Latest Marathi News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेगवेगळ्या विषयांवरून चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच नागपूरमध्ये दंगलीची घटना घडली. या घटनेचे अद्यापही पडसाद उमटत असल्याचं पाहायला मिळत आहेत. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून विरोधक सरकारला जाब विचारत आहेत. यातच सरकारमधील काही मंत्री चिथावणीखोर विधाने करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. नागपुरात घडलेल्या घटनेच्या संदर्भावरून विधानसभा आणि विधान परिषेदेत चर्चा झाली आहे. या चर्चेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही उत्तरेही दिली आहेत. यासह बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण देखील चर्चेत आहे. यासह राज्यातील राजकीय व इतर घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Mumbai Breaking News LIVE Today, 20 March 2025 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर वाचा...
दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंवर आरोप होताच उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “मागच्या अधिवेशनातच…”
दिशा सालियन प्रकरण पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत या प्रकरणाची सीबीआयद्वारे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तसेच आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर एफआयआर दाखल व्हावा, असेही ते म्हणाले आहेत. राजकीय दबावापोटी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊ शकली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. या याचिकेनंतर सत्ताधाऱ्यांनी शिवसेनेवर (ठाकरे) जोरदार टिकास्र सोडले आहे. यानंतर आता आदित्य ठाकरे यांचे वडील तथा शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे.
पोलीस ठाण्यासमोर महिलेने राॅकेल ओतून घेतले
छत्रपती संभाजीनगर - बीड जिल्ह्यातील युसूफ वडगाव पोलीस ठाण्यासमोर गुरुवारी एका महिलेने आपल्या बेपत्ता मुलीचा शोध लावला जात नसल्याच्या निषेधार्थ राॅकेल आेतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, आठ ते दहा पोलीस, महिला पोलीस यांनी संबंधित महिलेला पकडून ठेवल्याने पुढील अनर्थ टळला.
या महिलेने एक महिन्यांपूर्वी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात दिली होती. बेपत्ता मुलगी नात्यातीलच मुलासोबत गेली असून, या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. पोलीस तपास सुरू आहे, असे ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांनी सांगितले. राॅकेल ओतून घेणाऱ्या महिलेसोबत तिची एक मुलगीही सोबत होती. त्या मुलीनेच आपली बहीण महिन्यापासून बेपत्ता असून, तिला शोधून आणावे, यासाठी तक्रार देऊनही उपयोग झाला नसल्याचा आरोप केला.
"दिशा सालियनची हत्याच, जो कोणी आरोपी असेल त्याला...", संजय शिरसाट यांचं मोठं भाष्य
दिशा सालियन मृत्यू प्रकरण तब्बल पाच वर्षानंतर आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या माध्यमातून दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची पुन्हा एकदा नव्याने चौकशी करण्याची मागणी करण्यात आली असल्याची माहिती सांगितली जात आहे. तसेच दिशा सालियनची हत्या करण्यात आल्याचा आरोप दिशा सालियनच्या वडिलांनी केला आहे. यावरून आता राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, दिशा सालियनची प्रथमदर्शनी हत्या झालेली आहे. आता दिशा सालियनच्या वडिलांवर जो दबाव होता त्या विरोधात ते उच्च न्यायालयात गेलेले आहेत. आता न्यायालय काय निर्णय देणार हा वेगळा भाग. मात्र,या प्रकरणाच्या मागे अनेकजण आहेत. पोलीस त्याचा तपास गतीने करतील आणि जो कोणी आरोपी असेल त्याला जेलमध्ये जावं लागेल", असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
बनावट कागदपत्रांद्वारे जन्म दाखले, १६ जण गजाआड, सात ठाण्यांमध्ये गुन्हे
राज्यात बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिमांना बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्र दिल्याचा गंभीर आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला.
दुर्घटनेनंतर महापालिकेला जाग; यापुढे खेळाच्या मैदानांवर अन्य कार्यक्रमांना बंदी
शहरातील खेळाच्या मैदाने यापुढे फक्त खेळण्यासाठी राखीव ठेवण्याचा तसेच अन्य कुठल्याही खासगी कार्यक्रमांना न देण्याचा निर्णय वसई विरार महापालिकेने घेतला आहे. सोमवारी वसंत नगरी येथील मैदानातील खासगी मेळाव्यात वीजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर पालिकेने हा निर्णय घेतला आहे. सविस्तर वाचा…
नांदेडच्या नरसीमध्ये रविवारी भव्य पक्षप्रवेश सोहळा ! भास्करराव खतगावकर कर्तेधर्ते; खा.अशोक चव्हाण यांना आ.चिखलीकरांचा शह
जिल्ह्याच्या राजकारणातील गेल्या २० वर्षांतला सर्वांत मोठा आणि भव्य पक्षप्रवेश सोहळा येत्या रविवारी (दि.२३) नरसी येथे होणार असून ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर हे या सोहळ्याचे कर्तेधर्ते आहेत. सविस्तर वाचा…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील दोन्ही उपाहारगृहे बंद, विद्यार्थ्यांची नाश्त्यासाठी पायपीट
विद्यार्थ्यांना साध्या चहासाठी दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. चहा, नाश्ता, जेवण यासाठीही वेगवेगळ्या वेळेत यावे-जावे लागत असल्याने विद्यार्थ्यांमधून तीव्र नाराजीचा सूर ऐकू येत आहे.
सोलापुरात वृद्धाचा जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न ; मुले सांभाळत नसल्याने नैराश्य
वृद्ध शेतकऱ्याने आयुष्याच्या संध्याकाळी मुलांवर शेतीची जबाबदारी सोपवत संपूर्ण शेती मुलांच्या नावावर केली. परंतु, नंतर मुलांनी वृद्ध पित्याच्या पालनपोषण करण्याचे कर्तव्य विसरून त्याला अडगळीत टाकले. सविस्तर वाचा…
राष्ट्रधर्म पूजक- दादाराव कराड स्मृती राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धा- २०२५, आजपासून
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, पुरातन यज्ञभूमी रामेश्वर (रुई) ग्रामस्थ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने राष्ट्रधर्म पूजक दादाराव कराड स्मृती प्रीत्यर्थ संत एकनाथ महाराज षष्ठीचे औचित्य साधून लातूर येथील रामेश्वर (रुई) येथे राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. सविस्तर वाचा…
होळीच्या वादातून खून…रत्नागिरीतील खूनाचा रायगड पोलीसांकडून उलगडा
होळीच्या वादातून रत्नागिरी जिल्हयातील म्हाप्रळ येथे एकाची हत्या करण्यात आली होती. त्याचे प्रेत गोणीत भरून रायगड जिल्ह्यात टाकण्यात आले होते. मात्र रायगड पोलीसांनी तपासाची चक्र फिरवून आरोपींना गाठलेच. तीन आरोपींना पोलीसांनी जेरबंद केले असून, संतोष साबळे,विशाल देवरुखकर आणि श्यामलाल मौर्य अशी तिघांची नावे आहेत.
छत्रपती संभाजीनगर : आझाद चौकात अग्नितांडव; १६ दुकाने खाक
आगीची घटना पाहिलेल्या काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, सकाळच्या सहेरच्या नमाजासाठी उठलो त्यावेळी आग बऱ्याच प्रमाणात पसरत असल्याचे निदर्शनास आले.
सुप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर!
जगभरात भारताची मान अभिमानानं उंचावणारा गुजरातमधील ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा घडवणारे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत यासंदर्भातली घोषणा केली आहे. २५ लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र व शाल असं या पुरस्काराचं स्वरूप असून या माध्यमातून राम सुतार यांच्या कामाचा गौरव केला जाणार आहे. कोकणात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं कामदेखील राम सुतार यांनाच देण्यात आलं आहे.
“तुम्ही स्वत:ला काय समजता?”, अंबादास दानवे अन् महाजनांमध्ये जुंपली, एकमेकांच्या अंगावर धावून…; सभागृहात काय घडलं?
गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेगवेगळ्या विषयांवरून चांगलंच राजकारण तापलं आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच नागपूरमध्ये दंगलीची घटना घडली. या घटनेचे पडसाद उमटत आहेत. यातच दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून सभागृहात देखील मोठा गोंधळ पाहायला मिळाला. शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं.
होळीच्या वादातून खून…रत्नागिरीतील खूनाचा रायगड पोलीसांकडून उलगडा
होळीच्या वादातून रत्नागिरी जिल्हयातील म्हाप्रळ येथे एकाची हत्या करण्यात आली होती. त्याचे प्रेत गोणीत भरून रायगड जिल्ह्यात टाकण्यात आले होते. मात्र रायगड पोलीसांनी तपासाची चक्र फिरवून आरोपींना गाठलेच. तीन आरोपींना पोलीसांनी जेरबंद केले असून, संतोष साबळे,विशाल देवरुखकर आणि श्यामलाल मौर्य अशी तिघांची नावे आहेत.
Khokya Bhosale : सतीश उर्फ खोक्या भोसलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, शिरूर न्यायालयाचा निर्णय
Khokya Bhosale : भाजपा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसले याला बुधवारी (१२ मार्च) बीड पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथून अटक केली होती. एका इसमाला अर्धनग्न करून बेदम मारहाण केल्याप्रकरणी खोक्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयाने खोक्या भोसलेला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आज या कोठडीचा कालावधी संपल्यानंतर आज पुन्हा सतीश उर्फ खोक्या भोसलेला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयाने सतीश उर्फ खोक्या भोसलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यातत आली आहे.
दंत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा शेततळ्यात बुडून मृत्यू
मिरजेत रंगपंचमी साजरी करुन शेततळ्यात पोहायला गेलेल्या दंत वैद्यक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मिरजेत बुधवारी घडली. सविस्तर वाचा…
शेतकऱ्यांच्या कर्जमाफसाठी बच्चू कडू आक्रमक, अन्नत्याग आंदोलन करण्याची केली घोषणा
"विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असं सांगितलं होतं. मात्र, सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन फोल ठरलं आहे. आजही शेतकऱ्यांना वेदना सतावत आहेत. त्यामुळे उद्यापासून आम्ही तीन दिवस रायगडाच्या पायथ्याशी म्हणजेच महाराजांच्या राजधानीत आम्ही 3 दिवस अन्नत्याग आंदोलन करणार आहोत. दिव्यांगासाठी आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही लढणार आहोत", असं माजी आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
वन्य प्राण्यांची शिकार, छायाचित्रण; सांगलीत तरुणाविरुद्ध गुन्हा
वन्य प्राण्यांची शिकार करून त्या शिकारीचे छायाचित्रण समाज माध्यमावर प्रसारित केल्याबद्दल एका तरुणाविरुद्ध वन गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वन विभागाच्यावतीने बुधवारी देण्यात आली. सविस्तर वाचा…
खानापूरला शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र; चंद्रकांत पाटील यांची घोषणा
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरमध्ये मंजूर करण्यात येत असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केली. आ. सुहास बाबर यांनी आजच याबाबत घोषणा करण्याची मागणी करण्यात आली. सविस्तर वाचा…
छत्रपती संभाजीनगरमधील आझाद चौक परिसरातील १५ ते १६ दुकानांना भीषण आग
छत्रपती संभाजीनगरमधील आझाद चौक परिसरातील १५ ते १६ दुकानांना भीषण आग लागली असून, यामध्ये कोट्यवधींचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी पाच ते सहा अग्निशमन बंब असून, पाण्याचे खासगी काही टँकर आणून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. घटनेचा पंचनामा सुरू असल्याचे अग्निशमन विभागाचे जनसंपर्क अधिकारी अशोक खांडेकर यांनी सांगितले.
बातमीचा अधिक तपशील लवकरच !
दिशा सालियन प्रकरण पाच वर्षांनंतर का चर्चेत आलं? रोहित पवारांनी सांगितलं कारण; म्हणाले, “भाजपा जेव्हा…”
दिशा सालियन मृत्यू प्रकरण तब्बल पाच वर्षानंतर आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या माध्यमातून दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची पुन्हा एकदा नव्याने चौकशी करण्याची मागणी करण्यात आली असल्याची माहिती सांगितली जात आहे. तसेच दिशा सालियनची हत्या करण्यात आल्याचा आरोप दिशा सालियनच्या वडिलांनी केला आहे. यावरून आता राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.
दिशा सालियनचा मृत्यू झाला ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं होतं? तिच्या मित्रानं सांगितला होता घटनाक्रम
दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनचे मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरचा वादाचा विषय ठरत आहे. भाजपाचे नेते नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे या प्रकरणी पाच वर्षांपासून शिवसेनेचे (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांच्याविरोधात रान पेटवत आहेत. मात्र आता दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत या प्रकरणाची सीबीआयच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी केली आहे. याआधी हत्येचा आणि इतर काही अत्याचार झाल्याचा आरोप फेटाळून लावणारे सतीश सालियन आता दिशाची हत्या झाल्याचा गंभीर आरोप करत आहेत. ८ जून २०२० च्या रात्री दिशा सालियनचा मृत्यू झाला होता. त्यादिवशी रात्री नेमके काय घडले? याबाबत दिशाच्या एका मित्राने माहिती दिली होती.
मंत्रिमंडळातील तीन लाडके मंत्री कोण? जयंत पाटलांचा प्रश्न अन् फडणवीसांचं दिलखुलास उत्तर; म्हणाले, “आता लाडका मंत्री…”
गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेगवेगळ्या विषयांवरून चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच नागपूरमध्ये दंगलीची घटना घडली. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून विरोधक सरकारला जाब विचारत आहेत. यातच सरकारमधील काही मंत्री चिथावणीखोर विधाने करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. तसेच मंत्र्यांच्या अशा पद्धतीच्या विधानांवर मुख्यमंत्र्यांनी अंकुश लावला पाहिजे, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.
“ज्यांच्या मुलीचं निधन झालं ते आई-वडील…”, संजय राऊतांचे दिशा सालियन प्रकरणाबाबत मोठं वक्तव्य
दिशा सालियन मृत्यू प्रकरण पाच वर्षानंतर आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. यामध्ये दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयच्या माध्यमातून करण्याची मागणी दिशा सालियनच्या वडिलांनी केली आहे. “हे प्रकरण पुन्हा काही लोकांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे. जे प्रकरणच नव्हतं. त्या वडीलांचे जे म्हणणं आहे की त्यांच्यावर दबाव होता. खरंतर त्यांच्यावर आता दबाव आहे. हे प्रकरण तुम्ही नव्याने सुरू करा, असा आता त्यांच्यावर दबाव असावा हे मला स्पष्ट दिसतंय,” असे संजय राऊत म्हणाले आहेत.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर अधिवेशनात खडाजंगी होणार? वडिलांच्या गंभीर आरोपांनंतर राजकीय चर्चेला उधाण!
तब्बल पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चर्चा होऊ लागली आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यात काही गंभीर दावे केले आहे.
Disha Salian Death Case: "दिशा सालियन प्रकरणबाबत अनिल देशमुखांचं मोठं विधान; म्हणाले, "राजकीय षडयंत्र..."
Disha Salian Death Case: दिशा सालियन मृत्यू प्रकरण पाच वर्षानंतर आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कारण दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयच्या माध्यमातून करण्याची मागणी दिशा सालियनच्या वडिलांनी केली आहे. मात्र, दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी दिशाची हत्या झाल्याचा गंभीर आरोप आता केला आहे. या प्रकरणावर आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. "दिशा सालियन प्रकरणाबाबत २०२२ मध्येच एसआयटी नेमण्यात आली होती. एसआयटी चौकशी अद्यापही सुरु आहे. पण आता जे काही सुरु आहे हे सर्व प्रकरण राजकीय षडयंत्र असल्याचे दिसतंय", असं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
दिशा सालियन प्रकरणाबाबत बोलताना संजय राऊत यांनी हा ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. (फोटो-संग्रहित छायाचित्र)