Maharashtra News Updates : महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. मात्र, आता सर्वांचं लक्ष हे मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे लागलं आहे. ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सरकार स्थापन होऊन जवळपास एक आठवडा होता आला, पण अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला आहे? याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. यातच महायुतीत गृहमंत्रिपदाचा तिढा अद्यापही कायम असल्याची चर्चा आहे. यातच आम्ही गृहमंत्रिपदाचा आग्रह अद्यापही सोडलेला नसल्याचं विधान गुलाबराव पाटील यांनी केलं. त्यांच्या या विधानामुळे महायुतीत गृहमंत्रिपदाचा तिढा अद्यापही कायम असल्याची चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विरोधक आणखी आक्रमक जाले आहेत. यासह सर्व बातम्यांचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.

Live Updates

Maharashtra Political News Updates : राज्याच्या राजकीय घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.

13:17 (IST) 11 Dec 2024

पालिकेच्या संकेतस्थळावर इमारत अधिकृत की अनधिकृत याची खात्री करा, कल्याण डोंबिवली पालिकेचे आवाहन

कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील इमारतींमध्ये घरे घेताना नागरिकांनी पालिकेच्या संकेतस्थळाशी संपर्क साधावा. पालिकेच्या संकेतस्थळावर नगररचना विभागाने पालिका हद्दीत बांधकाम परवानगी दिलेल्या इमारती, बांधकाम पूर्णत्वाचे दाखले याची सविस्तर माहिती उपलब्ध करून दिली आहे.

सविस्तर वाचा….

13:16 (IST) 11 Dec 2024

मुंबई : वाहनावरील कारवाई टाळण्यासाठी परिवहन अधिकाऱ्याचा मोबाइलच पळवला

मुंबईः टेम्पोवरील कारवाई टाळण्यासाठी परिवहन अधिकाऱ्याचा मोबाइलच पळवल्याचा प्रकार कुर्ला परिसरात घडला. टेम्पोचालक व त्याच्या साथीदाराने परिवहन अधिकाऱ्याला मारहाणही केली. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी दोघांविरोधात मोबाइल चोरी व सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा…

13:02 (IST) 11 Dec 2024

खोपटे पूल ते कोप्रोली मार्ग लवकरच खड्डेमुक्त, एक किलोमीटर रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी सात कोटींच्या निधीस मंजुरी

उरण : खोपटा पूल ते कोप्रोली मार्गावरील खड्ड्यांचे विघ्न आता लवकरच दूर होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या मार्गावरील एक किलोमीटर लांबीच्या मार्गाच्या काँक्रीटीकरणासाठी शासनाने ७ कोटींच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली आहे.

सविस्तर वाचा…

13:00 (IST) 11 Dec 2024

खोपटे पूल ते कोप्रोली मार्ग लवकरच खड्डेमुक्त, एक किलोमीटर रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी सात कोटींच्या निधीस मंजुरी

उरण : खोपटा पूल ते कोप्रोली मार्गावरील खड्ड्यांचे विघ्न आता लवकरच दूर होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या मार्गावरील एक किलोमीटर लांबीच्या मार्गाच्या काँक्रीटीकरणासाठी शासनाने ७ कोटींच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली आहे.

सविस्तर वाचा…

12:48 (IST) 11 Dec 2024

धानाचे कोठार, पण शेतकऱ्यांचा कल मका, हरभऱ्याकडे; तूर, मोहरी व जवसलाही पसंती

गोंदिया : महाराष्ट्रातील ‘धानाचे कोठार’ म्हणून गोंदिया जिल्हा ओळखला जातो. मात्र यंदाच्या रब्बी हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा धानासह मका, हरभऱ्याकडे कल दिसून येत आहे. यंदा जिल्ह्यात ऑक्टोबरपर्यंत परतीचा पाऊस सुरूच राहिल्याने रब्बी पेरणी लांबणीवर पडली होती. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात १४ हजार २८७ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे.

सविस्तर वाचा…

12:19 (IST) 11 Dec 2024
26 हजार घरांच्या सोडत प्रक्रियेस मुदतवाढीचा प्रस्ताव विचाराधीन

नवी मुंबई : सिडको महामंडळाने ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या योजनेतून २६ हजार घरांच्या सोडत प्रक्रियेला अजून १५ दिवसांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव सिडको प्रशासनाच्या विचाराधीन आहे. या योजनेसाठी ११ डिसेंबर म्हणजेच बुधवारपर्यंत अर्जनोंदणीची अंतिम मुदत आहे. परंतु, अर्ज नोंदणीसाठी अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी ही मुदतवाढ मिळावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सविस्तर वाचा…

12:18 (IST) 11 Dec 2024

यवतमाळ हिट अँड रन प्रकरण, कारने भाजी विक्रेते व दुचाकीस्वारांना उडविले

यवतमाळ : येथील आर्णी रोडवर कृषी नगरजवळ एका भरधाव कारचालकाने पादचाऱ्यांसह दुचाकी स्वार व हात गाडीवाल्यांना उडविले. यात दोन जण गंभीर जखमी झाले असून, पाच ते सहा लोक जखमी झाले. ही घटना मंगळवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली. अक्षय उमरे (२०), दिलीप दारूटकर (४५) दोघेही रा. पुष्पकुंज सोसायटी,यवतमाळ अशी जखमीची नावे आहेत.

