Maharashtra Breaking News Highlights: काँग्रेसने देशभरात महागाईविरोधात आंदोलन सुरू केलं आहे. महाराष्ट्रातही काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. दुसरीकडे राज्यातील सत्तासंघर्षावरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यावरही राज्यात राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. याशिवाय ईडी कारवाईवरूनही आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे. एकूणच पावसासह राज्यातील इतर सर्व राजकीय घडामोडींचा आढावा एकाच ठिकाणी…

Live Updates

Maharashtra Political Crisis Live Updates, 05 August 2022 : पावसासह राज्यातील इतर सर्व राजकीय घडामोडींचा आढावा एकाच ठिकाणी...

20:19 (IST) 5 Aug 2022
तेजस ठाकरे खरंच राजकारणात सक्रीय होणार? आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितले; म्हणाले

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षात उभी फूट पडली. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले तसेच शिवसेना पक्षदेखील खिळखिळा झाला. पक्षाला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. तसेच दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांचे नातू तथा उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे हेदेखील राजकारणात सक्रीय होऊ शकतात असे म्हटले जात आहे. दरम्यान, तेजस ठाकरे खरंच राजकारणात येणार का? या प्रश्नाचे आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. वाचा सविस्तर

17:44 (IST) 5 Aug 2022
पुणे : सुरेश कलमाडी पुन्हा राजकारणात ? ; ‘पुन्हा येईन’, या विधानाने राजकारणात चर्चा

महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असतानाच काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी शुक्रवारी महापालिकेत दाखल झाले. तब्बल दहा वर्षानंतर कलमाडी महापालिकेत आले.

सविस्तर वाचा

16:21 (IST) 5 Aug 2022
सुरेश कलमाडी तब्बल १० वर्षानंतर पुणे महापालिकेत

पुण्यात महापालिका निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. पुण्यात प्रामुख्याने भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये लढत होणार असे दिसत आहे. असं असलं तरी काँग्रेस देखील आता मोठ्या ताकतीने मैदानात उतरण्याची तयारी करत आहे. याचं कारण म्हणजे गेल्या काही वर्षांपासून सक्रिय राजकारणातून बाजूला असलेले काँग्रेसचे नेते सुरेश कलमाडी सक्रीय झाले आहेत.

16:01 (IST) 5 Aug 2022
VIDEO: अमरावतीत दोन ट्रकचा भीषण अपघात, वाहनातील लोखंडी सळई घुसून चार जणांचा मृत्यू

अमरावतीत नागपूर-औरंगाबाद महामार्गावर दोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही ट्रकमधील चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. महामार्गावरील खड्डा वाचवताना हा अपघात झाला. अपघातामूळे बराच वेळ महामार्गावरील वाहतूक खोळंबली. त्यामुळे तब्बल ८ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

सविस्तर बातमी...

16:00 (IST) 5 Aug 2022
VIDEO: प्रियंका गांधींना ओढत, फरफटत घेतलं ताब्यात, काँग्रेसच्या बेरोजगारी, महागाई विरोधातील आंदोलनावर पोलिसांची कारवाई

काँग्रेसकडून महागाई, बेरोजगारी विरोधात आंदोलनात करण्यात येत आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींपासून खासदार राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधींपर्यंत सर्वच नेते रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीत काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ओढत, फरफटत ताब्यात घेतलं आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काँग्रेसकडून पोलीस बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा आरोप केला आहे.

सविस्तर बातमी...

15:59 (IST) 5 Aug 2022
Congress Protest against Inflation : महागाईविरोधात आंदोलन करणारे काँग्रेस नेते पोलिसांच्या ताब्यात

Congress Protest against Inflation : काँग्रेसने महागाईविरोधात देशव्यापी आंदोलन सुरू केलं आहे. महाराष्ट्रातही काँग्रेसचे वरिष्ठ नेते व कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले दिसले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात मुंबईत विधिमंडळासमोर आंदोलन करण्यात आलं. हा मोर्चा विधिमंडळापासून राजभवनकडे जाणार होता. मात्र, त्याआधीच पोलिसांनी काँग्रेस नेत्यांची धरपकड केली. नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सविस्तर बातमी...

14:37 (IST) 5 Aug 2022
“दंतवैद्यक महिलेला सहज काम मिळू शकते, विभक्त पतीच्या आर्थिक मदतीची तिला आवश्यकता नाही”

दंतवैद्यक महिलेला सहज काम मिळू शकते. विभक्त पतीच्या आर्थिक मदतीची तिला आवश्यकता नाही, अशी टिप्पणी महिलेची देखभाल खर्चाची मागणी फेटाळताना कनिष्ठ न्यायालयाने केली. अर्जदार महिला मुंबईसारख्या बहुभाषिक शहरात वास्तव्यास आहे. त्यामुळे दंतवैद्यक म्हणून तिला अनेक संधी उपलब्ध आहेत. तिला सहज नोकरी मिळू शकते. ती एक उच्चशिक्षित महिला आहे आणि तिला विभक्त पतीच्या आर्थिक सहाय्यावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही, असे बोरिवली महानगरदंडाधिकारी एस. पी. केकन यांनी आदेशात नमूद केले. तसेच देखभाल खर्चाची मागणी करणाऱ्या या महिलेला दिलासा देण्यास नकार दिला. वाचा सविस्तर बातमी...

