Marathi News Update : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना रात्री उशिरा अटक झाली आहे. पॉर्नस्टारला पैसे दिल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या अटकेवरून सामनात अग्रलेख लिहित पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका करण्यात आली आहे. तसंच काही वेळापूर्वीच संजय राऊत यांनीही भाजपावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात फडतूस या शब्दावरून कलगीतुरा रंगल्याचं पाहण्यास मिळालं. संजय राऊत यांनी तुमच्याकडे ईडी सीबीआयचं काडतूस आहे असं म्हटलं आहे. तसंच एकनाथ शिंदे यांना अयोध्या आम्ही दाखवली असाही टोला लगावला आहे. या आणि अशा अनेक घडामोडींवर आपली नजर असणार आहे. लोकसत्ताच्या या लाइव्ह ब्लॉगमधून जाणून घ्या दिवसभरातले महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर

Live Updates

Marathi News Live Update | 'फडतूस' आणि काडतूस' शब्दांवरचा कलगीतुरा आजही सुरू राहणार?

[caption id="attachment_3566244" align="alignnone" width="670"]Uddhav-and-Devendra-Fadnavis उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)[/caption]

कलगीतुरा आजही सुरू राहणार? वाचा महत्त्वाच्या घडामोडी

17:05 (IST) 5 Apr 2023
पोलीस चालक पदाची २०१९ मधील भरती : भरती प्रक्रियेत सुधारणा करण्याचे न्यायाधिकरणाच्या तिन्ही खंडपीठांचे निर्देश

मुंबईः पोलीस शिपाई (चालक) पदासाठी २०१९ मध्ये राबवलेल्या भरती प्रक्रियेत सुधारणा करण्याचे निर्देश न्यायाधिकरणाच्या मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. तसेच एकाच जिल्ह्यातून अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना तीन आठवड्यांत नियुक्ती पत्र देवून सुधारित यादी जाहीर करावी, असा महत्त्वपूर्ण निकाल न्यायाधिकरणाच्या तिन्ही खंडपीठांनी दिला.

सविस्तर वाचा...

16:32 (IST) 5 Apr 2023
चंद्रपूर : अल्पवयीन मुलीवर जंगलात नेऊन अत्याचार

चंद्रपूर : राजुरा शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या सहाव्या वर्गातील मुलीवर ओळखीच्याच २२ वर्षीय युवकाने जंगलात नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

सविस्तर वाचा..

16:18 (IST) 5 Apr 2023
‘स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ भारतात १० भाषांमधून प्रदर्शित होणार

मुंबई : ‘स्पायडर-मॅन’ या चित्रपटाच्या श्रृंखलेने आजवर सर्व वयोगटातील प्रेक्षकांचे मनोरंजन करीत अभूतपूर्व यश कमावले. आतापर्यंत जगभरातील सर्वाधिक पसंतीचा सुपरहिरो ठरलेला ‘स्पायडर-मॅन’ त्याच्या नव्या चित्रपटासाठी विविध भाषांमधून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे.

सविस्तर वाचा..

16:01 (IST) 5 Apr 2023
उद्या पृथ्वीजवळून जाणार २०० मीटर व्यासाचा लघुग्रह, वाचा सविस्तर…

२० दिवसांपूर्वी शोध लागलेल्या “२०२३ एफएम” नावाचा २०० मीटर व्यासाचा लघुग्रह उद्या, ६ एप्रिलला पृथ्वीजवळून जाणार आहे. हा लघुग्रह चंद्राच्या कक्षेबाहेरून जाणार असल्याने चंद्राच्या गुरूत्वकर्षांमुळे लघुग्रहाची दिशा भरकटण्याची चिन्हे आहेत. मात्र, तो पृथ्वीच्या दिशेने येणार नसल्याचे खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.

सविस्तर वाचा...

15:17 (IST) 5 Apr 2023
कल्याणमधील बारावे येथील कचराभूमीला भीषण आग

कल्याण – कल्याण पश्चिमेतील बारावे येथील कल्याण डोंबिवली पालिकेच्या घनकचरा प्रकल्पातील कचराभूमीला बुधवारी दुपारी भीषण आग लागली. कडक उन, जोरदार वारे यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते. आधारवाडी, बारावे येथील कचराभूमीला आग लागण्याची गेल्या दोन महिन्यांतील ही पाच ते सहावी घटना आहे.

सविस्तर वाचा..

15:11 (IST) 5 Apr 2023
ठाण्यातील महिला मारहाण वादात भाजपची उडी; पदाधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार दिल्याने पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या भुवय्या उंचावल्या

ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीनंतर ठाकरे आणि शिंदे गटात रंगलेल्या वादात आता भाजपनेही उडी घेतली आहे. सुरुवातीला भाजपचे पदाधिकारी सावध भुमिका घेऊन या वादापासून अलिप्त राहिल्याचे चित्र होते.

सविस्तर वाचा…

15:10 (IST) 5 Apr 2023
कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीचा ज्येष्ठ नागरिकाकडून विनयभंग

कल्याण- कल्याण मध्ये कचरा वेचक कुटुंबातील एका १० वर्षाच्या मुलीचा सापर्डे गावातील एका ६१ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने सोमवारी रात्री विनयभंग केला. अल्पवयीन मुलगी रात्री नऊच्या सुमारास घराजवळील दुकानात जात असताना हा प्रकार घडला आहे, अशी माहिती खडकपाडा पोलिसांनी दिली. सविस्तर वाचा…

15:08 (IST) 5 Apr 2023
डोंबिवलीत आयरे गावमध्ये तलाव बुजवून बेकायदा चाळींची उभारणी, भूमाफियांकडून १५० चाळींचे नियोजन

डोंबिवली- डोंबिवलीतील मोकळ्या जागा, पालिकेचे आरक्षित भूखंड, सरकारी जमिनी बेकायदा इमारती, चाळी बांधून हडप केल्याने शहरात आता बांधकामासाठी जागा शिल्लक नाहीत. भूमाफियांनी आता शहरालगतचे तलाव बुजवून बेकायदा चाळी उभारण्यास सुरुवात केली आहे. सविस्तर वाचा…

15:07 (IST) 5 Apr 2023
"मर्द-मर्द म्हणणाऱ्यांनी मर्दासारखं वागावं", ठाण्यात बॅनरद्वारे शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंना टोला

गेल्याकाही दिवसांपासून वीर सावरकर यांच्या नावाने राज्याचे राजकारण तापत असताना ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने फलकबाजी सुरू केली आहे.

सविस्तर वाचा…

14:15 (IST) 5 Apr 2023
‘समृद्धी’वर अतिवेगाचे दोन बळी; आई-वडिलांचा मृत्यू, मुलाची मृत्यूशी झुंज..

बुलढाणा : मृत्यूचा सापळा ठरलेल्या समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका कायम आहे. तांत्रिक उणिवा आणि चालकांची हयगय यामुळे समृद्धी महामार्गावरील अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे. मंगळवारी रात्री उशिरा समृद्धी महामार्गावर अतिवेगाने दोन बळी घेतले. या दुर्घटनेत दाम्पत्याचा मृत्यू झाला, तर वाहन चालक मुलगा गंभीर जखमी झाला असून, मृत्यूशी झुंज देत आहे. जखमीवर सिंदखेडराजा येथे उपचार सुरू आहेत.

सविस्तर वाचा..

13:51 (IST) 5 Apr 2023
साताऱ्यात अफूची शेती करणाऱ्या शेतकऱ्यावर कारवाई; तीन लाखांची अफू जप्त

वाई : साताऱ्यात लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी अफूची शेती करणाऱ्या शेतकऱ्यावर कारवाई करत तीन लाखांची अफू जप्त केली. मुळीकवाडी (ता फलटण) येथे अफूची शेती करणार्‍या शेतकऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली.

वाचा सविस्तर....

12:24 (IST) 5 Apr 2023
नंदुरबार : मंगळवारी रात्री किरकोळ वादातून दोन गटात दगडफेक, २५ हून अधिक जणांना अटक, आता परिस्थिती पूर्ववदावर

नंदुरबार – शहरातील महाराष्ट्र व्यायाम शाळा परिसरात मंगळवारी रात्री दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर तुफान दगडफेक झाली. समाजकंटकांनी दगडांसह काचेच्या बाटल्या फेकल्याने मोठे नुकसान झाले असून तीन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. या घटनेप्रकरणी पोलिसांनी २५ हून अधिक जणांना अटक केली आहे. सविस्तर वाचा…

12:24 (IST) 5 Apr 2023
देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, प्रियंका चतुर्वेदींची मागणी

शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी आज रोशनी शिंदे प्रकरणात अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून सपशेल अपयशी ठरले आहेत त्यांनी राजीनामा द्यावा. राज्यात घडत असलेल्या घटनांकडे त्यांचं दुर्लक्ष होतं आहे असंही प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे.

