….मग तुमचे बँक खाते….
नागपूर : सध्या ‘घिबली’फोटो ट्रेंड’ सुरू असून अनेकांची छायाचित्र तयार करण्यासाठी चढाओढ सुरू आहे. मात्र, हाच ‘ट्रेंड’ सायबर गुन्हेगारांसाठी संधी ठरत असून अनेकांना जाळ्यात ओढून फसवणूक करीत आहेत. ‘मेक अ घीबली फोटो,’ अशा आशयाची ‘लिंक’ पाठवून बँक खाते रिकामे करीत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
Marathi News Live Updates : "ट्रम्प भारताला धुताहेत आणि विष्णूचे अवतार गप्प, ठाकरे गटाची पंतप्रधानांवर टीका
डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर व्यापार कर लादले आहेत. ज्या देशांवर व्यापार कर लादले आहेत. त्यामध्ये भारताचाही समावेश आहे. यावरून, शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले की, "तिकडे ट्रम्प भारताला धुताहेत आणि इकडे विष्णूचे अवतार गप्प आहेत. या टेरिफच्या विरोधात संपूर्ण जग अमेरिकेविरोधात लढत आहे."
दीड किलोमीटर च्या रस्त्याचे काम करण्याच्या मागणीसाठी सुप्रिया सुळे यांच ठिय्या आंदोलन
भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणाऱ्या दीड किलोमीटरच्या रस्त्याची प्रचंड दूरवस्था झाली आहे. तो रस्ता क्रॉंक्रीटीचा करण्यात यावा,या मागणीसाठी बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे या पुणे जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर ठिय्या आंदोलनास बसल्या आहेत.
डोंबिवलीत प्लाझ्मा रक्तपेढीसमोरील सीमेंट काँक्रीट रस्त्यावर वाहन कोंडी
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेत वल्लभभाई पटेल रस्त्यावर प्लाझ्मा रक्तपेढी ते मिराज सिनेमागृह दरम्यान सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याची काँक्रीट रस्त्याची एक बाजू बांधून पूर्ण करण्यात आली आहे. दुसऱ्या मार्गिकेचे काम सुरू करण्यात आले आहे. एकाच आठ फुटाच्या मार्गिकेतून येणारी जाणारी वाहने धावत असल्याने या रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडी होत आहे.
Petrol Diesel Price Today: पेट्रोल भरायला जाण्यापूर्वी वाचा ‘ही’ महत्त्वाची बातमी; इंधनाचे नवे दर जारी
Petrol And Diesel Price In Maharashtra: पेट्रोल आणि डिझेल हा सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक सर्वसामान्य तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरुन महागाई वाढली आहे की नाही याचे अंदाज लावत असतात. आज ०९ एप्रिल २०२५ रोजी पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत.
Maharashtra Live Updates: “त्यांना माफी नाही”, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी सुप्रिया सुळे आक्रमक
बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे मतदारसंघातील विविध मागण्यांसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोनला बसल्या आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणावरही भाष्य केले आहे.
या प्रकरणी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "यामध्ये डॉक्टरांची तर चूक आहेच. पण, मी आजही म्हणजे की ही हत्याच आहे. कारण साडेपात तास ती बाई तिथे कळा देत होती. तरी तुम्ही तिला तयारी करून दुसऱ्या रुग्णालयात पाठवता. यामध्ये व्यवस्थापनातील ४-५ लोकही सहभागी आहेत. त्यामुळे यातून कोणाची सुटका नाही. जो जो यामध्ये सहभागी आहे त्याला माफी नाही."