Marathi News Updates : राज्याच्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदी आमदार आण्णा बनसोडे यांची निवड करण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडीवर अभिनंदन प्रस्ताव ठेवला. आज दोन्ही सभागृहात अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार आहे. विधान परिषदेत एकनाथ खडसे यांनी सभागृहात मंत्री गैरहजर राहिल्यावरून नाराजी व्यक्त केली. कुणाल कामरा प्रकरण, जयकुमार गोरे आरोप प्रकरण आदी विविध मुद्द्यांवर काल सभागृहात खडाजंगी पाहायला मिळाली. आजही विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. यासह राज्यातील विविध बातम्या आणि अपडेट्स जाणून घेउयात.

Live Updates

Maharashtra News Live Today, 26 March 2025 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घ्या

20:54 (IST) 26 Mar 2025

वसईत लागवड क्षेत्रात घट; वसई विरार शहराच्या नागरिकरणाचा फटका

वसई: वसई विरार शहराचे झपाट्याने होणारे नागरीकरण याचा फटका आता शेतीला बसू लागला आहे. या वाढत्या बांधकामामुळे शेतीचे लागवडीखालील क्षेत्र कमी होऊन त्यात घट होऊ लागली आहे. वसईत ७ हजार ८९१ हेक्टर क्षेत्र लागवडीचे असून यावर्षी केवळ ६ हजार ७९१ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली असून जवळ ११०० हेक्टरने लागवड क्षेत्रात घट झाली आहे.

सविस्तर वाचा

19:53 (IST) 26 Mar 2025

कर्मचारी संपावर, नागपुरात शहर बस सेवा ठप्प

नागपूर: शहरात धावणाऱ्या  महापालिकेच्या ‘आपली बस’च्या चालकांनी वाढीव वेतनाच्या थकबाकीसाठी बुधवारी संप पुकारल्याने शहर बससेवा ठप्प झाली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. ऑटोरिक्षा चालकांची मनमानी भाडे आकारून प्रवाशांची लूट केली. 

सविस्तर वाचा

19:44 (IST) 26 Mar 2025

अहिल्यानगरमधील राहुरी शहरात तणाव

अहिल्यानगरःराहुरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबना प्रकरणाने तणाव निर्माण झाला आहे. विविध संघटना व सर्वपक्षीयांनी अहिल्यानगर- मनमाड रस्ता रोखून धरला आहे. प्रचंड घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडण्यात आला. मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

राहुरी शहरातील बुवाबाबा तालमीत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचे आज, बुधवारी दुपारी उघडकीस आले. घटननेची माहिती राहुरी शहरात पसरताच मोठा जमाव जमला. घोषणाबाजी सुरू करण्यात आली. आमदार शिवाजी कर्डिले, जिल्हा बँकेचे संचालक अरुण तनपुरे यांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत करण्याचे प्रयत्न सुरू केले. जमाव ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही. विविध संघटनासह सर्वपक्षीयांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. ही माहिती समजल्यानंतर दिल्लीत संसदेच्या अधिवेशनात असलेल्या खासदार नीलेश लंके यांनी घटनेच्या निषेधाची ध्वनीफित प्रसारीत केली व माथेफिरुच्या अटकेची मागणी केली.

19:42 (IST) 26 Mar 2025

नागपूर दंगल : शासनाकडून नुकसान भरपाई, वाहनांसाठी …

नागपूरच्या  महालभागात १७ मार्चच्या रात्री उसळलेल्या दंगलीत झालेल्या हानीच्या नुकसान भरपाईपोटी शासनाने बुधवारी ७ लाख १५ हजार रुपयाची मदत मंजूर केली आहे. १७ तारखेला रात्री झालेल्या हिंसाचारात दंगलग्रस्त भागातील एक घर आणि दुचाकी ,चारचाकी व क्रेन जाळण्यात आली होती.

सविस्तर वाचा

18:48 (IST) 26 Mar 2025

अकोला : विटाने भरलेल्या ट्रकची स्कूल व्हॅनला जबर धडक; १२ विद्यार्थी जखमी

अकोला : विटाने भरलेल्या भरधाव ट्रकने स्कूल व्हॅनला जबर धडक दिल्याची घटना बाळापूर-वाडेगाव मार्गावर बुधवारी दुपारी घडली. या धक्कादायक घटनेमध्ये तब्बल १२ विद्यार्थी जखमी झाले आहेत.

सविस्तर बातमी...

