Maharashtra Latest News Updates : महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी आज ( ४ जानेवारी ) तीन दिवसांच्या संपावर गेले आहेत. भांडुप कार्यक्षेत्रात अदानी वीज कंपनीला वितरण परवाना देऊ नये, या मागणीसह वीज क्षेत्राच्या खासगी करणाविरोधात वीज कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. तसेच, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरूनही महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

Live Updates

Maharashtra News Live Today, 04 January 2023 : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर…

18:55 (IST) 4 Jan 2023
सिडकोचे कोटींचे भूखंड बेकायदा रोपवाटिका चालकांना आंदण, पालिका व सिडकोचे दुर्लक्ष

नवी मुंबई : नवी मुंबई शहर नियोजनबद्ध वसवलेल्या सिडकोने करोडो किंमतीचे भूखंड विकण्याचा सपाटा लावला आहे. पालिकेने विकास आराखड्यात आरक्षित केलेल्या भूखंडाची विक्री केल्याचे चित्र असताना दुसरीकडे पालिकेच्या मालकीच्या असलेल्या करोडो रुपयांच्या भूखंडाकडे सिडको दुर्लक्ष करत आहे.

सविस्तर वाचा...

18:46 (IST) 4 Jan 2023
पुणे : अजित पवारांच्या 'त्या' प्रश्नावर चंद्रकांत पाटलांनी जोडले हात

भाजपचे नेते पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना. त्यांनी अनेक मुद्यावर भाष्य केले.धर्मवीर संबंधीच्या विषयावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्ष नेते अजित पवार हे त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचा प्रश्न विचारताच चंद्रकांत पाटील यांनी हात जोडून निघून गेले. सविस्तर वाचा…

18:38 (IST) 4 Jan 2023
खंडाळ्यात जलतरण तलावात बुडून पर्यटक युवकाचा मृत्यू

लोणावळा : लोणावळा शहरात खासगी बंगल्यातील जलतरण तलावात बुडून पर्यटकांचा मृत्यू होण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. खंडाळा भागातील एका बंगल्यातील जलतरण तलावात बुडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

सविस्तर वाचा...

17:52 (IST) 4 Jan 2023
ठाणे महापालिकेच्या सार्वजिनिक बांधकाम विभागात मोठे फेरबदल; वर्षोनुवर्षे ठाण मांडून बसलेल्या कार्यकारी अभियंत्यांच्या अंतर्गत बदल्या

ठाणे : महापालिकेत कामावर उशीरा येणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याबरोबरच दर्जात्मक कामावर लक्ष केंद्रीत करत अधिकाऱ्यांसह ठेकेदारांची कान उघडणी करणाऱ्या ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सार्वजिनिक बांधकाम विभागात मोठे फेरबदल केले आहेत. सविस्तर वाचा…

17:36 (IST) 4 Jan 2023
मराठी शाळेत शिकून कुणाचे नुकसान होत नाही, ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांचे मत

पुणे : मुलांना मराठी शाळेत शिकवण्याचा न्यूनगंड आमच्यावेळच्या पालकांमध्ये नव्हता हे आमचे भाग्य आहे. नंतरच्या काळात पालकांमध्ये तो न्यूनगंड आला असावा. त्यामुळे, त्यांनी मुलांना इंग्रजी शाळेत घालण्यास सुरुवात केली. पण, मराठी शाळेत शिकून कुणाचे काही नुकसान होत नाही, असे स्पष्ट मत ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी बुधवारी मांडले.

सविस्तर वाचा...

17:20 (IST) 4 Jan 2023
नववर्षाच्या पार्टीत बाउन्सरकडून तरुणाला मारहाण, तरुणींच्या विनयभंगप्रकरणी तीन बाउन्सरच्या विरोधात गुन्हा

पुणे : नववर्ष साजरे करण्यासाठी एका हाॅटेलमध्ये गेलेल्या तरुणासह दोन तरुणींना बाउन्सरकडून मारहाण करण्यात आल्याची घटना वडगाव शेरी भागात घडली. या प्रकरणी तीन बाउन्सरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

17:06 (IST) 4 Jan 2023
ठाणे: एखादी दुर्घटना घडली तर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करणार; महापालिका आयुक्तांचा अधिकाऱ्यांना इशारा

