Marathi News Updates : राज्याच्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदी आमदार आण्णा बनसोडे यांची निवड करण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडीवर अभिनंदन प्रस्ताव ठेवला. आज दोन्ही सभागृहात अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार आहे. विधान परिषदेत एकनाथ खडसे यांनी सभागृहात मंत्री गैरहजर राहिल्यावरून नाराजी व्यक्त केली. कुणाल कामरा प्रकरण, जयकुमार गोरे आरोप प्रकरण आदी विविध मुद्द्यांवर काल सभागृहात खडाजंगी पाहायला मिळाली. आजही विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. यासह राज्यातील विविध बातम्या आणि अपडेट्स जाणून घेउयात.

Live Updates

Maharashtra News Live Today, 26 March 2025 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घ्या

15:01 (IST) 26 Mar 2025

पालकमंत्री बदलले…वाशीम जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी आता…

अकोला : वाशीम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जबाबदारी सोडल्यानंतर हे पद रिक्त होते. सामान्य प्रशासन विभागाने २६ मार्चला शासन निर्णय निर्गमित करून वाशीम जिल्ह्याच्या नव्या पालकमंत्र्यांची निवड जाहीर केली.

सविस्तर वाचा

15:01 (IST) 26 Mar 2025

“मंत्री साहेब… आमचे शिक्षण थांबवू नका…”, विद्यार्थ्यांची आर्त हाक शिक्षण मंत्री ऐकतील ?

अमरावती : “कमी पटामुळे आमच्या शाळेतील शिक्षक कमी होणार असे कळले आहे. आम्हाला गावातच शिकवण्यासाठी शिक्षक राहू द्या. कमी शिक्षक असले तर आमचे शिक्षण होणार नाही. बाहेरगावी जाण्यामुळे त्रास होईल व शिक्षण बंद होईल. पुरेसे शिक्षक असले तरच आमचे शिक्षण चांगले होऊ शकते.

सविस्तर वाचा

14:39 (IST) 26 Mar 2025

पाच लाखांच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ: चौघांवर गुन्हा दाखल

गोंदिया : विवाहितेचा सासरच्या मंडळीं कडून  कोणत्याही प्रकारे छळ होऊ नये यासाठी हुंडा विरोधात विविध कायदे सरकार द्वारे करण्यात आले आहे. तरी पण लोक यातून काही धडा घेतात असे दिसून येत नाहीत. असेच एक प्रकरण गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील ग्राम पाथरी येथे घडले आले.

सविस्तर वाचा

14:39 (IST) 26 Mar 2025

नागपुरातील दंगलीवर प्रतिक्रिया देणाऱ्या भाजप प्रवक्त्याला सिरियातून धमकी

नागपूर : गेल्या १७ मार्च रोजी नागपुरात गांधी गेट परिसरात दोन गटात दंगल झाली. या दंगलीस एक गट कसा कारणीभूत आहे, याबाबत वारंवार प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्याला थेट सीरियातून धमकी देण्यात आली. जीवे मारण्याची धमकी येताच भाजप प्रवक्त्यांनी लगेच सीताबर्डी पोलीस स्टेशन गाठले.

सविस्तर वाचा

14:17 (IST) 26 Mar 2025

संतोष देशमुख यांची हत्या मोठ्या कटाचा परिपाक, सुनावणीनंतर उज्ज्वल निकमांनी दिली माहिती

प्रत्येक तारखेबाब आमच्याकडे पुरावा आहे. ज्यांनी धमकी दिली, वाल्मिक कराडने धमकी त्याप्रमाणे गँगलीडर तिथे प्रत्यक्षात आला. सुदर्शन घुलेनेही धमकीचा पुनरुच्चार केला. या सर्व गोष्टी सरकारकडे व्हिडिओ आणि ऑडिओ रुपात आहेत. हा कट मोठ्या कटाचा परिपाक आहे. यातील आरोपी दोषी आहोत. कृष्णा आंधाळेचाही या गुन्ह्यात सहभाग आहे. साक्षीदारांची गोपनिय न्यायालयाने ठेवावी, अशी मागणी केली.

14:15 (IST) 26 Mar 2025

आमदाराची मित्रासाठी नाल्यात भिंत, जिल्हाधिकाऱ्यांनी मागितला अहवाल

चंद्रपूर: केवळ मित्राचा बंगला आणि भूखंडाला नाल्याच्या पाण्याची झळ पोहचू नये, यासाठी तब्बल ९५ लाख रुपयांची संरक्षण भिंत नियमांना धाब्यावर बसवून बांधण्यात आली. आता या प्रकरणाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा मृद व जलसंधारण आणि महानगर पालिकेला मागितला आहे.  मनपाचे नाहकरत प्रमाणपत्र नसताही या संरक्षण भिंतीचे बांधकाम केले आहे.