18:41 (IST) 26 Mar 2025

वीज बिलाच्या वसुलीसाठी आता ‘दामिनी’ मैदानात….बड्या ग्राहकांकडील…

अमरावती : वीज बिल भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या बड्या ग्राहकांकडील विजेचे बिल वसूल करण्याची जबाबदारी महावितरणच्या दामिनींनी घेतली असून त्या कारवाईसाठी थेट ग्राहकांच्या दारात पोहचत आहेत. चालू आर्थिक वर्षाचे केवळ ५ दिवस शिल्लक आहेत आणि अजूनही १२४ कोटी पैकी ३६ कोटीचे वीजबिल वसूल होणे बाकी असल्याने महावितरणच्या दामिनी वसूलीसाठी सरसावल्या आहेत.

सविस्तर वाचा

18:15 (IST) 26 Mar 2025

ठाकरे गटाला लागलेली गळती अहिल्यानगरमध्ये थांबेना;शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी पदाधिकाऱ्यांचा जथ्था मुंबईकडे रवाना

अहिल्यानगरः शिवसेनेच्या ठाकरे गटाला अहिल्यानगर जिल्ह्यात लागलेली गळती थांबायला तयार नाही. दोन महिन्यांपूर्वी माजी महापौरांसह काही माजी नगरसेवकांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. आज, बुधवारी पुन्हा ठाकरे गटातील जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य, सभापतींसह संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी दुपारी जथ्थ्याने मुंबईकडे रवाना झाले.

सविस्तर वाचा

17:48 (IST) 26 Mar 2025

राज्य शासनाची प्रमुख मुख्यालये नागपुरात स्थानांतरित करा, दटके म्हणाले…

नागपूर : नागपूर कराराप्रमाणे राज्य शासनाने मुंबई- पुण्यात असलेली राज्य शासनाची १६ कार्यालये नागपूरमध्ये स्थानांतरित करा, अशी मागणी भाजपचे आमदार  प्रवीण दटके यांनी विधानसभेत केली. दटके यांनी विधानसभेत नागपूर कराराचा उल्लेख करीत राज्य शासनाच्या विविध विभागाच्या मुख्यालयाची यादी सभागृहात वाचून दाखवली. 

सविस्तर वाचा

17:42 (IST) 26 Mar 2025

चाकूचा धाक दाखवून महिलेवर बलात्कार, आरोपी विरोधात नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अलिबाग : चाकूचा धाक दाखवून एका महिलेवर घरात घुसून बलात्कार केल्याची घटना नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी त्याला अटक केली आहे.

सदर फिर्यादी महिला ही तिच्या घरात काम करत होती. यावेळी घराचा दरवाजा कोणीतरी वाजवला म्हणून, महिलेने दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच आरोपी बळजबरीने घरात शिरला. दरवाजा बंद करून महिलेकडे शाररिक संबधाची मागणी करू लागला. मात्र महिलेने त्यास नकार दिला. त्यामुळे आरोपीने खिशात आणलेला चाकू बाहेर काढून महिलेला धमकावले, आरडा ओरडा केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. नंतर तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार कोणाला सांगितला तर तिच्या पतीला ठार मारेन अशी धमकी दिली.

या घटनेनंतर झालेल्या प्रकार महिलेनी तिच्या कुटूंबियांना सांगितला. यानंतर तीने नागोठणे पोलीस ठाण्यात या प्रकरणी रितसर तक्रार नोंदवली. महिलेच्या तक्रारीनंतर भारतीय न्याय संहीता २०२३ च्या कलम ६४, आणि ३५१(२)(३) प्रमाणे आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलीसांनी तपासाची सुत्र तातडीने फिरवली. या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेतला. त्याला अटक केली. बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

17:41 (IST) 26 Mar 2025

पैशाच्या वादातून मित्र झाला वैरी…चाकूने भोकसून चक्क…

नागपूर : एकमेकांशी घट्ट मैत्री असल्याने नेहमी दोघेही सोबतच राहायचे. नेहमी एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. अशातच पैशाच्या कारणावरुन मित्रच मित्राचा वैरी बनला. जिल्ह्यातील पारशिवनी तहसीलमध्ये असलेल्या कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली.

सविस्तर वाचा

17:28 (IST) 26 Mar 2025

संतोष देशमुख यांच्या हत्येचा खटला कोणत्या दोन गोष्टींवर अवलंबून? उज्ज्वल निकमांनी दिली मोठी माहिती

संतोष देशमुख खून खटल्याच्या सुरू असलेल्या खटल्यात, बुधवारी बीड मकोका न्यायालयात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पहिला युक्तिवाद केला. या युक्तीवादात निकम यांनी खटल्याच्या प्रक्रियेवर परिणाम करू शकणारे महत्त्वाचे पुरावे सादर केले. याचबरोबर सुनावनीनंतर पत्रकारांशी बोलताना उज्ज्वल निकम यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा खटला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुरावा या दोन गोष्टींवर अवलंबून असल्याचे म्हटले आहे.

