Marathi News LIVE Updates : राज्यात गेल्या काही दिवसांपासून विविध घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचाराअभावी तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. त्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या बरोबरच गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मराठी बोलण्याबाबतचा मुद्दा देखील तापलेला आहे. तसेच आज महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्ताने राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दाही चर्चेत आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून माजी मंत्री बच्चू कडू हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यासह राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Mumbai Pune Breaking News Highlights Today, 14 April 2025 : राजकीय व इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
ठाणे : उपवनमधील हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा
डोंबिवलीतील गोपीनाथ चौक ते जगदांबा मंदिर रस्त्यावरील ६८ झाडांंवर कुऱ्हाड, बाह्यवळण रस्त्याच्या पोहच रस्ते कामात झाडे बाधित
मुंबई विमानतळावर पावणे आठ कोटींच्या कोकेनसह परदेशी प्रवासी अटकेत
पिंपरी : रिक्षा चालकाने पावणेसात लाखांचे दागिने केले परत
पिंपरी : प्रवासी महिला रिक्षातून प्रवास करताना पावणे सात लाख रुपयांचे दागिने असलेली बॅग रिक्षामध्ये विसरली. मात्र प्रामाणिक रिक्षा चालकाने ती बॅग पोलिसांमार्फत संबंधित प्रवासी महिलेला परत केली. ही घटना नेवाळेवस्ती चिखली येथे ११ एप्रिल रोजी घडली. नेवाळेवस्ती येथील प्रतिभा काळे यांनी ११ एप्रिल रोजी नेवाळेवस्ती येथून चिखली गाव येथे रिक्षाने प्रवास केला. चिखली गाव येथे उतरल्यानंतर रिक्षामध्ये त्यांची सोने असलेली पर्स विसरली असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ चिखली पोलिसांकडे धाव घेतली. प्रतिभा काळे यांना संबंधित रिक्षाचा क्रमांक माहिती नसल्याने रिक्षा चालकाचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान होते.
पोलिसांनी नेवाळे वस्ती येथील रिक्षा स्टॉप वरून चिखली गाव दरम्यानच्या मार्गावरील वीस सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली. त्यामधून प्रतिभा काळे यांनी प्रवास केलेल्या रिक्षाचा नंबर पोलिसांनी मिळवला. त्यानंतर संबंधित रिक्षा चालक बाळू जाधव (चिखली) यांची पोलिसांनी भेट घेतली. त्यांची विचारपूस केली असता त्यांनी संबंधित बॅग सुरक्षित ठेवली असल्याचे सांगितले. तसेच दागिने असलेली बॅग रिक्षाचालक बाळु जाधव यांनी पोलिसांना परत केली. पोलिसांनी प्रामाणिक रिक्षाचालक बाळू जाधव यांचा सत्कार केला.
ग्रामीण भागात धोकादायक रसायनांची हाताळणी, पाच जणांवर गुन्हा दाखल, यापूर्वीही असे प्रकार उघडकीस
शिक्षक भरती घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार निलेश मेश्रामच्या पाच शाळा, ५० कोटींची संपत्ती
कळवा रुग्णालयात मोफत अन्नछत्र सुरू, दररोज शंभर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मिळणार मोफत जेवण
प्रशासकीय कारभार आता गतीमान आणि पेपरलेस, चंद्रपूर महापालिकेत…
ठाणे-बोरीवली भुयारी मार्गाला स्थानिक रहिवाशांचा विरोध, एमएमआरडीए अधिकाऱ्यांसोबत उद्या रहिवाशांची बैठक, बैठकीत आयआयटी अहवाल सादर होण्याची शक्यता
'चंद्रकांत खैरे अन् अंबादास दानवेंची उद्धव ठाकरेंना गरज नाही', शिंदे गटाच्या नेत्याची टीका
शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे. दोघांकडूनही एकमेकांवर टीका करण्यात येत असल्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. या वादावरून बोलताना शिवसेना शिवसेना (शिंदे) खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. "अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांची उद्धव ठाकरे यांना गरज नाही. चंद्रकांत खैरे आता जेष्ठ झाले आहेत. तसेच चंद्रकांत खैरे यांच्यावर नेहमीच अन्याय झाला आहे. चंद्रकांत खैरे यांचं काही ऐकलं जाईल असं मला वाटत नाही", अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली.
