Marathi News Updates: बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या, औरंगजेबाची कबर, कुणाल कामराचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबनात्मक गीत यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. गेल्या आठवड्यात घडलेले कुणाल कामरा प्रकरण अजूनही धगधगत आहे. तर बीडमधील कारागृहात असलेल्या वाल्मीक कराडला मारहाण झाल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत.

याचबरोबर गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विमागाने मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात आजही पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाले आहे. याबरोबर राज्यातील इतर घडामोडी लाईव्ह बॉगच्या माध्यमातून जाणून घेऊया.

Live Updates

Mumbai-Maharashtra News Live Today, 1 April 2025 :

20:23 (IST) 1 Apr 2025
वसईकरांवर पुन्हा पाणी संकट, रोहित्रात बिघाड, शहराचा पाणी पुरवठा ठप्प
संध्याकाळी ६ वाजता पुन्हा या रोहित्रात बिघाड झाला आणि वीज पुरवठा ठप्प झाला. परिणामी एमएमआरडीएच्या योजनेतून होणारा १४० दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा पुर्णपणे बंद झाला आहे. ...Learn More
18:38 (IST) 1 Apr 2025
आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवणाऱ्यांनी अनधिकृत बांधकाम का पाडले नाही ?
सर्वोच्च न्यायालयाने केवळ गुन्ह्याचा आरोप असणाऱ्या व्यक्तीच्या घरावर बुलडोझर कारवाई करणे चुकीचे असून घटनाविरोधी असल्याची परखड टिप्पणी केली. ...Learn More
18:00 (IST) 1 Apr 2025

दुचाकीला धडक मारत ४००फुट नेले फरफटत; निवळी चाफे येथील अपघात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

रत्नागिरी - रत्नागिरी तालुक्यातील निवळी-जयगड मार्गावरील चाफे येथे झालेल्या ट्रक आणि दुचाकी यांच्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराला प्राण गमवावा लागला. मंगळवारी साडे अकराच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातामुळे संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला. तसेच रस्त्यावरील अवजड वाहतुकीविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको केले.

या अपघातात किरण पागदे, रा. खंडाळा, वाटद या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्यानंतर मोटारसायकलस्वाराला तब्बल चारशे फुट फरफटत नेले. या भीषण धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ट्रकचालकाच्या बेदकारणांमुळे हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दुचाकीस्वाराचा मृतदेह रस्त्यावर पडलेला पाहून संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला. यामुळे काही काळ या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

17:47 (IST) 1 Apr 2025
बच्चू कडू पुन्हा आक्रमक, प्रहार संघटना आमदारांच्या घरासमोर मशाली पेटवणार
बच्चू कडू यांनी प्रहारच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी ही बैठक असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. ...Read More
17:38 (IST) 1 Apr 2025
कार चालकाचा उद्दमपणा, दुचाकीला धडक, जखमीला पुलाखाली फेकून पळ, उपचाराअभावी युवकाचा मृत्यू
नॅशनल कँसर इंस्टिट्युटसमोरुन जात असताना मागून भरधाव आलेल्या पांढऱ्या रंगाच्या कारने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवर दोघेही खाली फेकले गेले ...Read Full Details
17:25 (IST) 1 Apr 2025
भिवंडीतील मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर कोंडण्याची शक्यता
भिवंडीत मंगळवारी रात्री १० ते बुधवारी सकाळी ६ आणि बुधवारी रात्री १० ते गुरुवारी सकाळी ६ वाजता अंजुर चौक ते अंजुरफाटा पर्यंत सर्व वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ...Read More
16:49 (IST) 1 Apr 2025
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर २५ ठिकाणी तात्पुरत्या पाणपोई, विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने ठाणे महापालिकेचा उपक्रम
ठाणे स्थानकातील सॅटीसच्या खाली असलेल्या पाणपोईच्या उद्घाटनाने या उपक्रमाची मंगळवारपासून सुरूवात करण्यात आली. ...Read Full Details
16:03 (IST) 1 Apr 2025

