Maharashtra Breaking News Updates: राज्यात गेल्या काही काळापासून राजकीय वातावरण तापलेले असताना, काल राज्याचे कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार) नेते माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने एका प्रकरणात दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. याचबरोबर नवी दिल्ली येथे आजपासून ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुसरीकडे आजपासून राज्यात दहावीच्या परीक्षा सुरू होत आहे. या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणाले, “आजपासून इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेला बसणाऱ्या तमाम विद्यार्थी-विद्यार्थिनींना मनःपूर्वक शुभेच्छा!” यासह राज्यातील विविध घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊया.

Maharashtra News Live Update Today, 21 February 2025:

Live Updates
11:35 (IST) 21 Feb 2025

डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारतींमधील रहिवाशांच्या पाठीशी शासन, रहिवाशांना विस्थापित होऊ देणार नसल्याचे खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांचे आश्वासन

एकाही रहिवाशाला आम्ही विस्थापित होऊ देणार नाही असे आश्वासन कल्याण लोकसभेचे शिवसेना खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीतील ६५ महारेरा प्रकरणातील बेकायदा इमारतींमधील सुमारे ६०० रहिवाशांना गुरुवारी मुंबईत दिले.

वाचा सविस्तर…

11:26 (IST) 21 Feb 2025

संघभूमित प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक भागवत एका व्यासपीठावर !

अयोध्या येथील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या ऐतिहासिक सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे विशेष पाहुणे म्हणून पहिल्यांदाच एकत्र आले होते. सविस्तर वाचा

11:26 (IST) 21 Feb 2025

खळबळजनक! शेतीच्या वादात मुलाने चिरला वडिलांचा गळा

शेतीच्या वादातून मुलाने चाकुने गळा चिरून वडिलांची हत्या केली. ही घटना कळंब तालुक्यातील मेंढला या गावी, गुरूवारी पहाटे घडली. यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी २४ तासाच्या आत मारेकरी मुलास अटक केली. या घटनेने मेंढला गावात खळबळ उडाली आहे.

सविस्तर वाचा…

11:25 (IST) 21 Feb 2025

धक्कादायक! १३ वर्षांची मुलगी तीन महिन्यांची गर्भवती…

आठवीत शिकणाऱ्या मुलीने पोटात दुखत असल्याची तक्रार आईकडे केली. आईने तिला डॉक्टरकडे नेले असता डॉक्टरांनी तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे निदान केले. त्यामुळे आईच्या पायाखालची जमीन सरकली. सविस्तर वाचा…

11:25 (IST) 21 Feb 2025

बंदुकीसाठी केलेल्या अर्जामुळे ॲड. माणिक कोकाटे गोत्यात

४० ते ५० कामगारांना दर आठवड्याला सुमारे नऊ हजार रुपये रोख पगार द्यावा लागतो. ही रोकड सुरक्षितपणे हाताळताना संरक्षणासाठी बंदुकीचा परवाना देण्याची कधीकाळी ॲड. माणिकराव कोकाटे यांनी मागणी केली होती. सविस्तर वाचा…

11:24 (IST) 21 Feb 2025

बीकेसी भूखंड ई लिलाव : तीन व्यावसायिक भूखंड खरेदीसाठी जपान, सिंगापूर आणि कॅनडातील आघाडीच्या कंपन्या उत्सुक

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) वांद्रे-कुर्ला संकुलातील एकूण सात भूखंडांच्या ई लिलावासाठीच्या निविदा नुकत्याच खुल्या करण्यात आल्या आहेत. या निविदेला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. सविस्तर वाचा…

11:23 (IST) 21 Feb 2025

ठाणे- बोरिवली दुहेरी भूमिगत बोगदा प्रकल्प : बनावट बँक हमीचा दावा चुकीचा, कंपनीचा उच्च न्यायालयात दावा

ठाणे आणि बोरिवलीदरम्यान दुहेरी भुयारी बोगद्याच्या बांधकामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) परदेशी बॅंकेचे बनावट हमीपत्र देऊन फसवणूक केल्याचा आपल्यावरील आरोप चुकीचा असल्याचा दावा प्रकल्पाचे काम करणाऱ्या मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एमईआयएल) या कंपनीने गुरुवारी उच्च न्यायालयात केला. सविस्तर वाचा…

11:23 (IST) 21 Feb 2025

मुंबईकरांना थुंकण्याची सवय फार… वर्षभरात ६२ हजार मुंबईकरांवर दंडात्मक कारवाई

रस्त्यावर थुंकू नये असे कितीही फलक लावण्यात आले तरी मुंबईत कुठे ना कुठे थुंकणारे महाभाग दिसतातच.

सविस्तर वाचा…

11:22 (IST) 21 Feb 2025

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकीप्रकरणी दोघे ताब्यात; गुन्हे शाखेची कारवाई

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय वाहन बॉम्बने उडवून दिले जाईल, अशी धमकी गुरुवारी शहरातील काही पोलीस ठाणी आणि मंत्रालयाला ई-मेलद्वारे प्राप्त झाली.

सविस्तर वाचा…

11:21 (IST) 21 Feb 2025

भरत गोगावलेंचा राजन पाटील यांच्यावर हल्लाबोल

रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे वजनदार नेते, माजी आमदार राजन पाटील-अनगरकर यांच्यावर सडकून टीका केली. सविस्तर वाचा…

11:21 (IST) 21 Feb 2025

बालसुधार गृहातून पळून पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांपैकी एकाचा कालव्यात बुडून मृत्यू

मंगळवार ( दिनांक १८ फेब्रुवारी ) पासून या मुलाचा कालव्यात शोध घेतला असता गुरुवारी रोजी एका मुलाचा मृतदेह बांदलवाडी ता. बारामती या ठिकाणी कालव्याच्या पाण्यात आढळून आला आहे.

सविस्तर वाचा…

11:21 (IST) 21 Feb 2025

जाती विसरू तेव्हा मोठे होऊ : नाना पाटेकर

तुमची प्रज्ञा, ताकद, वैचारिकता यावर तुमचे मोठेपण अवलंबून आहे. आपला वकुब आपली पात्रता ठरवतो. मला आजवर कुणी जात विचारली नाही. संतांनी ब्राह्मणांची मिरासदारी मोडून काढली. सविस्तर वाचा…

11:20 (IST) 21 Feb 2025

पिंपरीत २५ चौक कोंडीचे; वाचा कोणते आहेत चौक?

औद्योगिकनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड परिसरात अनेक कारखान्यांसह हिंजवडी, तळवड्यातील माहिती तंत्रज्ञाननगरी, देहू-आळंदी तीर्थक्षेत्र, नामांकित शाळा, महाविद्यालये आहेत.

सविस्तर वाचा…

11:20 (IST) 21 Feb 2025

पाणी तोडण्याची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक; महापालिकेने केले ‘हे’ आवाहन

नळजोड तोडण्याच्या भीतीने ज्येष्ठाची दोन लाख ६५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार निगडीत उघडकीस आला आहे.

सविस्तर वाचा…

11:20 (IST) 21 Feb 2025

महापालिका निवडणूक तयारीत काँग्रेसची आघाडी; विधानसभा मतदारसंघ निहाय निरीक्षकांची नियुक्ती

आगामी महापालिका निवडणूक तयारीत काँग्रेसने आघाडी घेतली आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी विधानसभानिहाय निरीक्षक आणि सहायक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, मतदारसंघनिहाय बैठका घेण्याचीही सूचना करण्यात आली आहे. सविस्तर वाचा…

11:20 (IST) 21 Feb 2025

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘आरमंड’, ‘सांगला’ सर्वोत्कृष्ट

पुणे फिल्म फाउंडेशन, महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी यांच्यातर्फे आयोजित २३व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (पिफ) समारोप गुरुवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे झाला.

सविस्तर वाचा…

11:19 (IST) 21 Feb 2025

कोथरूडमध्ये संगणक अभियंता तरुणाला बेदम मारहाण; मिरवणुकीत दुचाकी नेल्याने मारहाणीची घटना

कोथरूड भागात दुचाकीस्वार अभियंता तरुणाला मारहाण केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. श्री शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीतून दुचाकी काढण्याचा प्रयत्न करत असताना तरुणाला मारहाण करण्यात आली. सविस्तर वाचा…

11:19 (IST) 21 Feb 2025

पुणे : शहा यांच्या दौऱ्यानिमित्त वाहतूक बदल; बाणेर, बालेवाडी भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शनिवारी (२२ फेब्रुवारी) बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

सविस्तर वाचा…

11:19 (IST) 21 Feb 2025

मुलाचा निरा डावा कालव्यात बुडून मृत्यू, ४८ तासांनी मृतदेह सापडला

बारामती येथील चर्च ऑफ क्राईस्ट  बॉईट होमच्या बाल गृहातून तीन मुले अधीक्षक यांची परवानगी न घेताच (ता. १८ फेब्रुवारी २०२५ ) मंगळवार रोजी पळून गेलेली होती,ती पोहण्यासाठी कालवा मध्ये उतरल्यावर त्यातील एकाचा बुडून मृत्यू झाला आहे, ४८ तासांनी अखेर मृत देह सापडला. सविस्तर वाचा…

11:18 (IST) 21 Feb 2025

‘लाडकी बहीण’च्या निकषांबाबत मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या,…

‘लाडकी बहीण योजनेच्या शासन निर्णयात कोणताही बदल केलेला नाही. निकष बदललेले नाहीत. ऑगस्टमध्ये छाननी केली असता ७५ हजार, तर सप्टेंबरमध्ये एक लाखापेक्षा अधिक अर्ज पात्र ठरू शकत नव्हते हे समोर आले. ते अर्ज बाद केले. सविस्तर वाचा…

11:16 (IST) 21 Feb 2025

१.४ अब्ज डॉलर्सच्या कर मागणीचे प्रकरण: फोक्सवॅगनने स्वत:ला पीडित दाखवू नये आणि नियमांचे पालन करावे, सीमाशुल्क विभागाचा उच्च न्यायालयात दावा

कंपनीने १२,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची कर मागणी ही खूपच जास्त असल्याचा दावा केला होता. तसेच, कंपनीतर्फे २००१ पासून कारच्या सुट्या भागांची आयात केली जात असून सध्याचा संपूर्ण वाद सीकेडी युनिट्सबद्दल असल्याचे म्हटले होते.

सविस्तर वाचा…

11:16 (IST) 21 Feb 2025

सातारा : वाईतील अतिरिक्त जिल्हा न्यायालय इमारतीस मंजुरी

संपूर्ण दगडी बांधकामातील ही दुमजली इमारत असून येथे सध्या वाई तालुका व अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय असे न्यायालयीन कक्ष व आस्थापना आहे.

सविस्तर वाचा…

11:15 (IST) 21 Feb 2025

सातारा: कांदाटी खोऱ्यात डोंगरफोड करणाऱ्यांना अभय

ठेकेदारांकडून या कामासाठी लागणाऱ्या दगड-मुरुम-खडीसाठी परिसरातील डोंगर फोडण्याचे प्रकार उघडकीस आले.

सविस्तर वाचा…

11:14 (IST) 21 Feb 2025

आर्थिक भरपाईऐवजी टीडीआर, एफएसआय स्वीकारण्यास भाग पाडणे अयोग्य, जमीन अधिग्रहणप्रकरणी उच्च न्यायालयाचा निर्वाळा

डहाणू येथील पूर्णिमा टॉकीज या चित्रपटगृहाचा काही भाग डहाणू नगरपालिकेने रस्ता रुंदीकरणासाठी अधिग्रहित केला होता.

सविस्तर वाचा…

11:14 (IST) 21 Feb 2025

खार पूर्व येथील रेल्वे जमिनीवरील रहिवाशांना निष्कासनापासून दिलासा, पश्चिम रेल्वेच्या याबाबतच्या आदेशाला उच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती

खार (पूर्व) येथील रेल्वे जमिनीवरील रहिवाशांच्या घरांवर निष्कासन कारवाई करण्यास उच्च न्यायालयाने नुकतीच अंतरिम स्थगिती दिली.

सविस्तर वाचा…

11:13 (IST) 21 Feb 2025

परिवहनमंत्र्यांच्या प्रवासासाठी नवी कोरी एसटी बस, सोलापूर आगारात स्वच्छता

सरनाईक हे धाराशिवचे पालकमंत्री आहेत. दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी ते सोलापूरहून धाराशिवला जाण्यासाठी त्यांनी एसटी बसने प्रवास केला.

सविस्तर वाचा…

11:12 (IST) 21 Feb 2025

बोपदेव घाट प्रकरणानंतर टेकड्यांची सुरक्षा ‘बळकट’, राज्य सरकारकडून ८० कोटींचा निधी मंजूर

टेकड्यांवरील लूटमार, गंभीर गुन्हे रोखण्यासाठी सुरक्षाविषयक उपाययोजना गरजेच्या असल्याने तत्कालिन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर कार्यक्रमात पोलिसांना आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी घोषणा केली होती.

सविस्तर वाचा…

11:11 (IST) 21 Feb 2025

दिरंगाईमुळे वर्षाअखेरी सायकलचे वाटप, हिंगोलीतील समाज कल्याण विभागाच्या कामावर पालक नाराज

जिल्हा परिषदेच्या सन २०२४-२५ मधील स्वमालकीच्या निधीतून २० टक्के मागासवर्गीय कल्याण निधी अंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सायकल खरेदीसाठी अर्थसासाहाय्य पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला.

सविस्तर वाचा…

11:11 (IST) 21 Feb 2025

जायकवाडीवरील सौर ऊर्जा प्रकल्पाच्या जैवविविधता अभ्यासासाठी समिती, मिलिंद म्हैसकर यांच्यासह पाच जणांचा समावेश

सौर ऊर्जा प्रकल्पामुळे सूर्यकिरणे पाण्यावर न पडल्याने जैवविविधतेवर काही परिणाम होईल का, याचा अभ्यास ही समिती करणार आहे.

सविस्तर वाचा…

11:10 (IST) 21 Feb 2025

‘सिडको’च्या जालना प्रकल्पासाठी संपादित जमिनीची चौकशी

अव्यवहार्य आणि आर्थिकदृष्ट्या न परवडणारा प्रकल्प प्रस्तावित केलेल्या शासनाची ९०० कोटींची फसवणूक होणार असल्याचा आरोप सांबरे यांनी केला आहे.

सविस्तर वाचा…