Latest Marathi News Updates : राज्यात दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकरणात शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नते आदित्य ठाकरे यांच्यावर राजकीय वर्तुळातून टीका केली जात आहे. दुसरीकडे औरंगजेबच्या कबरीचा मुद्दा देखील तापलेलं असून नागपूर येथे झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर संभाजीनगर जिल्ह्यातही पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर आहे. पुण्यातील हिंजेवाडी भागात बुधवारी सकाळी मिनी बसनं अचानक पेट घेतल्याच्या प्रकरण समोर आले होते. या घटनेच चार जणांचा होरपळून मृत्यू झाला तर ८ जण जखमी झाले होते, मात्र या प्रकरणाला आता मोठी कलाटणी मिळाली असून चालकानेच वैयक्तिक रागातून बस पेटवून दिल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्यातील या आणि इतर राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेट आपण येथे वाचू शकता.
Maharashtra News Live Today, 21 March 2025 : राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर....
हिंगोलीतील महेश उद्यानामध्ये ओढणीने तरुणीची आत्महत्या
हिंगोली : शहरातील एनटीसी भागातील महेश उद्यानात एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. तरुणीच्याआत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस सूत्राकडुन मिळालेली माहिती अशी की, शहरातील बावन खोली भागातील अंजली गजानन खंदारे (वय २०) ही तरुणी तिची आई, बहिण व भावासोबत राहते. अंजली एका खाजगी दवाखान्यात काम करते. तर तिची आई घरकाम करुन घर चालवते. शुक्रवारी सकाळी अंजली कामावर जाते असे सांगून घरातून बाहेर पडली होती. नेहमीप्रमाणे ती कामाला जात असल्यामुळे तिच्या कुटुंबियांना कुठल्याही प्रकारची शंका आली नाही. मात्र दुपारी अंजलीने एनटीसी भागातील महेश उद्यानात एका झाडाला स्वतःच्या ओढणीने गळफास घेतला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच हिंगोली शहर पोलिसांनाही माहिती देण्यात आली. ठाण्याचे निरीक्षक नरेंद्र पाडळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संगमनाथ परगेवार, जमादार संजय मार्केसह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृत अंजली हिचा मृतदेह खाली काढून उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केला आहे. या प्रकरणी हिंगोली शहर ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचे ‘टाळ-मृदंग’ वाजवत आंदोलन
छत्रपती संभाजीनगर : ‘खरीप-२०२४’ मधील पीकविमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयासमोर टाळ-मृदंग वाजवत आंदोलन केले. छत्रपती संभाजीनगर तालुक्याला २०२४ सालातील खरीप हंगामातील पीकविमा अद्याप शेतकऱ्यांना मिळाला नाही. ११ फेब्रुवारी रोजीही कार्यालयास उपरोक्त मागणीच्या संदर्भाने निवेदन देऊनही काही कार्यवाही झाली नाही, असा आरोप करत शेतकऱ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनावेळी शेतकऱ्यांनी मागण्यांचे फलक उंचावत, टाळ-मृदंग वाजवत लक्ष वेधले. यावेळी आंदोलक विश्वांभर हाके यांनी सांगितले की, २०२४ मधील पावसाळ्यात जोरदार वृष्टी झाली होती. त्यात सोयाबीन, कापूस, मूग, बाजरी, तूर या पिकांचे मोठ्या क्षेत्रावरील नुकसान झाले. पीकविमा कंपनीच्या अटी-शर्तीनुसार ७२ तासात नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी कळवलही. त्यानंतर कंपनीचे अधिकारी आले. त्यांनी पंचनामेही केले. मात्र, त्यानंतरही पीकविम्याची भरपाई मिळाली नाही. इतर तालुक्यांना पीकविमा मिळाला. सध्या शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचीही भीती निर्माण झाली. कारण दिल्लीत येणाऱ्या शेतकऱ्यांचे आंदोलनही चिरडून टाकण्यात आले, असा आरोपही हाके यांनी केला.
