Maharashtra Breaking News LIVE Updates : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी मस्साजोगवासियांनी अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर खासदार बजरंग सोनावणे हे मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेणार असल्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे राज्यात मंत्र्यांच्या पीए आणि ओएसडीवरून रणसंग्राम सुरू आहे. राज्यातील विविध खात्यातील दलाली रोखता यावी याकरता मंत्र्यांचे पीए आणि ओएसडींच्या नियुक्तीचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असल्याचं सूचक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्यानंतर आता त्यांच्या नियुक्तीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्टँडवर उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांना आरोपीची ओळख पटली असून त्याच्या शोधासाठी आठ पथक तैनात करण्यात आले आहे. दत्तात्रय रामदास गाडे (वय ३५,, रा. शिक्रापूर) असं या आरोपीचं नाव असून त्याच्यावर जबरी चोरीचे गुन्हेही दाखल आहेत. यासह राज्यातील इतर घडामोडी जाणून घेऊयात.

Live Updates

Maharashtra  News Highlights ,26 February 2025 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

18:25 (IST) 26 Feb 2025
मोबाईल सापडलेत… 'नांदेड पोलीस'ला भेट द्या, ओळख पटवून सायबर पोलीस ठाण्यातून फोन नेण्याचे आवाहन

नांदेड : जिल्हाभर फिरुन शोध घेत पोलिसांनी सुमारे २५ लक्ष रुपये किमतीचे अँड्रॉइड मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. त्याची माहिती समाज माध्यमावर नांदेड पोलीस दलाच्या "नांदेड पोलीस" या फेसबुक पेज व ट्विटर खात्यावर उपलब्ध आहे. संबंधितांनी ओळख पटवून सायबर पोलीस ठाण्यातून आपले फोन घेऊन जावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा....

17:30 (IST) 26 Feb 2025
"घटनेतील आरोपीची ओळख पटली असून, त्याला...", स्वारगेट बलात्कार प्रकरणावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

"स्वारगेट बस स्थानकातील घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील आरोपीची ओळख पटली असून, त्याला तात्काळ अटक होईल, असा विश्वास आहे. या घटनेनंतर पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला असून, कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. पुणे हे सुसंस्कृत शहर असल्याने देशभरातून असंख्य नागरिक इथे येत असतात. त्यामुळे पुण्याच्या संस्कृतीला काळिमा फासणाऱ्यांना आणि असे घृणास्पद कृत्य करणाऱ्यांना कठोर शासन करावे, अशा सूचना दिल्या आहेत," अशी पोस्ट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

17:22 (IST) 26 Feb 2025

वैनगंगा नदीच्या पात्रात तीन बहिणी बुडाल्या; युद्धस्तरावर शोधकार्य…

चंद्रपूर : गडचिरोली - चंद्रपूर मार्गावरील सावली तालुक्यातील व्याहाड येथे वैनगंगा नदीच्या पात्रात चंद्रपुरातील कु. प्रतिमा प्रकाश मंडल (२३), कु. कविता प्रकाश मंडल (२१), कु. लिपिका प्रकाश मंडल (१८) या तीन बहिणी बुडल्याने खळबळ उडाली आहे. या तिन्ही बहिणींचा युध्दपातळीवर शोध घेतला जात आहे.

सविस्तर वाचा...

17:10 (IST) 26 Feb 2025

जिल्ह्यात ११७४ पैकी ७५५ ठिकाणी निर्माण महिला बचतगटांच्या ग्रामसंघांना प्रत्येक गावात स्वतंत्र कार्यालय

अहिल्यानगर : जिल्ह्यात गावातील ग्रामपंचायत कार्यालयाप्रमाणे प्रत्येक गावात आता महिला बचत गटांच्या ग्रामसंघांचेही स्वतंत्र कार्यालय उभारण्यास सुरुवात झाली आहे. महिला बचतगटांचे एकुण ११७४ महिला ग्रामसंघ स्थापन करण्यात आली आहेत. त्यातील ७५५ ग्रामसंघांना जिल्हा परिषदेने स्वतंत्र कार्यालय उपलब्ध करून दिले आहे.

सविस्तर वाचा...

17:05 (IST) 26 Feb 2025

नागपुरात सिटीबस या नवीन मार्गावर धावणार..

नागपूर : महापालिकेच्या परिवहन विभागाद्वारे नव्याने बस सुरु करण्यात आली आहे. या बसेस विविध मार्गावर धावणार आहेत. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

वाचा सविस्तर...

