Maharashtra Political Crisis Updates, 22July 2022 : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सुरू केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ कॉंग्रेसच्या वतीने राज्यभरात करण्यात आलेल्या निदर्शनांमुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा शाब्दिक संघर्ष या विषयावरुन आजही पहायला मिळण्याची शक्यता आहे. सरकारच्या हुकूमशाहीच्या विरोधात आता आरपारची लढाई केली जाईल असं काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटलं असून या विषयावरुन आज आरोप प्रत्यारोप केले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय ईडीच्या माध्यमातून कारवाई करण्यात आलेल्या आणखीन एका प्रकरणामध्ये सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येण्याची चिन्हं आज दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याशी संबंधित वरळीतील सीजे हाऊस इमारतीतील चार मजल्यांवर ईडीने टाच आणली आहे. दाऊद इब्राहिमचा विश्वासू इक्बाल मिर्ची कुटुंबियांशी या जागेचा व्यवहार करण्यात आल्याचा आरोप आहे. याबाबत ‘ईडी’ तपास करत असून पटेल यांच्याविरोधातील कारवाईवरुनही आज राजकारण तापण्याची शक्यता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
गेली दोन वर्षे करोनाच्या सावटाखाली साजऱ्या होणाऱ्या सणोत्सवांवरील सर्व निर्बंध हटविण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केल्यानंतर सध्या सरकारच्या या निर्णयावर समाधान व्यक्त केलं जात आहे. दहिहंडी, गणशोत्सव, मोहरमवर कोणतेही अवास्तव निर्बंध लागू करू नका, नियमांचा बाऊ करू नका, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असून या निर्णयाचं स्वागत होताना दिसत आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) द्रौपदी मुर्मू यांनी विजय मिळवला असून देशभरामध्ये यासंदर्भातील जल्लोष पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी या विजयाच्या दुसऱ्या दिवशीही आनंद साजरा केला जात आहे. याशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा वाढदिवस असून त्यानिमित्ताने राज्यभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या समर्थकांनी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. हा विषयही दिवसभर चर्चेत असणार आहे.
महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि कलाविषयक घडामोडींचा आढावा एकाच ठिकाणी…
Maharashtra News Today : राष्ट्रपती निवडणुकीतील विजयानंतरचा जल्लोष ते ईडी कारवाईवरुन संघर्ष
मुंबईत जुलैच्या सुरुवातीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने नुकतीच विश्रांती घेतली असली तरी आठ दिवसांतच लेप्टोच्या रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात वाढली आहे. जुलैमध्ये लेप्टोचे ११ रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूचा ही प्रादुर्भाव कायम असून ३३ रुग्णांचे निदान झाले आहे. यावर तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी भाजपचे आमदार अमित साटम यांनी केली आहे. अमित साटम यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना पत्र लिहिलं आहे.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात पावसाने उघडीप दिली. चारही धरणांमध्ये शुक्रवारी सकाळपर्यंत तुरळक पावसाने हजेरी लावली. सध्या धरणांमधील पाणीसाठा २०.०० अब्ज घनफूट (टीएमसी) ६८.६१ टक्क्यांवर पोहोचला आहे. वाचा सविस्तर बातमी…
नक्षलवाद्यांच्या धमकीनंतरही एकनाथ शिंदे यांना सुरक्षा पुरवू नका असं उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना सांगितलं होतं, असा दावा शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे मनमाड दौऱ्यावर असून आपण त्यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं आहे. तसंच आदित्य ठाकरेंनी आपल्या प्रश्नांची उत्तरं दिली तर राजीनामा देण्यास तयार आहोत असंही म्हटलं आहे.
विरोधी पक्षाच्या आमदारांनी आज अधिवेशनाचं कामकाज सुरु होण्यापूर्वी संसदेच्या इमारतीसमोर महागाई आणि दैनंदिन जीवनातील वापराच्या वस्तूंच्या वाढत्या किंमतीविरोधात आंदोलन केलं.
Delhi | Opposition leaders including Congress MPs protest against the Central government over the issues of inflation and price rise in Parliament pic.twitter.com/0HCZ2Crf0U
— ANI (@ANI) July 22, 2022
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) द्रौपदी मुर्मू यांनी ६ लाख ७६ हजार ८०३ इतके मतमूल्य मिळवून विजय मिळवला. विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या पारडयात केवळ ३ लाख ८० हजार १७७ इतके मतमूल्य जमा झाले. या विजयानंतर सर्वच स्तरामधून मुर्मू यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावर होत असतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीनेही मुर्मू यांचं अभिनंदन करण्यात आलं आहे. पण त्यांची पोस्ट वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त
नेमकं राष्ट्रपती कोण झालंय? मुर्मू यांचं अभिनंदन करणारी मुख्यमंत्री शिंदेंची पोस्ट पाहून लोकांना पडला प्रश्न; फोटो ठरतोय चर्चेचा विषयhttps://t.co/3AOpaWtDSK
— LoksattaLive (@LoksattaLive) July 22, 2022
अनेकांनी या पोस्टवर आक्षेप घेतलाय…#DraupadiMurmu #EknathShinde #PresidentofIndia #SocialViral #ViralPost #Maharashtra
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. करोनाच्या निर्बंधांनंतर पहिल्यांदाच भाजपा कार्यकर्त्यांकडून यंदा मोठ्या उत्साहामध्ये फडणवीस यांचा वाढदिवस वेगवेगळ्या समाज उपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा केला जात आहे. असं असतानाच दुसरीकडे भाजपा आमदाराची एक पोस्ट सध्या तुफान चर्चेत आहे. येथे क्लिक करुन वाचा सविस्तर वृत्त…
Devendra Fadnavis Birthday: भाजपा आमदाराने फडणवीसांची प्रभू रामचंद्रांशी केली तुलना; म्हणाले, “मी माझ्या श्रीरामाच्या…”https://t.co/Bqfd0mKhQY

फोटोची कॅप्शन ठरतेय चर्चेचा विषय#DevendraFadnavis #Devendra_Fadnavis #BJP #PrasadLad
माकडांना पुराच्या पाण्यातून सोडवण्यासाठी वनखात्याने स्वयंसेवींच्या मदतीने उभारलेल्या ‘हरितसेतू’ पार करून गुरुवारी सातपैकी सहा माकडांनी नैसर्गिक अधिवास गाठला.
पिंपरी महापालिकेची वाल्हेकरवाडी येथील प्राथमिक शाळा धोकादायक अवस्थेत आहे. बालवाडी ते सातवीपर्यंतचे जवळपास ८०० विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून शाळेतील विद्यार्थ्यांवर धोक्याची टांगती तलवार असून कधीही काहीही होऊ शकते, अशी सध्याची स्थिती आहे. पालिकेने पर्यायी शाळा उभारण्याचा पर्याय दिला, मात्र त्या शाळेचे काम रडतखडत सुरू आहे. वाचा सविस्तर सविस्तर….
नागपूरमध्ये करोनासह ‘संसर्गजन्य’ आजाराचे रुग्ण वाढत असतानाच आता ‘स्वाईन फ्लू’चे संक्रमण वाढताना दिसत आहे. मागील सहा दिवसांत येथे ८ नवीन रुग्ण आढळल्याने, येथील आजपर्यंतच्या ‘स्वाईन फ्लू’ग्रस्तांची संख्या १४ वर पोहचली आहे. त्यापैकी ८ गंभीर संवर्गातील रुग्ण विविध रुग्णालयांत आहेत. वाचा सविस्तर बातमी…
महाराष्ट्रातील एक अनोखा प्रेम विवाह नुकताच पिंपरी-चिंचवड शहरात पार पडला आहे. ट्रान्सवूमन आणि ट्रान्समेन हे दोघे विवाह बंधनात अडकले आहेत. रूपा टाकसाळ आणि प्रेम लोटलीकर अशी दोघांची नावं आहेत. त्यांचा प्रेमविवाह झाला आहे असे ते अभिमानाने सांगतात. ट्रान्सवूमन आणि ट्रान्समेन यांच्यातील झालेला विवाह सोहळा हा महाराष्ट्रातील पहिलाच असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. वाचा सविस्तर बातमी…
मुंबई-नाशिक महामार्गावरील माजिवडा भागात ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक रस्त्यालगत असलेल्या झोपडीवर उलटला. या घटनेत झोपडीमध्ये झोपलेल्या १४ वर्षीय मुलगी मधू भाटी हिचा मृत्यू झाला. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. वाचा सविस्तर बातमी…
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याशी संबंधित वरळीतील सीजे हाऊस इमारतीतील चार मजल्यांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) टाच आणली आहे. दाऊद इब्राहिमचा विश्वासू इक्बाल मिर्ची कुटुंबियांशी या जागेचा व्यवहार करण्यात आल्याचा आरोप आहे. याबाबत ‘ईडी’ तपास करत आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त…
वरळीतील सीजे हाऊसच्या चार मजल्यांवर ‘ईडी’ची कारवाई#Mumbai #PrafulPatel #NCP #ED https://t.co/1YRVdZ0TUj

नागपूरमध्ये करोनासह ‘संसर्गजन्य’ आजाराचे रुग्ण वाढत असतानाच आता ‘स्वाईन फ्लू’चे संक्रमण वाढताना दिसत आहे. मागील सहा दिवसांत येथे ८ नवीन रुग्ण आढळल्याने, येथील आजपर्यंतच्या ‘स्वाईन फ्लू’ग्रस्तांची संख्या १४ वर पोहचली आहे. त्यापैकी ८ गंभीर संवर्गातील रुग्ण विविध रुग्णालयांत आहेत. येथे वाचा सविस्तर वृत्त
नागपूर : …आता 'स्वाईन फ्लू'चा धोका, सहा दिवसांत ८ रुग्ण आढळले https://t.co/qu7baKi8zr

बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी ऊर्फ डी. एस. कुलकर्णी यांना पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सदनिकांच्या मालकी हक्कासंदर्भात महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट्स अॅक्ट (MOFA, मोफा) अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात हा जामीन मंजूर करण्यात आलाय. २०१६ साली त्यांच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला. येथे वाचा सविस्तर वृत्त
डी. एस. कुलकर्णींना जामीन मंजूरhttps://t.co/gy9qTZq114

MOFA प्रकरणामध्ये पुणे न्यायालयाने दिला जामीन#DSK #Pune #Court
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सुरू केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ कॉंग्रेसच्या वतीने राज्यभरात करण्यात आलेल्या निदर्शनांमुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा शाब्दिक संघर्ष या विषयावरुन आजही पहायला मिळण्याची शक्यता आहे.