‘ज्ञानराधा’च्या ठेवीदारांसाठी ‘एमपीआयडी’चा प्रस्ताव
जालना - बीड येथील ‘ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी’च्या ४ हजार ५११ ठेवीदार आणि गुंतवणूकदारांनी जालना जिल्ह्यातील आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी केल्या आहेत. याप्रकरणी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये ११ गुन्हे दाखल झाले असून, ठेवीदारांच्या गुंतवणुकीची रक्कम २३७ कोटी ५५ लाखांवर आहे. दरम्यान, ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत म्हणून याप्रकरणी ‘एमपीआयडी (महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण वित्तीय आस्थापना-१९९९)’ कायद्यान्वये कारवाई व्हावी, असा प्रस्ताव जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेने शासनास सादर केला आहे.संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना अटक करून केलेल्या तपासात पोलिसांना आरोपींच्या ८२ मालमत्तांचा शोध लागला. या संस्थेची १६ वाहने जप्त करून जिल्ह्यातील बँक खाती गोठविण्यात आली आहेत. जप्त मालमत्तांचा लिलाव करून ठेवीदारांचे पैेसे परत करण्यासाठी ‘एमपीआयडी’ प्रस्ताव शासनास सादर करण्यात आलेला आहे.
जिल्ह्यातील सदर बाजार, जालना, अंबड, परतूर, जाफराबाद, भोकरदन, तीर्थपुरी, घनसावंगी या पोलीस ठाण्यामध्ये ‘ज्ञानराधा’विरुद्ध एकूण ११ गुन्हे दाखल झालेली आहेत. जिल्ह्यातील ठेवीदारांच्या गुंतवणुकीची रक्कम २३७ कोटी ५५ लाख ३८२ रुपये आहे. जालना जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार संस्थेचे अध्यक्ष व उपाध्यक्षांनी प्रारंभी ठेवीदारांचे पैसे परत देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनामुळे अनेक ठेवीदारांच्या तक्रारी दाखल होण्यास विलंब लागला. याप्रकरणी बीड जिल्ह्यात ६८ गुन्हे दाखल आहेत.
मुंबई उच्च न्यायालयात तातडीच्या सुनावणीचा मागणी करणार, सतीश सालियन यांच्या वकिलाची माहिती
दिशा सालियनच्या वडिलांनी दाखल केलेली रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडे सादर करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात त्यांच्या वकिलांकडून तातडीच्या सुनावणीसाठी हा विषय मांडला जाण्याची शक्यता आहे.
पुढील आठवड्यात सोमवार किंवा मंगळवारी तातडीच्या सुनावणीसाठी आम्ही हे प्रकरण उपस्थित करू असे अॅड. नीलेश ओझा यांनी सांगितले.
उरणकरांसाठी बाह्यवळण मार्ग कधी? मार्गातील पुनर्वसनासाठी ११ कोटींचा निधी आवश्यक
उरण : शहरातील वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस अधिकची भर पडत आहे. या कोंडीवर महत्त्वपूर्ण उतारा असलेल्या उरण बाह्यवळण (बायपास)मार्गाची प्रतीक्षा कायम आहे. ही प्रतीक्षा केव्हा संपणार असा सवाल आता वाहतूक कोंडीने त्रस्त झालेले उरणकर नागरिक विचारत आहेत.नगरपरिषद हद्दीतील जमिनी आणि त्यावरील बांधकामे यांच्या भूसंपादनाचा अथडळा निर्माण झाला आहे.
एरंडोलमध्ये शिंदे गटाला चुरशीची लढत देणाऱ्या अपक्ष उमेदवाराला भाजपच्या पायघड्या
राजकीय पक्षांची ताकद पाठीशी राहिली असती तर कदाचित त्या अपक्ष उमेदवारांनी महायुतीच्या उमेदवारांना धूळही चारली असती.
राज्यात खनिज संपत्तीची लूट… कारवाई वाढल्यावरही…
बेकायदेशीर खाणकामातून या खनिजांची लूट होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे सरकारचा कोट्यावधींचा महसूलही बुडत आहे.
केरळच्या धर्तीवर लॉटरीमधून उत्पन्न वाढवा, माजी मंत्र्यांची सूचना
केरळच्या धर्तीवर महाराष्ट्राला देखील लॉटरीच्या माध्यमातून उत्पन्न वाढवता येऊ शकते, यासंदर्भात राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत लक्ष वेधले.
अजब प्रेम गजब अंत! प्रेयसीच्या विरहाने विवाहित प्रेमीची आत्महत्या!! इंस्टाग्राम वर केले ‘शेअर’…
विवाहित युवकाने अन्य महिलेवर प्रेम जडले, प्रेयसीचा प्रतिसाद असल्याने आणि (बायकोची हरकत नसल्याने ) त्याने तिला घरीच आणले. हा आगळा वेगळा प्रेमवीर आपली पहिली बायको, प्रेमिका सह एकाच घरात ‘नांदू’ लागले. सविस्तर वाचा…
नागपुरात पुन्हा संचारबंदी…आता पोलीस आयुक्तांच्या आदेशात…
नागपुरातील महाल परिसरात १७ मार्च २०२५ रोजी रात्री दोन धार्मिक गटात झालेल्या दंगलीनंतर प्रशासनाकडून एकूण ९ पोलीस ठाणे हद्दीतील संचारबंदी लावण्यात आली होती. त्यापैकी पाच पोलीस ठाणे आंतर्गत संचारबंदीत दोन तास शिथिलता देण्याचा निर्णय पोलीस आयुक्तांनी गुरूवारी (२० मार्च २०२५) घेतला. सविस्तर वाचा…
फेसबुकवर पुन्हा आक्षेपार्ह पोस्ट; धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी तरुणाला अटक
दोन दिवसांपूर्वी एका तरुणाने इंस्टाग्रामवर औरंगजेबाचे स्टेटस ठेवत धार्मिक भावना दुखावतील , अशी स्टोरी टाकल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आणि अखेर त्या तरुणाविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सविस्तर वाचा…
सोन्याच्या दरात मोठे बदल.. चांदीचे दर घसरले…
करोनानंतर सोने- चांदीचे दर नियंत्रणात येत नसल्याचे चित्र आहे. मध्यंतरी चांदीचे दर प्रति किलो एक लाख रुपयाहून अधिकवर गेले होते. परंतु आता या दरात घट झाली आहे. तर सोन्याच्या दरातही मोठे बदल झाल्याने ग्राहकांमध्ये चिंता आहे. सविस्तर वाचा…
दंगलग्रस्त भागात मोजक्याच नमाजींच्या उपस्थितीत नमाजपठण… जबाबदार लोकांनी…
नागपुरातील दंगलग्रस्त भागातील मशिदीमध्ये मोजक्याच नमाजीच्या उपस्थितीत शुक्रवारी नमाजपठण झाले.
सर्वात जास्त नाराजीनाट्य कोण करतं? एकनाथ शिंदे की अजित पवार? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर
महायुतीच्या सरकारमध्ये अनेकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं. याबाबत वेगवेगळ्या चर्चांही रंगल्या. मात्र, सर्वात जास्त नाराजीनाट्य कोण करतं? एकनाथ शिंदे की अजित पवार? असं विचारल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, "नाराजी नाट्य कोणीच करत नाही. पण अलिकडच्या काळात सोशल मीडियामुळे कोणत्याही गोष्टीचा कशाही प्रकारे अर्थ घेतला जातो", असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहीनीच्या मुलाखतीत बोलत होते.
खासगी कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन रचला पथकाने सापळा; मत्स्य व्यवसायच्या सहायक आयुक्तांना लाच घेताना पकडले
राज्य सरकारच्या मत्स्य व्यवसाय (तांत्रिक) विभागाचे सहायक आयुक्त रमेशकुमार जगन्नाथ धडील (मूळ रा. ॲक्वा लाईन रेसिडेन्सी, नाशिक रस्ता, नाशिक) यांना अहिल्यानगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले.
