Maharashtra Political Crisis , 07 January 2023 : मागील अनेक दिवसांपासून राज्यात, देशात मोठ्या घडामोडी घडत आहेत. काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या उत्तर प्रदेशमध्ये आहे. लवकरच ही यात्रा पंजाबमध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे या यात्रेत आणखी कोणकोणत्या व्यक्ती सहभागी होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

तर राज्यातही अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. भाजपाचे नेते नारायण राणे यांनी मी संजय राऊत यांना सोडणार नाही, असे विधान केले आहे. तर संजय राऊत यांनीदेखील नारायण राणे यांचा एकेरी उल्लेख करत मी त्यांची प्रकरणं बाहेर काढली तरे ते ५० वर्षांसाठी तुरुंगात जातील, असे विधान केले आहे. यासह राज्यात ओरंगजेब तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या उल्लेखावरूनही आरोप-प्रत्यारोप केले जात आहे.

या मुख्य घडामोडींसह राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्किलवर.

Live Updates

Maharashtra Latest News Today, 06 January 2023 : राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर

19:29 (IST) 7 Jan 2023
“जादूटोणा करणे बंद करा, अन्यथा…”, राष्ट्रवादीचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बेलापूर मधून या जनजागर यात्रेला मोठ्या जल्लोषात सुरुवात करण्यात आलीय. महागाई व बेरोजगारी विषयी हे सरकार एकही शब्द काढत नसून या विषयांवरून नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी धर्मवीर सारख्या विषयांवरून राजकारण केलं जाते अशी टीका महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी केली.

सविस्तर वाचा

19:25 (IST) 7 Jan 2023
“देवेंद्रजी, माझ्या घरात जशी एक मुलगी, तशी तुमच्या घरातदेखील…”, उर्फी जावेद प्रकरणावरुन सुप्रिया सुळेंचे वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे या पुण्यात एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. उर्फी जावेद आणि अन्य महिलांच्या प्रकरणावरुन भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्यामध्ये सध्या टीका टिप्पणी सुरू आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेच टीकेला सुरुवात करतात असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

सविस्तर वाचा

19:24 (IST) 7 Jan 2023
VIDEO : गोपीचंद पडळकर यांच्या बंधूवर मिरजेत दुकान तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल

मिरज शहरी बसस्थानकाजवळ मुख्य रस्त्यावर काही दुकाने, हॉटेल, औषध दुकान गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ आहेत. ही जागा पडळकर यांनी विकत घेतली असल्याचा दावा केला जात आहे. या दुकानांना जागा खुली करण्याचे प्रयत्न सुरू होते. यातून गेले काही दिवस हा वाद सुरू होता. शुक्रवारी पहाटे अडीच वाजणेच्या सुमारास अचानक चार जेसीबी आणून या  जागेत कार्यरत असलेली दहा दुकाने पाडण्यात आली.

सविस्तर वाचा

12:45 (IST) 7 Jan 2023
"...तर मग छत्रपती संभाजी महाराजांवरून टीका कशाला करता?"

छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते ते स्वराज्यरक्षक होते, असे विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले होते. ते आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणी शिंदे गट, भाजपाकडून करण्यात आली. मात्र अजित पवार आपल्या मतावर ठाम आहेत. असे असतानाच आता भाजपाचे नेते नितेश राणे यांनी गाड्यांवर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असे नाव लिहिलेले स्टिकर लावण्याची मोहीम हाती घेतली आहे. वाचा सविस्तर

11:30 (IST) 7 Jan 2023
मुंबईत आज राज ठाकरेंची जाहीर सभा

मुंबईत आज राज ठाकरेंची जाहीर सभा

वाचा सविस्तर

11:24 (IST) 7 Jan 2023
धक्कादायक! अमेरिकेत सहा वर्षीय मुलाचा शिक्षिकेवर गोळीबार

अमेरिकेतील व्हर्जिनिया येथे एका सहा वर्षीय मुलाने आपल्या शिक्षिकेवर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रिचनेक प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला असून पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतले आहे. सध्या शिक्षिकेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिक्षक आणि गोळीबार करणाऱ्या मुलामध्ये भांडण झाल्याचे सांगण्यात येत आहे. वाचा सविस्तर

11:24 (IST) 7 Jan 2023
एअर इंडियाच्या विमानात लघुशंका करणाऱ्या व्यक्तीला ब्लॅकमेल केलं जातंय? वडिलांचा खळबळजनक दावा!

एअर इंडियाच्या विमानात एका वृद्ध महिलेवर लघुशंका करणाऱ्या मुंबईतील शंकर मिश्रा याला त्याच्या कंपनीने कामावरून काढून टाकले आहे. पोलीस त्याचा शोध घेत असून सध्या तो फरार आहे. दरम्यान, शंकर मिश्राचे वडील श्याम मिश्रा यांनी आपल्या मुलाची पाठराखण केली आहे. माझ्या मुलाने त्याच्या वयाच्या महिलेशी याआधी कधीही गैरवर्तन केलेले नाही. मग तो एका ७२ वर्षीय महिलेशी गैरवर्तन कसा करू शकतो? माझ्या मुलाला ब्लॅकमेल केले जात आहे, असा आरोप शंकर मिश्राचे वडील श्याम मिश्रा यांनी केला आहे. वाचा सविस्तर

maharashtra news live update

महाराष्ट्र न्यूज अपडेट

मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Story img Loader