13:53 (IST) 5 Aug 2022
‘एसटी’चा ‘इतिहास’ उद्घाटनाच्या प्रतिक्षेत; ‘सेल्फी विथ एसटी’चेही उद्घाटन बाकी

पुणे ते नगर मार्गावर पहिली एसटी बस १९४८ साली रवाना झाली. त्यानंतर एसटीचा विस्तार वाढला आणि नवनवीन बसगाड्या सेवेत येऊ लागल्या. प्रवाशांना या बसगाड्यांचा इतिहास सांगणाऱ्या प्रतिकृती एसटीच्या कुर्ला नेहरुनगर आगारातील प्रवेशद्वारांवरच ठेवण्यात आल्या आहेत. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून इतिहास सांगणाऱ्या या प्रतिकृती उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहेत. याशिवाय आगाराच्या प्रवेशद्वाराला लागूनच उभारलेल्या ‘सेल्फी विथ एसटी’चेही उद्घाटन बाकी आहे. वाचा सविस्तर बातमी...

13:39 (IST) 5 Aug 2022
पुणे-सातारा महामार्गाच्या दुरवस्थेचा मुद्दा सुप्रिया सुळे यांच्याकडून पुन्हा अधोरेखित

पुणे-सातारा महामार्गाची ठिकठिकाणी दुरवस्था झाली असून या रस्त्याची डागडुजी-दुरुस्तीसह तेथे सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी सविस्तर ट्वीट केले आहे. यापूर्वीही त्यांनी वारंवार यासंदर्भात केंद्र सरकारकडे या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत पाठपुरावा केला आहे. वाचा सविस्तर बातमी...

13:20 (IST) 5 Aug 2022
पुणे : २५ प्रवाशांना सुखरूप करून चालकाने सोडले प्राण; जालिंदर पवार यांच्या जिगरबाज वृत्तीचे कौतुक

आपल्या प्रकृतीची तमा न करता गाडीतील २५ प्रवाशांना सुखरूप करून एसटी चालकाने प्राण सोडले. चालक जालिंदर पवार ( वय ४५, रा. पळशी, ता. खटाव, जि. सातारा) या चालकाच्या जिगरबाज वृत्तीचे कौतुक होत आहे. “शो मस्ट गो ऑन’ असे म्हणत दुसऱ्या चालकासह एसटी पुढच्या प्रवासाला मार्गस्थ झाली. वाचा सविस्तर बातमी...

13:15 (IST) 5 Aug 2022
ठाणे : वाढत्या ‘सीएनजी’ दरामुळे रिक्षा भाडेवाढ मागणी पुढे येणारच – जितेंद्र आव्हाड

“वर्षभरामध्ये सीएनजीचा दर ३६ रुपयांनी वाढला असून त्यात आणखी ६ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे रिक्षाचे भाडे वाढवायची मागणी पुढे येणार आणि सगळे जण रिक्षा वाल्यांना शिव्या घालणार, हे विसरुन की तेही आपल्यासारखे आहेत.”, असे मत व्यक्त करत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रिक्षा भाडेवाढीचे समर्थन केले आहे. सध्याच्या महागाईचा विचार करता रिक्षा चालक आपला संसार कसा चालवत असतील याचा आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा, असेही त्यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर बातमी...

12:58 (IST) 5 Aug 2022
महागाई आणि दडपशाही या मोदींच्या धोरणाचा निषेध - आमदार यशोमती ठाकूर

काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या, "केंद्रातील मोदी सरकारने दुजाभाव करीत सामान्य जनतेचा छळ चालवला आहे. हे सरकार शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय करीत आहे. सरकारविरोधात बोलणाऱ्यांनाही त्रास दिला जात आहे. आम्ही महागाई आणि दडपशाही या मोदींच्या धोरणाचा जाहीर निषेध करतो."

12:26 (IST) 5 Aug 2022
शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरेंना पहिलं यश

पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर शिंदे गटासोबत संघर्ष सुरु असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पहिलं यश मिळालं आहे. सोलापूरमधील चिंचपूर ग्रामपंचायतीमध्ये उद्धव ठाकरे गटाचा विजय झाला आहे. ठाकरे गटाने चिंचपूर ग्रामपंचायतीमधील सर्व सात जागा जिंकल्या आहेत. ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा फडकल्याने ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. या निकालाने सोलापुरात वर्चस्व असणारे माजी सहकारमंत्री आणि भाजपा आमदार सुभाष देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे.

सविस्तर बातमी

12:09 (IST) 5 Aug 2022
पुणे : ‘बीआरटी’ मार्गातील बसला रिक्षाने दिली पाठी मागून धडक; रिक्षाचालक जखमी

पुणे-सातारा बीआरटी मार्गावर स्टॉपवर थांबलेल्या पीएमपीएमएल बसला एका रिक्षा चालकांने जोरात धडक दिल्याची घटना घडली. तर या घटनेत रिक्षा चालक जखमी झाला आहे. वाचा सविस्तर बातमी...

12:07 (IST) 5 Aug 2022
पुणे: फिल्म इन्स्टिट्यूटच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या

पुण्यातील फिल्म ॲंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या ( एफटीआयआय) मुलांच्या वसतिगृहामध्ये एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डेक्कन पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अद्याप आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. वाचा सविस्तर बातमी...

11:51 (IST) 5 Aug 2022
महागाईविरोधात राज्यव्यापी आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना अटक

काँग्रेसने महागाईविरोधात राज्यव्यापी आंदोलन पुकारल्यामुळे काँग्रेस नेत्यांना अटक केल्याची माहिती दिली आहे. ED सरकारच्या दबावतंत्रासमोर आम्ही झुकणार नाही, जनतेचे प्रश्न मांडण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकणार नाही, असंही काँग्रेसने ट्वीट करत म्हटलं आहे.

https://twitter.com/INCMaharashtra/status/1555435934853861376

11:45 (IST) 5 Aug 2022
Maharashtra Cabinet: …नेमकं कशाला घाबरत आहात? अजित पवारांची शिंदे सरकारला विचारणा, म्हणाले “हे भूषणावह नाही”

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप प्रलंबित असल्याने विधासनभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाराजी जाहीर केली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी नेमकी कोणत्या गोष्टीची भीती आहे? अशी विचारणा अजित पवारांनी केली आहे. अजित पवारांचा बारामतीमध्ये जनता दरबार पार पडला. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं. लोक आत्महत्या करण्यापर्यंत पावलं उचलत असून हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही असं सांगत त्यांनी पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत करण्याची मागणी केली आहे.

सविस्तर बातमी

11:42 (IST) 5 Aug 2022
पुणे : सदनिकेचा वेळेत ताबा न देता म्हाडाच्या लाभार्थ्यांची फसवणूक

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास महामंडळाच्या (म्हाडा) योजनेतील सदनिकांचा ताबा मुदतीत न देणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण होणार नाही, याची कल्पना असतानाही व्यावसायिकाने आर्थिक फायद्यासाठी प्रकल्पाचा प्रस्ताव म्हाडाकडे देऊन पंधरा लाभार्थ्यांची आणि सरकारची सुमारे चार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. वाचा सविस्तर बातमी...

11:40 (IST) 5 Aug 2022
गडचिरोली : जहाल महिला नक्षलवादीला अटक; एटापल्ली पोलिसांची कामगिरी

नाकाबंदी करून जहाल महिला नक्षलवादी मुडे हिडमा मडावीला अटक करण्यात एटापल्ली पोलिसांना यश आले आहे. दंडकारण्यात नक्षलवाद्यांनी २८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत शहीद सप्ताह पुकारला होता. यामुळे गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली होती. वाचा सविस्तर बातमी...

11:39 (IST) 5 Aug 2022
नागपूर : फडणवीसांच्या दबावामुळे मुख्यमंत्री शिंदेंनी प्रभाग रचना बदलली – नितीन राऊतांचा आरोप

तीन सदस्यीय प्रभाग रचनेमुळे पराभव होण्याची भीती भाजपला असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर यांनी प्रभाग रचना बदलली, अशी टीका काँग्रेसचे नेते व माजी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली.

वाचा सविस्तर बातमी...

11:35 (IST) 5 Aug 2022
गडचिरोली : जहाल महिला नक्षलवादीला अटक; एटापल्ली पोलिसांची कामगिरी

नाकाबंदी करून जहाल महिला नक्षलवादी मुडे हिडमा मडावीला अटक करण्यात एटापल्ली पोलिसांना यश आले आहे. दंडकारण्यात नक्षलवाद्यांनी २८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत शहीद सप्ताह पुकारला होता. यामुळे गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली होती.

सविस्तर वाचा...

11:35 (IST) 5 Aug 2022
नागपूर : विविध रुग्णालंयामध्ये ४६ ‘स्वाईन फ्लू’ग्रस्तांवर उपचार सुरू; आतापर्यंत पाच रुग्णांचा मृत्यू

नागपुरमध्ये ‘स्वाईन फ्लू’ चा संसर्ग वाढत असून सध्या शहरातील विविध रुग्णालयांत या आजाराचे तब्बल ४६ रुग्ण दाखल आहेत. आतापर्यंत पाच रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर बातमी...

11:34 (IST) 5 Aug 2022
पुणे : सदनिकेचा वेळेत ताबा न देता म्हाडाच्या लाभार्थ्यांची फसवणूक

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास महामंडळाच्या (म्हाडा) योजनेतील सदनिकांचा ताबा मुदतीत न देणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण होणार नाही, याची कल्पना असतानाही व्यावसायिकाने आर्थिक फायद्यासाठी प्रकल्पाचा प्रस्ताव म्हाडाकडे देऊन पंधरा लाभार्थ्यांची आणि सरकारची सुमारे चार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

सविस्तर बातमी...

Maharashtra News Live Updates Today

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स, महाराष्ट्र पॉलिटिकल अपडेट्स

Story img Loader