दापोलीतील सुवर्णदुर्ग रोप वे ला महायुती सरकारचा हिरवा कंदील
दापोलीच्या पर्यटन क्षेत्रात मनाचा तुरा रोवणारा सुवर्णदुर्ग रोपवे व्हावा हे दापोलीतील पर्यटन प्रेमींचे आणि अभ्यासकांचे स्वप्न आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या सुवर्णदुर्ग रोप वे ला महायुती सरकारचा हिरवा कंदील मिळाला आहे. सविस्तर वाचा…
आनंद डोहातले लग्नघर अचानक शोकसागरात बुडाले; नवरदेवाचा मृत्यू , रविवारी लग्न, शुक्रवारी अपघात
उद्याच्या रविवारी लग्न… घरात देव कार्याची लगबग.. पत्रिकांचे वाटप, निमंत्रणेही पोचलेले…जवळची बरीचशी पाहुणे मंडळी दाखलही झालेली.. लग्नघरी सनई-चौघड्यांचे मंजूळ सूर ऐकू येत असतानाच अचानकपणे एक वार्ता येऊन धडकते… सविस्तर वाचा…
ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्यास प्रतिबंध; आदेश जारी
पुणे ग्रामीण जिल्ह्यात कोणतीही खासगी व्यक्ती, कार्यक्रम व्यवस्थापन (इव्हेंट मॅनेजमेंट) व छायाचित्रण करणारे व्यावसायिक यांनी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यापूर्वी त्याची पूर्वमाहिती ७ दिवस आधी संबंधित पोलीस ठाण्यास कळवून, प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक राहील, सविस्तर वाचा…
गरीब चहा विक्रेत्याला गंभीर आजार; उपचारासाठी १० लाखांची गरज असतांना….
शहरातील एका ६२ वर्षीय चहा विक्रेता जीवघेण्या आजाराच्या विळख्यात सापडला. घरची बेताची परिस्थिती, मालमत्ता म्हणून काहीच नाही. उपचारासाठी तब्बल १० लाखाची गरज. त्यातच मुलाचा देखील अपघात झाला. सविस्तर वाचा…
तब्बल ३५ कोटींपेक्षा अधिकचा मालमत्ता कर थकीत; जप्तीची कारवाई…
मालमत्ता कराची ३५ कोटींपेक्षा अधिकची रक्कम थकीत असल्याने महापालिकेने जप्ती मोहिम तीव्र केली आहे. आतापर्यंत १ हजार पेक्षा अधिक थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. सविस्तर वाचा…
गुटखा गुजरात मार्गे महाराष्ट्रात -'या' नेत्याने...
चंद्रपूर:राज्यात गुटख्यावर बंदी असताना देखील सगळीकडे गुटखा सर्रासपणे उपलब्ध आहे.
अस असताना यांबाबत कठोर कारवाई होत नाही, लक्षवेधी माध्यमातून काँग्रेस विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला प्रश्न विचारले.
इतर राज्यात गुटखा बंदी नाही पण महाराष्ट्रात बंदी असताना मात्र गुटखा सगळीकडे उपलब्ध आहे. गुजरात मार्गे महाराष्ट्रात गुटखा येताना कारवाई नाही. यामुळे सरकारचा महसूल बुडतो. हा गुटखा येतो , पोलिसांनी मनात आणले तर एक ही पुडी विकू शकत नाही पण तरीही विदर्भ, मराठवाडा इथे गुटखा मिळतो, लोकांच्या आरोग्याला यामुळे हानी पोहचते.
यावर उत्तर देताना मंत्री योगेश कदम यांनी गुटखा बाबत अन्न आणि प्रशासन विभाग कारवाई करण्यात येते. या विभागात फूड ऑफिसर्सची कमतरता आहे. पण दोन महिन्यात या नियुक्त्या करण्यात येतील आणि गुटखा विक्रीवरील कारवाया वाढणार. या प्रकरणी कोणताही व्यापारी, विक्रेते ,पुरवठादार यांच्यावर कठोर कारवाई करणार असे मंत्री कदम म्हणाले.
सेंट्रल पार्कमधील जलतरण तलाव लवकरच नागरिकांसाठी खुला
नवी मुंबई</strong> : घणसोली सेंट्रल पार्क मधील जलतरण तलाव लवकरच नागरिकांसाठी खुला होणार आहे. घणसोली सेक्टर ३ सेंट्रल पार्क मधील तरण तलाव सुरुवातीपासूनच वापराविना पडून होता. त्यामुळे या तलावाची दुरावस्था झाली होती. मात्र आता ६० लाख रुपये खर्च करून दुरुस्ती करण्यात आली असून आता अखेर शहरातील नागरिकांसाठी हा जलतरण तलाव वापरता येणार आहे. नागरिकांसाठी मासिक पासाचे शुल्क १०० रुपये असणार आहे.
नागपूर दंगल : दुसऱ्या सूत्रधाराचे नाव आले समोर…
नागपूर : विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानी केलेल्या आंदोलन नंतर नागपुरात दंगल उसळली. या दंगलीचा सूत्रधार कोण याचा पोलीस शोध घेत होत असतानाच आणखी एका कथित सूत्रधाराचे नाव समोर आले आहे.
आनंद डोहातले लग्नघर अचानक शोकसागरात बुडाले; नवरदेवाचा मृत्यू , रविवारी लग्न, शुक्रवारी अपघात
उद्याच्या रविवारी लग्न... घरात देव कार्याची लगबग.. पत्रिकांचे वाटप, निमंत्रणेही पोचलेले...जवळची बरीचशी पाहुणे मंडळी दाखलही झालेली.. लग्नघरी सनई-चौघड्यांचे मंजूळ सूर ऐकू येत असतानाच अचानकपणे एक वार्ता येऊन धडकते... भूकंप होऊन सारं नष्ट व्हावं तशी ! कापडसिंगी (ता. सेनगाव) येथील तनपुरे कुटुंबाच्या घरात घडलं.
छत्रपती संभाजीनगर येथे पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे कृषी अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन
छत्रपती संभाजीनगर येथे शेतकऱ्यांना 2024 चा खरीप पीक विमा मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी टाळ आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत खरीप पीक विमा मिळावा यासाठी आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी सरकार विरोधात घोषणा केल्या. 'पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा' असे फलक घेऊन शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.
नोकरी शोधताय? आरोग्य विभागातील संधी जाणून घ्या…
राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत अमरावती जिल्ह्यात आरोग्य विभागातील पदभरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने राबविण्यात येत आहे. एकूण १६६ जागांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सविस्तर वाचा…
मुस्लिमांना चिथावण्यासाठीच चादर जाळली, गुन्हे दाखल करताना पोलिसांकडून भेदभाव; नागपूर मुस्लीम कम्युनिटीचा आरोप
गेल्या दोन महिन्यांपासून औरंगजेबाचा मुद्दा उपस्थित करून वेगवेगळ्या पद्धतीने मुस्लीम समाजाला चिथावण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, मुस्लीम बांधवांनी संयम पाळला. इतके करूनही हा समाज पेटत नसल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर मुस्लिमांसाठी पवित्र अशी ‘आयत’ असलेली चादर जाळण्याचे षडयंत्र रचण्यात आले. सविस्तर वाचा
अशा जपल्या स्मृती! मित्र अपघातात ठार, हेल्मेट वाटून दिला सुरक्षा संदेश
रस्ते अपघातात दरवर्षी हजारो बळी जात असल्याची आकडेवारी नवी नाही. त्यातही प्रामुख्याने दुचाकीस्वार रस्ते अपघातात प्रामुख्याने ठार पडत असल्याचे चित्र आहे. म्हणून हेल्मेट सक्ती करण्यात येते. पण त्यास गांभीर्याने घेतल्या जात नसल्याची स्थिती आहे.
खासगी कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन रचला पथकाने सापळा; मत्स्य व्यवसायच्या सहायक आयुक्तांना लाच घेताना पकडले
राज्य सरकारच्या मत्स्य व्यवसाय (तांत्रिक) विभागाचे सहायक आयुक्त रमेशकुमार जगन्नाथ धडील (मूळ रा. ॲक्वा लाईन रेसिडेन्सी, नाशिक रस्ता, नाशिक) यांना अहिल्यानगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले.
अनधिकृत व नियमबाह्य रिक्षांवर परिवहन विभागाची करडी नजर ; रात्रीच्या सुमारास पथके सक्रिय २४० रिक्षांवर कारवाई, ४५ रिक्षा जप्त
शहरात रात्रीच्या सुमारास अनधिकृत व नियमबाह्य पद्धतीने चालविल्या जाणाऱ्या रिक्षांना आवर घालण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने भरारी पथके सक्रिय केली आहेत. मागील पाच दिवसात २४० रिक्षांवर कारवाई करीत ४५ रिक्षा जप्त केल्या आहेत. सविस्तर वाचा…