Mumbai News Today, 26 September 2022 : राजस्थानमध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना समर्थन देणाऱ्या ८० हून अधिक आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे एकत्रित राजीनामा सादर केला आहे. सर्व आमदारांनी रविवारी रात्री उशिरा विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी त्यांच्या निवासस्थानी जाऊन राजीनामे सादर केली आहेत. काँग्रेस घटकपक्ष असलेलं महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राजस्थानातील काँग्रेस सरकार कोसळण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अशोक गेहलोत हे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले आहेत. ‘एक व्यक्ती, एक पद’ या नियमामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागणार आहे. यामुळे गेहलोत यांच्या ८० हून अधिक समर्थक आमदारांकडून हाय-होल्टेज ड्रामा सुरू आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातही ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणांमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. अनेक पीएफआयच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

या घडामोडींसह राज्य, देश तसेच जगभरातील घडामोडींचा आढावा एका क्लिकवर…

Live Updates

Maharashtra Breaking News Updates, 26 September 2022 : राज्यातील सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींची प्रत्येक अपडेट

10:17 (IST) 26 Sep 2022
तालिबानींनी तुरुंगात डांबून आमचे केस कापले; ५५ शिखांचे अफगाणिस्तानातून भारतात आगमन

अफगाणिस्तानमध्ये तालिबानी सरकार अस्तित्वात आल्यापासून देशातील अल्पसंख्यांकाचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. अफगाणिस्तानात सत्ताबदल घडल्यानंतर अनेक नागरिकांनी भारतात आश्रय घेतला आहे. मात्र, आजही असंख्य नागरिक तालिबानी राजवटीत जगत आहेत. त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. सविस्तर बातमी

10:16 (IST) 26 Sep 2022
“माझी बहीण आणि पत्नी गाडीत नसती तर…” वाहनावरील हल्ल्यानंतर संतोष बांगरांची संतप्त प्रतिक्रिया

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर रविवारी अमरावती दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी आपली पत्नी व बहिणीसोबत देवदर्शन घेतलं. देवदर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर काही तरुणांनी संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला केला आहे. यावेळी हल्लेखोरांनी ‘आला रे आला, गद्दार आला’, ‘५० खोके, एकदम ओके’ अशा घोषणा दिल्या आहेत. यावेळी संबंधित हल्लेखोरांनी संतोष बांगर यांच्या गाडीवर हाताने मारण्याचाही प्रयत्न केला आहे. या प्रकारानंतर आमदार संतोष बांगर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सविस्तर बातमी

10:15 (IST) 26 Sep 2022
राजस्थानमध्ये राजकीय वादळ; काँग्रेसच्या ८२ आमदारांचा विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द

राजस्थानमध्ये सध्या राजकीय उलथापालथ सुरू आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना समर्थन देणाऱ्या ८० हून अधिक आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे एकत्रित राजीनामा सादर केला आहे. सर्व आमदारांनी रविवारी रात्री उशिरा विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी त्यांच्या निवासस्थानी राजीनामे सादर केली आहेत. सविस्तर बातमी