16:46 (IST) 26 Feb 2025

बजाज ऑटो समूहाचा ‘ बेस्ट ‘ उपक्रम, १०० टक्के प्लेसमेंट व ८० टक्के शिष्यवृत्ती

वर्धा : पूणे येथील प्रख्यात बजाज ऑटो लिमिटेड या उद्योग समूहाने उद्योग व शैक्षणिक क्षेत्रातील दरी भरून काढणारा ‘ बेस्ट ‘ उपक्रम पुरुस्कृत केला आहे.

वाचा सविस्तर...

16:39 (IST) 26 Feb 2025

पन्नास फूट खोल विहिरीत पडला बिबट्या

बुलढाणा : तब्बल पन्नास फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट मादीला बुलढाणा वन विभागाच्या 'रेस्क्यू टीम'ने अथक परिश्रम करून संकट मुक्त केले! तिला पिंजऱ्याच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढून जीवदान देण्यात आले आहे. या बिबट मादीला वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर ज्ञानगंगा अभयारण्यात काल मंगळवारी रात्री उशिरा सोडण्यात आले.

सविस्तर वाचा...

16:32 (IST) 26 Feb 2025

धक्कादायक! दोन महिन्यात दोन हजाराहून अधिक वृक्षतोड; वर्षभरात…

नागपूर महापालिकेच्या उद्यान विभागाकडून अटींचे पालन न करता सरसकट वृक्षतोडीसाठी परवानगी देण्यात येत असल्याचा आरोप ग्रीन नागपूर समूहाच्या वृक्षप्रेमी नागरिकांनी पत्रकार परिषदेत केला.

वाचा सविस्तर...

16:28 (IST) 26 Feb 2025

सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर – रोहित पवार

पुण्यात स्वारगेट बस स्थानकात पहाटेच्या सुमारास बसमध्ये मुलीवर अत्याचार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेचा रोहित पवार यांनी एक्स पोस्टवर निषेध केला आहे.

सविस्तर वाचा...

16:17 (IST) 26 Feb 2025

विद्यार्थ्यांना ‘कॉपी’ करण्यास मदत करणे भोवले…चार शिक्षक निलंबित…

नागपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी मदत करणाऱ्या व गैरप्रकाराला बळ देणाऱ्या चार शिक्षकांना नागपूर विभागीय कार्यालयाने निलंबित केले तर दोघांची प्रशासकीय चौकशी सुरू आहे. काही दिवसांपूर्वीय विभागीय शिक्षण मंडळाने सहा शिक्षकांच्या निलंबनासाठी शिफारस केली होती.

सविस्तर वाचा...

15:58 (IST) 26 Feb 2025

ठाणे जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्याचा कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास, कर्मचाऱ्यांकडून उपसंचालकांकडे तक्रारी, तक्रारीनंतरही कारवाई नाही

ठाणे जिल्हा क्षयरोग विभागात नव्याने रुजू झालेल्या अधिकारी कडून कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास तसेच वैयक्तिक कामे करुन घेतली जात असल्याचा आरोप काही कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

वाचा सविस्तर...

15:47 (IST) 26 Feb 2025

नाशिकमध्ये टोळक्याने अल्पवयीनांसह चौघांना डांबले, प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण

नाशिक : फोनवर शिवीगाळ केल्याच्या कारणावरून टोळक्याने चार मुलांना शेडमध्ये डांबून प्लास्टिकच्या पाईपने बेदम मारहाण केली. नाशिक शहरातील अमरधाम भागात ही घटना घडली. या मारहाणीत दोन अल्पवयीन मुले जखमी झाले. डांबलेल्या मुलांची पोलिसांनी सुटका केली.

वाचा सविस्तर...

15:25 (IST) 26 Feb 2025

‘तुमचे शिवराय पळाले’, म्हटल्याचा आरोप असलेल्या कोरटकरच्या घरासमोर आंदोलन….

नागपूर : इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना अश्लील शिवीगाळ करुन कोल्हापूरमध्ये येऊन मारण्याची धमकी दिल्याच्या आरोप असलेल्या प्रशांत कोरटकर याच्या घरासमोर सकल मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

सविस्तर वाचा...

15:18 (IST) 26 Feb 2025

Maharashtra Live Updates : वादानंतर प्राजक्ता माळीची माघार; त्र्यंबकेश्वर मंदिरातील कार्यक्रमाला जाणार नसल्याची भूमिका जाहीर!

