Mumbai News Today, 26 September 2022 : राजस्थानमध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना समर्थन देणाऱ्या ८० हून अधिक आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे एकत्रित राजीनामा सादर केला आहे. सर्व आमदारांनी रविवारी रात्री उशिरा विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी त्यांच्या निवासस्थानी जाऊन राजीनामे सादर केली आहेत. काँग्रेस घटकपक्ष असलेलं महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राजस्थानातील काँग्रेस सरकार कोसळण्याची शक्यता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अशोक गेहलोत हे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले आहेत. ‘एक व्यक्ती, एक पद’ या नियमामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागणार आहे. यामुळे गेहलोत यांच्या ८० हून अधिक समर्थक आमदारांकडून हाय-होल्टेज ड्रामा सुरू आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातही ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणांमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. अनेक पीएफआयच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
या घडामोडींसह राज्य, देश तसेच जगभरातील घडामोडींचा आढावा एका क्लिकवर…
Maharashtra Breaking News Updates, 26 September 2022 : राज्यातील सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींची प्रत्येक अपडेट
राज्यात नवरात्र उत्सवास आज(सोमवार) पासून सुरुवात झाली आहे. या उत्सव कालावधीत दररोज रात्री गरबा खेळण्याची देखील परंपरा आहे. दररोज रात्री राज्यभरात अनेक ठिकाणी गरबा खेळला जातो. गरबा खेळण्यासाठी तरूण-तरूणी, महिला-पुरुषांची मोठ्यासंख्येने उपस्थिती असते. विविध नवरात्र उत्सव मंडळांकडून मोठ्याप्रमाणावर गरबा कार्यक्रम आयोजित केले जातात. आता याच पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेने “गरबा खेळण्यास येणाऱ्यांचे आधार कार्ड तपासा आणि गैरहिंदूंना गरबाच्या ठिकाणी प्रवेश देऊ नका.” अशी मागणी केली आहे. वाचा सविस्तर बातमी…
राज्यात शिंदे-फडणवीस सरकारने तरुणांच्या दृष्टीने एक मोठा निर्णय घेतला आहे. मागील दोन वर्षापासून कोविड व अन्य कारणांमुळे रखडलेली पोलीस भरती आता राज्य सरकारकडून केली जाणार आहे. राज्यात आता तब्बल २० हजार पोलिसांची पदे भरली जाणार असल्याची माहिती आज(सोमवार) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: प्रसार माध्यमांना दिली. वाचा सविस्तर बातमी…
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सेवेकरी म्हणून ओळखले जाणारे चम्पासिंग थापा यांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडत आज (सोमवार) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. वाचा सविस्तर बातमी…
विधानसभेच्या २०१९ मधील निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुडमधील विजयावर सर्वोच्च न्यायालयाकडूनही शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तत्कालीन उमेदवार आणि माजी नगरसेवक ॲड. किशोर शिंदे यांची याचिका फेटाळून लावली आहे.
टेंभीनाका येथील देवीच्या मिरवणूकीचा फटका सोमवारी ठाणे शहराला बसला. ठाण्यातील कोर्टनाका ते ऐरोली येथील पटनी मैदानापर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. वाहन चालकांना अवघ्या पाच मिनीटाच्या अंतरासाठी सुमारे पाऊण तास लागत होता.
कल्याण : टिटवाळ्या जवळील निंबवली गाव हद्दीत एका शाळकरी विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देऊन तिला फूस लावून पळून नेण्याचा प्रयत्न एक रिक्षा चालक आणि त्याच्या दुचाकी वरील साथीदाराने केला. परंतु, विद्यार्थिनीच्या जागरुकतेमुळे त्यांचा प्रयत्न फसला. बातमी वाचा सविस्तर …
दिवा येथील कचराभूमी कायमस्वरुपी बंद करण्यासाठी ठाणे महापालिकेकडून डायघर येथे घनकचरा प्रकल्प उभारणीचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरु असून विविध कारणांंमुळे विलंब होत असलेल्या या प्रकल्पाचे काम लवकर पुर्ण करण्यासाठी पालिकेने जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. बातमी वाचा सविस्तर …
मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालायने काहीसा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठाने २१ मार्चपासून अनिल देशमुख यांची जामीन याचिका प्रलंबित असल्याची नोंद घेतली.
मुंबईच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी वॉचडॉग फाऊंडेशनने नऊ रंगात खड्डे रंगवले आहेत.वॉचडॉग फाऊंडेशनने हे अनोखे आंदोलन सोमवारपासून सुरू केले असून पहिल्याच दिवशी अंधेरी पूर्वेकडील विविध रस्त्यांवरील खड्डे रंगवण्यात आले होते.
