Maharashtra Breaking News Updates, 30 July 2024 : विधानसभेची निवडणूक पुढच्या दोन ते तीन महिन्यांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष आतापासून तयारीला लागले आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये सध्या जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहेत. असे असतानाच सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुती बरोबर जाण्याच्या अगोदर दिल्लीला गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला जात असताना मास्क आणि टोपी घालून म्हणजे वेश बदलून दिल्लीला जात असायचे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरु आहे. यावरून विरोधकांकडून आता टिकेची झोड उठली आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनीही टीका केली आहे. तसेच राज ठाकरे यांनी पुण्यातील मुसळधार पावसानंतर निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीवर बोलताना अजित पवार यांच्यावर टीका केली. त्यांच्या टीकेला आता अजित पवार गटाकडून प्रत्त्युत्तर देण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Live Updates

Marathi News Today, 30 July 2024

19:22 (IST) 30 Jul 2024
विजेच्या झटक्याने महावितरणचा तंत्रज्ञ मृत्युमुखी, पर्वती भागातील दुर्घटना

पुणे : विद्युत तारेची दुरुस्ती करताना विजेचा झटका बसल्याने महावितरणमधील तंत्रज्ञाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पर्वती भागातील लक्ष्मीनगर परिसरात घडली. तरुण कर्मचाऱ्याच्या अपघाती निधनामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली.

18:02 (IST) 30 Jul 2024
“माझ्यावर जीवघेणा हल्ला, मनसेच्या कार्यकर्त्यांना अटक करा”, अमोल मिटकरींचं पोलीस स्टेशनमध्ये आंदोलन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करत प्रत्युत्तर दिलं होतं. तसेच राज ठाकरे यांना सुपारीबाज असा उल्लेख अमोल मिटकरी यांनी केला होता. यानंतर आता मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत अकोल्यात अमोल मिटकरी यांची गाडी फोडली. यानंतर आता अमोल मिटकरी हे आक्रमक झाले असून मनसेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यासाठी आणि गुन्हा दाखल करण्यासाठी तसेच अटक करण्याच्या मागणीसाठी अमोल मिटकरी यांनी पोलीस स्टेशनमध्ये आंदोलन सुरु केलं आहे.

17:13 (IST) 30 Jul 2024
चंद्रपूर : गडचांदूर बसस्थानकासमोर दुकानात ‘बॉम्ब’? परिसरात खळबळ, बॉम्बशोधक पथक घटनास्थळी

चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील बसस्थानकासमोरील भगवती कलेक्शन समोर जिवंत बॉम्ब आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बॉम्ब असल्याची माहिती गडचांदूर परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

सविस्तर वाचा…

16:44 (IST) 30 Jul 2024
आनंदाचा शिधासाठीच्या निविदा प्रक्रियेतील अटीला आव्हान

मुंबई : यंदा गौरी-गणपतीनिमित्त प्रतिशिधापत्रिका एक शिधाजिन्नस वितरीत करण्याचा निर्णय राज्याच्या पुरवठा विभागाने घेतला आहे. मात्र, त्यासाठी १८ जुलै रोजी काढलेल्या निविदा प्रक्रियेतील ३०० जणांच्या मनुष्यबळाच्या आणि या कामासाठी मागील तीन वर्षांत २५ कोटी रुपये खर्च करण्याच्या अटीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून न्यायालयानेही या अटीबाबत सोमवारी आश्चर्य व्यक्त केले. तसेच, त्यावर, भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

सविस्तर वाचा…

16:22 (IST) 30 Jul 2024
“शासकीय योजनांची नाही, ही तर निवडणुकीची मोहीम”; जयंत पाटलांची सरकारवर टीका

“राज्य सरकारने एक शासन आदेश जारी केलेला आहे. सर्व योजनांसाठी राज्य सरकार पुढच्या दोन महिन्यांत २७० कोटी खर्च करणार आहे. मात्र, ही शासकीय योजनांची प्रसिद्धी मोहीम आहे असं दिसत नाही तर नाही तर ही निवडणुकीची प्रसिद्धी मोहीम आहे, असं दिसतं आहे”, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर केली.

15:55 (IST) 30 Jul 2024
मावळ विधानसभेवर भाजपच्या दाव्यानंतर आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केली नाराजी म्हणाले…

पुणे : मावळ विधानसभेमध्ये महायुतीत तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मावळ विधानसभेवर दावा केल्यानंतर अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सविस्तर वाचा…

15:54 (IST) 30 Jul 2024
पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बॅनरवर महिलांची परवानगी न घेता वापरले फोटो, भाजप आमदाराविरोधात पोलिसांकडे महिलांची थेट तक्रार

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यातील महिला वर्गाकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून १ कोटींहून अधिक महिलांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. दुसर्‍या बाजूला विरोधकांनी या योजनेवरुन टीका करण्यास सुरुवात केली. तर ही योजना राज्यातील प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचली पाहिजे.त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात येत आहे.

सविस्तर वाचा…

15:54 (IST) 30 Jul 2024
झारखंडमध्ये रेल्वे अपघात, नागपूरमार्गे धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द, काहींचे मार्ग बदलले

एका मालगाडीचे २० डब्बे रुळावरुन घरसले आणि शेजारच्या रेल्वे मार्गावर पडले.

सविस्तर वाचा…

15:34 (IST) 30 Jul 2024
वसई : रिसॉर्टमधील मिलिंद मोरे मृत्यूप्रकरण, आरोपीेंना ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

वसई – अर्नाळा येथील सेव्हन सी रिसॉर्टमध्ये ठाणे शिवसेनेचे माजी उपशहरप्रमुख मिलिंद मोरे यांच्या मृत्यूप्रकरणी अर्नाळा सागरी पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या ११ आरोपींना ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आरोपींविरोधात सदोष मनुष्यवधाऐवजी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

15:09 (IST) 30 Jul 2024
कौशल्यविकासाच्या माध्यमातून वर्षाकाठी ६० हजारांचे उत्पन्न; गडचिरोलीच्या आदिवासी तरुणांची यशोगाथा…

येथील ७६ टक्के भाग हा जंगलाने व्यापलेला असल्याने घनदाट जंगलात नक्षल समर्थित लोक आश्रय घेतात.

सविस्तर वाचा…

14:53 (IST) 30 Jul 2024
मनसेच्या कार्यकर्त्यांकडून अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करत प्रत्युत्तर दिलं होतं. तसेच राज ठाकरे यांना सुपारीबाज असा उल्लेख अमोल मिटकरी यांनी केला होता. यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची अकोल्यात तोडफोड केली आहे. यामध्ये गाडीचं मोठं नुकसान झालं असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या गाडीमध्ये कोणीही नव्हतं.

14:30 (IST) 30 Jul 2024
“त्या निर्णयाला आमचा पाठिंबा असेल”, मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरेंनी भूमिका केली स्पष्ट

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात भूमिका स्पष्ट करण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने ‘मातोश्री’ या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनानंतर आता उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, “सर्व समाजाच्या नेत्यांना बोलावून आरक्षणावर चर्चा करावी, तेव्हा जो निर्णय होईल, त्या निर्णयाला आमचा पाठिंबा असेल”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

14:03 (IST) 30 Jul 2024
वाघ आला रे आला! त्या दोघांनी मोठ्या हिंमतीने वाघाला लावले पळवून अन्…

भंडारा शहरालगत असलेल्या गणेशपूर येथे एका पट्टेदार वाघाचे पायाचे ठसे दिसल्याची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली.

सविस्तर वाचा…

13:41 (IST) 30 Jul 2024
गुन्हेगार शिरजोर होत असताना ठाण्यात पोलीस नाहीत…राज्यात तब्बल अडीच हजारांपेक्षा जास्त पदे…

Maharashtra Police Vacant Posts: पोलीस महासंचालकांनी २०१३ मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठी पात्रता मिळवलेल्या ६६० पोलीस हवालदारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला होता.

सविस्तर वाचा…

13:11 (IST) 30 Jul 2024
“हरलो तरी बेहत्तर, पण महायुतीला ताकद दाखवूनच देणार”, मित्रपक्षाच्याच नेत्याने ठोकला शड्डू

महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या या इशाऱ्यामुळे महायुतीत कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत.

सविस्तर वाचा…

13:11 (IST) 30 Jul 2024
नागपुरातील शाळांसमोर जीवघेणी वाहतूक…ना व्यवस्थापनाला चिंता, ना पोलिसांना काळजी…

अनेक पालक बराच वेळ मुलांसह वाहतूक कोंडीत अडकलेले दिसतात. मात्र एकही वाहतूक पोलीस या रस्त्यावर दिसत नाही.

सविस्तर वाचा…

13:10 (IST) 30 Jul 2024
लालबागमध्ये स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या स्फोटात चार जण भाजले; एकाची प्रकृती चिंताजनक

लालबाग परिसरातील एस. एस. राव मार्गावरील क्षीरसागर हॉटेलनजीकच्या तीन मजली इमारतीत मंगळवारी पहाटे ५ च्या सुमारास स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला.

सविस्तर वाचा…

13:05 (IST) 30 Jul 2024
“मराठा समाजाच्या आंदोलनात फडणवीसांना फूट पाडायची आहे का?”, मनोज जरांगेंचा सवाल

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात भूमिका स्पष्ट करण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने ‘मातोश्री’ या निवासस्थानासमोर आंदोलन सुरु केला आहे. या आंदोलनाबाबत मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली. “मातोश्रीवर गेलेले कोण? मला माहिती नाही. मराठा समाजाचं राज्यात सध्या आंदोलन सुरु नाही. मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करण्याचा हक्क आहे. पण दरेकरांच्या अभियनात सहभागी होऊन असेल तर ते आम्हाला मान्य नाही. सध्या मराठा समाजाचं आंदोलन राज्यात सुरु नाही. याचा अर्थ असा होता की मराठा समाजाच्या आंदोलनात देवेंद्र फडणवीसांना फूट पाडायची आहे का?”, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला.

12:41 (IST) 30 Jul 2024
अद्याप ३८ हजार गिरणी कामगारांच्या कागदपत्रांची म्हाडाला प्रतीक्षा; आतापर्यंत एक लाख १२ हजार कामगारांची कागदपत्रे सादर, ९८ हजार कामगार पात्र

म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे पावणे दोन लाख गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसदारांनी घराच्या योजनेसाठी अर्ज दाखल केले आहेत.

सविस्तर वाचा…

12:41 (IST) 30 Jul 2024
गडचिरोलीवर घोंगावणारे महापुराचे संकट टळले? मेडिगड्डाचे ८५ दरवाजे उघडे असल्याने थेट तेलंगणा सरकारला…

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्प महाराष्ट्रासाठी कायम धोकादायक ठरला आहे.

सविस्तर वाचा…

12:32 (IST) 30 Jul 2024
Minor Girl Commits Suicide : लैंगिक अत्याचारानंतर अल्पवयीन मुलीची आत्महत्या; दोघांविरोधात गुन्हे दाखल

उत्तरप्रदेशातून पळवून आणलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने लैंगिक अत्याचारानंतर आत्महत्या केल्याची घटना काशिमिरा येथे घडली आहे. याप्रकरणी काशिमिरा पोलिसांनी दोन तरुणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा…

12:06 (IST) 30 Jul 2024
पत्नीने मुलाला घरी राहण्यास आणले, संतापलेल्या सावत्र वडिलांकडून साडे चार वर्षीय मुलाची हत्या, पोलिसांकडूनच गुन्हा दाखल

पत्नीला पहिल्या पतीपासून साडेचार वर्षीय मुलगा त्या मुलाला घरी राहण्यासाठी आणल्याने मोहम्मद दिलशाद मोहम्मद इम्रान (२३) याने त्याला मारहाण केली. तसेच लोखंडी खाटेवर ढकलले. या घटनेत त्याच्या मणक्याचे अस्थिभंग झाल्याने तसेच अंतर्गत जखमा झाल्याने त्याचा मृत्यू झाला. सविस्तर वाचा…

12:02 (IST) 30 Jul 2024
मराठा आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक, ‘मातोश्री’च्या बाहेर मराठा क्रांती ठोक मोर्चाचं आंदोलन

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न चर्चेत आहे. आता मराठा आरक्षणाच्या संदर्भात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने आंदोलन करण्यात आलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघटना आक्रमक झाल्या असल्याचं पाहायला मिळत आहे.

11:50 (IST) 30 Jul 2024
देशाला वाहतुकीची शिस्त लावणाऱ्या गडकरींच्या शहरात वाहतूक कोंडीमुळे नागरिकांच्या नाकीनऊ…..

वाहतूक पोलीस मात्र हातावर हात ठेवून हा सर्व प्रकार बघत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

सविस्तर वाचा…

11:46 (IST) 30 Jul 2024
Dombivli Woman Duped : डोंबिवली एमआयडीसीतील महिलेची उल्हासनगरच्या पती, पत्नीकडून फसवणूक

डोंबिवली एमआयडीसीतील एका उद्योजक महिला आणि इतर गुंतवणूकदारांची उल्हासनगर मधील पती, पत्नीने व्यवसायातील गुंतवणुकीच्या माध्यमातून ३१ लाख ५८ हजार ४८० रूपयांची फसवणूक केली आहे. मागील दोन वर्षाच्या काळात हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे, सविस्तर वाचा…

11:43 (IST) 30 Jul 2024
Central Railway Trains : उपनगरीय गाड्यांच्या विलंबामुळे प्रवासी हैराण; नोकरदारांकडून नाराजी

Central Railway Trains Running Late गेल्याकाही दिवसांपासून मध्य रेल्वे मार्गावर विविध तांत्रिक कारणांमुळे रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होत असून अनेक रेल्वेगाड्यांची वाहतुक सुमारे २० ते २५ मिनीटे उशीराने धावत आहे. सविस्तर वाचा…

11:40 (IST) 30 Jul 2024
Mehul Choksi News : मुंबई : फरार असणाऱ्यांच्या याचिका का ऐकायच्या? मेहुल चोक्सीची याचिका ऐकण्यास न्यायालयाचा नकार

देशातून पलायन केलेल्या आणि न्यायालयाने समन्स बजावूनही आदेशांचा वारंवार अवमान करणाऱ्या फरारी आर्थिक गुन्हेगार नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या याचिका का ऐकायच्या? त्यावर सुनावणी का घ्यावी? असा संताप उच्च न्यायालयाने सोमवारी व्यक्त केला.

सविस्तर वाचा…

11:15 (IST) 30 Jul 2024
“अजित पवारांनी वेश बदलून विमान प्रवास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा”, संजय राऊतांची मागणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वेश बदलून दिल्लीला गेल्याच्या चर्चांवर बोलताना खासदार संजय राऊत यांनी टीका केली. वेश बदलून अजित पवार यांनी दिल्ली विमान प्रवास केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली.

10:55 (IST) 30 Jul 2024
“अजित पवार नाव बदलून कसे गेले? एअरलाईन्सची चौकशी करा”, सुप्रिया सुळेंची मागणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वेश बदलून दिल्लीला जात असल्याच्या चर्चांवर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. तसेच दिल्ली आणि मुंबई विमानतळाची यासंदर्भात चौकशी झाली पाहिजे. अजित पवार नाव आणि वेश बदलून विमानतळावरून कसे गेले? यासाठी त्यांना परवानगी कशी मिळाली? यामध्ये दिल्ली आणि मुंबई विमानतळाची आणि संबधित एअरलाईन्सची चौकशी झाली पाहिजे, तसेच याचं उत्तर केंद्र सरकारने दिलं पाहिजे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

10:55 (IST) 30 Jul 2024
गोंदिया: वाघ, बिबट्यांची दहशत कायमच…त्यात पुन्हा गावात हत्ती शिरल्याने…

हत्तीच्या आगमनाच्या वार्तेने नवेगावबांध व परिसरात एकच खळबळ माजली आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून आसाममधून आलेल्या हत्तीच्या कळपाने गडचिरोली परिसरात ठाण मांडले आहे.

सविस्तर वाचा…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वेश बदलून दिल्लीला जात असल्याच्या चर्चांवर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. तसेच दिल्ली आणि मुंबई विमानतळाची यासंदर्भात चौकशी झाली पाहिजे. अजित पवार नाव आणि वेश बदलून विमानतळावरून कसे गेले? यासाठी त्यांना परवानगी कशी मिळाली? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

खासदार सुप्रिया सुळे