Maharashtra News Live Updates : महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. मात्र, आता सर्वांचं लक्ष हे मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे लागलं आहे. ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सरकार स्थापन होऊन जवळपास एक आठवडा होता आला, पण अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला आहे? याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. यातच महायुतीत गृहमंत्रिपदाचा तिढा अद्यापही कायम असल्याची चर्चा आहे. यातच आम्ही गृहमंत्रिपदाचा आग्रह अद्यापही सोडलेला नसल्याचं विधान गुलाबराव पाटील यांनी केलं. त्यांच्या या विधानामुळे महायुतीत गृहमंत्रिपदाचा तिढा अद्यापही कायम असल्याची चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विरोधक आणखी आक्रमक जाले आहेत. यासह सर्व बातम्यांचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.

Live Updates

Maharashtra Political News Live Updates : राज्याच्या राजकीय घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.

18:09 (IST) 11 Dec 2024

नालासोपाऱ्यातील पुराचा प्रश्न अखेर सुटला, निळेगावात कामाला रेल्वे मंत्रालयाची परवानगी

वसई- नालासोपारा पश्चिमेच्या निळेमोरे गावातील दरवर्षी निर्माण होणार्‍या पूरपरिस्थितीवर अखेर तोडगा निघाला आहे. येथील रेल्वेच्या ५ एकर जागेवर धारण तलाव तयार करून त्याचे सुशोभिकरण करण्याच्या निर्णयाला केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी मान्यता दिली आहे.

सविस्तर वाचा....

17:58 (IST) 11 Dec 2024

वसई : २९ गावांचे प्रकरण तापले, सुनावणीची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा आरोप

वसई- गावे महापालिकेत ठेवण्याच्या शासन निर्णयावर मागवलेल्या हरकती आणि सुचनांवर सुनावणी प्रक्रिया होणार असल्याने पुन्हा एकदा २९ गावांचा मुद्दा चर्चेत आला आहे. मात्र गाव आंदोलकांनी या हरकतींची प्रक्रियाच बेकायेदशीर असल्याचा आरोप केला आहे.

सविस्तर वाचा....

17:18 (IST) 11 Dec 2024

नागपूर : झटपट पैशांचे आमिष! महाविद्यालयीन तरुणींकडून देहव्यापार, ‘हेवन स्पा’मध्ये सेक्स रॅकेट….

नागपूर : लक्ष्मीनगरसारख्या गजबजलेल्या चौकात स्पा-मसाज सेंटरच्या नावावर सुरु असलेल्या ‘सेक्स रॅकेट’वर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा घातला. या छाप्यात देहव्यापार करणाऱ्या तीन तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले.

सविस्तर वाचा...

17:07 (IST) 11 Dec 2024

गोंदिया : ‘ईव्हीएम हटवा, बॅलेट पेपर आणा’; भाकप, ‘बीआरएसपी’ आक्रमक

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी व आदिवासी गोवारी युवा शक्ती संघटनेच्या वतीने आज ११ डिसेंबर रोजी नवीन प्रशासकीय इमारतीत असलेल्या तहसील कार्यालयासमोर ईव्हीएम काढून मतपत्रिका आणण्यासाठी आंदोलन करण्यात आले. ज्यामध्ये दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सविस्तर वाचा...

17:03 (IST) 11 Dec 2024

मानपाडा-बाह्यवळण रस्ता ते कोपर रस्त्यामधील अडथळा दूर

डोंबिवली : येथील पूर्वेतील नांदिवली पंचानंद भागातील स्वामी समर्थ चौकात पालिकेच्या २४ मीटर रूंदीच्या विकास आराखड्यामधील रस्त्यात दहा वर्षापूर्वी उभारण्यात आलेली एक बेकायदा इमारत पालिकेच्या ई प्रभाग तोडकाम पथकाने मंगळवारी जमीनदोस्त केली.

वाचा सविस्तर...

17:02 (IST) 11 Dec 2024

टिटवाळा येथे कर थकबाकीदारांच्या दोन कोटीच्या मालमत्तांना टाळे, पालिकेच्या अ प्रभागाची कारवाई

कल्याण : अनेक वेळा नोटिसा देऊनही टिटवाळा अ प्रभागातील अनेक मालमत्ताधारकांनी कराची थकित रक्कम पालिकेत भरणा केली नाही. त्यामुळे पालिकेच्या अ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी विशेष मोहीम राबवून टिटवाळा, आंबिवली भागातील मालमत्ता कर थकबाकीदारांच्या दोन कोटी किमतीच्या मालमत्तांना टाळे लावले आहे.

वाचा सविस्तर...