"हे जाणूनबुजून केले जात आहे", वक्फ दुरुस्ती विधेयकावर काँग्रेस नेत्याची प्रतिक्रिया

वक्फ दुरुस्ती विधेयकाबाबत बोलताना काँग्रेस नेते हुसेन दलवाई म्हणाले, "माझ्या मते, हे जाणूनबुजून केले जात आहे. जर चुका असतील तर त्या दुरुस्त करण्यात काहीच गैर नाही. पण, मुस्लिमांचा एक ट्रस्ट आहे, ज्याच्याकडे लोकांनी दान केलेला निधी आणि मालमत्ता आहेत, ज्याचा वापर गरिबांना मदत करण्यासाठी, शिक्षणात मदत करण्यासाठी आणि विधवांना आधार देण्यासाठी केला पाहिजे. जर हे काम योग्यरित्या केले जात नसेल, तर त्यावर लक्ष द्या, परंतु संपूर्ण व्यवस्था बदलणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे चुकीचे आहे."

15:49 (IST) 1 Apr 2025

जेजुरीत भेसळयुक्त भंडाऱ्याची विक्री, भाविकांना त्रास; विश्वस्तांकडून सरकारकडे कारवाईची मागणी

जेजुरीत उधळल्या जाणाऱ्या भंडाऱ्यामुळे जेजुरीला ‘सोन्याची जेजुरी’ म्हटलं जातं. मात्र हाच पिवळा भंडारा आता जेजुरीतील भाविकांच्या व स्थानिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. या भंडाऱ्यात होत असलेल्या भेसळीमुळे भाविकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. तसेच येथील ऐतिहासिक जेजुरी गडाला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे प्रशासनाने, सरकारने या गंभीर प्रकरणात लक्ष घालून भंडाऱ्यात होणारी भेसळ रोखावी अशी मागणी जेजुरीतील मार्तंड देवस्थानचे माजी मुख्य विश्वस्त शिवराज झगडे यांनी केली आहे.

15:49 (IST) 1 Apr 2025
Manisha Bidve : मनिषा बिडवे हत्या प्रकरणात दोघे ताब्यात, धनंजय देशमुख यांची कळंब पोलिसांशी चर्चा
संतोष देशमुख यांची हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र, मनिषा बिडवे हिचा वापर संतोष देशमुख हत्या प्रकरणात केला जाणार होता का, यावर बोलण्यास धाराशिव पोलिसांनी नकार दिला. ...Learn More
15:25 (IST) 1 Apr 2025
मनपाचे अतिक्रमण निर्मूलनही आता बाह्य अभिकरणामार्फत, सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर तीन वर्षात १७ कोटींचा खर्च
याकरिता १६० जणांचे मनुष्यबळ आणि यंत्र सामग्री पुरवून मोहीम राबविण्यासाठी पुढील तीन वर्षात सुमारे १७ कोटींच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. ...Learn More
15:01 (IST) 1 Apr 2025
डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारत प्रकरणी अवमान याचिका ? न्यायालयीन आदेशाची तीन महिन्याची मुदत संपली
अवमान याचिका न्यायालयात दाखल करू, असा इशारा देणारी नोटीस डोंबिवलीतील ६५ महारेरा बेकायदा इमारत प्रकरणातील याचिकाकर्ते वास्तुविशारद संदीप पाटील यांना राज्याच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना पाठवली आहे. ...Read Full Details
14:48 (IST) 1 Apr 2025
बनत आहे आणि बनतच राहील पलावा पूल, मनसेच्या राजू पाटलांची पलावा पुलावरून बोचरी टीका
१ एप्रिलचा मुहुर्त साधत मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. ३१ एप्रिलला पलावा पुलाचे उद्घाटन कुणाल कामरा याच्या हस्ते होईल असे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहीले आहे. ...Read More
14:48 (IST) 1 Apr 2025
कल्याण डोंबिवली पालिकेतील २०६८ सफाई कामगारांना आश्वासित योजनेचा लाभ
मागील वर्षी लिपिक संवर्गातील सुमारे अडिचशेहून अधिक कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ प्रशासनाने दिला होता. ...Read More
14:29 (IST) 1 Apr 2025
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील महिलेच्या मृत्यूप्रकरणी दोन महिला डाॅक्टरांच्या सेवा खंडित, कडोंमपाकडून कारवाईच्या हालचाली
पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात सुवर्णा सरोदे या गर्भवती महिलेचा फेब्रुवारीमध्ये सीझेरिअन शस्त्रक्रिया केल्यानंतर मृत्यू झाला होता. ...Learn More
14:11 (IST) 1 Apr 2025
महापालिकेत नोकरी दिली नाही तर, मृतदेह मुख्यालयासमोर ठेवून आंदोलन करण्याचा इशारा; वागळे कचरा हस्तांतरण केंद्रावरील मृत्यू प्रकरण
ठाणे महापालिका मुख्यालया समोर मृत महिलेचा मृतदेह ठेवून आंदोलन करण्याचा इशारा कुटुंबातील सदस्यांनी दिला आहे. ...Read More
13:58 (IST) 1 Apr 2025

"मी मुस्लिमांना खात्री देऊ इच्छितो की..." वक्फ दुरुस्ती विधेयकावर शिवसेना खासदाराची प्रतिक्रिया

आज संसदेत वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे, यावर बोलताना शिवसेना खासदार मिलिंद देवरा म्हणाले की, "जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्यात आले आणि सीएए लागू करण्यात आले तेव्हाही एक बनावट कथा रचण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीदरम्यान संविधान धोक्यात आहे अशी आणखी एक बनावट कथा पसरवण्यात आली. आजही असेच केले जात आहे. भारतीय मुस्लिमांना तुष्टीकरण नको आहे तर सक्षमीकरण हवे आहे. मी मुस्लिमांना खात्री देऊ इच्छितो की हे विधेयक त्यांना सक्षम करेल."

13:41 (IST) 1 Apr 2025
ठाणे : यंदा ५५ हजार हेक्टरवर भात पिकाचे नियोजन, खरीप हंगामाची कृषी विभागाकडून पूर्वतयारी सुरू
ठाणे जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र ४ लाख ९ हजार १८६ हेक्टर एवढे असून त्यापैकी खरीप हंगामा खालील सर्वसाधारण क्षेत्र ६५ हजार ९०९ हेक्टर एवढे आहे. ...Read Full Details
12:39 (IST) 1 Apr 2025
अंबरनाथमध्ये आठ वर्षाच्या बालकावर चार अल्पवयीन मुलांचा सामुहिक लैंगिक अत्याचार
पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांच्या विरोधात पीडित मुलाच्या आईच्या तक्रारीवरून बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि माहिती व तंत्रज्ञान अधिनियमाने रविवारी गुन्हा दाखल केला आहे. ...Read More
12:32 (IST) 1 Apr 2025
कल्याण : शिळफाटा रस्त्यावर मेट्रोचे संरक्षित पत्रे धुण्यासाठी हजारो लीटर पाणी वाया, मध्यरात्रीच्या वेळेत पाण्याच्या टँकरमुळे वाहतूक कोंडी
शिळफाटा रस्त्याच्या मध्यभागी लावण्यात आलेल्या यंत्रणेला संरक्षित करण्यासाठी निळ्या रंगाचे १० फुटाचे उभे पत्रे लावण्यात आले आहेत. ...Read Full Details
12:18 (IST) 1 Apr 2025

"बाळासाहेब ठाकरे यांना वक्फ कायदा रद्द करायचा होता कारण..." वक्फ दुरुस्ती विधेयकावर शिंदेंच्या खासदाराची प्रतिक्रिया