महापालिका क्षेत्रातील पावसाळी पाणी वाहू नेणाऱ्या गटारावरील तुटलेली झाकणे तातडीने बसविण्याचे आदेश देत याठिकाणी एखादी दुर्घटना घडली तर संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरुन कारवाई केली जाईल असा इशारा आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मंगळवारच्या बैठकीत दिला. सविस्तर वाचा…

17:04 (IST) 4 Jan 2023
मनसे आमदार प्रमोद पाटील याचे मोदींसोबत उत्तर प्रदेशात लागले पोस्टर, दिले नोकरीचे आश्वासन, नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशातील मिरझापूर जिल्ह्यातील काही भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मनसेचे कल्याण ग्रामीणचे आ. प्रमोद उर्फ राजू पाटील यांच्या छबीची छायाचित्रे लावून बेरोजगारांना घरबसल्या नोकरी देण्याचे आमीष दाखविणारे फलक लावण्यात आले आहेत. आपल्या नावाचा गैरवापर करुन कोणीतरी उत्तरप्रदेशात पैसे उकळण्याचा प्रकार, बेरोजगारांची फसवणूक करत असल्याचे लक्षात आल्यावर आ. पाटील यांनी ठाणे पोलीस आयुक्त जय जीत सिंग आणि सायबर गुन्हे शाखेकडे मंगळवारी लेखी तक्रार केली आहे. सविस्तर वाचा…

17:03 (IST) 4 Jan 2023
ठाणे : म्हसा यात्रेनिमित्त अवजड वाहनाच्या वाहतुकीत बदल; मुरबाड-कर्जत मार्गावर अवजड वाहनाच्या वाहतुकीत बदल

ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळख असलेल्या मुरबाड तालुक्यातील म्हसा खांबलिंगेश्वर देवस्थानाचा यात्रा उत्सव शुक्रवार, ६ जानेवारी रोजी सुरू होणार आहे. या यात्रेला लाखोंच्या संख्येने नागरिक या ठिकाणी दाखल होतात. यामुळे यात्रा काळात परिसरातील वाहतूक सुरळीत रहावी, वाहतूक कोंडी होऊ नये तसेच यात्रेत येणाऱ्या भाविक, नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी ५ ते १५ जानेवारी पर्यंत मुरबाड कर्जत राज्यमार्ग क्रमांक ७९ वर अवजड वाहनांसाठी वाहतूक बदल करण्यात आले आहे. सविस्तर वाचा…

16:52 (IST) 4 Jan 2023
कुलगुरू निवड प्रक्रिया पुन्हा लांबणीवर, निवडीसाठी नवीन समितीची नियुक्ती

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) प्रतिनिधींचा समावेश असलेली समिती नव्याने नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून थांबलेली कुलगुरू निवडीची प्रक्रिया आता अधिक लांबणीवर पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

सविस्तर वाचा...

16:28 (IST) 4 Jan 2023
यवतमाळमधील विद्यार्थ्यांच्या संपादणुकीमध्ये वाढ, ‘मिड टर्म अचिव्हमेंट सर्व्हे’चे निष्कर्ष जाहीर

पुणे : देशभरातील विविध राज्यांमध्ये करण्यात आलेल्या ‘मिड टर्म अचिव्हमेंट सर्व्हे’चे निष्कर्ष जाहीर करण्यात आले. त्यात राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या संपादणुकीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाल्याचे दिसून आले.

सविस्तर वाचा...

16:12 (IST) 4 Jan 2023
वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे पुण्यातील अनेक भागांत बत्तीगुल, कर्मचाऱ्यांकडून ‘गो बॅक अदानी’च्या घोषणा

पुणे : राज्यातील वीज कर्मचारी खासगीकरणाच्या निषेधार्थ आजपासून ७२ तासाच्या आंदोलनावर ठाम आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक महावितरण कार्यालयांबाहेर आंदोलन करण्यात येत असून, पुण्यातील रास्ता पेठेतील महावितरण कार्यालयाबाहेर हजारो वीज कर्मचारी एकत्रित येऊन आंदोलन करीत आहे.

सविस्तर वाचा...

16:10 (IST) 4 Jan 2023
रायगडात अल्पवयीन मुली पळून जाण्याचे प्रमाण वाढले

अलिबाग : नातेसंबधातील ताण तणाव, प्रेम संबध, पालकांबाबत नाराजी यातून रायगड जिल्ह्यात अल्पवयीन मुला मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. वर्षभरात मुले बेपत्ता होण्यासंदर्भातील १२१ गुन्हे जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.

सविस्तर वाचा...

16:06 (IST) 4 Jan 2023
बुलढाणा जिल्ह्यालाही संपाची झळ; ग्रामीणसह शहरी भागात वीजपुरवठा प्रभावित

बुलढाणा : महावितरणमध्ये देशातील अग्रगण्य उद्योगपती गौतम अदानी यांच्या शिरकाव करण्याचा प्रयत्न आणि शासनाच्या खासगीकरण धोरणाच्या निषेधार्थ महावितरणच्या तब्बल ३२ संघटनांनी ३ तारखेच्या मध्यरात्रीपासून पुकारलेल्या तीन दिवसीय संपाची बुलढाणा जिल्ह्यालाही झळ बसली आहे. जिल्ह्यातील अधिकारी, प्रशासकीय कर्मचारी ते तांत्रिक कामगार मिळून २ हजार कर्मचारी संपात सहभागी झाले आहे. यामुळे वितरण व पारेषणचे कामकाज प्रभावित झाले असून कार्यलये ओस आणि कर्मचारी रस्त्यावर, असे चित्र जिल्ह्यात सर्वत्र दिसून येत आहे.

वाचा सविस्तर...

16:05 (IST) 4 Jan 2023
संपाचा फटका, राज्यातील महानिर्मितीचे पाच वीज निर्मिती संच बंद!

नागपूर: वीज यंत्रणेच्या खासगीकरणाला विरोधासह इतर मागण्यांसाठी वीज कर्मचारी- अधिकाऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाचा फटका आता महानिर्मितीलाही बसू लागला आहे. महानिर्मितीच्या राज्यभरातील वीज निर्मितीचे पाच संच कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे बंद पडले आहेत. या संचाची क्षमता १ हजार ३८० मेगावॅट आहे. परंतु निश्चित उद्दिष्टानुसार महानिर्मिती ६ हजार मेगावॅट वीज निर्मिती करत असल्याचा दावा महानिर्मितीने केला आहे.

वाचा सविस्तर...

15:41 (IST) 4 Jan 2023
शहापूर : भातसा धरणाच्या कालव्याला भगदाड; लाखो लीटर पाणी शेतात शिरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

भातसा धरणापासून १५ किमी अंतरावर आवरे गावाजवळ बुधवारी पहाटे उजवा कालव्याला भलेमोठे भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी शेतात शिरल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पाणी शिरल्याने ५० हुन अधिक शेतकऱ्यांचे किमान १०० एकर क्षेत्रातील भातशेती व भाजीपाल्याची नासाडी झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सविस्तर वाचा…

15:03 (IST) 4 Jan 2023
चेंबूरधील २५ मजली इमारतीला भीषण आग

चेंबूरच्या आशिष सिनेमा परिसरातील ‘शेठ हाइट’ या २५ मजली इमारतीला बुधवारी दुपारी १ च्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.

सविस्तर वाचा

14:24 (IST) 4 Jan 2023
भोसरी एमआयडीसीतील लघु उद्योजकांना महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका

पिंपरी- चिंचवडच्या भोसरी एमआयडीसीतील एक हजारहुन अधिक लघु उद्योजकांना महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज फटका बसला होता. सकाळी साडेसात ते साडेअकरा असा तीन ते चार तास वीज पुरवठा खंडित होता.

सविस्तर वाचा...

14:03 (IST) 4 Jan 2023
आष्ट्यात विना परवाना उभारलेला शिवरायांचा पुतळा हलवला

सांगली : आष्टा शहरात भाजप कार्यकर्त्यांनी विनापरवाना बसविलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा रात्री प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी हलवला.

सविस्तर वाचा...

13:34 (IST) 4 Jan 2023
“आनंद दिघेंच्या ठाण्यात घाण पसरली”, अरविंद सावंतांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात; म्हणाले, “नाव एकनाथ पण…”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह शिवसेनेत बंड केलं. तेव्हापासून शिवसेना खासदार अरविंद सावंत शिंदे गटावर टीकास्त्र सोडत आहेत. आताही अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. नाव एकनाथ पण असूनी नाथ ते अनाथ आहेत. घरका ना घाटका होतील. भाजपा त्यांचा वापर करुन फेकून देईल, असं अरविंद सावंतांनी ठाण्यात बोलताना म्हटलं आहे.