17:02 (IST) 11 Dec 2024

बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी मुंब्र्यातील मुस्लीम रस्त्यावर

ठाणे : बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदूत्ववादी संघटना रस्त्यावर उतरून मोर्चे काढत असतानाच, मुंब्य्रात मुस्लीम बांधवानी रस्त्यावर उतरून बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंदूवरील अत्याचाराविरोधात निषेध आंदोलन केले.

वाचा सविस्तर...

17:01 (IST) 11 Dec 2024

Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचालींना वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तातडीने दिल्ली दौऱ्यावर

Maharashtra Cabinet Expansion : राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं असून ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सरकार स्थापन होऊन आठवडा झाला. मात्र, तरीही अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. महायुतीत मंत्रि‍पदावरून महायुतीत रस्सीखेच सुरु असल्याचं बोललं जात आहे. यातच एकनाथ शिंदे हे गृहखात्यासाठी आग्रही असल्याचं बोललं जात आहे. मात्र, भाजपा गृहखातं सोडण्यास तयार नसल्याचं बोललं जात आहे. यातच आता पुढील दोन ते ती दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तातडीने दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात मंत्रिमंडळाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेले नसल्याची माहिती आहे. त्यामुळेही चर्चा रंगल्या आहेत.

16:26 (IST) 11 Dec 2024

प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?

नागपूर : पाच वर्षात तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे नागपूरकर देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त वारंवार टळत आहे. पूर्वी १२ डिसेंबरला ते नागपूरला येणार होते, नंतर ही तारीख १३ डिसेंबर झाली आणि आता १५ डिसेंबर झाली आहे.

सविस्तर वाचा

16:25 (IST) 11 Dec 2024

 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले...

नागपूर : राज्यभरातील सरकारी स्वस्त धान्य दुकानात सरकारकडून धान्याचा पुरवठा झाल्यावरही तांत्रिक अडचणींमुळे वितरण रखडले आहे.केंद्र व राज्य सरकारकडून दारिद्र्यरेषेखालील गरीब कुटुंबाला सरकारी स्वस्त धान्य दुकानातून नि:शुल्क धान्याचे वाटप केले जाते. त्यासाठी संबंधित दुकानाला सरकारकडून महिन्याच्या सुरुवातीलाच आवश्यक राखीव धान्याचा पुरवठा केला जातो.

सविस्तर वाचा

16:23 (IST) 11 Dec 2024

पुणे : दरडप्रवण गावातील कामांना गती, २०० कोटींचा निधी मंजूर

पुणे : जिल्ह्यातील ५३ दरडप्रवण गावांत विविध विकासकामे करण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. भूस्खलन आणि दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या या गावांमध्ये तातडीने उपाययोजना करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून एकूण २०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून, आंबेगाव, इंदापूर, खेड, जुन्नर, भोर आणि मावळ तालुक्यातील गावे पहिल्या टप्प्यात निश्चित करण्यात आली आहेत.

सविस्तर वाचा....

16:23 (IST) 11 Dec 2024

सतीश वाघ यांची हत्या जुन्या वादातून, पाच लाखांची दिली होती सुपारी – पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार

पुणे हडपसर येथील भाजपचे नेते विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची फुरसुंगी फाटा येथून दोन दिवसांपूर्वी सकाळी पहाटेच्या सुमारास चारचाकी वाहनातून चार जणांनी अपहरण केल्याची घटना घडली होती.

सविस्तर वाचा....

16:21 (IST) 11 Dec 2024

नाशिकरोड परिसरात नायलॉन मांजा विक्रेता ताब्यात

नाशिक : बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या संशयितावर नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने कारवाई केली असून ६१,९०० रुपयांचा मांजा जप्त करण्यात आला.

वाचा सविस्तर...

15:58 (IST) 11 Dec 2024

आता समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्याही बदल्या होणार

बुलढाणा : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत समुदाय आरोग्य अधिकारी पदी नियुक्ती झाली की त्या कर्मचाऱ्याला एकाच ठिकाणी कायम 'अडकून' पडावे लागत होते! याचे कारण या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदलीचे प्रावधानच नव्हते…

सविस्तर वाचा...

15:35 (IST) 11 Dec 2024

लग्नाच्या हंगामात सोन्याच्या दराने वाढवली चिंता… हे आहे आजचे दर…

नागपूर : नागपूरसह सर्वत्र लग्नाची लगबग वाढली. लग्न असलेल्या कुटुंबियांकडून वर- वधूसाठी दागिने करण्यासाठी सराफा व्यवसायिकांकडेही गर्दी होऊ लागली . परंतु अद्यापही सोन्याचे दर नियंत्रणात येत नाही. त्यातच मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दराच चांगलीच वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे.

