Latest Marathi News : स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक कविता सादर केली आहे. ही कविता व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेने (शिंदे) त्यावर आक्षेप घेत हॅबिटॅट स्टुडिओची (जिथे कुणाल कामराचा कार्यक्रम पार पडला होता) तोडफोड केली. यावर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटल्या. अद्यापही यावरून गोंधळ चालू आहे. यासंबंधीच्या घडामोडींवर आपलं लक्ष असेल. त्याचबरोबर नागपूर हिंसाचारप्रकरणातील दंगेखोरांना सोडणार नसल्याचा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला होता. याप्रकरणी सुरू असलेली कारवाई, तपास व राजकीय प्रतिक्रियांचा आढावा आपण घेणार आहोत.
दुसऱ्या बाजूला, विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असून अधिवेशनात काय-काय घडतंय याचा आढावा आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत. नागपूर हिंसाचाराचा सूत्रधार फहीम खानच्या घरावर सोमवारी बुलडोझर चालवण्यात आला. मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली गेली. पाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याला काही वेळापूर्वी कोल्हापूर न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. तिथे काय घडतंय याबाबतच्या बातम्या तुम्हाला इथेच वाचायला मिळतील.
Maharashtra News Live Today, 25 March 2025 : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी
सांगली : मिरजेत वादळासोबत हलका पाऊस, वीज पुरवठा खंडित
आज दिवसभर तापमान ३८ अंश सेल्सियस होते. वाढत्या उष्म्यानंतर सायंकाळी विजेचा कडकडाट सुरू झाला.
जहाल नक्षल नेता मुरलीसह तिघांना कंठस्नान, छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश…
सुरक्षा दलातील राखीव पोलीस जवान (डीआरजी), स्फोटकविरोधी पथकाने दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक गौरव राय यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षलविरोधी अभियान हाती घेतले होते.
मोटार चालकास मारहाणीसह महिलेचा विनयभंग, दुचाकीस्वारास न्यायालयीन कोठडी
नाशिक – वाहतूक नियम न पाळणाऱ्या दुचाकीस्वारास समजावले असता त्याने मोटार चालकासह महिलेचा विनयभंग केला. शालिमारजवळील गंजमाळ सिग्नल भागात हा प्रकार घडला. भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यावर संशयिताला ताब्यात घेण्यात आले. त्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
समीर हमीद शहा (३०, रा. पंचशीलनगर,गंजमाळ) असे संशयिताचे नाव आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी सायंकाळी महिला, तिची मुलगी, जावई आणि मुलगा असे मोटारीतून प्रवास करत असताना ही घटना घडली. पंचवटीकडून कुटूंबिय त्यांच्या घरी जात असताना खडकाळीजवळील गंजमाळ सिग्नल येथे दूध बाजारकडून येणाऱ्या दुचाकीस्वाराने नियमांचे उल्लंघन करुन दुचाकी पुढे दामटली. त्यामुळे मोटार चालकाने संशयिताला सिग्नल सुटला नसताना पुढे का आला, असे विचारले असता संशयिताने दुचाकी मोटारीसमोर उभी करून रस्ता अडवला. शिवीगाळ करत मोटार चालकाला मारहाण केली. महिला समजावून सांगत असताना संशयिताने विनयभंग केला. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
मागील आठवड्यात याच परिसरात रिक्षाला धक्का लागल्याचे कारण देत रिक्षाचालकाने मोटार चालकाला मारहाण केली होती. या परिसरात वाहतूक पोलीस कायम कार्यरत असतानाही त्यांच्याकडून बेशिस्त वाहनचालकांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याच्या तक्रारी वाहंवार होत असतात.
अकोला : कौटुंबिक वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी; एकाचा मृत्यू, आठ जण गंभीर जखमी
दोन दिवसांपूर्वीच अकोला शहरातील खदान परिसरात दोन गटातील वादातून तरुणाची हत्या झाली होती.
बुलढाणा : शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबन काव्याने स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रकरणाचे तीव्र पडसाद आज बुलढाण्यात देखील उमटले. शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा महिला आघाडीने आज कुणाल कामराच्या प्रतिमेला जोडे मारून तीव्र निषेध व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. कुणाल कामराविरुध्द गुन्हा दाखल करुन त्यास तत्काळ अटक करावी, अशी मागणी बुलढाणा जिल्हा महिला आघाडीच्यावतीने करण्यात आली. कुणाल कामराच्या तैलचित्राला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोडे मारून आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला.
अहिल्यानगरमधील ग्रामपंचायतींची लोकअदालतमधून ८.५६ कोटींची थकबाकी वसुल
लोक अदालतीच्या नोटिसा थकबाकीदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष मोहीम हाती घेतली होती.
महाबोधी महाविहार मुक्त करा, नांदेडमधील महामोर्चात भिख्खू व अनुयायांची एकमुखी मागणी
नांदेड येथे मंगळवारी (दि. २५) महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व भंतेजींनी केले.