वाचा सविस्तर...

13:20 (IST) 4 Jan 2023
भंडारा शहरावरही ‘ब्लॅक आऊट’चे संकट!; जिल्ह्यातील ७७५ वीज कर्मचारी संपावर

भंडारा : वीज कंपन्यांच्या खासगीकरणाविरोधात महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी-अधिकारी संघर्ष समितीने पुकारलेल्या संपात भंडारा जिल्ह्यातील सर्व ७७५ अधिकारी- कर्मचारी सहभागी झाले आहेत. तीन दिवसांच्या या संपादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यास शहरावर ‘ब्लॅक आऊट’चे संकट कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर पर्यायी व्यवस्था म्हणून खासगी एजन्सीची मदत घेण्याची तयारी वीज वितरणने चालवली आहे.

वाचा सविस्तर...

13:19 (IST) 4 Jan 2023
खासगी ठेकेदारांच्या ८२९ कामगारांवर वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी

जळगाव: महावितरणच्या कामगार संघटनांच्या कृती समितीतर्फे खासगीकरणाविरोधात मंगळवारी मध्यरात्रीपासून ७२ तासांच्या पुकारलेल्या संपात जिल्ह्यातील अभियंत्यांपासून लाइनमनपर्यंत सुमारे दोन हजार आठशे कर्मचारी सहभागी झाले असून, आता जिल्हाभरात खासगी ठेकेदारांच्या ८२९ कामगारांवर वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी आहे. तसेच अखंडित वीजपुरवठा मिळण्यासाठी महावितरणतर्फे चोवीस तास नियंत्रण कक्ष सुरू ठेवला जाणार आहे.

वाचा सविस्तर...

12:45 (IST) 4 Jan 2023
वीज कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना वेठीस धरु नये, लघु उद्योजकांच्या संघटनेचं संपकऱ्यांना आवाहन

ठाणे : महावितरणच्या भांडुप कार्यक्षेत्रात अदानी कंपनीस वीज वितरण परवाना देऊ नये तसेच कंपनीचे खासगीकरण करू नये यासाठी महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीचे कर्मचारी ७२ तासांसाठी संपावर गेले आहेत. ठाण्यातील लघु उद्योजकांच्या संघटनेने संपकरी कर्मचाऱ्यांना ग्राहकांचे हीत जपावे असे आवाहन करत ग्राहकांना वेठीस धरू नका अशी विनंती केली आहे. तसेच स्पर्धेच्या व जागतिकीकरणाच्या या युगात दोन काय अधिकाधिक कंपन्या आल्या तरी कमी पडतील एवढी स्पर्धा निर्माण व्हायला हवी हे एक ग्राहक म्हणून आम्हाला वाटते असे म्हटले आहे.

वाचा सविस्तर...

12:00 (IST) 4 Jan 2023
उरणच्या वायू विद्युत केंद्रातील ५० मेगावॅट निर्मिती संच बंद, १०० टक्के कामगार संपात सहभागी

उरण : राज्यातील वीज कर्मचारी संपावर गेल्याने उरणच्या वायू विद्युत केंद्रातील महाजनकोच्या वीज निर्मितीवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे उरणमधील वायू विद्युत केंद्रातील ५० मेगावॅटचा सयंत्र बंद झाला आहे. परिणामी वायू विद्युत केंद्रातील २१० मेगावॅट वीज निर्मिती १६० वर आली आहे.

सविस्तर वाचा...

11:24 (IST) 4 Jan 2023
नागपूर: महानिर्मितीकडून ६,१०० मेगावॅट उत्पादन

वीज यंत्रणेच्या खासगीकरणाला विरोधसह इतर मागणीसाठी राज्यातील तिन्ही शासकीय कंपनीचे वीज कर्मचारी ३ जानेवारीच्या मंध्यरात्रीपासून संपावर आहे. महानिर्मितीच्या राज्यभरातील वीज निर्मिती प्रकल्पात रात्रपाळीत ७५ टक्केहून अधिक कर्मचारी संपात सहभागी झाले. त्यानंतरही ६,१०० मेगावॅट वीज निर्मिती ४ जानेवारीच्या सकाळी ९ वाजता नोंदवल्यागेल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. पण येथे तांत्रिक दोष उद्भवल्यास स्थिती बिघडण्याची शक्यता आहे

वाचा सविस्तर...