सविस्तर वाचा

13:31 (IST) 26 Mar 2025

प्राध्यापकाला या अभ्यासक्रमात करिअर नाही म्हणणे भोवले, आत्महत्येस प्रवृत्त केल्याची विद्यार्थिनींची तक्रार

नागपूर: शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्थेमधील एक प्राध्यापक कायम मानसिक छळ करत असल्याची निनावी तक्रार एका विद्यार्थिनीने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडे केली. याचा आधार घेत अभाविपने विज्ञान संस्थेमध्ये आंदोलन करत संबंधित शिक्षकाला निलंबित करण्याची मागणी केली. मात्र, संबंधित विद्यार्थिनीची महाविद्यालयाकडे किंवा तेथील विशाखा समितीकडे कुठलीही तक्रार नाही.

सविस्तर वाचा

13:25 (IST) 26 Mar 2025

पीएसआय २०२३ चा निकाल तर पीएसआय २०२२ ची प्रतीक्षा यादी जाहीर, अतिश मोरे राज्यात पहिला

नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्‍या महाराष्ट्र अराजपत्रित गट- ब सेवा मुख्य परीक्षेतील पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. त्यात अतिश मोरे यांनी सर्वाधिक गुणांसह राज्‍यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

सविस्तर वाचा

13:07 (IST) 26 Mar 2025

‘त्या’ युवकांची वाढली डोकेदुखी! पुन्हा घ्यावे लागणार प्रशिक्षण

बुलढाणा : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत प्रशिक्षण घेणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील लाखो युवकांसाठी हि बातमी आहे. बातमी उपयुक्त असली तरी काहीशी डोकेदुखी वाढविणारी आहे.लाखो युवक, युवती  सह शासकीय, निमशासकीय यंत्रणाची देखील डोकेदुखी याने वाढणार आहे. याचे कारण देखील मजेदार आहे. कधी कधी एखाद्या योजनेची  शासन घोषणा करते, घाईघीसडीत अंमलबाजवणी करते आणि काही महिन्यांनंतर त्यात बदल करते.

सविस्तर वाचा

13:02 (IST) 26 Mar 2025

राज्यातील शासकीय परिचर्या महाविद्यालयात ना प्राचार्य, ना प्राध्यापक..

नागपूर : मुंबई, नागपूरसह सर्वच शासकीय बी.एस्सी. आणि एम.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी प्राचार्य, प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक नाहीत. त्यामुळे या महाविद्यालयातील पदभार वर्ग तीनमध्ये मोडणाऱ्या पाठ्यनिर्देशकांकडे देऊन सरकार वेळ मारून नेत आहे. पदोन्नतीही केली जात नसल्याने या महाविद्यालयांच्या दर्जावरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सविस्तर वाचा

12:59 (IST) 26 Mar 2025
संतोष देशमुख हत्याप्रकरणी बीड जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरू

सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी युक्तीवाला केली सुरुवात

संपूर्ण घटनेत वाल्मिक कराडने गाईड केलं – उज्ज्वल निकम

सुदर्शन घुलेने अवादा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली

12:53 (IST) 26 Mar 2025

“वाघ्या कुत्रा दंतकथेतून आला”, संभाजी छत्रपतींनी मांडली भूमिका

मी ३१ मेचा अल्टिमेटम दिलेला नाही. राज्य शासनाचे धोरण काय सांगतं की ३१ मेपर्यंत गडकोट किल्ल्यात जे अतिक्रमण आहे ते काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मी सरकारला विनंती केली आहे वाघ्या कुत्र्याचा एक टक्काही पुरावा नाही. डाव्या उजव्या इतिहासकारांनीही या कुत्र्याविषयी संदर्भ दिलेला नाही. वाघ्या कुत्र्याचं चित्रण दंतकथेतून आलेलं आहे – छत्रपती संभाजी महाराज

12:50 (IST) 26 Mar 2025

आनंदवार्ता! ‘महाराष्ट्र’तून आता अधिक सुरक्षित प्रवास; आठ गाड्यांच्या फेऱ्यामध्ये…

अकोला : मध्य रेल्वेने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. मध्य रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या काही गाड्यांना एलएचबी कोच लावले जाणार आहे. शिवाय सुधारित संरचनेसह गाडी चालवण्यात येणार आहे. महाराष्ट्र एक्सप्रेसला एलएचबी कोच लावले जाणार असल्याने प्रवास अधिक सुरक्षित होईल.

सविस्तर वाचा

12:24 (IST) 26 Mar 2025

अनगरचे अप्पर तहसील कार्यालय अखेर रद्द

सोलापूर : मोहोळ तालुक्यातील संपूर्ण राजकारणावर परिणाम केलेल्या अनगर येथील अप्पर तहसील कार्यालयाच्या निर्मितीचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने आदेश देताच अखेर शासनाने रद्द केला आहे. त्यामुळे मोहोळ तालुक्यातील ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माजी आमदार राजन पाटील यांच्या गटाला धक्का बसल्याचे मानले जाते.

