Maharashtra Live News Today : राज्यात विधान परिषदेच्या दहा जागांसाठी नुकतीच निवडूक झाली. या निवडणुकीत भाजपाचे पाच तर महाविकास आघाडीचे पाच उमेदवार निवडून आले. काँग्रेस आणि शिवसेनेची मतं फुटल्यामुले काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. हा पराभव म्हणजे महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का समजला जात असून या निमित्ताने महाविकास आघाडीतील आमदारांमधील बेदिली समोर आल्याचे म्हटले जात आहे.

या निवडणुकीमध्ये मतांची फाटाफूट झाल्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या शीर्ष नेतृत्वांनी ही बाब गांभिर्याने घेतली आहे. शिवसेनेच्या सर्व आमदारांची आज बैठक घेण्यात येणार आहे. तसेच काँग्रेसच्या सर्व आमदारांना दिल्लीला तातडीने बोलावले असल्याची माहिती मिळते आहे.

दुसरीकडे राज्यात मान्सून पावसाला सुरुवात झालीय. त्यामुळे राज्यात शेती कामांची लगबग सुरू आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पावसाच्याही अपडेट्स येत आहेत. याशिवाय करोना काळानंतर आता शाळाही सुरू झाल्यात. त्यामुळे शाळांमध्ये देखील विद्यार्थ्यांची हजेरी दिसत आहे. युक्रेन व रशियातील संघर्ष, शेअर बाजारातील चढउतार अशा विविध घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय पातळीवर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडींचा एकाच ठिकाणी आढावा

Live Updates

Maharashtra Latest News Updates : राज्यासह देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक अपडेट

13:16 (IST) 21 Jun 2022
म्हैसाळ सामूहिक आत्महत्या प्रकरणी १३ जणांना केली अटक ; १२ जणांच्या शोधासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकात पथके रवाना

सांगलीमधील मिरज येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिरजेपासून १२ किमी अंतरावर असणाऱ्या म्हैसाळमधील अंबिकानगरमध्ये ही घटना घडली आहे.

सविस्तर वाचा

12:43 (IST) 21 Jun 2022
पुणे : विधानपरिषद निवडणुकीतील यशानंतर भारतीय जनता पक्षाचा जल्लोष

राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळविलेल्या विजयाचा जल्लोष भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंगळवारी करण्यात आला. शहर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महापालिका भवन परिसरात एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली.

सविस्तर वाचा

12:40 (IST) 21 Jun 2022
अंकिता जळीत कांड प्रकरणाची पुनरावृत्ती टळली ; युवतीला धमकी देणाऱ्यास अटक

हिंगणघाटच्या अंकिता जळीत कांड प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता टळली. अंकिताच्याच गावातील एका युवतीला ,’तुझी अंकिता करेन’, अशी धमकी देणाऱ्या युवकास पोलिसांनी अटक केली.

सविस्तर वाचा

12:39 (IST) 21 Jun 2022
अंधेरीमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या ; चेंबूर, कुलाबा, वांद्रे भागामध्ये रुग्णवाढ झपाट्याने

मुंबईतील अंधेरी भागात झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे.रुग्णवाढीच्या यादीमध्ये अंधेरी आघाडीवर असून त्याखालोखाल चेंबूर, कुलाबा, वांद्रे भागामध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी २८४ दिवसांपेक्षाही कमी झाला आहे.

सविस्तर वाचा

12:38 (IST) 21 Jun 2022
बुलढाण्यातील दोन आमदार संपर्क क्षेत्राबाहेर ; एकनाथ शिंदेंसोबत सुरतमध्ये असल्याचा कयास

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या एका उमेदवाराचा धक्कादायक पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आल्याच्या चर्चेला राज्यात पेव फुटले आहे. शिवसेना नेते व मंत्री एकनाथ शिंदे नाराज असून त्यांच्यासोबत शिवसेना आमदारांचा एक गट गुजरातमधील सुरतमध्ये असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

सविस्तर वाचा

12:37 (IST) 21 Jun 2022
नायगाव बीडीडीमधील आणखी चार इमारतींना निष्कासनाच्या नोटिसा

नायगाव बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या कामाची गती वाढविण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने इमारती रिकाम्या करून घेण्याच्या प्रक्रियेला गती दिली आहे. काही दिवसांपूर्वी दोन इमारतीतील पोलिसांना निष्कासनाच्या नोटिसा बजावल्यानंतर आता मंडळाने तेथील आणखी चार इमारतींना निष्कासनाच्या नोटीसा पाठविल्या आहेत.

सविस्तर वाचा

12:36 (IST) 21 Jun 2022
मुंबई : केवायसीच्या माध्यमातून ऑनलाईन फसवणूक

केवायसी अपडेटच्या नावाने एका ३१ वर्षांच्या व्यक्तीची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार अंधेरी परिसरात घडला. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.  

सविस्तर वाचा

12:35 (IST) 21 Jun 2022
राजकीय भूकंपानंतर संजय राठोडांचे पुनर्वसन? ; एकनाथ शिंदेंना यवतमाळचे पालकमंत्री भुमरे व आमदार राठोड यांची साथ

शिवसेनेचे नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या काही आमदारांना घेऊन ‘नॉट रिचेबल’ आहेत, त्यात यवतमाळचे पालकमंत्री संदिपान भुमरे व माजी मंत्री आमदार संजय राठोड यांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

सविस्तर वाचा

11:22 (IST) 21 Jun 2022
मुंबई : पाणीसाठा खालावला ; धरणात केवळ १० टक्के पाणीसाठा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या केवळ १० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत जलसाठा खालावला आहे. त्यामुळे लवकरच समाधानकारक पाऊस  पडला नाही, तर मुंबईकरांना पाणी कपातीच्या संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा

11:09 (IST) 21 Jun 2022
मुंबई : वर्षभरात लोकलमधील महिलांचे सर्व डबे सीसी टीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेत

प्रवासादरम्यान महिलांशी संबंधित होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी लोकलच्या महिला डब्यात सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय मध्य आणि पश्चिम रेल्वेने घेतला होता. आतापर्यंत ३२३ महिला डब्यांमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून पुढील एका वर्षात सर्वचं महिला डब्यांमध्ये कॅमेरे बसवण्याचे काम पूर्ण होईल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.

सविस्तर वाचा

11:08 (IST) 21 Jun 2022
एकनाथ शिंदेंसोबत रायगडचे तिन्ही शिवसेना आमदार संपर्क क्षेत्राबाहेर

विधान परिषदेच्या निकालात भाजपाने पुन्हा एकदा महाविकास आघाडीला धक्का दिला असताना शिवसेना नेते एकनाथ शिंदे बेपत्ता झाले असल्याने राजकीय भूकंप आला आहे. एकनाथ शिंदे संपर्काबाहेर असल्याने त्यांनी बंड पुकारल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेनेकडून वारंवार एकनाथ शिंदेंसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान एकनाथ शिंदे सूरतमध्ये असून त्यांच्यासोबत १२ पेक्षा अधिक आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. शिवसेनेचे रायगडमधील तिन्ही आमदारही संपर्क क्षेत्राबाहेर असून ते एकनाथ शिंदेंसोबत असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सविस्तर बातमी

https://twitter.com/LoksattaLive/status/1539119345330442240

11:00 (IST) 21 Jun 2022
देवेंद्र फडणवीसांचा नाशिक दौरा रद्द, तातडीने दिल्लीला रवाना

विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. या निवडणुकीनंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असून त्यांच्यासोबत शिवसेनेचे १३ आमदार असल्याचे बोलले जात आहे. सध्या शिंदे या १३ आमदारांसोबत गुजरातमध्ये असल्याचेही म्हटले जात आहे. या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. फडणवीसांच्या या अचानक दिल्लीवारीमुळे आणखी संभ्रम वाढला आहे. वाचा सविस्तर

10:53 (IST) 21 Jun 2022
नागपूर : एअर मार्शलकडून अग्निपथ योजनेची भलामण ; माजी सैनिक, कर्मचाऱ्यांना बोलावून फायदे सांगितले

अग्निपथ योजनेवरून देशभरात रान पेटले असताना वायुदलाच्या अनुरक्षण कमानचे प्रमुख एअर मार्शल विभास पांडे यांनी नागपुरातील माजी सैनिक आणि कर्मचाऱ्यांना मुख्यालयात बोलावून योजनेचे फायदे सांगितले.