16:55 (IST) 26 Mar 2025

"बाबासाहेबांच्या संविधानामुळे मोठं परिवर्तन झालंय", देवेंद्र फडणवीस विधानसभेतून लाईव्ह!

https://www.youtube.com/watch?v=o1PkuoytP94

16:55 (IST) 26 Mar 2025

खेडशी गावच्या सहकारी संस्थेत सोळा लाखांचा गैरव्यवहार ; सचिवावर गुन्हा दाखल

रत्नागिरी तालुक्यातील आणि शहरा लगत असलेल्या खेडशी गावच्या सहकारी संस्थेमध्ये सोळा लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीला आला आहे. हा अपहार याच सोसायटीमध्ये कार्यरत असलेल्या सचिवाने केला असल्याचे उघड झाल्याने त्याच्या विरोधात रत्नागिरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत घडली. याप्रकरणी सचिव संदिप दत्ताराम घवाळी (रा. डफळचोळ वाडी मु.पो. खेडशी, रत्नागिरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने खेडशी गावच्या सहकारी संस्थेमध्ये सोळा लाखांपेक्षा जास्त रक्कमेचा गैरव्यवहार केल्याचे उघड झाले आहे.

त्याच्या विरोधात माधव भास्कर हिर्लेकर (वय ६४) रा. पाडावे वाडी मिरजोळे एमआयडीसी, रत्नागिरी यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

16:51 (IST) 26 Mar 2025

काजुच्या व्यवसायात जादा परताव्याची बतावणी करून पावणे तीन कोटींची फसवणूक

ठाणे : काजुच्या व्यवसायात चांगला परतावा मिळवून देतो अशी बतावणी करुन बंगळूरू येथील व्यवसाय सल्लागाराची दोन कोटी ८३ लाख ४० हजार रुपयांना फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फसवणूक झालेली ३९ वर्षीय व्यक्ती बंगळूरू येथे वास्तव्यास असून ते व्यवसाय सल्लागार म्हणून काम करतात. सुमारे दहा वर्षापूर्वी ते मुंबईत एका कंपनीत कामाला होते. त्यावेळी त्यांची ओळख एका तरुणासोबत झाली होती.

त्यावेळी त्या तरुणाने त्यांना काजुच्या व्यवसायाबद्दल माहिती दिली होती. २०२१ मध्ये त्या तरुणाच्या बाळकूम येथील निवासस्थानी त्यांनी काजुच्या व्यवसायामध्ये गुंतवणूकीचा निर्णय घेतला. त्या तरुणाने जुलै २०२२ ते एप्रिल २०२३ या कालावधीत व्यवसाय सल्लागाराकडून काजुच्या व्यवसायात गुंतवणूकीसाठी दोन कोटी ८३ लाख १६८ रुपये घेतले. त्यानंतर त्या तरुणाने त्यांच्याशी संपर्क बंद केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यवसाय सल्लागाराने कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.

16:43 (IST) 26 Mar 2025

कापूरबावडी चौक महिनाभर कोंडीचा; मेट्रोच्या कामामुळे उड्डाणपूल बंद

ठाणे : मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) कापूरबावडी जंक्शन परिसरात सुरू आहे. या कामासाठी येथील हलक्या वाहनांसाठी सुरु असलेला उड्डाणपूल बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कापूरबावडी चौक सायंकाळी आणि रात्रीच्या वेळेत कोंडीचे केंद्र ठरत आहे.

सविस्तर वाचा

16:40 (IST) 26 Mar 2025

प्रशासकीय गतिमानता : नागपूरचे जिल्हाधिकारी, डॉ. इटनकर यांना पारितोषिक

नागपूर : प्रशासनात लोकाभिमूखता, तत्पर निर्णयक्षमता आणि लोकसहभागाचे तत्व जपत उत्तम प्रशासनाचा आपल्या कार्यशैलीतून वस्तुपाठ घालून देणारे जिल्हाधिकारी म्हणून ओळखले जाणारे डॉ. विपीन इटनकर यांना राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानाचा तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे.

सविस्तर वाचा

16:04 (IST) 26 Mar 2025

लांछनास्पद ! रॅगिंगमध्ये देशात ' हे ' तर राज्यात ' या ' विद्यापीठाची आघाडी,अहवाल म्हणतो…

वर्धा : उच्च शिक्षण क्षेत्रात रॅगिंग हा शब्द परवलीचा होता. मात्र त्या विरोधात कठोर कायदा आला आणि रॅगिंगला बराच आळा बसला. पण तरीही रॅगिंग अद्याप पूर्णतः बंद झालेले नाहीच. कारण युजीसीने सूरू केलेल्या राष्ट्रीय रॅगिंग विरोधी हेल्पलाईनवर रॅगिंगच्या तक्रारी नोंदविल्या जात असतातच. २०२२ ते २०२४ या दरम्यान देशभरातून तक्रारी नोंदविल्या गेल्या.

सविस्तर वाचा

15:55 (IST) 26 Mar 2025

थकबाकीदारांना हिसका; जप्त मालमत्तांची एप्रिलपासून विक्री, ४२५ नव्या थकबाकीदारांना नोटीसा

नवी मुंबई</strong> : उत्पन्नाता मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता कराची अधिकाधिक वसुली व्हावी यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने यंदा कंबर कसली आहे. ४२५ बड्या थकबाकीदारांना नव्याने नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. वारंवार नोटीसा देऊनही मालमत्ता कर थकविणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करणे तसेच एक एप्रिलपासून अशा मालमत्तांचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णयही आयुक्त डाॅ.कैलास शिंदे यांनी घेतला आहे.

सविस्तर वाचा...

15:53 (IST) 26 Mar 2025

जलवाहिनी फुटल्याने पेठांसह अन्य भागातील पाणीपुरवठा विस्कळीत

पुणे : महापालिकेची दांडेकर पूल परिसरातील जलवाहिनी सोमवारी रात्री फुटल्यानंतर मंगळवारी जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. हे काम दिवसभर सुरू राहिल्याने पेठांसह अन्य काही भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. दरम्यान, या भागाचा पाणीपुरवठा बुधवारी (२६ मार्च) रोजी पूर्ववत होईल, असा दावा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आला.

सविस्तर वाचा...

15:52 (IST) 26 Mar 2025

आला उष्माघाताचा ईशारा, वाढल्या पोलीसांच्या जबाबदाऱ्या, ‘ हे ‘ करा आणि ‘ हे ‘ करू नका

वर्धा : सद् रक्षणाय, खलनिग्रणाय हे पोलीस दलाचे ब्रीदवाक्य. २४ तास पोलिसाने सेवेत असलेच पाहिजे ही अपेक्षा. कुठंही काही विपरीत घडले की पोलिसांनी त्वरित हजर झालेच पाहिजे, ही समाज मानसिकता. आता तर उन्हाळा लागला व उष्णतेची संभाव्य लाट, गृहीत धरून महसूल खात्याने मार्गदर्शन केले आहे.

सविस्तर वाचा...

15:51 (IST) 26 Mar 2025

वादग्रस्त ‘आयएएस’ अधिकारी शुभम गुप्ता विदर्भ वैधानिक विकास मंडळावर, गायवाटप घोटाळ्याप्रकरणी कारवाई केव्हा?

गडचिरोली : जिल्ह्यातील भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात झालेल्या गाय वाटप घोटाळ्याप्रकरणी दोषी आढळलेले तत्कालीन प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता यांची विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा...

15:50 (IST) 26 Mar 2025

मुलाची केली हत्या, वडिलांना जन्मठेप

बुलढाणा : पोटच्या पोराच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून निर्घृण हत्या करणाऱ्या पित्यास मेहकर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मेहकरचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सागर मुंगीलवार यांनी हा अपराध्याना जरब बसविणारा निकाल दिला आहे.मेहकर तालुक्यातील पारडी येथे हा भीषण घटनाक्रम घडला होता. आरोपी माणिक केशव राठोड ( राहणार पारडी तालुका मेहकर ) हा कौटुंबिक वादापायी पत्नी व मुलगा रवी राठोड यांच्यापासून वेगळा राहत होता.

सविस्तर वाचा...

15:41 (IST) 26 Mar 2025

…अन् महिलेने एसटी महामंडळ अधिकाऱ्याच्या श्रीमुखात भडकावली, कारण…

यवतमाळ : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ कायम तत्पर असलेल्या राज्य परिवहन महामंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना काय झाले? असा प्रश्न सध्या यवतमाळ जिल्ह्यात चर्चेत आहे. दोन दिवसांपूर्वी उमरखेड आगारातून अल्पवयीन मुलीस सोबत नेत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी बस चालकास अटक करण्यात आली.