12:22 (IST) 26 Mar 2025

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सोलापूर एनटीपीसीमध्ये वीज निर्मितीत घट

सोलापूर : एनटीपीसीच्या सोलापूर औष्णिक ऊर्जानिर्मिती प्रकल्पाने यंदाच्या २०२४-२५ वर्षात फेब्रुवारीअखेर ६२०९ मिलियन युनिट वीजनिर्मिती केली असून आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत ६८०० मिलियन युनिट वीजनिर्मिती होण्याची अपेक्षा आहे. मागील २०२३-२४ आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा तीन हजार मिलियन युनिट वीजनिर्मिती इतकी घट होत असल्याची माहिती समोर आली आहे.

सोलापूरपासून २२ किलोमीटर अंतरावर दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी येथे एनटीपीसीच्या देखरेखीखालील सोलापूर औष्णिक ऊर्जानिर्मिती प्रकल्पात प्रत्येकी ६६० मेगावॅट क्षमतेप्रमाणे दोन विभागात एकूण १३२० मेगावॅट क्षमतेने वीजनिर्मिती होते. मागील आर्थिक वर्षाच्या प्रकल्पातील कामकाजाची माहिती प्रकल्पाचे कार्यकारी संचालक तपनकुमार बंडोपाध्याय यांनी दिली.

12:14 (IST) 26 Mar 2025

छत्रपती संभाजीनगरमधील औद्योगिक वसाहतीमध्ये २८ हजार ८९८ कोटींची भर, पर्यावरण पुरक वाहन निर्मितीच्या पुन्हा केंद्रस्थानी

छत्रपती संभाजीनगर : दिल्ली – मुंबई औद्योगिक पट्टयात आतापर्यंत झालेल्या ६४ हजार कोटींच्या गुंतवणुकीमध्ये दावोसमध्ये झालेल्या गुंतवणूक करारातील २८ हजार हजार ८९८ कोटी रुपयांची भर पडणार असल्याचे बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समाज माध्यमांमधील माहितीनंतर स्पष्ट झाले. या गुंतवणुकीमुळे मराठवाडा पर्यावरण पुरक दूचाकी आणि चारचाकी वाहननिर्मितीचे मोठे केंद्र बनणार आहे. या क्षेत्रात आता रिलाईन्स पॉवर इंउस्ट्रीजही उतरणार आहे. त्यांनी १४ हजार ३७७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून त्यातील चार हजार रोजगार उपलब्ध होतील.

जेनसोल इंजिनिअरिंग या इलेक्ट्रिकल्स चारचाकी वाहन बनविणारी कंपनी चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून दूचाकी व चारचाकी वाहनांन लागणार बॅटरी उत्पादनातही अन्वी पॉवर ही कंपनी उतरणार असून त्यांची गुंतवणूक १० हजार ५२१ कोटी असणार असणार आहे. तर सर्वात मोठी गुंतवणूक रिलाईन्स पॉवर इंडस्ट्रीज करणार असून १४ हजार ३७७ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून चार हजार नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. या नव्या गुंतवणुकीमुळे ऑरिकमधील १० हजार हेक्टरावर भूसंपादनातून उद्योगासाठी निर्धारित केलेली ६० टक्के जमीन पूर्णत: वापरली आहे. दरम्यान या नव्या गुंतवणुकीमुळे ११ हजार नवे रोजगार उपलब्ध होतील, असा दावा करण्यात आला आहे.

12:09 (IST) 26 Mar 2025

सांगली : लसणाचा तोरा उतरला, ६०० रुपयांवर गेलेला किलोचा दर ७० रुपयांवर खाली

सांगली : रब्बी हंगामातील माल बाजारात येताच लसणाचा तोरा उतरला असून, ६०० रुपये किलोवर गेलेला दर आता ठोक बाजारात ७० रुपयांपर्यंत खाली आला आहे. मंगळवारी सांगलीतील सौदे बाजारात सरासरी कांद्याचा क्विंंटलचा सरासरी दर १४०० रुपये असला, तरी किरकोळ बाजारात मात्र किलोला किमान ३० रुपये ग्राहकांना मोजावे लागत आहेत.

स्वयंपाकामध्ये आवश्यक आणि आयुर्वेदिकदृष्ट्या बहुगुणी असलेला लसूण ६०० रुपये किलोवर होता. मात्र, रब्बी हंगामातील लसूण काढणी झाल्यानंतर बाजारात लसणाचे दरही घसरले आहेत. दर खाली आल्याने सोमवारी सौदे बाजारात ३८५ क्विंंटल असलेली लसूण आवक मंगळवारी अवघी २५ क्विंंटलपर्यंत खाली आली. सौदे बाजारात क्विंटलचा दर किमान पाच हजार, तर कमाल नऊ हजार रुपये होता. सरासरी लसणाचा ठोक बाजारात दर सात हजार रुपये प्रतिक्विंटल होता. म्हणजेच ७० रुपये किलो दराने लसणाचा सरासरी दर होता.