12:23 (IST) 5 Apr 2023
जळगाव : भरधाव अनियंत्रित ट्रॅक्टर नागरी वस्तीत; मुलगी जागीच ठार

जळगाव – भडगाव तालुक्यातील आमडदे येथे वाळूने भरलेला भरधाव ट्रॅक्टर बुधवारी भल्या पहाटे नागरी वस्तीत शिरल्याने अकरावर्षीय मुलीचा नाहक बळी गेला. मृत मुलीची  आजी व बहीण (वय ५ वर्षे) गंभीर जखमी झाल्या आहेत.  दरम्यान, ट्रॅक्टरचालकाला भडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सविस्तर वाचा…

12:22 (IST) 5 Apr 2023
नाशिक : २५२ जागांसाठी २४२० अर्ज, १४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक, आज छाननी

स्थानिक राजकारणाची भविष्यातील दिशा निश्चित करणाऱ्या जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांच्या निवडणुकीत विविध गटातून तब्बल २४२० उमेदवारी अर्ज दाखल झाले असून बुधवारी त्यांची छाननी होणार आहे. पिंपळगाव बसवंत बाजार समितीसाठी सर्वाधिक ३०९ तर, सर्वात कमी म्हणजे २५ अर्ज सुरगाणा बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दाखल झाले आहेत.

सविस्तर वाचा…

12:20 (IST) 5 Apr 2023
ज्या ठाणे पोलीस आयुक्तांच्या बदलीची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली ते पोलीस आयुक्त आहेत तरी कोण ?

ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना मारहाण झाल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात येऊन ठाण्याचे  पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ते कार्यालयातच उपलब्ध नव्हते.

सविस्तर वाचा…

12:19 (IST) 5 Apr 2023
काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांच्याकडे ३० लाख खंडणीची मागणी, बिडकर यांच्यानंतर बागवेंना खंडणीचा दूरध्वनी

काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून अज्ञाताने ३० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आठवड्यापूर्वी भारतीय जनता पक्षाचे माजी सभागृहनेते,नगरसेवक गणेश बिडकर यांना धमकावून २० लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला होता.  सविस्तर वाचा…

11:53 (IST) 5 Apr 2023
वर्सोवा – विरार सागरी सेतू : प्रकल्पाच्या व्यवहार्यता अभ्यासाचे समवयस्क पुनरावलोकन करणार

मुंबई – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वर्सोवा – विरार सागरी सेतूच्या व्यवहार्यता अभ्यास अहवालाचे स्वतंत्र सल्लागारामार्फत समवयस्क पुनरावलोकन (पीअर रिव्ह्यू) करण्याचा निर्णय घेतला आहे. सल्लागाराच्या नियुक्तीसाठी नुकत्याच आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा जारी करण्यात आल्या आहेत.

सविस्तर वाचा..

11:37 (IST) 5 Apr 2023
उपराजधानी की ‘क्राईम कॅपिटल?’; एकाच रात्री दोन हत्याकांडांनी शहर हादरले, शंभर दिवसांत १९ खून

नागपूर : यशोधरा नगर आणि पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्येच्या घटना घडल्या. वैयक्तिक वादातून हे खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनांमुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे चित्र निर्माण झाले असून, उपराजधानी ‘क्राईम कॅपिटल’ होत असल्याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

सविस्तर वाचा..

11:24 (IST) 5 Apr 2023
केरळ रेल्वे आग प्रकरण : रत्नागिरी रेल्वे स्थानकात झोपलेल्या आरोपीला अटक

मुंबई : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने केरळ रेल्वे आग प्रकरणातील आरोपी शाहरुख सैफी याला मंगळवारी रात्री उशिरा रत्नागिरी रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले. त्याला केरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, केरळ पोलिसांचे एक पथक रत्नागिरीला रवाना झाले आहे.

सविस्तर वाचा..

11:13 (IST) 5 Apr 2023
भंडारा : सख्खे भाऊ आंघोळीसाठी तलावात गेले, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले

भंडारा : लाखनी तालुक्यातील मानेगाव येथे तलावात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. ही घटना ४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेनंतर मानेगाव गावात व परिसरात शोककळा पसरली आहे. बिरजू (२०) आणि कृष्ण सिंह चित्तोडिया (२०) अशी मृतांची नावे आहेत.

सविस्तर वाचा..

11:12 (IST) 5 Apr 2023
मुंबई : रुग्णालयांत औषध तुटीचे संकट? देयकाची रक्कम थेट उत्पादक कंपनींच्या खात्यात जमा होत असल्याने वितरक संतप्त

मुंबई : वितरकांनी पुरवठा केलेल्या औषधांची रक्कम थेट संबंधित उत्पादक कंपनीच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. यामुळे मुंबई महानगरपालिकेला औषधांचा पुरवठा करणाऱ्या जवळपास ४०० पेक्षा अधिक वितरकांना आर्थिक फटका बसणार आहे.

सविस्तर वाचा..

11:11 (IST) 5 Apr 2023
‘दुष्काळात तेरावा..! महाविद्यालयीन शिक्षणही आता ‘जीएसटी’च्या कक्षेत, गोंडवाना विद्यापीठाने काढले परिपत्रक

गडचिरोली : देशातील करप्रणालीमध्ये सुधारणा करताना सरकारने नवी करप्रणाली वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू केली. त्यावेळेस केंद्रीय मंत्रालयाने शिक्षण क्षेत्राचा यात समावेश करणार नाही, असे स्पष्ट केले होते. मात्र, गोंडवाना विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयांना विविध प्रकारचे शुल्क भरताना १८ टक्के वस्तू व सेवा कर भरावा लागणार, असे परिपत्रक काढले आहे.

