Maharashtra Political Crisis , 06 January 2023 : शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात वेगवेगळ्या मुद्द्यावरून संघर्ष पाहायला मिळत आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. काही महिन्यांपूर्वी ठाकरे गटात प्रवेश केलेल्या उपनेत्या सुषमा अंधारे यादेखील तेवढ्याच ताकदीने शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांवर टीका-टिप्पणी करताना दिसतात. त्यांनी माझा अपघात घडवून आणला जाऊ शकतो, असे विधान त्यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे हा मुद्दा दिवसभर चर्चेत राहण्याची शक्यता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Latest News Today, 06 January 2023 : पुणे महापालिकेची उत्पन्नासाठी धावाधाव, अंदाजपत्रकात पंधराशे कोटींची तुटीची शक्यता
मुंबई : मानखुर्दच्या लल्लूभाई कम्पाउंड परिसरातील एका बंद शौचालयात गुरुवारी दुपारी मानखुर्द पोलिसांना एका १६ वर्षीय मुलाचा मृतदेह आढळला होता. मानखुर्द पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून हत्या करणाऱ्या चार आरोपींना अटक केली असून पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
जळगाव : तालुक्यातील कुसुंबा येथील 43 वर्षीय महिलेला भरधाव रुग्णवाहिकेने जोरदार धडक दिली. त्यात ती जागीच ठार झाली. शुक्रवारी सकाळी हा अपघात झाला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पुणे : शेतजमिनीचा ताबा आणि वहिवाटीबाबत शेतकऱ्यांतील आपापसांतील वाद मिटविण्यासाठी शासनाने सलोखा योजना आणली आहे. एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे, दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकांचे क्षेत्र अदलाबदल करण्यासाठी या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे. यासाठी नोंदविण्यात येणाऱ्या दस्तांसाठी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क प्रत्येकी केवळ एक हजार रुपये शेतकऱ्यांना भरावे लागणार आहे.
पुणे : सौंदर्योपचार शस्त्रक्रिया (प्लास्टिक सर्जरी) शिबिरामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या दिवंगत डॉक्टरच्या स्मरणार्थ २०० रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचा उपक्रम संचेती रुग्णालयाकडून हाती घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आपल्या प्रिय सहकाऱ्यांच्या स्मृती जागवण्यासाठी अमेरिकेतील काही नामांकित शल्यविशारदही या शिबिरामध्ये सहभागी झाले आहेत.
बदललेल्या नियमावलीनुसार दत्तक विधानाचा पहिला आदेश दोन अनाथ बालकांना थेट विदेशी नागरिकत्व बहाल करणारा ठरला आहे. यापैकी एक स्वीडिश पालकांच्या छत्रछायेत तर दुसरे बालक अमेरिकेत जाणार आहे. आता न्यायालयीन प्रक्रियेऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे दत्तक विधान प्रक्रिया सुरू झाली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गेले दोन दिवस मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी चित्रपट निर्मात्यासह अभिनेत्यांची भेट घेतली. मात्र, त्यांच्या या भेटींनंतर मुंबईमधील चित्रपट उद्योग उत्तर प्रदेशला नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा रंगू लागल्या असतानाच याबाबत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक सुचक ट्वीट केलं आहे. सविस्तर वाचा
दिल्लीतील कंझावाला येथे कारखाली आलेल्या अंजली सिंग या २० वर्षीय तरुणीला चालकाने १२ किलोमीटर फरपटत नेलं होतं. या अपघातात अंजलीचा मृत्यू झाला होता. तसेच तिचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत पोलिसांना आढळून आला होता. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली असून गाडी मालक आशुतोषला अटक करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी एकूण सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. सविस्तर वाचा
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गेले दोन दिवस मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह अनेक उद्योगपती आणि अभिनेत्यांचीसुद्धा भेट घेतली. दरम्यान, त्यांच्या या दौऱ्यावरून शिवसेनेने भाजपाला लक्ष्य केलं आहे. योगी आदित्यनाथ यांचा हा दौरा भाजपा पुरस्कृत राजकीय खेळ असून उद्योगपतींच्या नावाखाली मुंबई महानगरपालिका निवडणुकीत हिंदी भाषिक मतदारांची गुंतवणूक करण्याचा हा उद्योग आहे, अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून करण्यात आली आहे. सविस्तर वाचा
पुणे : येरवडा भागात अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. त्यांच्याकडून २० लाख रुपये किंमतीचे मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आले. सविस्तर वाचा
विविध महात्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करावा लागत असल्याने आणि अंदाजपत्रकात अपेक्षित धरलेले उत्पन्न प्राप्त होण्याची शक्यता कमी असल्याने यंदा महापालिकेच्या अंदाजपत्रकात किमान दीड हजार कोटींची तूट येण्याची शक्यता आहे. गेल्या नऊ महिन्यांत महापालिकेच्या तिजोरीत ४ हजार ४०० कोटींचे उत्पन्न जमा झाले आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकातील उत्पन्न उद्दिष्ट गाठण्यासाठी उर्वरित तीन महिन्यांत महापालिका प्रशासनाला धावाधाव करावी लागणार आहे.