सांगली बाजारात उन्हाळी हंगामातील कांदा आवकही घटली असून, मंगळवारी ३१७३ क्विंंटल कांदा आवक झाली. गेल्या आठवड्यात कांदा आवक सहा हजार क्विंंटलपर्यंत होती, अशी माहिती सांगली बाजार समितीतून सांगण्यात आली. कांद्याचे क्विंटलला किमान ८०० रुपये, तर कमाल २००० रुपये दर होते. तर बटाटा आवक ८६८ क्विंटल होती, किमान दर १२००, तर कमाल दर २२०० रुपये होते. बाजारात मात्र बटाटा दर ३० रुपये किलो आहेत.

12:07 (IST) 26 Mar 2025

सांगलीत गांजा, नशेच्या इंजेक्शनचा साठा जप्त, पाच जणांना अटक

सांगली : वाळवा तालुक्यात उसाच्या पाल्यात लपविण्यात आलेला साडेआठ लाखांचा तयार गांजा आणि विटा येथे नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शनच्या १७ हजार ५०० रुपयांच्या ३५ कुप्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

जिल्ह्यात अमली पदार्थ विरोधी कृती दल स्थापन करण्यात आले आहे. या पथकाकडून अमली पदार्थाची साठवणूक, विक्री, वाहतूक करणाऱ्याविरुध्द पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार वाळवा तालुक्यातील ओझर्डे ते धबकवाडी रस्त्यावर असलेल्या कुंभार वस्तीवर उसाच्या पाल्याची गंजी रचून या गंजीमध्ये गांजा ठेवण्यात आल्याचे समजले. यानुसार पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जयदीप कळेकर आणि पथकाने या ठिकाणी छापा टाकला असता गंजीमध्ये लपविण्यात आलेल्या प्लास्टिक पोत्यात २७ किलो ९२५ ग्रॅम तयार गांजा मिळाला.

याचे मूल्य ८ लाख ३७ हजार रुपये आहे. या प्रकरणी सुनील सुतार (वय २८ रा. ऐतवडे खुर्द, ता. वाळवा), सुजय खोत (वय ३४, रा. खोत मळा, आष्टा) आणि परशुराम पोळ (वय ३४, रा. पोळ गल्ली, आष्टा) या तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुध्द इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

11:52 (IST) 26 Mar 2025
संतोष देशमुख हत्याप्रकरणी आज बीड जिल्हा न्यायालयात सुनावणी

संतोष देशमुख हत्याप्रकरणी आज बीड जिल्हा न्यायालयात सुनावणी

सुनावणीकडे अवघ्या राज्याचं लक्ष

थोड्याच वेळात सुनावणीला होणार सुरुवात

11:52 (IST) 26 Mar 2025

आमदारांच्या मनधरणीला यश, झाडावर चढलेला तरुण खाली उतरला

त्याच्या एकूण १८ मागण्या आहेत. इश्वर शिंदे या तरुणाचं नाव आहे. तो बीड जिल्ह्याचा आहे. तो इंजिनिअर आहे. त्याला समजावलं आहे, त्याला खाली येण्यास सांगितलं आहे. उपमुख्यमंत्री अजित दादांकडे जाऊन चर्चा करू असं मी त्यांना सांगितलं आहे. त्यांनी माझं ऐकलं असून ते खाली आले आहेत- अनुप अग्रवाल, भाजपा आमदार

11:41 (IST) 26 Mar 2025

विधानभवन परिसरात झाडावर चढून आंदोलन करण्याचा प्रयत्न

राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. असं असतानाच विधानभवन परिसरात एका तरुणाने झाडावर चढून आंदोलन केलं आहे. या तरुणाच्या नेमक्या मागण्या काय आहेत हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र पोलीस अग्निशामक दलाच्या मदतीने तरुणाला झाडावरून खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

11:31 (IST) 26 Mar 2025

“पान टपरी चालवणारे…”, विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड होताच देवेंद्र फडणवीसांकडून अभिनंदन!

देशातील संविधान किती मोठं आहे, हे आज आपण पाहू शकतो. चहा टपरीवर काम करणारे पंतप्रधान झाले, रिक्षा चालवणारे राज्याचे मुख्यमंत्री झाले. आणि ज्यांनी पान टपरी चालवली ते आज राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष बनले, अस म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांचं अभिनंदन.

कॉमेडियन कुणाल कामरा कॉन्ट्रोव्हर्सी लाईव्ह

Maharashtra News Live Today, 26 March 2025 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घ्या