Mumbai NewsToday: पहलगाम हल्ल्याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहेत. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात केलेल्या विधानावरून भाजपाकडून टीका केली जात आहे. दुसरीकडे बेस बस तिकीट दरात केलेली कपात मागे घेण्यात आली असून तिकीटदर दुप्पट करण्यात आले आहेत. यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा विरोधकांकडून उचलून धरला जाण्याची शक्यता आहे.

Live Updates

Mumbai-Pune News Live Today 29 April 2025 : मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रभरातील सर्व महत्त्वाच्या बातम्या

18:21 (IST) 29 Apr 2025

इलेक्ट्रिक वाहनांना टोलमुक्ती, प्रवासी ईव्हींवर मोठं अनुदान; राज्य सरकारकडून नवं ईव्ही धोरण मंजूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत राज्य सरकारने नवीन इलेक्ट्रिक व्हेइकल धोरणास मंजुरी दिली असून या धोरणांतर्गत काही विशिष्ट इलेक्ट्रिक गाड्यांना काही निवडक रस्त्यांवर टोलमुक्ती दिली जाणार आहे. तसेच प्रवासी इलेक्ट्रिक गाड्यांवर मोठं अनुदान दिलं जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे.

सविस्तर वाचा

17:36 (IST) 29 Apr 2025

“शेवटची लढाई लढायची वेळ आली तरी…”, रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिंदेंच्या आमदाराचा इशारा

आता शिवसेना (शिंदे) पक्षाचे आमदार महेंद्र दळवी यांनी महायुतीला एक सूचक इशारा दिला आहे. ‘आम्हाला पालकमंत्री पदासाठी शेवटची लढाई लढायची वेळ आली तरी चालेल. आम्ही ती लढाई लढणार’, असा इशारा महेंद्र दळवी यांनी दिला आहे.

सविस्तर वाचा

15:43 (IST) 29 Apr 2025

Rohit Pawar on Bharat gogawale: भरत गोगावलेंच्या पालकमंत्रीपदावर रोहित पवारांची खोचक टिप्पणी

भरत गोगावले वर्षभरापासून म्हणत आहेत की पालकमंत्रीपदाबाबतची इच्छा लवकरच पूर्ण होईल. अजून अनेक वर्षं त्यांना तसंच म्हणावं लागेल. आधी त्यांना मंत्रीपदाची इच्छा होती. अडीच वर्षं त्यांना त्यासाठी थांबावं लागलं. पालकमंत्रीपदासाठी त्यांना पाच वर्षं तरी थांबावं लागेल असं दिसतंय - रोहित पवार

15:29 (IST) 29 Apr 2025

DCM Eknath Shinde on Pahalgam: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहलगाम पीडितांबाबत प्रतिक्रिया

दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या मुलाबाळांना, आपल्या लाडक्या बहिणींना दहशतवाद्यांनी सोडलं. पण घरातल्या कर्ता पुरुषाला मारलं. त्या कुटुंबांची परिस्थिती सर्वसामान्य आहे. कुणाचं शिक्षण चालू आहे, कुणाच्या नोकरीचा मुद्दा आहे. अनेक मुद्द्यांनी हे कुटुंबीय ग्रस्त आहेत. त्यामुळे आज मंत्रिमंडळ बैठकीत तिथे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्याचं काम आम्ही केलं - एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

14:15 (IST) 29 Apr 2025

Government Job for Asavari Jagdale: आसावरी जगदाळेंना सरकारी नोकरी

सरकारी नोकरीचं माझं स्वप्न नव्हतं. पण माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की मी एका मोठ्या पदावर काम करावं. लोकांच्या मदतीस यावं. त्यांनी कधीही मुलगा आणि मुलगी यांच्यात भेद केला नाही. सरकारच्या कामात माझा हातभार लागावा अशी त्यांची इच्छा होती. त्यांची ती इच्छा आज पूर्ण होतेय असं मला वाटतं - आसावरी जगदाळे, पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळे यांच्या कन्या

14:12 (IST) 29 Apr 2025

Government Job for Asavari Jagdale: आसावरी जगदाळेंना सरकारी नोकरी

मी मुख्यमंत्री व महाराष्ट्र सरकारचे आभार मानते. त्यांनी आम्हाला सांगितलं की ते सगळे आमच्यासोबत आहेत. माझ्या शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले होते. आज सरकारने जाहीर केलं की ते आम्हाला आर्थिक मदत देणार आहेत. शिवाय, मला सरकारी नोकरी देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यासाठी मी त्यांचे आभार मानते - आसावरी जगदाळे, पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळे यांच्या कन्या

14:12 (IST) 29 Apr 2025

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांना महाराष्ट्र सरकारकडून ५० लाखांची मदत; शिक्षण आणि नोकरीसाठी तरतूद

पहलगाम हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला असून यापैकी ६ जण महाराष्ट्रातील आहेत. त्यांच्यासाठी राज्य सरकारने मोठ्या घोषणा केल्या आहेत. ...अधिक वाचा
14:07 (IST) 29 Apr 2025

Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातील मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांच्या कुटुबीयांना आर्थिक मदत

पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र सरकराने ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

https://twitter.com/ANI/status/1917119103883514113

13:30 (IST) 29 Apr 2025

अक्षय्य तृतीयेआधी जळगावमध्ये सोने दरात ४१२ रुपयांची वाढ

मंगळवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा ४१२ रुपयांची वाढ झाल्याने सोन्याचे दर प्रतितोळा ९९ हजार २९२ रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले. ...सविस्तर बातमी
12:37 (IST) 29 Apr 2025

कल्याणमध्ये बनावट सोन्याच्या बांगड्यांद्वारे खासगी वित्त संस्थेची आर्थिक फसवणूक

कल्याणमध्ये एका खासगी ठेकेदाराने एका खासगी वित्त संस्थेत बनावट सोन्याच्या बांगड्या या खऱ्या आहेत असे सांगून गहाण ठेवल्या. ...वाचा सविस्तर
11:38 (IST) 29 Apr 2025

Bharat Gogawale Raigad Gardian Minister: रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावलेंचा आग्रह कायम

रायगडमध्ये १ मे रोजी आदिती तटकरेंच्या हस्ते झेंडावंदन होणार आहे. मात्र, यानंतरदेखील शिंदे गटाचे आमदार व मंत्री भरत गोगावले हे रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही आहेत. "झेंडावंदनाचा अधिकार दिला म्हणजे सगळं झालं असं नाही. सबुरीचं फळ मिळतंच. त्याप्रमाणे आम्हाला मिळेल. मला मंत्रीपदासाठी कोणताही संघर्ष करावा लागला नाही. पालकमंत्रीपदासाठी थोडाफार संघर्ष करावा लागतोय. पण सगळं चांगलं होईल. संघर्षातूनच पुढे चांगलं होतं", असं भरत गोगावले माध्यमांना म्हणाले.

11:23 (IST) 29 Apr 2025

‘यादव’ने बनविले ‘खान’ नावाने इन्स्टा खाते, केला पाकिस्तानचा उद्धार आणि मोदींविषयी आक्षेपार्ह पोस्ट

‘यादव’ आडनाव असलेल्या एका २१ वर्षीय तरुणाने इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर ‘खान’ आडनावाचे बनावट खाते तयार करुन धार्मिक भावना भडकविण्यासाठी पाकिस्तान देशाचा उद्धार केल्याचा धक्काकायक प्रकार समोर आला आहे. ...अधिक वाचा
11:23 (IST) 29 Apr 2025

‘यादव’ने बनविले ‘खान’ नावाने इन्स्टा खाते, केला पाकिस्तानचा उद्धार आणि मोदींविषयी आक्षेपार्ह पोस्ट

‘यादव’ आडनाव असलेल्या एका २१ वर्षीय तरुणाने इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर ‘खान’ आडनावाचे बनावट खाते तयार करुन धार्मिक भावना भडकविण्यासाठी पाकिस्तान देशाचा उद्धार केल्याचा धक्काकायक प्रकार समोर आला आहे. ...अधिक वाचा
10:56 (IST) 29 Apr 2025

Tuljapur Darshan Pass Issue: तुळजापूरमध्ये दर्शन पासचा बाजार

खरंतर पास बंद केले पाहिजेत. देवासमोर सगळे सारखेच आहेत. सगळ्यांना समान न्याय द्या. कुणी व्हिआयपी, कुणी साधा असं काहीही न ठेवता सगळ्यांना समान ठेवा. व्हिआयपी व्यक्तीला २०० रुपये देणं कठीण नाही. अशा लोकांना जवळच्या लोकांसाठी पास द्यायचा असेल, तर २०० रुपये देऊन त्यांनी पास खरेदी करावा. पण इथे पासचा बाजार मांडला जात असेल तर ते चुकीचं आहे - कैलास पाटील, ठाकरे गटाचे आमदार

10:56 (IST) 29 Apr 2025

Tuljapur Darshan Pass Issue: तुळजापूरमध्ये दर्शन पासचा बाजार

पासच्या बाबतीत पुजारी मंडळ व तुळजापूरच्या स्थानिक रहिवाशांची तक्रार होती की ट्रस्टनं राखीव ठेवलेल्या पासचा बाजार मांडला जातो. त्या पासवर पक्की नोंद केली जात नाही. पेन्सिलनं त्यावर लिहिलं जातं आणि तोच पास पुन्हा फिरून येतो. आमची आणि पुजारी मंडळाची मागणी आहे की या पासमध्ये खरंच व्हिआयपी असतील, त्यासाठी २०० रुपये फी असेल तर त्यांनी शुल्क भरून पास घ्यावेत. तुम्ही कुणाला पास देताय, याची पक्की यादी वेबसाईटवर असायला हवी. पेन्सिलनं लिहायचं आणि तोच पास फिरवून पुन्हा वापरायचा हे असं चाललं आहे - कैलास पाटील, ठाकरे गटाचे आमदार

10:30 (IST) 29 Apr 2025

Vijay Wadettiwar Controversial Statement: विजय वडेट्टीवार यांच्या विधानावरून वाद

वडेट्टीवार यांनी अत्यंत असंवेदनशी आणि या देशातील जनतेला दुखावणारं वक्तव्य केलं आहे. अशा विधानावर फक्त माफी मागून होणार नाही. आपल्या विधानाचे समाजावर काय परिणाम होतील, पीडित परिवारांवर काय परिणाम होईल, तपास करणाऱ्या यंत्रणांवर काय परिणाम होतील याचा विचार करायला हवा. कितीही वरच्या पदावर असले, तरी असंवेदनशीलपणे बोलू नये. काँग्रेस पक्षाचा खरा चेहरा आणि देशवासीयांबद्दलच्या भावना यातून दिसून येतात - चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्राचे महसूल मंत्री

Vijay Wadettiwar

पहलगाम हल्ल्यावरून विरोधकांनी सरकारच्या व गुप्तचर यंत्रणेच्या चुकांवर बोट ठेवलं आहे. (PC : ANI)

Mumbai-Pune News Live Today 29 April 2025 : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या राजकीय घडामोडी