सविस्तर वाचा...

15:31 (IST) 11 Dec 2024

"संविधानाचा अवमान हे अत्यंत गंभीर", रामदास आठवले यांची परभणीच्या घटनेवर प्रतिक्रिया

"संविधानाचा अवमान करणे हा अत्यंत गंभीर आणि राष्ट्रद्रोही गुन्हा आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष द्यावे. या प्रकरणातील आरोपीला अटक झाली आहे. आंबेडकरी जनतेच्या भावना तीव्र आहेत. निषेध आंदोलनातून त्या व्यक्त झाल्या आहेत. आता आंबेडकरी जनतेने संयम बाळगुन शांतता राखावी", असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

15:21 (IST) 11 Dec 2024

पुणे : दरडप्रवण गावातील कामांना गती, २०० कोटींचा निधी मंजूर

पुणे : जिल्ह्यातील ५३ दरडप्रवण गावांत विविध विकासकामे करण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. भूस्खलन आणि दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या या गावांमध्ये तातडीने उपाययोजना करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून एकूण २०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून, आंबेगाव, इंदापूर, खेड, जुन्नर, भोर आणि मावळ तालुक्यातील गावे पहिल्या टप्प्यात निश्चित करण्यात आली आहेत.

सविस्तर वाचा....

15:07 (IST) 11 Dec 2024

स्कूलबस आणि दुचाकीची धडक, युवकाचा मृत्यू; चिखली राज्य मार्गावरील घटना

बुलढाणा : बुलढाणा-चिखली राज्य मार्गावर आज झालेल्या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. बुलढाणा नजीकच्या येळगाव नजीक एका शैक्षणिक संस्थेची बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन ही दुर्घटना घडली. आज बुधवारी, ११ डिसेंबर रोजी झालेल्या या दुर्देवी अपघातात येळगाव जवळील आश्रम शाळेजवळ ही घटना घडली.

सविस्तर वाचा...

14:54 (IST) 11 Dec 2024

मालाडमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद; पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन

मुंबई : मालाड (प.) येथील एवरशाईन नगरातील ९०० मिमी व्यासांच्या जलवाहिनीतून गळती होत असून महापालिकेच्या जलअभियंता विभागातर्फे गुरुवार, १२ डिसेंबर रोजी जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा

14:47 (IST) 11 Dec 2024

खातेवाटपाचा पेच आता दिल्लीतच सुटण्याची शक्यता

मुंबई : खातेवाटप आणि मंत्रीपदांच्या संख्येवरून महायुतीमध्ये पेच असून आता तो नवी दिल्लीत भाजप पक्षश्रेष्ठींबरोबर होणाऱ्या बैठकीतच सुटणार आहे. मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार हे बुधवारी दुपारी नवी दिल्लीला जाणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चेनंतरच खातेवाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

वाचा सविस्तर...

14:46 (IST) 11 Dec 2024

ठाणे : मुलीवर व्यवस्थित उपचार केले नसल्याचे म्हणत डॉक्टरला मारहाण

ठाणे : मुलीवर व्यवस्थित उपचार केले नसल्याचे म्हणत डॉक्टरला तीन ते चार जणांनी क्लिनिकमध्ये शिरून मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा सविस्तर...

14:41 (IST) 11 Dec 2024
परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना? खासदार सुप्रिया सुळेंनी केली कारवाईची मागणी

"परभणी शहरात एका समाजकंटकाने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याचा प्रकार संतापजनक आहे. हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. संविधानाचा अवमान करणाऱ्यांना त्यातील समतेची तत्वे अमान्य आहेत असेच म्हणावे लागेल. या घृणास्पद कृत्याचा निषेध", असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

परभणी शहरात एका समाजकंटकाने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याचा प्रकार संतापजनक आहे. हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. संविधानाचा अवमान करणाऱ्यांना त्यातील समतेची तत्वे अमान्य आहेत असेच म्हणावे…— Supriya Sule (@supriya_sule) December 11, 2024
14:19 (IST) 11 Dec 2024

पाच वर्षांत बेस्टच्या २१६० बस भंगारात, केवळ ३७ नव्या बसची खरेदी

मुंबई : कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघाताची घटना ताजी असताना शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या मालकीच्या वाहनांमध्ये प्रचंड घट झाल्याचे उघडकीस आले आहे.  गेल्या पाच वर्षांत बेस्टने आयुर्मान संपुष्टात आलेल्या तब्बल २१६० बस भंगारात काढल्या असून  त्याबदल्यात केवळ ३७ नवीन बसगाड्या घेतल्या आहेत.