11:19 (IST) 4 Jan 2023
अखेर अंधार दाटलाच!, उमरेड, भिवापूरच्या बऱ्याच भागात वीज पुरवठा खंडित

नागपूर: उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्यातील उमरेड, भिवापूर परिसरात मंगळवारी रात्री अवेळी पाऊस पडला. त्याचा फटक्याने येथील बऱ्याच भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. येथील ९७ टक्के कर्मचारी संपात असल्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यास अडचण येत आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या संपाला नागपूर जिल्ह्यातही चांगला प्रतिसाद आहे. महावितरणचेही कर्मचारी- अधिकारी मंगळवारी मध्यरात्रीपासून संपावर आहे.

वाचा सविस्तर...

10:53 (IST) 4 Jan 2023
पुणे : खड्डे दुरुस्तीसाठी २२१ कोटींची उधळपट्टी, तरही रस्त्यांची दुरवस्था कायम, आता ४०० कोटींची आवश्यकता

पुणे : रस्ते दुरुस्तीसाठी गेल्या दहा वर्षांत महापालिकेच्या पथ विभागाने तब्बल २२१ कोटी रुपयांचा खर्च केला आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्यांची दुरवस्था आणि रस्त्यांवर खड्डे कायम असल्याने हा खर्च उधळपट्टी ठरला आहे.

सविस्तर वाचा...

10:41 (IST) 4 Jan 2023
Delhi Accident : १२ किलोमीटर फरफटत नेलेल्या अंजलीच्या डोक्याचा भाग गायब, फुफ्फुसे शरीराच्या बाहेर अन्…; शवविच्छेदनातून धक्कादायक बाबी समोर

दिल्लीत रविवारी ( १ जानेवारी ) अपघाताची थरकाप उडवणारी घटना समोर आली होती. कारच्या धडकेत मृत्यू झाल्यानंतर दुचाकीस्वार २० वर्षीय तरुणीला चालकाने १२ किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. या अपघातानंतर तरुणीचा मृतदेह रस्त्यावर नग्नावस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. पण, तरुणीच्या अपघातानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं सांगण्यात येत होतं. आता तरुणीचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून, त्यात मृत्यचं कारण सांगण्यात आलं आहे.

वाचा सविस्तर...

10:39 (IST) 4 Jan 2023
पंतप्रधानांपाठोपाठ राष्ट्रपतींनीही नाकारले भारतीय विज्ञान काँग्रेसच्या समारोपाचे निमंत्रण

एकूण गैरव्यवस्थापन आणि अनागोंदीने मंगळवारी भारतीय विज्ञान काँग्रेसच्या पहिल्याच दिवशी गोंधळ घातला. नागपूर विद्यापीठ आणि इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन (आयएससीए) यांचा समावेश असलेल्या आयोजकांनी दिलेल्या निकृष्ट सुविधांबाबत मान्यवर, विद्यार्थी आणि अगदी माध्यमातील व्यक्तींकडूनही अनेक तक्रारी प्राप्त झाल्या.

वाचा सविस्तर...

10:39 (IST) 4 Jan 2023
संपामुळे राज्यातील वीजपुरवठा विस्कळीत होण्याची भीती, MSEB संचालक म्हणाले, "राज्यातील जनतेने..."

महावितरणच्या भांडुप कार्यक्षेत्रात अदानी वीज कंपनीला वितरण परवाना देऊ नये, या मागणीसह वीज क्षेत्राच्या खासगीकरणाविरोधात महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या शासकीय वीज कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (३ जानेवारी) मध्यरात्रीपासून संप पुकारला. त्यामुळे तीन दिवस राज्यातील वीजपुरवठा विस्कळीत होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे (MSEB) संचालक विश्वास पाठक यांनी राज्यातील जनतेला कुठेही भयभीत होण्याची आवश्यकता नसल्याचं म्हटलं आहे. त्यांनी ट्वीट करत आपली भूमिका मांडली.

सविस्तर बातमी...

msedcl

राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

Story img Loader