पुणे : भवानी पेठेतील कासेवाडी भागात पिस्तुल बाळगणाऱ्या गुंडाला पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तुल, पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. बातमी वाचा सविस्तर …
पिंपरी चिंचवड : वेदांता – फॉक्सकॉन प्रकल्पावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच खडाजंगी सुरू आहे. त्यांच्यात आरोप प्रत्यारोप झालेले पाहायला मिळत आहेत. वेदांता – फॉक्सकॉन प्रकल्प स्वतः हून महाराष्ट्रात आला होता. तळेगाव येथे हा प्रकल्प होणार होता. पण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली आणि तो प्रकल्प गुजरातला गेला. बातमी वाचा सविस्तर …
डोंबिवली : आतापर्यंत खड्डे, मुसळधार पावसाच्या त्रासातून सुटका झालेली नसताना डोंबिवलीतील प्रवासी, विद्यार्थ्यांना मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवरील छेद रस्ते, अरुंद रस्ते आणि पालिकेच्या कचरा वाहू वाहनांचे मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरील ठाण याचा त्रास होऊ लागला आहे. या नव्या डोकेदुखीने डोंबिवलीतील प्रवासी हैराण आहे. बातमी वाचा सविस्तर …
उल्हासनगर : दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर शहरात विनापरवाना फटाक्यांचा साठा करणे एका व्यापाऱ्याला महागात पडले आहे. कोणत्याही अनुज्ञप्तीशिवाय अमरजीत राजवाणी आणि हरेश राजवानी या दोघांनी सुमारे ४३ लाख २७ हजार रूपयांचे विविध प्रकारचे फटाके उल्हासनगरच्या सर्वाधिक वर्दळीच्या अशा कॅम्प दोन भागात साठवून ठेवले होते. बातमी वाचा सविस्तर …
केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांना त्यांच्या अधीश बंगल्यातील बांधकाम प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून दणका बसला आहे. उच्च न्यायालयाने दिलेला अनधिकृत बांधकामावरील कारवाईचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे आणि नारायण राणे यांची याचिका फेटाळली आहे. वाचा सविस्तर बातमी…
गडचिरोली : विविध कारणांनी वादग्रस्त ठरलेल्या सूरजागड लोहप्रकल्पात वाढीव उत्खनन प्रस्तावित करण्यात आले आहे. यामुळे एटापल्ली तालुक्यातील १३ आदिवासी बहुल गावे प्रभावित होणार असल्याने त्यांना भविष्यात विस्थापनाचा धोका निर्माण होऊ शकतो. येत्या २७ ऑक्टोबरला प्रशासनाकडून तक्रारी ऐकण्यासाठी जनसुनावणी ठेवण्यात आली आहे. बातमी वाचा सविस्तर …
नागपूर : मोदी सरकारने लोकशाहीच्या सर्वच स्तंभांना खिळखिळे केले. विरोधी पक्ष कमकुवत राहावा यासाठी सरकारच प्रयत्नशील आहे. अशा स्थितीत लोकशाही वाचवायची असेल तर जनआंदोलनाशिवाय पर्याय नाही. परंतु, यातून पुन्हा नवीन हुकूमशहा निर्माण होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन वरिष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. प्रशांत भूषण यांनी केले. बातमी वाचा सविस्तर …
वेदांता – फॉक्सकॉन प्रकल्पावरून राज्यात राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात टीकेच्या फैरी झाडल्या जात आहे. दोनच दिवसांपूर्वी शिवसेना आमदार व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वडगाव मावळमध्ये जनआक्रोश आंदोलनात सहभागी होऊन मोर्चा काढला होता. यावेळी आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर चौफेर टीका केली. त्या टीकेला आज भाजपच्या वतीने उत्तर देत ठिय्या आंदोलन करण्यात आले. बातमी वाचा सविस्तर …
राजस्थानमध्ये अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट असा संघर्ष निर्माण झाला असून पुन्हा एकदा राज्य सरकार संकटात अकडलं आहे. अशोक गेहलोत काँग्रेसचे नवे अध्यक्ष होण्याच्या तयारीत असताना, सचिन पायलट मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. अशोक गेहलोत यांच्या समर्थक आमदारांचा मात्र याला विरोध असून ८२ आमदारांनी राजीनामा दिला आहे. या सत्तासंघर्षावर तोडगा काढण्यासाठी नेतृत्वाकडून प्रयत्न सुरु असताना सचिन पायलट यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
अंबरनाथ : अंबरनाथ पूर्वेतील ग्रीन सिटी संकुल परिसरात विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका छोट्या बसला सोमवारी सकाळच्या सुमारास अपघात झाला. बातमी वाचा सविस्तर …
हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात टेम्पो ट्रॅव्हलर बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सात पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. घटनेत गंभीर जखमी असलले्या १० जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भारतातून नामशेष झालेले चित्ते जवळपास ७० वर्षांनंतर भारतात परतले आहेत. आफ्रिकेच्या नामिबियातून आणलेले आठ चित्ते सध्या मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात आहेत. या चित्त्यांना बघायला जाणार असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले आहेत.
कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेचा पाणी देयक, मालमत्ता कर थकविलेल्या, मालमत्ता कर न लावलेल्या आणि ज्या चाळ, इमारतींना सदनिकांच्या प्रमाणात नळजोडण्या नाहीत. अशा सर्व मालमत्तांना कल्याण डोंबिवली पालिकेकडून मोफत टँकरव्दारे करण्यात येणारा पाणी पुरवठा बंद करण्याचे आदेश आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिले आहेत. बातमी वाचा सविस्तर …
नागपूर : शहराला लागून असलेल्या खेड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात इमारतींचे बांधकाम झाले आणि लोकवस्तीही वाढली आहे. त्या भागात नियोजनबद्ध नागरी सुविधा विकसित करण्यासाठी नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आले. बातमी वाचा सविस्तर …
किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समोरच पिंडदानाचा विधी सुरू असल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. या धक्कादायक प्रकाराने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या गंभीर प्रकाराची कसून चौकशी करून तेथे तैनात असलेले पोलीस कर्मचारी आणि पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.
डोंबिवली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्ता स्थापनेत महत्वाची भूमिका बजावणारे डोंबिवलीचे भाजप आमदार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना ठाणे जिल्हा पालकमंत्री पदापासून दूर ठेवण्यात आल्याने जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बातमी वाचा सविस्तर …
ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात आजपासून ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान राबविण्यास सुरुवात होणार आहे. ५ ऑक्टोबरपर्यंत राबविल्या जाणाऱ्या या अभियानात १८ वर्षावरील महिला, माता, गरोदर महिला यांची सर्वांगीण तपासणी पालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक आरेाग्य केंद्रांवरती करण्यात येणार आहे. बातमी वाचा सविस्तर …
नागपूर : राज्याचे भाषा धोरण तयार करून ते भाषा सल्लागार समितीने शासनाला सादर केले आहे. या बाबीला आठ वर्षे झाली. या काळात चार वेगवेगळ्या पक्षांची सरकार महाराष्ट्राला लाभली. मात्र, एकाही सरकारच्या काळात हे धोरण जाहीर करण्यात आले नाही. बातमी वाचा सविस्तर …
केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी अमेरिका-पाकिस्तानमधील संबंधांवर प्रश्चचिन्ह उपस्थित केलं आहे. पाकिस्ताशी असणाऱ्या संबंधांमुळे अमेरिकेचा कोणताही फायदा झाला नसल्याचं ते म्हणाले आहेत. “या संबंधांतून ना पाकिस्तानचं हित झालं आहे, ना अमेरिकेचा फायदा झाला आहे,” असं एस जयशंकर म्हणाले आहेत. रविवारी वॉशिंग्टनमध्ये भारतीय-अमेरिकी समुदायासाठी आयोजित कर्यक्रमात ते बोलत होते.
राजस्थानमध्ये काँग्रेसच्या ९० आमदारांनी राजीनामा देण्याची धमकी दिली असल्याने सरकार संकटात आलं आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पक्षनेतृत्वाला आपल्या हातात काहीच नसल्याचं म्हटलं आहे. ७१ वर्षीय अशोक गेहलोत काँग्रेसचे अध्यक्ष होण्याच्या तयारीत आहेत. यानिमित्ताने पहिल्यांदाचा गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती अध्यक्षपदी विराजमान होणार आहे. अशोक गेहलोत अध्यक्ष झाल्यानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी सचिन पायलट यांनी मुख्यमंत्रीपद घ्यावं अशी नेतृत्वाची इच्छा आहे. यावरुनच राजस्थानमध्ये राजकीय संकट निर्माण झालं असून, आमदारांनी राजीनामा देण्याची धमकी दिली आहे.
नागपूर : प्रेमसंबंध कायम ठेवण्यास नकार देणाऱ्या महिलेला अश्लील छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देणाऱ्या नोकराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राहुल (३०) असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली. बातमी वाचा सविस्तर …