Mumbai- Maharashtra News Updates in Marathi : टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं निधन झालं आहे. पालघरमधील चारोटी येथे झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांनी आपला जीव गमावला. रविवारी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास सूर्या नदीवरील पुलावर चालकाचा ताबा सुटल्याने दुभाजकाला कार आदळून हा अपघात झाला. अपघातात सायरस मिस्त्री यांच्यासह आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान दोघे जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूनंतर विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. उद्योग क्षेत्रातूनही मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शिवसेनेशी समोरून दोन हात करता येत नाहीत. मग फोडा-झोडा-मजा पहा. आपापसात झुंज लावा ही ब्रिटिश नीती अवलंबली जात आहे असा गंभीर आरोप शिवसेनेने ‘सामना’च्या संपादकीयमधून केला आहे. शिवतीर्थावरच दोन तट पाडून कमळाबाईचा भाजपा आज आनंदाने नाचत आहे, पण ते स्वप्नरंजनात दंग आहेत. मराठी माणूस आपसात लढवला जात आहे. कमळाबाईचे हेच तर मिशन होते. ज्यांचे पक्ष कमिशनखोरीच्या मलिद्यावर तरारले आहेत त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार? अशी टीकाही शिवसेनेने केली आहे.
“पण हे राज्य शिवरायांचे आहे. येथे बाळासाहेब ठाकरे यांनी स्वाभिमानी मर्द मावळे घडवले, ते मेल्या आईचे दूध प्यायलेले नाहीत याचे भान राखा! बाकी सारे शिवतीर्थावरच!”, असा इशारा ‘सामना’तून देण्यात आला आहे.
Mumbai- Maharashtra Live News Today, 05 September 2022 : गणेशोत्सव आणि पावसासह राज्यातील सर्व राजकीय घडामोडींचा आढावा एकाच ठिकाणी…
घरात गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्याने मौलवींकडून आपल्याला धमकी दिली जात असल्याचा दावा भाजपा नेत्या रुबी खान यांनी केला आहे. रुबी खान यांनी उत्तर प्रदेशातील मेरठ येथील आपल्या घरी गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली आहे. राम मंदिराची पायाभरणी झाली आणि घरात पूजा केली तेव्हा आपल्याविरोधात फतवा काढण्यात आला होता असा दावाही त्यांनी केला आहे.
‘टाटा सन्स’चे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रविवारी भीषण अपघातात मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्यासह प्रवास करणारे जहांगीर दिनशा पंडोल यांचाही मृत्यू झाला, तर इतर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. राज्य सरकारने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे आनंद महिंद्रा यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये, आनंद महिंद्र यांनी यापुढे गाडीतून प्रवास करताना सीट बेल्ट लावूनच प्रवास करण्याची शपथ घेतली आहे.
रेल्वेगाडीची प्रतीक्षा करत फलाटावर बसलेल्या प्रवाशांना तेथे अचानक साप दिसल्याने त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. भीतीपोटी त्यांची पळापळ सुरू झाली. ही घटना नागपूर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक सहावर रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. बातमी वाचा सविस्तर...
महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या एका तरुणीला अर्धवेळ नोकरीचे आमिष दाखवून ऑनलाईन प्रणालीतून भामट्याने विद्यार्थिनीची दोन लाख २६ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. नोकरी नाहीच, पण घेतलेले पैसे परत मिळणार नाहीत याची खात्री झाल्यावर तरुणीने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. बातमी वाचा सविस्तर...
गणपती बाप्पा दर्शन भ्रमंती करत असताना सोमवारी पहाटे खा. शिंदे यांना भूक लागली. मग त्यांनी कल्याण मधील प्रसिध्द गरम चहा, मलई पाववर कार्यकर्त्यां सोबत भुकेच्या भरात ताव मारला.
शिवसेनेने ‘सामना’ अग्रलेखातून टीका केल्यानंतर भाजपा नेत्यांनी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेशी समोरून दोन हात करता येत नाहीत. मग फोडा-झोडा-मजा पहा. आपापसात झुंज लावा ही ब्रिटिश नीती अवलंबली जात आहे असा गंभीर आरोप शिवसेनेने भाजपावर केला आहे. त्यानंतर आता भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्वीट करत मराठी माणसाला गाडा, आपला मॉल माचवा हे तुमचं मिशन असल्याची टीका केली आहे.
अमेरिकेतील स्थित ‘बेड बाथ अॅण्ड बियाँड’ कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी गुस्तावो अर्नल यांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कमधील उंच इमारतीच्या १८ व्या मजल्यावरुन उडी मारुन त्यांनी आत्महत्या केल्याचं वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने दिलं आहे. महत्त्वाचं म्हणजे, काही दिवसांपूर्वीच कंपनीने २० टक्के कर्मचारी कपात करण्याची आणि काही स्टोअर्स बंद करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर काही दिवसातच गुस्तावो अर्नल यांनी आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील हॉटेलमध्ये भीषण आग लागल्याने खळबळ माजली आहे. हजरतगंज येथील हॉटेल ‘लेवाना’मध्ये सकाळी आग लागली. आग लागली तेव्हा हॉटेलमध्ये अनेक लोक उपस्थित होते. आगीनंतर मोठ्या प्रमाणात धूर झाला असल्याने, खिडकीच्या काचा फोडून त्यांना बाहेर काढलं जात आहे. अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आतापर्यंत १३ लोकांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.
कॅनडाच्या सस्केचेवान प्रांतात झालेल्या चाकू हल्ल्यात १० लोकांचा मृत्यू झाला असून, जवळपास १५ जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर कॅनडात खळबळ माजली असून, दोन संशयितांचा शोध घेतला जात आहेत. जवळपास १३ ठिकाणी चाकू हल्ला झाला असून कॅनडाच्या इतिहासातील सर्वात मोठा हल्ला असल्याचं सांगितलं जात आहे.
शिवसेनेने ‘सामना’ अग्रलेखातून टीका केल्यानंतर भाजपा नेत्यांनी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेशी समोरून दोन हात करता येत नाहीत. मग फोडा-झोडा-मजा पहा. आपापसात झुंज लावा ही ब्रिटिश नीती अवलंबली जात आहे असा गंभीर आरोप शिवसेनेने भाजपावर केला आहे. त्यानंतर आता भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्वीट करत मराठी माणसाला गाडा, आपला मॉल माचवा हे तुमचं मिशन असल्याची टीका केली आहे.
मुंबई : स्त्री तिच्या इच्छेनुसार कोणत्याही वेळी पती किंवा त्याच्या कुटुंबियांवर घरगुती हिंसाचार संरक्षण कायद्यानुसार कारवाईची मागणी करू शकत नाही, असे नमूद करून बोरिवली न्यायदंडाधिकार्यांनी महिलेला दिलासा देण्यास नकार दिला. बातमी वाचा सविस्तर...
मनुष्याने केलेली कुठलीही कृती, वागणूक यासंदर्भात न्याय देण्याची शक्ती समाजाने न्यायाधीशांना प्रदान केली आहे. या शक्तीच्या भरवशावर न्यायाधीश कायद्याच्या अंमलबजावणीतून सदृढ लोकशाहीचे निर्माण करू शकतात, असे प्रतिपादन सरन्यायाधीश उदय लळीत यांनी केले. बातमी वाचा सविस्तर...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून ‘एमकेसीएल’ला हद्दपार करण्याचा निर्णय राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला असला तरी विद्यापीठ प्रशासनाकडून याबाबत कुठलाही आदेश काढण्यात आलेला नाही. बातमी वाचा सविस्तर...
आमदार अमोल मिटकरी व युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. आ. मिटकरींनी मोहोड यांना पाच कोटी रुपयांची मानहानीची नोटीस वकिलामार्फत पाठवली. त्यानंतरही ‘झुकेंगा नहीं’ म्हणून मोहोड आपल्या भूमिकेवर ठाम असून १० दिवसांत भांडाफोड करण्याचा इशारा त्यांनी दिला. बातमी वाचा सविस्तर...
नागपूरच्या चंद्रशेखर आझाद बहुउद्देशीय संस्थेची वादग्रस्त गणेशमूर्तीला यंदाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या वर्षी या मंडळाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखावा केला होता पोलिसांनी देखावा व गणेशमूर्ती आपल्या ताब्यात घेतली आहे.
अशा अनेक महत्त्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.