सविस्तर वाचा..

10:59 (IST) 5 Apr 2023
पिंपरी-चिंचवडमध्ये सात वर्षांत दीड लाख नवीन मालमत्ता; गेल्या वर्षभरात २६ हजार मालमत्तांची भर

वीज, पाणी या मूलभूत सुविधांसह सुसज्ज रस्ते, उड्डाणपूल, आयटी पार्क, शैक्षणिक संस्था यामुळे पिंपरी-चिंचवड शहर नागरिकांच्या दृष्टीने आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. नागरिकांची राहण्यासाठी शहराला पसंती मिळत आहे. सविस्तर वाचा…

10:58 (IST) 5 Apr 2023
पुणे : रेल्वेचा फुकट्या प्रवाशांवर कारवाईचा दंडुका; २४ कोटींची वसुली

रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर रेल्वे प्रशासनाने कारवाईचा दंडुका उगारला आहे. रेल्वेच्या पुणे विभागाने मागील आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या ३ लाख ४१ हजार जणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांच्याकडून तब्बल २४ कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. सविस्तर वाचा…

10:57 (IST) 5 Apr 2023
पुणे : वाहनांची स्वयंचलित पद्धतीने तपासणी लांबणीवर; दीड वर्षांची मुदतवाढ देण्याची केंद्रीय परिवहन मंत्रालयावर नामुष्की

देशभरात प्रादेशिक परिवहन कार्यालयांतील (आरटीओ) वाहन निरीक्षकांकडून होणारी वाहनांच्या तंदुरुस्तीची तपासणी यंदा एप्रिलपासून बंद होणार होती. वाहनांची स्वयंचलित पद्धतीने तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले होते. सविस्तर वाचा…

10:56 (IST) 5 Apr 2023
राज्यातील शेतकरी ‘तंत्रस्नेही’ ; एका दिवसांत १.६१ लाख डिजिटल कागदपत्रे डाउनलोड

राज्याच्या महसूल विभागाच्या ई-फेरफार प्रकल्पांतर्गत आता डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा आणि खाते उताऱ्यांबरोबरच (गाव नमुना क्रमांक आठ-अ) मिळकतपत्रिका डाउनलोड करण्यावर नागरिकांकडून भर देण्यात आला आहे. या सुविधेचा वापर करून ३ एप्रिल रोजी एका दिवसात तब्बल एक लाख ६१ हजार ४७२ डिजिटल कागदपत्रे डाउनलोड केली आहेत.

सविस्तर वाचा…

10:55 (IST) 5 Apr 2023
पुणे : मिळकत कर सवलतीबाबत कार्यवाही पूर्ण; मंत्रिमंडळाकडून मान्यतेची प्रतीक्षा

मिळकतकरात ४० टक्के सवलत देण्याबाबत सर्व कायदेशीर कार्यवाही पूर्ण झाली आहे. केवळ मंत्रिमंडळ बैठकीत मान्यतेची प्रतीक्षा आहे. याबाबतचा निर्णय अद्याप न झाल्याने महापालिकेने नव्या आर्थिक वर्षात (सन २०२३-२४) मिळकतकर देयकांचे वाटप १ मेपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सविस्तर वाचा…

10:54 (IST) 5 Apr 2023
तेल उत्पादकांच्या नफ्यावरील करभार शून्यावर

केंद्र सरकारने देशांतर्गत तेल उत्पादक कंपन्यांच्या नफ्यावरील अतिरिक्त कर आणि विमानाच्या इंधनाच्या (एटीएफ) निर्यातीवरील कर ‘शून्यावर’ आणला आहे. तर डिझेलवरील ‘विंडफॉल’ करात मंगळवारी ५० टक्क्यांची कपात केली आहे. सविस्तर वाचा…

10:54 (IST) 5 Apr 2023
“तुमचं खरं काडतूस हे ईडी-सीबीआय, म्हणूनच…” संजय राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

उद्धव ठाकरेंनी माझा उल्लेख फडतूस असा केला, पण मी त्यांना सांगू इच्छितो की मी फडतूस नाही तर काडतूस आहे, असं वक्तव्य करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेचा काल समाचार घेतला होता. दरम्यान, फडणवीसांना आता शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राऊत म्हणाले की, तुमचं खरं काडतूस हे ईडी (सक्तवसुली संचालनालय) आणि सीबीआय (केंद्रीय अन्वेषण ब्युरो) आहे.

उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख फडतूस गृहमंत्री असा केला. त्यावरून चांगलंच राजकारण रंगताना दिसतं आहे.

Story img Loader