सविस्तर वाचा…

11:50 (IST) 11 Dec 2024

फ्लेमिंगोंच्या अधिवासात रस्ता नको, राज्य सरकारच्या पाहणी पथकाच्या अहवालात खाडीकिनारचा रस्ता बंद करण्याची शिफारस

नवी मुंबई</strong> : सीवूड्स येथील एनआरआय संकुलामागील खाडी हा फ्लेमिंगोंचा अधिवास असल्याने या अधिवासाला धोका निर्माण करणारा खाडी किनाऱ्यालगतचा रस्ता बंद करण्याची स्पष्ट शिफारस करण्यात आली.

सविस्तर वाचा…

11:46 (IST) 11 Dec 2024

विरोधकांना विरोधीपक्ष नेतेपद मिळणार की नाही? महाविकास आघाडीच्या नेत्याचं मोठं विधान

“हिवाळी अधिवेशनामध्ये आमची बैठक होईल. आमच्यात चर्चा करून विरोधीपक्ष नेतेपदेपदासाठी आम्ही एक नाव देऊ. मात्र, विरोधीपक्ष नेतेपद देण्यासाठी भाजपाची इच्छा आहे का? देवेंद्र फडणवीस हे तयार आहेत का? हे आधी त्यांना विचारणार आहोत. कारण आधीच आम्ही नाव देऊन उपयोग नाही. आधी आम्ही नाव द्यायचो आणि तोंडघशी पडायचो. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारू, त्यानंतर आम्ही विरोधीपक्षनेते पदासाठी नाव देऊ”, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

11:33 (IST) 11 Dec 2024

विदर्भ गारठला… गोंदिया ९.४, तर नागपूर, वर्धा १० अंश सेल्सिअस

नागपूर : “फेईंगल” चक्रीवादळाचे संपूर्ण राज्यावर दाटलेले मळभ आता दूर झाले आहे आणि पुन्हा एकदा राज्याची वाटचाल थंडीच्या दिशेने सुरू झाली आहे. किमान तापमानाने त्याची किमया दाखवण्यास सुरुवात केली असून हे तापमान झपाट्याने खाली येत आहे. एवढेच नाही तर कमाल तापमानात देखील झपाट्याने घसरण होत आहे.

सविस्तर वाचा…

10:49 (IST) 11 Dec 2024

प्रियकर की शिक्षक ! डीएनए ठरला पुरावा आणि न्यायालयाने ठोठावली शिक्षा

वर्धा : खरा गुन्हेगार कोण हे ठरवतांना आलेला पेच शेवटी न्याय वैद्यकीय पुराव्याआधारे सुटला. येथील जिल्हा न्यायाधीश वर्ग एक तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.ए.एस.एम.अली यांनी या प्रकरणात आरोपी प्रियकरास दहा वर्ष सश्रम कारावास तसेच दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

सविस्तर वाचा…

10:45 (IST) 11 Dec 2024

महाविकास आघाडीत विरोधीपक्ष नेते पदाबाबत काय ठरलं? संजय राऊत म्हणाले…

“महाविकास आघाडीचे सर्व नेते विरोधीपक्ष नेते पदाबाबत चर्चा करतील. उद्धव ठाकरे हे देखील हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरला जाणार आहेत”, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

10:33 (IST) 11 Dec 2024

शहरातील गुन्हेगारी क्षेत्रात ‘बिट्स गँग’चा उदय, सत्ताधारी नेत्याच्या छत्रछायेत स्वप्निलचे दुष्कृत्य

नागपूर : गुन्हेगारी विश्वातील संतोष आंबेकर टोळी, राजू भद्रे टोळी, रणजित सफेलकर टोळी, शेखू टोळी, इप्पा टोळी, माया टोळी, गिजऱ्या टोळी अशा कुख्यात टोळ्या शहरातून नामशेष झाल्या. परंतु, आता नव्याने स्वप्निलच्या ‘बिट्स गँग’ने तोंड वर काढले आहे. स्वप्निलने क्रिकेट सट्टेबाजीच्या विश्वातही पाय रोवले असून नागपुरातील मोठा क्रिकेट बुकी अशी ओळख त्याने निर्माण केली आहे.

सविस्तर वाचा…

10:26 (IST) 11 Dec 2024

“सभापती जगदीप धनखड पक्षपातीपणे वागतात”, खासदार संजय राऊत यांचा आरोप

राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव राज्यसभा सचिवालयाकडे सादर करण्यात आला आहे. जगदीप धनखड यांच्या विरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. दरम्यान, यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड हे गेल्या काही दिवसांपासून पक्षपातीपणे वागत असल्याचं दिसतं आहे. सभापती जगदीप धनखड हे सत्ताधारी पक्षाच्या बाजून झुकलेले आहेत आणि विरोधी पक्षाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केल्यानंतर आमच्यासमोर अविश्वास प्रस्ताव सादर करण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नव्हता, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

(फोटो-संग्रहित छायाचित्र)

“मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात आम्ही सर्व अधिकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेले आहेत. तसेच जेव्हा महायुतीचे तिन्ही नेते एकत्र बसतील तेव्हा ठरवतील. मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मात्र, तीन पक्ष असल्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी वेळ लागत आहे. आमच्या पक्षाला किती मंत्रि‍पदे घ्यावी? कोणती खाते घ्यावे? हे सर्व एकनाथ शिंदे ठरवतील”, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं.