Maharashtra Breaking News Updates: राज्यात गेल्या काही काळापासून राजकीय वातावरण तापलेले असताना, काल राज्याचे कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार) नेते माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने एका प्रकरणात दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. याचबरोबर नवी दिल्ली येथे आजपासून ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होत आहे.
दुसरीकडे आजपासून राज्यात दहावीच्या परीक्षा सुरू होत आहे. या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणाले, “आजपासून इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेला बसणाऱ्या तमाम विद्यार्थी-विद्यार्थिनींना मनःपूर्वक शुभेच्छा!” यासह राज्यातील विविध घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊया.
Maharashtra News Live Update Today, 21 February 2025:
हरभऱ्याचीही आता हमीभावापेक्षा कमीने विक्री
शेतीच्या वाणाला हमीभाव मिळत नाही व सरकार आयातीच्या पायघड्या कायम अंथरून बसलेले आहे.
समन्यायी पाणी वाटपासाठी मराठवाड्यातील जलअभ्यासक राज्यपालांच्या दारी
सिंचनाचा अर्थसंकल्प ठरवताना सिंचन अनुशेषाचे सूत्र काही वर्षापूर्वी ठरवून देण्यात आले होते. त्या सूत्राबाहेर आता अनेक प्रकल्प सुरू आहेत.
मुंबई – गोवा महामार्गाची जूनी कामे रखडलेली असताना पेण परिसरात नवीन पूलांचा प्रस्ताव
रविंद्र चव्हाण हे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असतांना त्यांनी मुंबई गोवा महामार्गाचे जवळपास दोन डझन पहाणी दौरे केले. मात्र रस्त्याच्या कामाला गती काही मिळाली नाही.
Maharashtra Live News Update Today, 21 February 2025 : “महिला आणि ज्येष्ठांना सवलत दिल्यामुळे एसटीला तोटा”, मंत्री प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना राज्यातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासासाठी मोठी सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता शिंदे यांच्या पक्षाचेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलत दिल्यामुळे एसटीला दरदिवशी ३ कोटी रुपयांचा तोटा होत असल्याचे म्हटले आहे.