Maharashtra Breaking News Updates: राज्यात गेल्या काही काळापासून राजकीय वातावरण तापलेले असताना, काल राज्याचे कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार) नेते माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने एका प्रकरणात दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. याचबरोबर नवी दिल्ली येथे आजपासून ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दुसरीकडे आजपासून राज्यात दहावीच्या परीक्षा सुरू होत आहे. या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणाले, “आजपासून इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेला बसणाऱ्या तमाम विद्यार्थी-विद्यार्थिनींना मनःपूर्वक शुभेच्छा!” यासह राज्यातील विविध घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊया.
Maharashtra News Live Update Today, 21 February 2025:
पुणे : प्रवाशांची आर्थिक फसवणूक; ‘आपली पीएमपीएमएल’चे बनावट ॲप
‘पीएमपी’च्या प्रवाशांच्या सोयीसाठी २६ जानेवारी रोजी ‘आपली पीएमपीएमएल’ ॲप सुरू करण्यात आले. या ॲपद्वारे बस कोठे आहे, बस मार्ग या बाबतची माहिती या ॲपद्वारे उपलब्ध होते.
पनवेलमधील महिलांना महापालिकेकडून वाहन चालविण्याचे मोफत प्रशिक्षण
पनवेल : पनवेल महापालिकेने यंदाच्या आर्थिक वर्षात महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘गुलाबी अर्थसंकल्प’ या संकल्पनेंतर्गत अनेक उपक्रम हाती घेतले. याच उपक्रमापैकी महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या मुली व महिलांना चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण तसेच प्रशिक्षणानंतर संबंधित महिलांना वाहन चालकाचा शिकाऊ परवाना काढून देण्यासाठी प्रशिक्षण संस्था नेमण्याच्या हालचाली पालिकेत सुरू झाल्या आहेत.
Video : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचे धागेदोरे पाकिस्तानात?
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत पोहोचल्याची माहिती समजते आहे. या प्रकरणातील फरार आरोपी झीशान अख्तरची कथित ध्वनिचित्र समाज माध्यमांवर प्रसारित झाली असून त्यात पाकिस्तानी गँगस्टर शेहजाद भट्टीने पळण्यास मदत केल्याचा आणि आश्रय दिल्याचा दावा झीशन याने केला आहे. गुन्हे शाखा या ध्वनिचित्रफितीची पडताळणी करत आहे.
तंदूर विकणाऱ्या रेस्टारंटवर संक्रात! आरोग्यासाठी योग्य की अयोग्य? MPCB अभ्यास करणार
राज्यातील शहरांमध्ये बेकरी आणि तंदूर किचनमध्ये कोळसा व लाकडांचा वापर केला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. ते टाळण्यासाठी बेकरी व तंदूर किचन चालकांना हरित इंधन वापरणे अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे लज्जतदार तंदूर विकणाऱ्या रेस्टारंटवर संक्रात येण्याची चिन्हे आहेत. सविस्तर वाचा…
महसूल क्रीडा स्पर्धेकडे बावनकुळेंसह दोन मंत्र्यांची पाठ, ऐनवेळी माजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
नांदेड : राज्याच्या महसूल विभागाचे पालक समजले जाणारे या विभााचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भूषविणारे अतुल सावे या दोघांनीही वरील विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेकडे पाठ फिरवल्याचे शुक्रवारी येथे दिसून आले. या दोघांशिवय राज्यमंत्री योगश कदम हेही उद्घाटन सोहळ्यास आले नाहीत.महसूल खात्याशी संबंधित राज्यातल्या ७ विभागांतील दीड हजारांहून अधिक खेळाडू आणि कलावंत राज्यस्तरीय स्पर्धच्या निमित्तने या ऐतिहासिक नगरीमध्ये दाखल झाले आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी येथे मालवाहू ट्रकचा भीषण अपघात ; दोघे जागीच ठार
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या बावनदी बस थांब्या जवळ शुक्रवारी सकाळच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले.
भारतीय राज्यघटनेच्या अमृत महोत्सवानिमित्त कुरुंदकर केंद्रातर्फे विशेष व्याख्यानमाला
नांदेड : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन आणि संशोधन केंद्रातर्फे विशेष व्याख्यानमाला दिनांक 2 मार्च ते 9 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. सदरील व्याख्यानमालेचा मुख्य विषय “नरहर कुरुंदकर यांच्या विचारातील संवैधानिक मूल्ये” हा असेल.
ठाणे शहरात दोन महिन्यात १०० हून अधिक आगीच्या घटना
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध भागात दोन महिन्यात १४९ आगीच्या घटना घडल्या आहेत. बहुतांश आगीच्या घटना तांत्रिक कारणांमुळे लागल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे अग्निसुरक्षा नियमांचे पालन केले नसल्याने आग लागत असल्याचे अग्निशमन दलाचे म्हणणे आहे.