सविस्तर वाचा

10:51 (IST) 21 Jun 2022
पुणे : वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला हॉटेलमधील अंगरक्षकाकडून मारहाण

बाणेरमधील एका हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या तरुणाला हॉटेलमधील अंगरक्षकाने बेदम मारहाण  केल्याची घटना घडली. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांकडून दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा

10:16 (IST) 21 Jun 2022
नागपूर : गडकरी म्हणतात ” योगामुळेच माझी तब्येत ठणठणीत”

माझी आई सुद्धा योग प्रचार,प्रसाराचे काम करायची. मलाही योग करायला सांगायची. पण तेव्हा त्याचे महत्व कळले नाही. पण जेव्हा मी आजारी पडलो, तेव्हापासून  मी योगाकडे वळलो.आज योगामुळेच माझी तब्येत ठणठणीत आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

सविस्तर वाचा

10:14 (IST) 21 Jun 2022
मतं फुटल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, बाळासाहेब थोरात म्हणाले

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बासला. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. तर भाजपाचे पाच उमेदवार निवडून आले. शिवसेना तसेच काँग्रेसची मते फुटल्यामुळे पुरेसे संख्याबळ नसतानाही भाजपाने ही कमाल करुन दाखवली आहे. महाविकास आघाडीची मतं फुटल्यानंतर आता काँग्रेसचे नेते तथा मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी काँग्रेसची काही मतं फुटल्याचे मान्य केले आहे. वाचा सविस्तर

10:14 (IST) 21 Jun 2022
विधान परिषद निवडणूक : विजयानंतर एकनाथ खडसे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले

विधान परिषदेच्या दहा जागांसाठीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा विजय झाला आहे. राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यापासून आपल्या राजकीय पूनर्वसनाची ते वाट पाहत होते. मात्र आता ते आमदार म्हणून विधान परिषदेत जाणार असून याबाबत त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी निवडून येऊ नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले. मात्र राष्ट्रवादी पक्षाने माझे राजकीय पुनर्वसन केले. भाजपा पक्षातील काही आमदारांनीदेखील मलं मतं दिली, असे एकनाथ खडसे म्हणाले आहेत. टीव्ही ९ मराठीने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे. वाचा सविस्तर

10:13 (IST) 21 Jun 2022
“काँग्रेसचं आता काय राहिलंय?” विधान परिषद निवडणुकीनंतर नारायण राणेंची टीका

विधान परिषदेच्या दहा जागांसाठीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेची मतं फुटल्यामुळे काँग्रेस पक्षाचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. तर पुरेसे संख्याबळ नसतानाही भाजपाचे पाच उमेदवार निवडून आले. दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या याच पराभवावर भाजपा नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खोचक टीका केली आहे. काँग्रेस पक्षाचं आता काय राहिलंय अशी खोचक टीका राणे यांनी केली आहे. पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी मेट्रो स्थानकात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये राणे सहभागी झाले. त्यांतर ते माध्यमांशी बोलत होते. वाचा सविस्तर

10:06 (IST) 21 Jun 2022
विश्लेषण : भाजपाला १३४ मते कशी मिळाली? शिवसेना, काँग्रेसची किती मते फुटली?

राज्यसभेनंतर आता विधानपरिषद निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. या निवडणुकीत भाजपाचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र भाजपाकडे पाचव्या जागेसाठी पुरेशी मते नसतानाही त्यांना एकूण १३४ मते मिळाली आहेत. तर या निवडणुकीत काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला आहे. वाचा सविस्तर...

Story img Loader