Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला कालपासून राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या अभिभाषणानं सुरुवात झाली आहे. डिसेंबरमध्ये बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. या हत्याकांडांमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयांचा हात असल्याचा आरोप करत विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेतेही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. त्यामुळे मुंडे यांच्या राजीनाम्यावर आज विधिमंडळात जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे समाजवादी पक्षाचे आमदार आबू आझमी यांनी शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. याचबरोबर स्वारगेट बस स्थानकावर एक तरुणीवर झालेल्या बलात्काराचे प्रकरण घडल्यानंतर विरोधकांनी राज्यातील कायदा व सुरक्षतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
Maharashtra Today, 04 March 2025 : राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.
विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांच्या नावावर ठाकरे गटाकडून शिक्कामोर्तब
कोकणातील गुहागर विधानसभे मधून निवडून आलेले आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना असा राजकीय प्रवास केला आहे.
पुणे : सुप्रिया सुळे मूक आंदोलनस्थळी; संतोष देशमुख यांना वाहिली श्रद्धांजली
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला ८० दिवस उलटून गेले आहेत.तर याप्रकरणी सीआयडीने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं असून दोषारोप पत्रातून अनेक खुलासे करण्यात आले आहेत.त्याच दरम्यान संतोष देशमुख यांना कशा प्रकारे मारहाण करीत मारण्यात आले.याबाबतचे फोटो समोर आले आहेत.हे फोटो पाहून राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे.राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत असून वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना फाशीची देण्यात यावी,ही मागणी केली जात आहे.त्या सर्व घडामोडी दरम्यान धनंजय मुंडे यांनी त्यांच्या स्वीय सहाय्यकामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. त्याच दरम्यान पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकात संतोष देशमुख यांना शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मेणबत्ती पेटवून श्रध्दांजली वाहिली आणि यावेळी मूक आंदोलन केले.
ताम्हिणी घाटात कार व एसटी बसचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, तीन जण जखमी
ताम्हिणी घाटात रायगड जिल्ह्याच्या हद्दीत मंगळवारी दुपारी एसटी बस व कारचा भीषण अपघात झाला.
वडेट्टीवार समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश, वडेट्टीवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचीही चर्चा ?
काँग्रेस विधीमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार मागील पाच वर्षापासून सत्तेपासून दूर आहेत. वडेट्टीवार सत्तेत नसल्यामुळे अस्वस्थ आहेत.
राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मंजूर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीवरून राज्यपालांनी मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
https://twitter.com/maha_governor/status/1896899173242519574
पुणे : कात्रज भागात इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणाऱ्या कंपनीत आग
कात्रज भागात इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणाऱ्या एका कंपनीत मंगळवारी दुपारी आग लागली.
ऐकावं ते नवलचं! नागपुरातील ‘या’ नेत्याने चक्क तलावात बांधले घर…
महापालिकेने २०१९ ला लॉन बंद करून बांधकाम पाडण्याबाबतचे पत्र माजी नगरसेवक कमलेश चौधरी यांना पाठवले होते.
धक्कादायक! विवाहित असूनही सहा महिन्यांपासून अल्पवयीन मुलीसोबत…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ही अल्पवयीन असल्याची जाणीव असताना आरोपीने त्यांच्या आणि तिच्या घरी व घराचे मागे तसेच सुनसान ठिकाणी नेऊन अनेकदा तिचा विनयभंग केला आहे.
Dhananjay Munde Live: "कोणालाही माफी मिळणार नाही", मुंडेंच्या राजीनाम्यानंतर शिंदे गटाच्या नेत्याचे मोठे वक्तव्य
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर बोलताना शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) मंत्री संजय शिरसाट म्हणाले, “बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्या घटनेचा सर्वांनीच निषेध नोंदवला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या घटनेवर भाष्य करताना सांगितलं होतं की या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई होईल. कोणालाही माफी मिळणार नाही.
नाशिक महानगरपालिकेच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढा, काँग्रेसचे आंदोलन
नाशिक : भूसंपादन मोबदला, ठेकेदारांना झुकते माप, गोदावरी नदी प्रदूषण आदी विषयांवरून संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या महापालिकेच्या मागील पाच वर्षाच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढावी आणि अन्य विषयांकडे लक्ष वेधण्यासाठी शहर काँग्रेसतर्फे महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आले.
‘मराठ्यांनी स्वतःला संकुचित करु नये’ - संभाजी भिडे यांची प्रतिक्रिया
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा ते मराठ्यांचा इतिहास यावर भाष्य केले. सविस्तर बातमी वाचा
“औरंगजेबाची कबर उखडून टाका…”, नवनीत राणा यांची अबू आझमींवर टीका
अबू आझमी म्हणाले होते की, "चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिर बनवलेली आहेत. मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही. "
३.९३ कोटी ग्राहकांच्या ‘ऊर्जे’साठी जीवावर उदार होऊन रात्रंदिवस कार्य; तरीही दुर्लक्षित घटकच!
२४ तास अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी रात्रंदिवस धडपड करणारे हात म्हणजे महावितरणचे लाईनमन.
आरोग्य विद्यापीठात देशात पहिलेच असे कुलगुरू, तरी राजस्थानच्या राज्यपालांनी बोलावले; कारण…
वर्धा : ज्यांच्या मागे मागे पदे स्वतः धावत असतात असा व्यक्ती म्हणजे डॉ. पी. जी. येवले, अशी चर्चा राज्याच्या शैक्षणिक वर्तुळत नेहमी होत असते. सलग ४० वर्ष डॉ. येवले हे प्रमुख पदावर कार्यरत राहले असून आता आणखी काही वर्षाची त्यात भर पडणार. नुकतीच त्यांची राजस्थान आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाली आहे. सहसा आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरूपदी वैद्यकीय शाखेतीलच व्यक्ती निवडल्या जात असतो.
नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेमार्ग सरळ मार्गेच व्हावा, मुंबईतील बैठकीत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची एकजूट
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गाच्या प्रस्तावित बदलांना विरोध करण्यासाठी आज मुंबईत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावे या मागणीसाठी कर्जतमध्ये रास्ता रोको आंदोलन
संतोष देशमुख यांची हत्या अतिशय निर्दयीपणे केल्याचे आता उघड झाले आहे. ही बाब आज निदर्शनास आल्यानंतर त्याचे पडसाद तात्काळ उमटले आहेत.
Video: “ती” मादी जिवाच्या आकांताने ओरडत होती…आणि “ते” तिच्या शरीराचे लचके तोडत होते…
सावज शिकाऱ्यापासून वाचण्यासाठी पळत असताना मागून हे रानकुत्रे त्या सावजाचे लचके तोडायला सुरुवात करतात.
संतापजनक ! वकीलच विसरला कायद्याचे भान; मुलीला घरी खेळायला बोलवायला आलेल्या शेजारच्या चिमुकलीवर केला अत्याचार…
एका वकिलाने त्याच्या मुलीला खेळायला बोलवायला आलेल्या शेजारच्या एका ११ वर्षीय मुलीला खोटे बोलून घरात घेतले आणि तिच्यावर अत्याचार केला.
“त्या औरंग्याने माझ्या राजासमोर भिक मागितली! उदात्तीकरण काय करतो?”; सभागृहात महेश लांडगे कडाडले
महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे क्रूरकर्मा औरंगजेब धार्जिने आमदार अबू आझमी यांनी अकलेचे तारे तोडलेले आहेत.
Dhananjay Munde Live: "आरोपींना फाशी व्हावी, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याने विषय संपणार नाही" नाना पटोलेंची मागणी
मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले की, "सरकारकडे जर कणभर संवेदना आणि माणुसकी उरली असेल, तर या हत्याकांडातील सर्व सूत्रधारांवर तात्काळ कठोर कारवाई करावी. तसेच फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी. धनंजय मुंडे यांच्या केवळ एका राजीनाम्याने हा विषय संपणार नाही. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील."
प्रशांत कोरटकरच्या डॉक्टरेट पदवीसुद्धा संशयाच्या भोवऱ्यात !
मार्च २०२० मध्ये कथित पत्रकार आरोपी प्रशांत कोरटकरला भारत व्हर्चुअल युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट मिळाली.
कल्याण मोहने येथील बेकायदा आठवडी बाजार बंद, पालिकेच्या अ प्रभागाची कारवाई
कल्याण : कल्याण जवळील मोहने येथे मुख्य बाजारपेठेत मागील अनेक वर्षापासून आठवडी बाजार भरतो. या बाजारामुळे मोहने बाजारपेठेसह लगतचे रस्ते विक्रेत्यांनी व्यापले जात होते. या भागातून जाणाऱ्या वाहनांचा रस्ता बंद होता. पादचाऱ्यांना चालणे या भागातून अवघड होत होते.
भर न्यायालयात न्यायदंडाधिकाऱ्यांना धमकावले
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात एका प्रकरणात निलेश जाधव नावाचा आरोपी हजर नसल्यामुळे न्यायालयाने २९ जानेवारी २०२० रोजी जामीनपात्र वॉरंट काढला.
ठाण्यात शिंदे गटाकडून वाल्मीक कराडचा पुतळा जाळला, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचे रस्त्यावर उतरुन आंदोलन
ठाणे : सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाल्याचे काही फोटो समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर आता सर्वत्र संतापची लाट उसळली आहे. मंगळवारी दुपारी शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी 'वाल्मीक कराडला फाशी द्या' अशी मागणी करत टेंभी नाका परिसरात आंदोलन केले. आंदोलकांनी वाल्मीक कराडचा प्रतिकात्मक पुतळा जाळत आंदोलन केले.
पंकजा मुंडेंना अश्रू अनावर; म्हणाल्या, “संतोष देशमुखच्या आईची माफी मागते…धनंजय मुंडेंनी आधीच राजीनामा…”
धनंजय मुंडे यांनी आज (४ मार्च) सकाळी त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.
जेएनपीएच्या गेटवे बंदरात मिथेनॉल इंधनावर चालणारे पहिले जहाज, केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते जहाजाचे नामकरण
उरण : हरित इंधन म्हणून मिथेनॉलवर चालणारे जहाज जेएनपीएच्या गेटवे टर्मिनल (जीटीआय) या बंदरात दाखल झाले. या दुहेरी इंधन मिथेनॉल जहाजाचे ‘अल्बर्ट मर्स्क’ असे नामकरण करण्यात आले आहे. १६ हजार कंटेनर वाहून नेणारे गे जहाज आहे. या कार्यक्रमाला जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल व केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे उपस्थित होत्या.
Dhananjay Munde Live: "या हत्या प्रकरणात त्यांना सह-आरोपी बनवले पाहिजे", मुंडेंच्या राजीनाम्यानंतर रोहित पवार यांची मागणी
महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार म्हणाले, "बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी सामान्य लोक आणि देशमुख कुटुंब लढत होते. हे त्याचेच परिणाम आहे. सरकारने त्यात विलंब केला, पण शेवटी त्यांचा (धनंजय मुंडेंचा) राजीनामा घेतला. पण आम्ही असेही म्हणतो इच्छितो की त्यांना या हत्या प्रकरणात सह-आरोपी बनवले पाहिजे आणि पारदर्शक पद्धतीने चौकशी केली पाहिजे."
अंधश्रद्धेचा बाजार ! शुभशकून म्हणून काळ्या घोड्याची नाल बांधताय ? येथे चक्क घोड्यालाच…
वन्य जिवांबाबत आस्था ठेवून काम करणाऱ्या पीपल्स फॉर ऍनिमल्स या संघटनेने हा बाजार उजेडात आणला आहे.
बीड बंदची आज हाक
संतोष देशमुख यांची हत्या करतानाची छायाचित्रे पाहून त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांचा बांध फुटला.
बौद्धगया येथील महाबोधी महाविहार; बौद्ध बांधव देशभर आंदोलन का करीत आहेत?
अनेक बौद्ध विहारांमध्येही आंदोलन करून केंद्र सरकारला निवेदन पाठवण्यात आले आहे.