सविस्तर वाचा

14:14 (IST) 11 Dec 2024

आकाशात १३, १४ डिसेंबरला उल्कावर्षाव; पृथ्वी लहान-मोठ्या कणांजवळून…

अकोला : निरभ्र रात्री आकाशात अचानक एखादी प्रकाशरेषा क्षणार्धात चमकून जाते. ती उल्का वर्षाव असते. १३ आणि १४ डिसेंबरला देखील अवकाशात उल्का वर्षाव होणार असून खगोलप्रेमींसाठी ही पर्वणी ठरणार आहे.

सविस्तर वाचा...

14:14 (IST) 11 Dec 2024

थरारक… वायुसेनेच्या जवानाची आत्महत्या, कर्तव्यावर तैनात असताना डोक्यात घातली गोळी अन्…

नागपूर : वायुसेनेत सेवारत एका जवानाने कर्तव्यावर हजर असताना स्वत:च्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. ही थरारक घटना बुधवारी पहाटे दोन वाजता उघडकीस आली. जवीर सिंग असे आत्महत्या करणाऱ्या वायुसेनेच्या जवानाचे नाव आहे.

सविस्तर वाचा...

13:49 (IST) 11 Dec 2024

कळंबोलीत साथरोग रुग्णालय; पनवेल महापालिका आयुक्तांचा निर्णय, २७ कोटींचा खर्च अपेक्षित

पनवेल : कळंबोली वसाहतीमधील सेक्टर ५ ई येथे सिडको मंडळाकडून समाज मंदिराच्या इमारतीमधील करोना साथरोग रुग्णालयाचे हस्तांतरण झाल्यावर पनवेल महापालिकेने ही इमारत पाडून पुन्हा नव्याने रुग्णालयासाठी इमारत बांधण्याचा निर्णय पालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी घेतला.

सविस्तर वाचा

13:47 (IST) 11 Dec 2024

रांजणपाडा रेल्वे स्थानकाच्या नावात बदल, उरण, नेरुळ, बेलापूर रेल्वेमार्गावरील रांजणपाडाऐवजी शेमटीखार

उरण : रेल्वे विभागाकडून रांजणपाडा स्थानकाच्या नाम फलकात बदल करण्यात आला असून आता या स्थानकावर शेमटीखार असे फलक बसविण्यात आले आहेत. स्थानकाच नाव रांजणपाडा असलं तरी तिकट मात्र शेमटीखार या नावाने मिळत होते

सविस्तर वाचा...

13:37 (IST) 11 Dec 2024

नवी मुंबई: राडारोडा टाकणाऱ्या २० डम्परवर कारवाई

नवी मुंबई : सिडकोच्या दक्षता विभागाच्या मार्गदर्शनाखाली मागील आठ दिवसांत वेगवेगळ्या पथकांनी २० डम्परचालकांना डम्पर आणि राडारोड्यासह पकडले.मुंबईतून अटल सेतूमार्गे बेकायदा राडारोडा वाहतूक करून उलवे येथे टाकत असताना सिडकोच्या भरारी पथकाने ही कारवाई केली.

सविस्तर वाचा

13:27 (IST) 11 Dec 2024

चंद्रपूर जिल्ह्यात सातवाहनकालीन वस्तीचे अवशेष; कधी होते मोठे शहर, आज आहे गर्द वनराई…

चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील चिवांडागावापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या टेकाभट्टी या प्राचीन रिठावर सातवाहनकालीन वस्तीचे अवशेष आढळून आले आहे.

सविस्तर वाचा...

13:21 (IST) 11 Dec 2024
परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना? जमावाकडून पोलिसांवर दगडफेक, तणावाचं वातावरण

परभणीत जिल्ह्यात संविधानाच्या प्रतिकृतीची अज्ञात व्यक्तीने विटंबना केल्याप्रकरणी परभणी बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, या बंद दरम्यान जमावाकडून दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तसेच परभणीत काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. सध्या परभणीत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. तसेच आंदोलक आक्रमक झाल्याची माहिती समोर येत आहे. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना देखील घडल्या असून पोलिसांकडून नागरिकांना शांततेचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी देखील नागरिकांना शांततेचं आवाहन ट्विट करत केलं आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

Gulabrao Patil

(फोटो-संग्रहित छायाचित्र)

"मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात आम्ही सर्व अधिकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेले आहेत. तसेच जेव्हा महायुतीचे तिन्ही नेते एकत्र बसतील तेव्हा ठरवतील. मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मात्र, तीन पक्ष असल्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी वेळ लागत आहे. आमच्या पक्षाला किती मंत्रि‍पदे घ्यावी? कोणती खाते घ्यावे? हे सर्व एकनाथ शिंदे ठरवतील”, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं.

Story img Loader