पुणे : बेकायदा परवाने वाटपामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हात, पण कारवाईस प्रशासनाची टाळाटाळ !
परिहार चौकातील मिनी मार्केटमधील व्यावसायिकांना अगोदर परवाना नाकारणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याने परवाना देण्याची प्रक्रिया बंद असताना नंतर परवाने वाटले.
पिंपरी : श्रीमंत महापालिकेचा ९ हजार ६७५ कोटींचा अर्थसंकल्प सादर; करवाढ, दरवाढ आहे का?
महापालिकेत १३ मार्च २०२२ पासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी प्रशासक शेखर सिंह यांना अर्थसंकल्प सादर केला.
शहरबात : पुण्यातील काँग्रेस नवा कारभारी निवडणार का?
पक्षहितापेक्षा व्यक्तिद्वेषाने पछाडलेले राजकारण झाल्याने काँग्रेसची पुण्यात दयनीय अवस्था झाली आहे.
पुणे : पुन्हा नागरिकांच्या जीवाशी खेळ, आरओ चालकांचा परस्पर व्यवसाय सुरू!
नागरिकांना पिण्यास योग्य नसलेले पाणी पुरविणाऱ्या ३० खासगी आरओ प्रकल्पांना महापालिकेने टाळे ठोकले होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकीप्रकरणाचे बुलढाणा कनेक्शन, पोलिसांनी दोन युवकांना…
राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांचे शासकीय वाहन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या दोघा युवकांना जेरबंद करण्यात आले आहे. सविस्तर वाचा…
“माणिक कोकाटेंवर कारवाई करण्याची हिंमत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांत नाही,” काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा हल्लाबोल
सतत गंभीर आरोप होणारे मंत्री धनंजय मुंडे व नाशिक न्यायालयाकडून शिक्षा सुनावण्यात आलेले माणिक कोकाटे यांना मंत्रिमंडळातून तत्काळ बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. सविस्तर वाचा…
Supriya Sule: “केंद्रीय मंत्र्यांचे निकटवर्तीयही सुरक्षित नाहीत”, मुरलीधर मोहळ यांच्या कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यानंतर सुप्रिया सुळे यांची टीका
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्यानंतर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली आहे. त्या म्हणाल्या, “पुणे शहरात केंद्रीय मंत्र्यांचे निकटवर्तीय देखील सुरक्षित नाहीत. कुख्यात गुंडाने पुण्यातील केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या स्टाफमधील काही कर्मचाऱ्यांवर हल्ला करून जखमी केले. केंद्रीय मंत्रीमहोदयांची ही अवस्था तर सर्वसामान्य जनतेचे काय हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. गेली काही दिवस पुण्यात गुंडांनी उच्छाद मांडला आहे. भररस्त्यतात रिव्हॉल्व्हर काढणे, हाणामारी प्रकार नेहमीच घडताना दिसत आहेत. मुख्यमंत्री महोदयांनी यात तातडीने लक्ष घालून शहराची कायदे सुव्यवस्था रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करावेत.”
...आणि त्याने पुन्हा उंच भरारी घेतली
मुंबई : काही दिवसांपूर्वी उरण जवळील एका गावात अशक्त अवस्थेत सापडलेल्या हिमालयीन गिधाडाचा बचाव करण्यात आला होता. बचाव केल्यानंतर त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. दरम्यान, वैद्यकीय उपचारानंतर गिधाडाची प्रकृती पूर्णपणे सुधारली असून त्याला गुरुवारी पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
आतकोली कचरा प्रकल्पासाठी पालिकेची पुन्हा निविदा
ठाणे : शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी राज्य शासनाने ठाणे महापालिकेला दिलेल्या भिवंडीतील आतकोलीच्या जागेवर कचरा प्रकल्प उभारणीसाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असल्या तरी या कामाच्या निविदेस प्रतिसाद मिळाला नाही.
१४०० कोटींच्या सफाई कंत्राटाचे प्रकरण : निविदा प्रक्रिया रद्द करण्याची महापालिकेवर नामुष्की
मुंबई : मुंबईतील सर्व झोपडपट्ट्यांमधील कचरा सकंलनासह वस्ती आणि शौचालयांची दैनंदिन स्वच्छता राखण्याकरीता खासगी संस्थेची नियुक्ती करण्यासाठी मागवलेली सुमारे १४०० कोटी रुपयांची निविदा रद्द करण्याची नामुष्की महापालिकेवर ओढवली आहे.
कळवा पुलावर अखेर सुरक्षा साधने
ठाणे : वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कळवा पुलावर अखेर सुरक्षा साधने बसविण्यात आले आहेत. मागील अनेक महिन्यांपासून येथील पुलावर सुरक्षा साधनांचे कुंपण नसल्याने पादचारी आणि वाहनांचे अपघात होऊन जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली होती.