सविस्तर वाचा

15:34 (IST) 26 Mar 2025

अध्यक्षपद कायम राखण्यासाठी महाराष्ट्र चेंबरच्या घटनेत बदल ? कार्यकारिणी सभेत ठराव मंजूर

नाशिक : राज्यातील उद्योजकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री आणि ॲग्रीकल्चर संस्थेच्या अध्यक्षपदाचा कार्यकाल वाढविण्यासाठी घटनेतील तरतुदीत बदल करण्याचा प्रस्ताव कार्यकारिणीच्या सभेत मंजूर करण्यात आला आहे. सध्या चेंबरच्या अध्यक्षपदाची धुरा ललित गांधी यांच्याकडे आहे. गांधी जैन अल्पसंख्यांक विकास आर्थिक विकास महामंडळाचेही अध्यक्ष आहेत.

सविस्तर वाचा...

15:33 (IST) 26 Mar 2025

नाशिकमध्ये दोन लाखाहून अधिकची लाच स्वीकारताना गटविकास अधिकारी जाळ्यात

नाशिक : रोजगार हमी योजनेतील थकीत देयक काढून देण्याच्या मोबदल्यात दोन लाख १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा पंचायत समितीतील गटविकास अधिकारी महेश पोतदार याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले. पोतदारच्या शहरातील घराच्या झडतीत दोन लाखाहून अधिक रोकड आणि मालमत्तेची कागदपत्रे आढळली.

सविस्तर वाचा...

15:33 (IST) 26 Mar 2025

संविधान संवर्धनासाठी सज्ज होण्याची गरज … येवल्यातील पहिल्या संविधान लोककला साहित्य संमेलनातील सूर

नाशिक : संविधान संवर्धनासाठी सज्ज होण्याचे आवाहन करतानाच केंद्र आणि राज्य सरकारने शालेय व विद्यापीठ स्तरावर संविधान हा स्वतंत्र विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा, प्रबुद्ध लोककला विद्यापीठाची स्थापना करावी, यासह एकूण १० ठराव येवला येथे आयोजित पहिल्या संविधान लोककला साहित्य संमेलनात मांडण्यात आले.

सविस्तर वाचा...

15:31 (IST) 26 Mar 2025

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने नाशिक जिल्हा बँकेवर प्रशासक नेमण्याची गरज

नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कमकुवत आर्थिक स्थितीमुळे नागपूर जिल्हा बँकेच्या धर्तीवर प्रशासक म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची (एमएससीबँक) नियुक्ती करावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेती आणि सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते तसेच देवळा तालुक्यातील विठेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष कुबेर जाधव यांनी निवेदनाव्दारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सहकार मंत्र्यांकडे केली आहे.

सविस्तर वाचा...

15:26 (IST) 26 Mar 2025

narendra modi: "खूप अभ्यास करा, मोठे होऊन…" पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खासदारांच्या चिमुकल्यांना सल्ला

अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देश-विदेशात प्रचंड लोकप्रियता आहे. अनेक दिग्गज त्यांची भेट घेऊन चर्चा करण्यासाठी आतूर असतात. नरेंद्र मोदींना लहान मुलांची विशेष आवड. दिल्ली येथील पंतप्रधानांच्या निवासस्थानी नरेंद्र मोदी खासदारांच्या चिमुकल्यांशी गुफ्तगू करतांना रमल्याचे चित्र दिसून आले.

सविस्तर वाचा

15:20 (IST) 26 Mar 2025

सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण.. चांदीने मात्र…

नागपूर: सोने- चांदीचे दर सातत्याने वाढल्याने बघता- बघता हे दर उच्चांकीवर पोहचले होते. त्यामुळे दागिने खरेदीसाठी इच्छुक ग्राहकांमध्ये चिंता वाढली होती. परंतु मागील तीन दिवसांपासून सातत्याने सोन्याच्या दरात घट झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर चांदीच्या दरात मात्र वाढ झालेली दिसत आहे.

सविस्तर वाचा

15:08 (IST) 26 Mar 2025

तीन वर्षात ७० ते ८० वाघांच्या शिकारीचा अंदाज, आरोपपत्रात २९ आरोपींची नावे

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या शिकार प्रकरणात मंगळवार, २५ ला राजूरा प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. वाघांची शिकार आणि त्यांच्या अवयवांचा बेकायदेशीर व्यापार या सर्व गोष्टींचा तपशीलवार तपास केल्यानंतर निर्धारित वेळेच्या आत आरोपपत्र दाखल करण्यात आले.

सविस्तर वाचा

Kunal Kamra vs Shiv Sena Leader Eknath Shinde Controversy LIVE Updates in Marathi

कॉमेडियन कुणाल कामरा कॉन्ट्रोव्हर्सी लाईव्ह

Maharashtra News Live Today, 26 March 2025 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घ्या