महाशिवरात्रीनिमित्त होणारा त्र्यंबकेश्वर कार्यक्रमाला पूर्वीपासूनच प्रसिद्ध द्यायची नाही, असं ठरलं होतं. काल दिवसभरात या कार्यक्रमाला अनावश्यक प्रसिद्ध मिळाली, त्यामुळे आता अवास्तव गर्दीची भीती आणि काळजी प्रशासनाच्या मनात आहे. त्यामुळे मी कुटुंबियांशी बोलून मी हा निर्णय घेतेय. कमिटमेंट दिली होती, त्यानुसार हा कार्यक्रम होणार आहे, परंतु माझ्याशिवाय. अर्थात यामुळे माझ्या आनंदावर विरजण पडेल. परंतु, वैयक्तिक सुखापेक्षा आपल्यामुळे प्रशासनावर अतिरिक्त ताण येऊ नये ही बाब मला महत्त्वाची वाटते. हा सर्वस्वी माझा निर्णय आहे - प्राजक्ता माळी</p>

14:41 (IST) 26 Feb 2025
Swargate Rape Case Live Updates :

स्वारगेट बस स्थानकावर शिवसेनानेत्या नीलम गोऱ्हे दाखल

14:41 (IST) 26 Feb 2025
स्वारगेट बलात्कारप्रकरणी सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप; म्हणाल्या, "पुण्यात दररोज..."

https://twitter.com/supriya_sule/status/1894672335782748624

14:22 (IST) 26 Feb 2025

आमच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण करा… कुलब्यातील रहिवाशांनी पालिकेला दिला अल्टीमेटम

मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून खोदून ठेवलेले रस्ते पूर्ण करा असा इशारा कुलाब्यातील नागरिकांनी दिला आहे. फर्स्ट पास्ता लेन आणि विंडी हॉल लेन या रस्त्यांची कामे अर्धवट सोडून दिली असून त्यामुळे रहिवाशांची मोठी गैरसोय होते आहे.

सविस्तर वाचा...

14:01 (IST) 26 Feb 2025

कल्याण डोंबिवली पालिकेला पाचव्यांदा उर्जा संवर्धनाचा पुरस्कार, दिल्लीत कार्यकारी अभियंता प्रशांंत भागवत यांनी स्वीकारला पुस्कार

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेने हरित उर्जा आणि उर्जा संवर्धनात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तेराव्या ग्रीन एनर्जी समितीमध्ये इंडियन चेंबर ऑफ काॅमर्सतर्फे कल्याण डोंबिवली पालिकेला हरित उर्जा आणि उर्जा संवर्धनाचा पुरस्कार देऊन सन्मानित केले. या श्रेणीतील हा पाचवा पुरस्कार पालिकेला मिळाला आहे.

सविस्तर वाचा...

13:48 (IST) 26 Feb 2025

मेळघाटातील स्‍ट्रॉबेरीची चव न्यारी; पर्यटकांसाठी पर्वणी…

अमरावती : मेळघाटातील चिखलदरा परिसरातील शेतकरी आजवर संपूर्णपणे पारंपरिक पिके घेऊनच उदरनिर्वाह करीत असत. मात्र बदलत्या काळानुसार या शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी पिकाची लागवड करण्यास सुरुवात केली. आता परिस्थिती अशी झाली आहे की, चिखलदरा या पर्यटन स्‍थळी येणारे देशभरातील नागरिक येथे स्ट्रॉबेरीचा आस्वाद आवर्जून घेत आहेत.

सविस्तर वाचा...

13:35 (IST) 26 Feb 2025

ओबीसी-आर्य वैश्य समाजात वादाची ठिणगी!काय आहे कारण? जाणून घ्या…

चंद्रपूर : आर्य वैश्य (कोमटी) समाजाच्या ओबीसी प्रवर्गातील समावेशाला राष्ट्रीय ओबीसी महासंघाने विरोध दर्शवला आहे. महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे आणि राष्ट्रीय सरचिटणीस सचिन राजूरकर यांनी राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती अनिल शुक्रे व सदस्यांची मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली. आर्य वैश्य समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करू नये, अशा मागणीचे निवेदन त्यांनी अध्यक्षांना दिले. दुसरीकडे, आर्य वैश्य समाजाच्या शिष्टमंडळानेही आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेऊन माहिती सादर केली. त्यामुळे ओबीसी व आर्य वैश्य समाजात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा...

12:57 (IST) 26 Feb 2025

ठाण्यात केवळ तीनच सहाय्यक आयुक्तांना नोटीसा; संपुर्ण शहरात बांधकामे असताना केवळ तिघांच नोटीसा दिल्याने आश्चर्य व्यक्त

ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व प्रभाग समिती क्षेत्रात ७६९ बेकायदा बांधकामे असून त्यापैकी ६६३ बांधकामांची नोंद प्रभाग समितींच्या बीट निरीक्षकांनी बीट नोंदवहीत केल्याचे सांगत ती तोडण्याचे आदेश आयुक्त सौरभ राव यांनी नुकतेच दिले आहेत. सविस्तर वाचा…

12:56 (IST) 26 Feb 2025

घटस्फोट घेत असल्याने भर रस्त्यात पत्नीवर पेट्रोल टाकून जिवंत जाळले

पत्नी घटस्फोट घेत असल्याने विक्रम भोईर (३५) याने भर रस्त्यात पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परिसरातील एका पाण्याच्या डबक्यात महिलेने उडी घेतल्याने या घटनेत तिचा जीव वाचला. सविस्तर वाचा…

12:55 (IST) 26 Feb 2025

कोयना धरण जमीन अधिग्रहण प्रकरण : तब्बल ६५ वर्षांनी याचिकार्त्यांना न्याय, सहा महिन्यात भूखंड देण्याचे सरकार आदेश

कोयना धरण प्रकल्पासाठी १९६० मध्ये जमीन अधिग्रहित केलेल्या वामन कदम यांच्या कायदेशीर वारसांना येत्या सहा महिन्यात पर्यायी भूखंड देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच राज्य सरकारला दिले. सविस्तर वाचा…

12:54 (IST) 26 Feb 2025

महिला टीसीचा विक्रम; एकाच दिवसात १५० विनातिकीट प्रवाशांकडून ४५ हजारांचा दंड वसूल

लोकलमध्ये विनातिकीट प्रवाशांची संख्या वाढल्याने, तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होतो. तसेच वातानुकूलित लोकल, प्रथम श्रेणीच्या सामान्य लोकल डब्यात गर्दीचा फायदा घेत विनातिकीट प्रवाशांची घुसखोरी सुरू आहे. सविस्तर वाचा…

12:53 (IST) 26 Feb 2025

Santosh Deshmukh Murder Case : "कुटुंबीय भयभीत, आमच्यावर पाळत ठेवली जातेय", खासदार बजरंग सोनावणेंचा आरोप

कुटुंबीय भयभीत आहे. त्यांच्यावर पाळत ठेवला जात आहे. आमच्यावरही वॉच ठेवला जात आहे. - बजरंग सोनावणे

12:53 (IST) 26 Feb 2025

पत्नीसोबत झालेल्या वादानंतर सासूला टेम्पोतच जाळले; सासू आणि जावयाचा मृत्यू

पत्नीसोबत झालेल्या वादामुळे संतापलेल्या जावयाने सासूला टेम्पोत पेटवून दिल्याची धक्कादायक घटना सोमवारी मुलुंड परिसरात घडली. या घटनेत सासूसह जावयाचाही जळून मृत्यू झाला असून याप्रकरणी नवघर पोलीस अधिक तपास करीत आहेत. सविस्तर वाचा…

12:49 (IST) 26 Feb 2025

Santosh Deshmukh Murder Case : सीडीआर का तपासले जात नाहीत? - बजरंग सोनावणे

पोलिसांनी सीडीआर सापडत नाहीत का? लोकसभा निवडणुकीच्या काळात माझे फोन टॅप केले जात होते. आता एवढा संवेदनशील विषय आहे, मग आता सीडीआर का काढला जात नाही? या प्रकरणात संबंधित असलेल्या सर्वांचे सीडीआर तपासले पाहिजेत. - बजरंग सोनावणे

11:41 (IST) 26 Feb 2025

सुप्रिया सुळे यांनी घेतली माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट

https://twitter.com/supriya_sule/status/1894627469740970344

10:50 (IST) 26 Feb 2025

आरोपपत्र दाखल करताना सरकारी वकिलांची मदत होईल- धनंजय देशमुख

एसआयटी, सीआयडीच्या अधिकाऱ्यांना वकिलांची मदत होईल. कुठे काही उणिवा वाटत असेल तर मदत होईल. जी चौकशी सुरू आहे, त्यात जास्तीचा फायदा होऊ शकतो. लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे, यासाठीही सरकारी वकिलांचा उपोयग होणार आहे. - धनंजय देशमुख

10:49 (IST) 26 Feb 2025
परीक्षेपेक्षा वडिलांना न्याय मिळणं महत्त्वाचं - वैभवी देशमुख

आज आमची एक मागणी मान्य केली असून इतर मागण्याही मान्य कराव्यात अशी अपेक्षा आहे.

आम्हाला न्याय मागण्यासाठी जे करणं शक्य आहे, ते मी करणार आहे. कारण माझे वडील माझ्यासाठी सर्वस्व होते. त्यांच्यासाठी आम्ही न्याय मिळवू शकलो नाही तर आम्ही स्वतःला माफ करू शकणार नाही.

एकीकडे मला माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्यायचा आहे तर दुसरीकडे मला परीक्षाही द्यायची आहे. दोन्ही गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत. पण त्याहीपेक्षा माझ्या वडिलांना न्याय मिळवून देणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. - वैभवी देशमुख

Maharashtra News Highlights , 26 February 2025 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर