Starting: Marathi News Today : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातानंतर राज्यभरात संतापाची लाट पसरली. सुरुवातीला आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न केला गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून आली. त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे वडील, पबमधील कर्मचारी यांना अटक केली. तर अल्पवयीन आरोपीची ५ जूनपर्यंत बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. या घटनेसह महाराष्ट्र काल उजणी जलाशय आणि प्रवरा नदीत बोट बुडण्याच्या दोन घटना घडल्या. उजनी जलाशयात प्रवाशी बोट उलटून सहा जणांचा मृत्यू झाला. तर प्रवरा नदीत बुडालेल्या दोन तरूणांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या एसडीआरएफच्या बोटीचाही अपघात झाला. यात तीन जवानांचा मृत्यू झाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Marathi News Updates 23 May 2024
गेल्या काही सत्रातील मंदीला पूर्णविराम देत देशांतर्गत भांडवली बाजारातील निर्देशांकांनी गुरुवारी पुन्हा एकदा नव्या उच्चांकी पातळीला गवसणी घातली आहे. रिझर्व्ह बँकेने बुधवारी केंद्र सरकारला २०२३-२४ आर्थिक वर्षासाठी २.११ लाख कोटी रुपयांचा सर्वोच्च लाभांश देण्यास मान्यता दिली. सविस्तर वाचा…
भाजपा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ३७ टक्के मते घेऊन देशाच्या सत्तेत आले होते. मात्र या निवडणुकीत ते ३२-३३ टक्क्यां पर्यंत खाली आल्यास,ते देशातील सत्तेतून जाऊ शकतात असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी इस्लामपूर येथे केले. सविस्तर वाचा…
डोंबिवली क्षेत्रात साठ वर्षापूर्वी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून औद्योगिक क्षेत्र विकसित केले. त्यावेळी औद्योगिक क्षेत्र आणि निवास क्षेत्र यांच्यामध्ये एक संरक्षित पट्टा म्हणून चार ते पाच किलोमीटरचा बफर झोन (झालर पट्टी) नियोजनकारांनी येथील एमआयडीसीत प्रस्तावित केला होता. सविस्तर वाचा…
इचलकरंजी शहरातील नाईक मळा येथे आलेल्या माकडावर भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याने ते ठार झाले. कार्यकर्त्यांनी कुत्र्याना हाकलण्याचा केलेला प्रयत्न असफल झाला. मृत माकडावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सविस्तर वाचा…
मुंबई : महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर मुंबई विद्यापीठाची नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक होणार कधी? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. जवळपास दोन वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही ही निवडणूक झालेली नाही.
डोंबिवली एमआयडीसी केमिकल कंपनीत आज दुपारी २ च्या सुमारास बॉयलरचा भला मोठा स्फोट आणि त्यानंतर छोटे स्फोट झाले. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४८ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालातून मे महिन्यात विभागातील टंचाईचे संकट अधिक गडद झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
डोंबिवली एमआयडीसीमधील केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटात ४ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. द इंडियन एक्सप्रेसने ही बातमी दिली असून जखमींची संख्या ३० असल्याचे सांगितले आहे. या आगीत आणखी काही लोक फसले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
4 killed and 4 injured in massive blast at chemical company in Maharashtra's #Dombivli
— The Indian Express (@IndianExpress) May 23, 2024
Read: https://t.co/iA05CgYkVB pic.twitter.com/SUzO1HqCqh
डोंबिवली एमआयडीसीमधील कंपनीतील बॉयलरच्या स्फोटामुळे आग लागली आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं आहे. संबंधित अधिकाही घटनास्थळी पोहोचले आहे. परिस्थिती आता नियंत्रणात आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
नागपूर: अक्षय तृतीयेनंतर सोन्याच्या दरात प्रथम घसरण व त्यानंतर चांगलीच वाढ झाली होती. हे दर विक्रमी उंचीवर म्हणजे प्रति दहा ग्राम २४ कॅरेटसाठी ७५ हजार रुपयांपर्यंत पोहचले होते. परंतु गेल्या दोन दिवसांत पुन्हा सोने- चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
नागपूर : ‘आरटीई’ अंतर्गत मुलांना शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करणाऱ्या दोन पालकांना सदर आणि सीताबर्डी पोलिसांनी अटक केली. दोघांनाही तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
नागपूर : हवामानाचे चक्र उलट फिरायला लागले असून उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा अशा तिन्ही ऋतूंची सरमिसळ झाली आहे. यावर्षी तर उन्हाळ्यातील अधिकांश दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली.
अमरावती : एका विवाहितेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. तिच्या जवळील दागिने व रोखही हिसकाविण्यात आली. ही धक्कादायक घटना येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.
नागपूर : शहरातील झोपडपट्टीवासीयांना त्यांच्या घराच्या जमिनीचा भाडेपट्टा करून देण्याच्या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मालकी पट्टे योजनेत नागपूर सुधार प्रन्यास व नागपूर महापालिकेच्या तुलनेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कक्षेत येणारा नझूल विभाग कमालीचा माघारला आहे.
नागपूर: अक्षय तृतीयेनंतर सोन्याच्या दरात प्रथम घसरण व त्यानंतर चांगलीच वाढ झाली होती. हे दर विक्रमी उंचीवर म्हणजे प्रति दहा ग्राम २४ कॅरेटसाठी ७५ हजार रुपयांपर्यंत पोहचले होते.
कल्याण : ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गावोगावी, आदिवासी पाड्यांच्या हद्दीत पाण्याचे डोह, ओहाळ वाहत असतात. या पाण्याचा गावकरी आंघोळीचे पाणी, गाई, म्हशी, बैल, वासरांना पिण्याच्या पाण्यासाठी वापर करतात.
नवी मुंबई : राज्य शासनाच्या १५ मार्चच्या शिक्षकांच्या गणवेशाबाबतच्या परिपत्रकानुसार नवी मुंबईतही शिक्षकांचा गणवेश निश्चित करण्यासाठी ऑनलाइन लिंक पाठवून शिक्षकांच्या मतदानाचा कौल घेतला जाणार आहे.
एका ध्येयवेड्या, संपूर्ण आयुष्यभर तत्वांशी इमानदार राहणाऱ्या नेतृत्वाला आपण मुकलो आहोत, अशी भावना हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.
महसूल क्षेत्रालगत असलेल्या वनविभागाच्या राखीव वनक्षेत्रात अवैधपणे गौण खनिज काढण्यात आल्याचे निदर्शनास आले.
जिल्ह्याचे मिनी मंत्रालय समजल्या जाणा-या सोलापूर जिल्हा परिषदेच्या सेवेतून येत्या ३१ मे रोजी सुमारे २५० कर्मचारी निवृत्त होत आहेत.
अरूंद तोंड असलेल्या बरणीत श्वानाचे डोके अडकल्याने ते स्वत:हून त्याला बाहेर काढणे अशक्य झाले.
डोंबिवली एमआयडीसीच्या फेज २ मध्ये मोठा स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली आहे. डोंबिवली परिसरात दूरपर्यंत स्फोटाचे आवाज ऐकू आले. अग्निशामक दलाकडून आता आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
विविधता, सर्वसमावेशकता, समानता, सुगमता ही तत्वे फक्त निवडणुकीचा भाग असू नयेत तर ती सर्वकाळ असावित अशा आशयाचे मत अमेरिकेचे भारतीय राजदूत एरिक गार्सेटी यांनी बुधवारी व्यक्त केले.
धारण तलावात असलेल्या खारफुटी कांदळवनामुळे त्यातील गाळ काढण्यास अडचणी येत आहेत. न्यायालय आणि एमसीझेडएमएची परवानगी प्रलंबित आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे खंबीर नेतृत्व हरपले अशा भावना श्रीमंत शाहू महाराज यांनी व्यक्त केल्या.
रक्कम पुन्हा तक्रारदाराच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कळवा येथील मतदान केंद्राबाहेर ‘मशाल चिन्हा’चे बूथ लावल्याने पिता-पुत्रांना घरात शिरून बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मुंबई : घाटकोपर दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश प्रभूदास भिंडे (५१) याला बेकायदा जाहिरात फलक लावल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने शंभरपेक्षा अधिकवेळा दंड ठोठावल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे.
सविस्तर वाचा…