बुलेट ट्रेन मार्गावर ७० मीटर लांबीचा स्टील पूल उभारला; गुजरात, दादर नगर हवेलीत ७ स्टील पूल उभे
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात बदल… चांदीही २,४०० रुपयांनी…
"मतदारसंघात जा, निधी मिळाला म्हणून घोषणा कर अन् कामाला लाग…" गडकरी असे म्हणाले आणि आमदार हरखले…
Chandrakant Khaire : ठाकरे गटाच्या दोन नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर? "ते फक्त काड्या करतात", चंद्रकांत खैरे अंबादास दानवेंवर संतापले
Rohit Pawar : "एकनाथ शिंदेंच्या खात्यांमध्ये घुसखोरी केली, आता अजित पवारांचा नंबर", रोहित पवारांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हटलं?
उद्धव ठाकरेंचा पक्ष विनायक राऊत चालवतात, संजय घाडी यांचा आरोप, घाडी दांपत्याच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेच्या दोन गटात आरोप प्रत्यारोप
बुलढाणा : आठवडी बाजारात अग्नितांडव, जीवितहानी…
आणखी एक ‘डिजिटल अरेस्ट’चा सापळा, सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्याची ३१ लाखांची फसवणूक
बाबासाहेबांच्या जिवंतपणीच त्यांची पहिली जयंती कुणी साजरी केली होती?, पुण्यात हत्तीवरून मिरवणूक..
अर्थखात्याबाबत शिंदेंची अमित शाह यांच्याकडे तक्रार? छगन भुजबळांनी दिली 'ही' प्रतिक्रिया; म्हणाले
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे अर्थ खात्याकडून फाईली मंजूर होत नसल्याची तक्रार केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या चर्चांवर अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. आज या संदर्भात छगन भुजबळ यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, "त्याबाबत अजित पवार यांनी सांगितलं की आमच्यामध्ये काहीही धूसफूस नाही. सर्व व्यवस्थित असल्याचं ते म्हणाले. त्यामुळे ही चांगली गोष्ट आहे", असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
नव्यांना संधी दिली, मला पक्षाने डावलले नाही : सुधीर मुनगंटीवार
पंढरपूर : मंत्री असलं म्हणजे भाव असणे, असे वाटत नाही. नवीन लोकांना संधी द्यायची होती. त्याबाबत पक्षाने निर्णय घेतला. पक्षाने मला डावलले नाही, असे भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राऊत, वडेट्टीवार यांच्यावर टीका केली. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार येथील विठ्ठल दर्शनासाठी आणि खासगी कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. एकनाथ शिंदे हे अमित शहा यांच्याकडून अजितदादांना बोलणार नाहीत. शिंदे थेट कॅबिनेटमध्ये अजितदादा यांच्याशी बोलू शकतील. एकनाथ शिंदे हे चांगले नेते आहेत. त्यांच्या मनात कुठलीही तक्रार नसणार, असे मुनगंटीवार म्हणाले.
नाशिकच्या प्रमोशनबाबतच्या वक्तव्याबद्दल काही लोकांनी ट्विस्ट करायचे ठरवले होते. कारण, माझ्या व्याख्यानानंतर विरोधी नेत्यांचे व्याख्यान होते. त्यामुळे याठिकाणी आमचे सरकार आले पाहिजे, असे आपण म्हणालो होतो. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरून चालू असलेल्या वादावरही मुनगंटीवार बोलले. ज्यांना आपण भारतरत्न दिला, महाराष्ट्र भूषण दिले. त्यांच्याबद्दल चुकीचे बोलू नये. तुम्हाला शंका होती तर तुमचे सरकार असताना तुम्ही कारवाई करायला पाहिजे होती. अशी खोचक टिप्पणी विजय वडेट्टीवारांवर मुनगंटीवार यांनी केली. दरम्यान, मुनगंटीवार यांनी श्री विठ्ठल आणि रखुमाईचे दर्शन घेतले. या वेळी भाजपाचे आमदार समाधान आवताडे, प्रशांत परिचारक आदी उपस्थित होते. विठ्ठलाचे दर्शन घेतले की सात्विक आनंद मिळतो. सर्वांना सुखी ठेव, अशी प्रार्थना देवापुढे केल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.
पुणे : पबवर कारवाईचा बडगा, पोलिसांकडून पब ‘सील’
पुणे : कल्याणीनगर भागातील ‘युनिकाॅर्न हाऊस’ या पबविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. पोलिसांनी संबंधित पब लाखबंद (सील) केला.पब परिसरात गुरुवारी (११ एप्रिल) मध्यरात्री दोन गटांत वादावादी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मध्यरात्री पब बंद करण्यात आला होता. तसेच, आतमध्ये सफाईचे काम सुरू होते. यापूर्वी संबंधित पबविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच, दहा खटले दाखल करण्यात आले होते. पबच्या समोर झालेल्या वादावादीत पोलिसांकडे कोणी तक्रार दिली नाही, अशी माहिती येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली.
पबविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ कलम १४२ (२) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. संबंधित पब सील करण्यात आला. गैरप्रकारांना आळा बसावा म्हणून पोलिसांनी ही कारवाई केली आहे, असे पोेलिसांनी सांगितले.
जेसीबीची दुचाकीस धडक तरुण जागीच ठार, दुचाकीस धडक एकाचा मृत्यू
लातूर : जिल्ह्यातील रेणापूर- लातूर महामार्गावर जेसीबीने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक तरुण जागीच ठार झाल्याची घटना नेहरू नगर तांडा येथे रविवारी रात्री आठच्या सुमारास घडली. जोपर्यंत आरोपीला अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतल्याने तणाव निर्माण झाला होता व वाहतूकही विस्कळीत झाली होती.
पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार राजू मलिक शेख वय ३६ राहणार राजे नगर रेणापुर हा बांधकाम मिस्त्री म्हणून लातूर येथे काम करत होता. रविवारी रात्री आपल्या दुचाकीवरून तो घराकडे येत असताना नेहरूनगर तांडयाजवळ आरसखेडा पांदण रस्त्यावरून शेतकाम करून जेसीबी लातूर महामार्गावर येत होता यावेळी जेसीबी आणि दुचाकीची जोरात धडक झाली यामध्ये राजु शेख गंभीर झाला व त्याचा जागीच मृत्यू झाला.
नातेवाईक संतप्त झाले होते आरोपी जेसीबीसह पसार झाल्याने अपघातातील आरोपीला जोपर्यंत ताब्यात घेत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा नातेवाईकाने दिला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने आरोपीला अटक केली याप्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूर : स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सहा जणांना अटक
लातूर : लातूर रेल्वे स्टेशन रस्त्यावर औरा थाई स्पा येथे बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे उघडकीस आणले व या प्रकरणी सहा जणांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. तर त्या चार पिडीत महिलेची सुटका केली आहे.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे स्थानक नजीकच्या स्पा मध्ये वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे बनावट ग्राहक पाठवले या स्पॉवर आरोपी रोहन संजय वाघमारे, अनिरुद्ध इंगळे, परमेश्वर शिंदे, शशिकांत कांबळे, औदुंबर बडे ओमप्रसाद शिंदे या सर्वांना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी परप्रांतातील चार महिलांची सुटका ही पोलिसांनी केली आहे .पोलीस अधीक्षक सोमय मुंडे व अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
"गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रिपद मिळणार नाही, कारण...', 'या' नेत्याने केला दावा
शिवसेना शिंदे पक्षाचे नेते तथा मंत्री भरत गोगावले यांना रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळणार नाही. कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपावाले आता मोजत नाहीत. कारण खाते वाटपावरून, अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून, आर्थिक अधिकारावरून हे दिसून येत आहे. कारण यांच्या सर्व खात्यांचे निर्णय देवेंद्र फडणवीस हेच घेत आहेत. हे वेगवेगळ्या खात्यामधील निर्णयावरून दिसून येतं. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत शिंदे काहीही करू शकणार नाहीत", असं शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
ठाण्यात भाजपकडून ठाकरे गटाला धक्का, माजी नगरसेवक डिसोझा यांचा भाजपामध्ये प्रवेश
विशाल गवळीवर विठ्ठलवाडी स्मशानभूमीत मध्यरात्री अंत्यसंस्कार
मालवणीतील १४ हजार झोपड्यांचे म्हाडा करणार पुनर्वसन, ५१ हेक्टर जागेवरील राजीव गांधी नगरच्या पुनर्वसनासाठी लवकरच सल्लागार, वास्तुविशारदाची नियुक्ती
देव तारी त्याला कोण मारी.. तब्बल सहा दिवस विहिरीतील एका झाडाच्या फांदीला तो लटकून होता आणि "वाचवा वाचवा" अशी….
राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाचा तडाखा, (फोटो-प्रातिनिधीक छायाचित्र)