Maharashtra Breaking News : राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यामुळे विरोधकांकडून शिंदे गट-भाजपा सरकारवर सडूकन टीका केली जात आहे. तर हा प्रकल्प याआधीच्या महाविकास आघाडी सरकारमुळेच गेला आहे, असा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. राज्यात पैशांच्या मदतीनेच सत्तांतर झाले असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे समर्थक आमदार नितीन देशमुख यांनी केल्यामुळे खळबळ उडाली आहे. तर जागतिक पातळीवरही मोठ्या घडामोडी घडत असून ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
यासह क्रीडा, अर्थकारण तसेच सर्व क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर!
Mumbai- Maharashtra News Updates, 19 September 2022: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!
मालाड येथील एरंगळ समुद्रकिनाऱयाजवळील मच्छिमार समुदायासाठी बांधण्यात आलेली स्मशानभूमी जमीनदोस्त करण्यासाठी न्यायालयीन यंत्रणेचा गैरवापर करण्यात आला, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने सोमवारी केली. तसेच ही स्मशानभूमी जमीनदोस्त करण्याच्या उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भूमिकेवरही न्यायालयाने ताशेरे ओढले.
नवघर ते खोपटा पूल मार्गावरील पथदिव्याखाली अंधार पसरला आहे. जेएनपीटी बंदरावर आधारित गोदाम तसेच उरणच्या पूर्व आणि पश्चिम विभाग ये-जा करणाऱ्या वाहनांना त्रास सहन करावा लागत आहे. या सार्वजनिक प्रवासी वाहतुकीच्या रहदारीचा रस्ता अंधारात गेल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्य मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत, तर दहावीची परीक्षा ०२ मार्च ते २५ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे. वाचा सविस्तर बातमी…
तालुक्यातील ७५ पैकी ४१ ग्रामपंचायतींवर भाजप समर्थकांनी विजय मिळविला आहे. परंतु, दुधाळे येथील सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची पुतणी पराभूत झाल्याने गड आला आणि सिंह गेला अशी त्यांची अवस्था आहे. राज्यातील सत्तेत वाटेकरी असलेल्या शिंदे गट समर्थकांनी भाजपला कडवी झूंज देत २९ ग्रामपंचायतींमध्ये यश मिळविले आहे.
जिल्ह्यात पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने बाजी मारली असून पाचपैकी तीन सरपंच पदांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. या ठिकाणी माजी मंत्री व तिवसाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. एका ठिकाणी भाजपला संधी मिळाली असून एक जागा प्रहारच्या वाट्याला आली आहे.
शहरासह जिल्ह्यात आठ-दहा दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील कपाशीसह मका, सोयाबीन यांसह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. जिल्ह्यात सोमवारीही वादळी पाऊस सुरु राहिला. पावसामुळे जिल्ह्यातील जळगावसह चाळीसगाव, पारोळा, भडगाव, अमळनेर, पाचोरा, एरंडोल, चोपडा, रावेर, यावल आदी तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे.
वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीदेखील प्रसारमाध्यमांशी बोलताना एक मोठं विधान केलं आहे. वाचा सविस्तर बातमी…
पुण्याचे नियोजित विमानतळ पुरंदरऐवजी चाकणला करण्याची मागणी ‘फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन’ या उद्योजकांच्या संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. औद्योगिक पट्टा असल्याने चाकण परिसरात विमानतळ झाल्यास अनेक परदेशी कंपन्या गुंतवणुकीसाठी पुढे येतील, असा दावा या संघटनेने केला आहे.
टिटवाळ्यातील वासुंद्री रस्त्यावर नारायण निवास मध्ये राहणाऱ्या एका महिला आणि तिच्या दोन लहान मुलींना घरात बंदिस्त करुन तिच्या घरावर पेट्रोल ओतून त्यांना घरात जिवंत जाळण्याचा प्रकार बुधवारी रात्री मांडा टिटवाळा येथे घडला. या घराच्या आजुबाजुला असलेल्या रहिवाशांच्या घरांना मारेकऱ्यांनी कड्या लावल्या होत्या. त्यामुळे हे रहिवासी घरात कोंडून राहिले होते.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रविवारी डोंबिवलीतील एका कार्यक्रमात रस्ते, खड्डे, कल्याण डोंबिवली पालिकेतील आयुक्तांच्या मनमानीवरुन नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य केले. ही टीका जिव्हारी लागल्याने सोमवारी शिंदे समर्थक कल्याण डोंबिवली पालिकेतील माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी मंत्री चव्हाण यांना टीकेचे लक्ष्य केल्याने डोंबिवलीत राजकीय रण पेटले आहे.
नागरिकांना कोणत्या आजाराचा केव्हा त्रास होईल हे सांगता येत नाही. परंतु अखिल भारतीय आयुविज्ञान संस्थेत (एम्स) संध्याकाळी सहा वाजतानंतर उपचारासाठी आलेल्या रुग्णाला दाखल केले जात नाही, अशा तक्रारी आहेत. सायंकाळी सहा नंतर आलेल्या रूग्णांना दाखल करून घ्या, असे सांगत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी एम्सच्या अधिकाऱ्यांना सुनावले.
पर्यटन कंपन्यांच्या संकेतस्थळावर चांगले गुणांकन (रेटींग) दिल्यास दिवसाला एक हजार रुपये मिळतील असे सांगून काही भामट्यांनी एका आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची २७ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.
समता विचार प्रसारक संस्थेतर्फे ठाण्यात विद्यार्थ्यांसाठी वारली चित्रकलेचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. वारली चित्रकलेत प्रविण असलेल्या कलाकार शहनाज शेख आणि येऊर येथील आदिवासी समाजातील विद्यार्थी करीना साऊद यांच्या मार्गदर्शनाखाली दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये नुकतेच हे शिबीर पार पडले.
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे भातसा नदीला आलेल्या पुरामुळे पिसे येथील पंपाच्या मुखाजवळ कचरा अडकल्याने महापालिकेला पुरेशा प्रमाणात पाणी उचलणे शक्य होत नसून हा कचरा काढण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर इंदिरानगर संप येथील जलवाहीनी जोडणीचे काम हाती घेण्यात येणार आहे.
करोना काळात मुखपट्टीसक्ती न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई कोणत्या कायदेशीर तरतुदीअंतर्गत केली ? अशी विचारणा उच्च न्यायालयाने सोमवारी महापालिकेकडे केली. तसेच त्याबाबत दोन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. करोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेने नागरिकांना मुखपट्टी वापरणे बंधनकारक केले असेल किंवा ती परिधान न करणाऱ्यांकडून दंड वसूल केला असेल, तर ते व्यापक सार्वजनिक हितासाठी होते असे मानून आम्ही या प्रकरणात हस्तक्षेप करणार नाही, असेही मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने हे आदेश देताना प्रामुख्याने स्पष्ट केले.
भाजपा आमदार आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस हा दोन अडीच जिल्ह्यांपुरताच पक्ष आहे. तो राज्यस्तरावरचा पक्षच नाही.” असं त्यांनी म्हटलं आहे. वाचा सविस्तर बातमी…
अकोला : महाराष्ट्रासह संपूर्ण देश नासवण्याचे कार्य भाजपकडून सुरू आहे. महाराष्ट्राचे अहित करणे हेच भाजपचे कर्तृत्व आहे, अशी टीका शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केली. रविवारी अकोल्यात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. बातमी वाचा सविस्तर …
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आल आहे. दारुच्या नशेत असल्याने भगवंत मान यांना विमानातून खाली उतरवण्यात आल्याचा दावा केला जात असून, अकाली दलने हा मुद्दा लावून धरला आहे. भगवंत मान फ्रँकफूर्टहून दिल्लीला येत असताना शेवटच्या क्षणी त्यांचं विमान चुकलं आणि प्रवास एक दिवस पुढे ढकलण्यात आला. ‘द हिंदू’ने जर्मनी दौऱ्यावर असणाऱ्या भगवंत मान यांची प्रकृती ठीक नसल्याने विमान प्रवास लांबला असल्याचं वृत्त दिलं आहे. मात्र सोशल मीडियावर भगवंत मान यांच्याबाबत इतर दावे होत असून आम आदमी पक्षानेही त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
निफाड तालुक्यातील उगाव येथील पुलावरून दुचाकीवरून जात असताना तोल जाऊन पडल्याने महाविद्यालयीन युवती वाहनासह पाण्यात वाहून गेली. स्थानिकांनी धाव घेऊन तिला बाहेर काढले. परंतु, तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. सोमवारी सकाळी सात वाजता ही घटना घडली.
राज्य शासनाकडून महापालिकेत प्रतिनियुक्तीवर येणाऱ्या वर्ग एक अधिकाऱ्याची प्रतिनियुक्ती ही तीन वर्षासाठी कालबध्द असते. तीन वर्षानंतर किंवा अशा अधिकाऱ्याच्या कार्यक्षमतेप्रमाणे त्याची त्या पालिकेतून बदली केली जाते. कल्याण डोंबिवली पालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली कल्याण डोंबिवली पालिकेत नोव्हेंबर २०१८ मध्ये येऊन, त्यांचा प्रतिनियुक्ती तीन वर्षाचा कालावधी संपुनही शासनाने त्यांची आतापर्यंत बदली न केल्याने शासकीय, पालिका अधिकारी आश्चर्य व्यक्त करत आहेत.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. तैलिक महासभेने आज त्यांचा पुतळा जाळून निषेध नोंदवला. एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना पटोले यांनी ‘नरेंद्र मोदी हे ओबीसी नाहीत,’ असे वक्तव्य केले होते. यामुळे ओबीसी व तेली समाजाच्या भावना दुखावल्याचा सूर उमटला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. “नुकताच सेमी कंडक्टरचा प्रोजेक्ट महाराष्ट्राच्या हातातून हिसकावून घेतला गेला. फॉक्सकॉन'चा प्रोजेक्ट जर महाराष्ट्रात आला असता, तर इतर कंपन्यांनीही प्रोत्साहित होऊन त्यांचे प्रोजेक्ट आपल्या राज्यात आणण्यासाठी इच्छा व्यक्त केली असती. परंतु मुख्यमंत्री हे दिल्लीश्वरांच्या इच्छेपुढे नमले.” असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. वाचा सविस्तर बातमी…
रविवारी दापोलीमध्ये शिंदे गटाची सभा झाली आहे. या सभेतून माजी मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. येत्या काळात मी चिपळून आणि गुहागर येथे सभा घेऊन भास्कर जाधवांची पळता भुई थोडी करणार आहे, असं रामदास कदमांनी आपल्या भाषणात म्हटलं. रामदास कदमांच्या टीकेनंतर शिवसेना नेते भास्कर जाधवांनी त्यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. सविस्तर बातमी
वाढदिवसाचा केक कोयत्याने कापून समाजमाध्यमावर चित्रफीत प्रसारित करणाऱ्या एकाला गुन्हे शाखेने अटक केली. आतिष जालिंदर लांडगे (वय २६,रा. कासेवाडी, भवानी पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. लांडगे याने वाढदिवसानिमित्त कासेवाडीत हातात कोयता घेऊन भरचौकात दहशत माजविली.
घाटंजी शहरात रविवारी रात्रीच्या सुमारास एका अस्वलाने चांगलाच धुमाकूळ घातला. शहरातील जंगल परिसरातून रात्री ९ वाजताच्या सुमारास हे अस्वल न्यायालय परिसरात आले. रात्री अस्वल बघायला नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती.
कार्यालयीन वेळ चुकवत कायमच उशिराने कार्यालयात येणाऱ्या उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांचा आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. स्वयंचलित हजेरी पद्धत असतानाही हे कामगार उशिराने येत असल्याने त्याचा कामकाजावर परिणाम होत होता. त्यात विभाग प्रमुखही कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.
पत्राचाळ प्रकरणी अटक करण्यात आलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली आहे. आता संजय राऊतांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम आणखी १४ दिवस वाढला आहे. आज त्यांची न्यायालयीन कोठडी संपल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. पुन्हा एकदा सुनावणी घेण्यात आली होती. वाचा सविस्तर बातमी…
डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा, नवनवीत नगर, लोढा हेरिटेज भागातील सोसायट्यांच्या आवारात रात्रीच्या वेळेत येऊन तेथील दुचाकींमधील पेट्रोल चोरुन काळ्या बाजारात विकणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणाला लोढा हेरिटेजमधील रहिवाशांनी दोन दिवसापूर्वी पकडून मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. बातमी वाचा सविस्तर …
महाराष्ट्रात होणारा वेदांता प्रकल्प गुजरातला हलविण्यात आला आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प पळविण्याचा घाट घालून मुंबई, महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा डाव रचला जात असल्याचा आरोप माजीमंत्री छगन भुजबळ यांनी केला. ही दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पुणे : समाजातील बेरोजगारीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे बेरोजगारी व महागाईविरोधी प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. बातमी वाचा सविस्तर …