Maharashtra Weather Forecast : राज्यात उन्हाचा तडाखा, पण हवामान खाते म्हणते…
राज्यातीलच नाही तर संपूर्ण देशात हवामानात सातत्याने बदल होत आहेत. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनंतर देशाच्या काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात सध्या उन्हाचा तडाखा आहे, पण बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे काही भागांमध्ये पुढील दोन दिवसांत पावसाचा अंदाज आहे. सविस्तर वाचा…
महिला कर्मचाऱ्याची शारीरिक, आर्थिक पिळवणूक; वर्ध्यात गुन्हा, नांदेडचा भामटा वाशीममध्ये…
लग्नाचे आमिष देत महिलेची शारीरिक व आर्थिक फसवणूक करण्याचे हजारो प्रकार उजेडात येतात. मात्र तरीही भोळ्या महिलांची अशी फसवणूक टळता टळत नसल्याचे दिसून येते. या प्रकरणात तसेच आर्वी येथील एका खाजगी बँकेत एक सुविद्य महिला कार्यरत आहे.
सविस्तर वाचा…
“आम्ही करू तो न्याय अन् आम्ही देऊ तो दंड, ही तर…,” विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका
चंद्रपूर : न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द करण्याचा आदेश विधानसभा अध्यक्ष कधी काढणार? सत्ता आहे, आम्ही काहीही करू, अशीच भूमिका या सरकारची राहणार का? असे प्रश्न काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केले आहे.
पुणे : ‘रिंग रोड’ अधिक गतिमान, ‘कनेक्टिव्हिटी’साठी १५ ‘इंटरचेंज’चा प्रस्ताव, १४५ कोटींचा खर्च
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रस्तावित ‘रिंग रोड’ची कनेटिव्हिटी वाढविण्यात येणार आहे.
साताऱ्यातील १४९२ गावांत शनिवारी एकाच वेळी ग्रामसभा
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा – दोन मंजुरी पत्र आणि प्रथम हप्ता वितरण कार्यक्रमाच्या अनुषंगाने या ग्रामसभेबाबत सर्व गटविकास अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
पुणे : वाढलेल्या दोन मेट्रो स्थानकांचा खर्च कोण करणार ? ‘महामेट्रो’, महापालिकेने घेतला मोठा निर्णय!
स्थानकांचा खर्च वाढणार असून, हा वाढलेला ‘भार’ नक्की कोण उचलणार, हे निश्चित झालेले नाही.
सरकारविरूध्द घोषणाबाजी; ‘या’ आमदाराविरुद्ध गुन्हा…
चंद्रपूर: शासनाविरोधात घोषणाबाजी केल्याचा ठपका ठेवत शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्यासह १५ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
“माझ्यावर आरोप झाले असते तर मी…”, माणिकराव कोकाटे, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठं वक्तव्य
महराष्ट्र सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्याने तर धनंजय मुंडे यांना त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांमुळे राजीनामा मागण्यात येत आहे. अशात बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की, “माझ्यावर आरोप झाले असते तर मी नैतिकतेनुसार निर्णय घेतला असता.”
Maharashtra Live News Update Today, 21 February 2025 : “माझ्यावर आरोप झाले असते तर मी…”, कोकाटे, मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठं वक्तव्य
राज्यात राष्ट्रवादीचे (अजित पवार) मंत्री धनंजय मुंडे यांचे वाल्मिक कराडशी संबंध असल्याने तर माणिकरावक कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने शिक्षा सुनावल्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. अशात बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी, “माझ्यावर आरोप झाले असते तर, मी नैतिकतेनुसार निर्णय घतेला असता”, असे म्हटले आहे.
वऱ्हाडातील साहित्य संमेलनाने साकारली साहित्य परिषदेची घटना!, साहित्यिक वि. मो. महाजनिंचा सिंहाचा वाटा; १९१२ मध्ये अकोल्यात…
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची नियमबद्ध घटना असावी, असा विचार बडोद्याला डॉ. किर्तीकर यांच्या अध्यक्षतेतील संमेलनात पुढे आला. त्याला १९१२ मधील अकोल्यातील संमेलनात निश्चित स्वरूप प्राप्त झाले.
गडकरींच्या मतदारसंघातील उड्डाणपूल तब्बल साडेनऊ वर्षानंतर सुरू
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला पारडी उड्डाणपूल अखेर गुरुवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पारडी उड्डाणपुलाचा सेंट्रल ॲव्हेन्यू रोडवरील मार्गिका वाहतुकीसाठी गुरुवारी खुला करण्यात आला आहे. पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी या उड्डाण पुलाचे लोकार्पण केले. सविस्तर वाचा