Maharashtra Breaking News  : राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यामुळे विरोधकांकडून शिंदे गट-भाजपा सरकारवर सडूकन टीका केली जात आहे. तर हा प्रकल्प याआधीच्या महाविकास आघाडी सरकारमुळेच गेला आहे, असा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. राज्यात पैशांच्या मदतीनेच सत्तांतर झाले असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे समर्थक आमदार नितीन देशमुख यांनी केल्यामुळे खळबळ उडाली आहे. तर जागतिक पातळीवरही मोठ्या घडामोडी घडत असून ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यासह क्रीडा, अर्थकारण तसेच सर्व क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर!

Live Updates

Mumbai- Maharashtra News Updates, 19 September 2022: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

13:59 (IST) 19 Sep 2022
लोकसभेसाठी भाजपचे ‘मिशन ४५’; केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव बुलढाण्यात

बुलढाणा : ‘मिशन ४५’ अंतर्गत बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील आपल्या पहिल्या दौऱ्यात केंद्रीय श्रम, वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी रविवारी बैठकींचा सपाटा लावला. त्यांनी खामगाव मतदारसंघात आयोजित विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसह विविध समाजघटकांचे विचार ऐकून घेत आपल्या मार्गदर्शनात ‘शत प्रतिशत भाजप’वर भर दिला. बातमी वाचा सविस्तर …

13:47 (IST) 19 Sep 2022
अमित शाहांनी उद्धव ठाकरेंना अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद कबूल केलं होतं? राज ठाकरे स्पष्टच बोलले

महाराष्ट्राच्या राजकारणात मी इतका गोंधळ आणि इतकी प्रतारणा आजपर्यंत पाहिलेली नाही. कोण कोणासोबत जात आहे आणि कोण सत्ता स्थापन करत आहे, विरोधी पक्षात कोण बसत आहे यावर इतका गोंधळ मी इतक्या वर्षाच्या राजकारणात पाहिलेला नाही असा संताप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. राज ठाकरे पाच दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर असून आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, यावेळी त्यांनी भाजपा-शिवसेनेची युती तुटण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या मुद्द्यावरही भाष्य केलं. भाजपा-शिवसेना युतीमध्ये १९८९ साली मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्यूला ठरला होता याची आठवणही त्यांनी करुन दिली.

सविस्तर बातमी

13:46 (IST) 19 Sep 2022
दसरा मेळाव्यावरुन उद्धव ठाकरे-शिंदे गट आमने-सामने असताना शरद पवारांचं विधान, म्हणाले “शिंदेंनाही अधिकार, पण…”

दसरा मेळाव्यासाठी दादरचे शिवाजी पार्क मैदान मिळविण्याकरिता शिवसेना आणि बंडखोर आमदारांच्या गटामध्ये रस्सीखेच सुरू असून मुंबई महापालिकेने कोणाला परवानगी द्यायची याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. दुसरीकडे, वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदान मिळावे याकरिता बंडखोर आमदारांच्या गटाने केलेला अर्ज ‘एमएमआरडीए’ने स्वीकारला आहे. त्यामुळे शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी मैदान मिळणार की नाही याचं उत्तर अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर भाष्य केलं आहे.

सविस्तर बातमी

13:13 (IST) 19 Sep 2022
घरबसल्या ऑनलाईन खोटे रेटींग देण्याचे काम पडले महागात

ठाणे : पर्यटन कंपन्यांच्या संकेतस्थळावर खोटे रेटींग दिल्यास दिवसाला एक हजार रुपये मिळतील असे सांगून काही भामट्यांनी एका आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची २७ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे. बातमी वाचा सविस्तर …

12:22 (IST) 19 Sep 2022
पुण्यातील रंगपंढरी संस्थेची ‘विषाद’ एकांकिका ठरली प्रकाश इनामदार करंडकाची मानकरी

पुणे : रंगपंढरी, पुणे या संस्थेच्या कलाकारांनी सादर केलेली ‘विषाद’ एकांकिका सांघिक विजेतेपदासह विनोदमूर्ती प्रकाश इनामदार करंडकाची मानकरी ठरली. विजय पटवर्धन फाऊंडेशन आयोजित या स्पर्धेत कलादर्शन संस्थेच्या ‘यशोदा’ आणि मुक्ताई फाऊंडेशनच्या ‘उरूस’ एकांकिकेने अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. बातमी वाचा सविस्तर …

12:09 (IST) 19 Sep 2022
काँग्रेसच्या राजस्थान अधिवेशनातील निर्णयाला बगल

चंद्रपूर : अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या राजस्थान येथे झालेल्या अधिवेशनात एकाच कुटुंबातील दोन सदस्यांना पदे न देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, प्रदेश काँग्रेस समितीत प्रदेश प्रतिनिधी म्हणून जिल्ह्यातून खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे, राजुराचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी आमदार अविनाश वारजूरकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतिश वारजूरकर या एकाच कुटुंबाला संधी देण्यात आली आहे. बातमी वाचा सविस्तर …

11:39 (IST) 19 Sep 2022
“…देशातील ८ राज्यांनी,” खरी शिवसेना आणि दसरा मेळाव्यावरून भाजपा खासदाराचे विधान

भाजपाचे खासदार प्रसाद लाड यांनी खरी शिवसेना कोणाची? तसेच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर भाष्य केले आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असल्याचे मत जनतेचे आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे. त्यामुळे जनतेला शिंदे यांच्या दसरा मेळाव्यामध्येच विचारांचे सोने लुटायला आवडेल, असे लाड म्हणाले आहेत. ‘एबीपी माझा’ने याबाबतचे सविस्तर वृत्त दिले आहे. वाचा सविस्तर

11:24 (IST) 19 Sep 2022
बांबूची उत्पादने विकण्यासाठी ‘ई-मार्केटिंग’ची स्वतंत्र व्यवस्था

नागपूर : राज्यातील बाबू कारागिरांना एकत्र करून त्यांनी तयार केलेली बांबूची विविध उत्पादने विकण्यासाठी ई-मार्केटिंगची स्वतंत्र व्यवस्था उभी करण्याची योजना आहे. शिवाय बुरुड येथे ‘कॉमन फॅसिलिटी सेंटर’ सुरू करणार असल्यामुळे त्याचा फायदा ग्रामीण आणि आदिवासी भागातील लोकांना होईल, असे प्रतिपादन प्रधान मुख्य वन संरक्षक (वनबल प्रमुख) वाय. एल. पी. राव यांनी केले. बातमी वाचा सविस्तर …

11:09 (IST) 19 Sep 2022
पुणे जिल्ह्यात १७६ जणांना नव्याने करोनाचा संसर्ग

रविवारी दिवसभरात जिल्ह्यातील १७६ जणांना करोना संसर्गाचे निदान झाले. राज्याच्या साथरोग सर्वेक्षण विभागाने याबाबत माहिती दिली. मात्र, बहुसंख्य करोना रुग्णांना सौम्य लक्षणे असून ते घरच्या घरी बरे होत असल्याने घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बातमी वाचा सविस्तर …

10:52 (IST) 19 Sep 2022
‘लंपी’ आजाराचा प्रभाव वाढतोय ; ३ जनावरांचा मृत्यू, ३८ बाधित

नागपूर : जिल्ह्यामध्ये सावनेर, हिंगणा, मौदा, पारशिवनी, नागपूर ग्रामीण या पाच तालुक्यात ‘लंपी’ आजाराचा अधिक प्रादुर्भाव असून आतापर्यंत तीन जनावरे मृत्युमुखी पडली तर ३८ जनावरे बाधित झाली आहेत. बातमी वाचा सविस्तर …

10:41 (IST) 19 Sep 2022
झवेरी बाजारात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्याला अटक

मुंबई : मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून झवेरी बाजार व अहमदनगर येथे बॉम्ब ठेवल्याची धमकी दिल्याप्रकरणी लोकमान्य टिळक (एल.टी.) मार्ग पोलिसांनी २४ वर्षीय आरोपीला अटक केली. त्याच्याकडून मोबाइल संच जप्त करण्यात आला असून त्याच मोबाइलच्या साहाय्याने आरोपीने धमकी दिल्याचा पोलिसांना संशय आहे. बातमी वाचा सविस्तर …

10:30 (IST) 19 Sep 2022
फाल्गुनी पाठकच्या कार्यक्रमाविरोधात उच्च न्यायालयात याचिका

मुंबई : कांदिवली (पश्चिम) येथे प्रमोद महाजन क्रीडा संकुलावर नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दांडिया क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या फाल्गुनी पाठक हिच्या कार्यक्रमाविरोधात उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. बातमी वाचा सविस्तर …

10:11 (IST) 19 Sep 2022
नाशिक : जायकवाडी तुडूंब भरेल इतके पाणी प्रवाहीत

सर्वच धरणे तुडूंब असताना पावसाचा जोर कायम असल्याने या हंगामात नाशिकमधून जायकवाडीच्या दिशेने आतापर्यंत तब्बल १०४ टीएमसी पाणी प्रवाहीत झाले आहे. मराठवाड्यातील जायकवाडी हे १०२ टीएमसी क्षमतेचे विशाल धरण आहे. बातमी वाचा सविस्तर …

09:56 (IST) 19 Sep 2022
“मला अमितभाई शाहांवर विश्वास असून ते मला नक्की न्याय देतील, ते नेहमी…”; पुण्यामध्ये पत्रकारांसमोर सुप्रिया सुळेंचं विधान

“अमित शाह खरं बोलतात. अनेकदा मला हा अनुभव आला आहे. मला नक्की खात्री आहे की ते मला एक महिला खासदार म्हणून न्याय देतील,” असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळेंनी पुण्यामध्ये रविवारी सायंकाळी हे विधान केलं. येथे क्लिक करुन जाणून घ्या नेमकं प्रकरण आहे तरी काय…

09:55 (IST) 19 Sep 2022
‘संपूर्ण जीवन स्वराधीन राहो, हा आशीर्वाद द्यावा’ – कलापिनी कोमकली यांची भावना

पुणे : किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डाॅ. प्रभा अत्रे यांच्या नावाचा पुरस्कार त्यांच्याच हस्ते स्वीकारला याचा आनंद वाटतो. त्यांच्याप्रमाणेच माझे संपूर्ण जीवन स्वराधीन राहो, हा आशीर्वाद मला द्यावा. हा आशीर्वादच माझा मार्ग प्रशस्त करेल, अशी भावना प्रसिद्ध गायिका कलापिनी कोमकली यांनी रविवारी व्यक्त केली. बातमी वाचा सविस्तर …

09:35 (IST) 19 Sep 2022
रेल्वे स्थानकाबाहेर प्रवासी महिलेच्या खूनातील रहस्य उलगडले

पनवेल : चार दिवसांपूर्वी पनवेल रेल्वेस्थानकातील पूर्वबाजूस नवीन पनवेल वसाहतीमध्ये स्थानक परिसरात ३९ वर्षीय प्रियंका रावत या प्रवासी महिलेचा अनोळखी मारेक-यांनी खून केल्याच्या घटनेने सर्वत्र खळबळ माजली होती. या प्रकरणी नवी मुंबई पोलीस दलाने वेगवेगळी शोधपथक स्थापन करुन मारेक-यांचा तपास सुरु केला होता. बातमी वाचा सविस्तर …

09:30 (IST) 19 Sep 2022
बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा काही संशय आहे का? रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर टीका

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेच्या माध्यमातून केलेल्या टीकेला आता शिंदे गटाकडून उत्तर दिलं जात आहे. दापोलीमध्ये शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंना उत्तर देण्यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाही लक्ष्य केलं. बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा संशय आहे का? अशी विचारणा रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना केली.

सविस्तर बातमी

09:29 (IST) 19 Sep 2022
“…तर मी व्हिडीओ बाहेर काढणार”, नितीश देशमुख यांचा शिंदे गटाला इशारा

शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत. सूरत आणि गुवाहाटीमधील अनेक व्हिडीओ आपल्याकडे असून, ते समोर आणण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. नितीन देशमुख एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेले होते. मात्र नंतर ते तेथून परत आले होते. अकोल्यात शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी शिंदे गटासोबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही लक्ष्य केलं.

सविस्तर बातमी

09:28 (IST) 19 Sep 2022
पुण्यात शिवशाही बस आणि कंटेनरची धडक होऊन भीषण अपघात, सहाजण जखमी

पुणे-सासवड रोडवरील ऊरळी देवाची येथे शिवशाही बस आणि कंटेनरची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहाजण जखमी झाले असून, त्यापैकी एक गंभीर जखमी आहे.

सविस्तर बातमी

09:07 (IST) 19 Sep 2022
“राज्यात पैशांनी सत्तांतर झालं, …तर विधानसभेत आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही”

नितीन देशमुख हे शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत, जे गुवाहाटी येथून उद्धव ठाकरे यांच्याकडे परतले होते. याच नितीन देशमुखांनी आता राज्यातील सत्तांतरावर मोठे विधान केले आहे. राज्यात पैशांच्या मदतीने सत्तांतर झाले असून मी ते सिद्ध करू शकलो नाही, तर महाराष्ट्राच्या विधानसभेत आत्महत्या करेन, असे नितीन देशमुख म्हणाले आहेत. ते रविवारी (१८ सप्टेंबर) अकोला जिल्ह्यात एका सभेला संबोधित करत होते. वाचा सविस्तर

09:06 (IST) 19 Sep 2022
“पहिल्या यादीत माझे नाव होते, पण…” मंत्रीमंडळ विस्तारावर आमदार भरत गोगावले यांचे विधान

मंत्रीमंडळ विस्तारावर शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात माझे नाव होते. मात्र काही नेत्यांनी मंत्रिपदाची मागणी केल्यामुळे माझे नाव बाद झाले, असे भरत गोगावले म्हणाले आहेत. ते दापोलीमध्ये एका सभेला संबोधित करत होते. यावेळी बोलताना त्यांनी वरील विधान केले. वाचा सविस्तर

मुंबई महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज अपडेट, महाराष्ट्र न्यूज अपडेट