वक्फ दुरुस्ती विधेयकावर बोलताना शिवसेना खासदार नरेश म्हस्के म्हणतात, "आम्ही वक्फ दुरुस्ती विधेयक आणणार आहोत. बाळासाहेब ठाकरे यांना वक्फ कायदा रद्द करायचा होता कारण या कायद्याचा खरा वापर गरीब अल्पसंख्याकांसाठी, गरीब मुस्लिमांसाठी व्हावा असे त्यांचे मत होते. परंतु वक्फ बोर्डावरील काही मुस्लिम नेते वक्फची मालमत्ता लुटत आहेत, ती गरीब मुस्लिमांसाठी वापरत नाहीत. जे वक्फ दुरुस्ती विधेयक आले आहे त्याचा फायदा गरीब मुस्लिमांना होणार आहे."

12:07 (IST) 1 Apr 2025
ठाणे-नवी मुंबई विमानतळ जोडणी मार्गासाठी लगबग, सिडकोने मागवल्या निविदा, अर्थसंकल्पातही तरतूद
सिडकोकडून पीपीपी तत्त्वावर विकसित केले जात असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई महानगर प्रदेशासाठी दुसरे आंतरराष्ट्रीय प्रवेशद्वार विमानतळ असेल. ...Read More
11:33 (IST) 1 Apr 2025
Thane Crime News : हळदीत नाचताना धक्का लागला, अल्पवयीन मुलांनी थेट हत्याच केली
२५ मार्चला तो नातेवाईकाच्या हळदी समारंभात गेला होता. परंतु तो रात्री उशीरापर्यंत घरी परतला नव्हता. ...Read Full Details
11:17 (IST) 1 Apr 2025
मुंब्य्रात बेकायदा बांधकामांचे इमले, पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नाराजी
ठाणे महापालिका क्षेत्रातील बेकायदा बांधकामांचा मुद्दा सातत्याने चर्चेत येत आहे. करोना काळानंतर बेकायदा बांधकामांच्या संख्येत वाढ झाली आहे. ...Read Full Details
11:01 (IST) 1 Apr 2025
मुंबई : निसर्ग उन्नत मार्गावर पर्यटकांची झुंबड, सर्व स्लॉट हाऊसफुल्ल
सिंगापूर येथील 'ट्री टॉप वॉक'च्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाने सुमारे ३० कोटी रुपये खर्चून निसर्ग उन्नत मार्ग विकसित केला आहे. ...Read Full Details
10:51 (IST) 1 Apr 2025
Thane Accident : भावासमोरच तरुणाचा टेम्पोखाली चिरडून मृत्यू, मुंबई-नाशिक महामार्गावरील घटना
सकाळी ७ वाजता हिमांशू आणि दिपक हे दोघेही दुचाकीने दुकानात जाण्यासाठी निघाले होते. हिमांशू हा दुचाकी चालवित होता तर दिपक त्याच्या मागे बसला होता. ...Read More
10:50 (IST) 1 Apr 2025

"मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांमुळे राज्यातील वातावरण बिघडले", ठाकरे गटाचा आरोप

राज्यात गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाची कबर, कुणाल कामरा प्रकरण आणि संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण गाजत आहे. अशात राज्यातील राजकीय वातावरण बिघण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री जबाबदार असल्याचे शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

10:44 (IST) 1 Apr 2025
प्रवासी बनून आले आणि टॅक्सीच चोरुन गेले
मुंबई येथील चेंबूर भागात टॅक्सी चालक राहतो. तो एका व्यक्तीच्या मालकीची टॅक्सी भाडेतत्तावर चालवितो. ...Learn More
10:19 (IST) 1 Apr 2025

Maharashtra Live Updates: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबईत, देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मुंबई येथे होणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या ९० व्या वर्धापन दिनाच्या समारोप समारंभाला उपस्थित राहणार आहेत. यासाठी त्या कालच मुंबईत दाखल झाल्या आहेत. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवर उपस्थित राहतील.

दरम्यान आज या आरबीआयच्या कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.