ठाण्यात हुक्का पार्लर विरोधात पुन्हा कारवाई, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे आदेश
हुक्का पार्लर व्यवसायावर बंदी असून याबाबत गुन्हे दाखल केले तर तीन वर्षाची शिक्षा आहे, परंतु शहरात हुक्का पार्लर सुरू आहेत.
कल्याणमधील लालचौकी येथील हाॅटेलमध्ये वेश्या व्यवसाय; तीन जणांवर गुन्हा, चार पीडित महिलांची सुटका
वेश्या व्यवसाय प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे हवालदार विजय पाटील यांनी सुनिता गोरे, सरला भालेराव आणि विनोद मोर्या यांच्या विरुध्द अनैतिक मानवी प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.
डोंबिवलीतील पलावा, २७ गावांमधील सात जणांची ७३ लाखांची फसवणूक
रिलायन्स कंपनीत नोकरीला असलेल्या नोकरदाराला घरी असताना समभाग गुंतवणुकीविषयी एक जाहिरात समाज माध्यमातून पाहण्यास मिळाली.
ठाणे : मलनिस्सारण विभागातील घोटाळ्याची चौकशी करा, मनसेची राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे तक्रार
वरिष्ठ अधिकारी आणि दुसऱ्याच परिसराचा कार्यभार असलेला एका उप अभियंत्याने वर्षभरात २१ बिल्डरांच्या प्रकल्पांना परस्पर परवानगी दिल्या आहेत.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मदत निधीसाठी विनंत्याची वेळ
मदतीसाठी आवश्यक निधीची मागणी केली आहे. ही मदत आली की वितरित केली जाईल असे अधिकारी सांगत आहेत.
हंगाम संपल्यानंतर पांढऱ्या सोन्याला झळाळी, कापसाने ओलांडली हमीभावाची मर्यादा
परभणी बाजार समितीच्या आवारात काल खाजगी बाजारात कापसाला प्रतिक्विंटल ६३५० ते ७७१० असा दर मिळाला.
छत्रपती संभाजीनगर : अतिक्रमण हटाव पथकावर दगडफेक, दोघेजण जखमी
प्रकल्पासाठी गटनंबर २१६ आणि २१७ मधील अडीच एकर जागा लागणार आहे. या जागेवर अतिक्रमण करून १८० जणांनी घरे थाटली होती.
अहिल्यानगर मधील संगमनेरच्या जवानाचा सीमेवर मृत्यू
जम्मू-काश्मीरमधील तंगधार जिल्ह्यात ऑपरेशनल ड्युटी करत असताना नियंत्रण रेषेवर बढे यांचे निधन झाले.
कोपरगाव शहरात दोन गटांत तुंबळ हाणामारी ; कोपरगाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
कोपरगाव शहरातील नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीसमोर सोमवारी रात्री दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत ३ जण जखमी झाले.
शिवरायांचा अपमान करणाऱ्या कोरटकरला तीन दिवस पोलीस कोठडी
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणारा, इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना अश्लिल शिवीगाळ करून त्यांना धमकावणारा तथाकथित पत्रकार आरोपी प्रशांत कोरटकरला न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. गेल्या महिनाभरापासून पोलिसांना गुंगारा देत असलेल्या कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी सोमवारी तेलंगणा राज्यातून बेड्या ठोकल्या. त्याला मंगळवारी दुपारी कोल्हापूर न्यायालयात हजर केले.तेथे शिवप्रेमींनी मोेठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
मानव विकास मिशन : लाडक्या बहिणीच्या तरतुदीमुळे मानव विकास मिशनला ६७२ कोटींची घट
राज्यातील १२५ तालुक्यांमध्ये मानव विकास मिशन २००६ मध्ये सुरू करण्यात आले. २३ जिल्ह्यातील १२५ तालुक्यांमध्ये आरोग्य, शिक्षण व उत्पन्न वाढीच्या योजना होती घेण्याच्या या प्रकल्पास निर्धारित अर्थसंकल्पित तरतुदीपेक्षा नेहमी कमी रक्कम मिळाली.
आभासी चलनाच्या नावाखाली ८२ लाख रुपयांची फसवणूक
घोडबंदर भागात फसवणूक झालेले ४२ वर्षीय नोकरदार राहतात. सुमारे तीन महिन्यांपूर्वी त्यांच्या फेसबुक खात्याच्या माध्यमातून एका महिलेसोबत त्यांची ओळख झाली होती.
अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. स्थापनेपासून मंत्रिपदाची प्रतीक्षा असलेल्या पिंपरी- चिंचवड शहराला मंत्रीपदाचा दर्जा असलेले विधानसभेचे उपाध्यक्षपद मिळाले आहेत. बनसोडे यांनी उपाध्यक्षदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. महायुतीकडे बहुमत असल्याने बनसोडे यांची सहज या पदावर निवड झाली आहे. अजित पवार यांनी मंत्रीपदाऐवजी एकेकाळी त्यांचा बालेकिल्ला असलेल्या शहरात उपाध्यक्षपद दिले आहे.
अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. स्थापनेपासून मंत्रिपदाची प्रतीक्षा असलेल्या पिंपरी- चिंचवड शहराला मंत्रीपदाचा दर्जा असलेले विधानसभेचे उपाध्यक्षपद मिळाले आहेत. बनसोडे यांनी उपाध्यक्षदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. महायुतीकडे बहुमत असल्याने बनसोडे यांची सहज या पदावर निवड झाली आहे. अजित पवार यांनी मंत्रीपदाऐवजी एकेकाळी त्यांचा बालेकिल्ला असलेल्या शहरात उपाध्यक्षपद दिले आहे.
बांगडीची काच लागून ज्येष्ठ महिलेचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर – बांगडीची काच लागून झालेल्या जखमेवर उपचार सुरू असताना एका ८२ वर्षीय ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात २४ मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
परीगा कारभारी जाधव (रा. काटेपिंपळगाव ता. गंगापूर) असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी राहता पोलीस ठाण्याकडून वैजापूर पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. या माहितीनुसार परीगा जाधव यांना ४ मार्च रोजी बांगडीची काच लागून हाताला जखम झाली होती. उपचारासाठी त्यांना लोणी येथील प्रवरा रुग्णालयात (जि. अहमदनगर) दाखल करण्यात आले होते.
उपचार सुरू असताना ५ मार्च रोजी परागा जाधव यांचा मृत्यू झाला. त्या संदर्भातील माहिती वैजापूर पोलीस ठाण्याला राहाता पोलिसांकडून कळवण्यात आल्यानंतर सोमवारी रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
डोंबिवलीत दोन पाण्याच्या टाक्यांजवळ भुयारी गटारांवरील झाकणांमुळे अपघाताची शक्यता
उमेशनगरमधील दोन पाण्याच्या टाक्यांजवळील भाग हा सर्वाधिक वर्दळीचा परिसर म्हणून ओळखला जातो.
अकृषी कर रद्द करण्याचा नुसताच निर्णय, ना अध्यादेश ना तरतूद; लातूर महापालिकेला फटका
लातूर महापालिकेने अकृषी कर भरला नाही म्हणून तहसीलदाराने यशवंतराव चव्हाण व्यापारी संकुल सील केले आहे.
गोंदवलेत तरुणाचा प्रेमसंबंधातून खून
तेजस पवार (वय ३२, रा. गोंदवले बुद्रुक, ता. माण) यांनी आपला भाऊ योगेश पवार हा दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दहिवडी पोलीस ठाण्यात दिली होती.
प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी
प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये करणारा आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर महिनाभरापासून तेलंगणात लपून बसला होता. महाराष्ट्र पोलिसांनी सोमवारी (२४ मार्च) तेलंगणात त्याला अटक करून कोल्हापुरात आणलं. आज पोलिसांनी त्याला कोल्हापूर न्यायालयात हजर केलं. यावेळी वकील असीम सरोदे आणि सरकारी वकिलांनी न्यायालयात इंद्रजीत सावंत यांची बाजू मांडली. तर अॅड. घाग यांनी कोरटकरची बाजू मांडली. ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयात हजर होते. यावेळी असीम सरोदे यांनी प्रशांत कोरटकरची सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. दोन्ही बाजूच्या वकिलांचे दावे-प्रतिदावे ऐकल्यानंतर न्यायालयाने त्याला तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे.
फलटणच्या श्रीराम कारखान्यावर प्रशासक, रामराजे नाईक निंबाळकर यांना धक्का
श्रीराम सहकारी साखर कारखान्याबाबत विश्वास भोसले यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेतील हरकतीचे गांभीर्य लक्षात घेऊन कारखान्याची निवडणूक पुढे ढकलली होती.
सातारा : ओझर्डेत सोंगांची मिरवणूक उत्साहात
या मिरवणुकीचे जिल्ह्यासह पंचक्रोशीला याचं मोठं आकर्षणच असतं. प्रतिवर्षी ओझर्डेत बावधन बगाडाच्या आदल्या दिवशी पहाटे चार वाजल्यापासून या सोंगांची वाजत गाजत मिरवणूक निघते.
नागपूर दंगल: इरफान हत्या प्रकरणातील आरोपी ‘बळीचा बकरा’?
नागपूर : दंगलीत इरफान अन्सारी याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात तहसील पोलिसांनी घरात अठराविश्वे दारिद्र्य आणि कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या संतोष गौर याला अटक केली. मात्र, दंगलीत इरफानला मारणारे वेगळेच होते. संतोष गौर याला ‘बळीचा बकरा’ बनवले जात आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
उल्हास नदीकिनारी उपाययोजनांसाठी हालचाली, तालुका प्रशासन इशारा फलक लावण्यासह इतर उपाययोजना करणार
गेल्या काही वर्षात अशा घटना वाढल्या आहेत. धुळवडीच्या दिवशी याच उल्हास नदीत वेगवेगळ्या ठिकाणी सहा जणांचा बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले.