Latest Marathi News Updates : औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरण तापलं आहे. ही कबर काढून टाकावी अशी अनेकांनी मागणी केली आहे. विश्व हिंदू परिषदेने यासाठी काल (१७ मार्च) मोठं आंदोलन पुकारलं. मात्र, या आंदोलनाला गालबोट लागलं असून दंगलसदृष्य स्थिती निर्माण झाली. परिणामी आजही नागपुरातील काही भागात तणावपूर्ण शांतता असून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संदर्भात राज्यसभेत खासदार रेणुका चौधरी यांनी स्थगन प्रस्ताव मांडला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आज विधानसभेत निवेदन सादर करणार आहेत. यावरून आज राज्यात घमासान होण्याची शक्यता आहे. यासह राज्यातील इतर घडामोडी वाचा.

Live Updates

Maharashtra News Live Today, 18 March 2025 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा

17:50 (IST) 18 Mar 2025

माजी आमदार सीताराम घनदाट यांचा भाजपामध्ये प्रवेश

परभणी : दोन वेळा अपक्ष आमदार झालेले आणि यावेळच्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले माजी आमदार सिताराम घनदाट यांनी मंगळवारी (दि.१८) मुंबई येथे प्रदेश कार्यालयात कार्याध्यक्ष श्री.रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

सवितस्तर वाचा...

17:34 (IST) 18 Mar 2025

अहिल्यानगर विभागाला २०० एसटी बसची आवश्यकता; उपलब्ध झाल्या केवळ ३०

अहिल्यानगर : एसटी महामंडळाच्या अहिल्यानगर विभागाला तब्बल २०० एसटी बसची कमतरता भासत आहे. पाच वर्षानंतर त्यामध्ये १२० एसटी बसची घट झाली आहे. काही दिवसांपूर्वी जिल्ह्याला ३० नव्या एसटी बस (लालपरी) मिळाल्या आहेत.

सविस्तर बातमी...

17:25 (IST) 18 Mar 2025

वीज पुरवठा वारंवार खंडित का होतोय?

अमरावती : उन्हामुळे विजेची मागणी वाढली आहे.त्यामुळे ‘महावितरण’च्या प्रत्येक उपकेंद्राचा विद्युतभार वाढला आहे. अमरावती परिमंडळाअंतर्गत अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात सुमारे २ लाख ७० हजार शेतीपंपधारक शेतकरी आहेत ‘महावितरण’कडून या शेतकऱ्यांना दिवसा व रात्री अशा पद्धतीने वीजपुरवठा करण्यात येतो. हा वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतीपंपांना ‘ऑटो स्वीच’ लावले आहेत बसवलेल्या ‘ऑटो स्वीच’मुळे वीज आल्यावर एकाच वेळी सर्व पंप सुरू होऊन विद्युतभार वाढतो. त्याचवेळी रोहित्रावरील (डीपी) दाबही वाढत असल्याने त्यामध्ये बिघाड होऊन वीजपुरवठा बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे.

सविस्तर वाचा...

17:07 (IST) 18 Mar 2025

बेशिस्त रिक्षाचालकांविरुध्द पोलीस आक्रमक; तीन दिवसात हजारपेक्षा अधिक जणांवर कारवाई

शहरातील रिक्षा चालकांची वाढती मुजोरी हा नाशिककर आणि पोलिसांसाठी त्रासदायक विषय होऊ लागला आहे. थांबा सोडून रिक्षा उभी करणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविणे, प्रवासी तसेच अन्य वाहनचालकांशी मुजोरी करणे, किरकोळ कारणावरुन मारहाण करणे, थांब्यांवर शहर बससेवेच्या जागेवर रिक्षा उभी करणे, असा मनमानी कारभार सुरू आहे.

सविस्तर वाचा…

16:58 (IST) 18 Mar 2025

Nagpur Violence : “शेकडोंच्या जमावाने घेराव घातला, एकाने कुऱ्हाडीने…”, उपायुक्तांनी सांगितला नागपुरातील ‘तो’ थरारक घटनाक्रम

नागपूरमध्ये झालेल्या भीषण दंगलीत अनेक पोलीस आणि नागरीक गंभीर जखमी झाले आहेत. नागपूर झोन ५ चे उपायुक्त निकेतन कदम यांच्या हातावर कुऱ्हाडीने वार करण्यात आले. यामुळे त्यांना खोलवर जखम झाली असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान,हा प्रकार नेमका कसा घडला, याबाबत त्यांनी आता सविस्तर माहिती दिली आहे.

सविस्तर वृत्त वाचा

16:54 (IST) 18 Mar 2025

उल्हासनगरात बनावट मसाले विक्री; नामांकीत कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने कारवाई

एका नामांकीत मसाले कंपनीच्या नावाखाली बनावट मसाले विक्रीचा धक्कादायक प्रकार उल्हासनगर शहरात समोर आला आहे. याप्रकरणी नामांकीत कंपनीच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या तक्रारीनंतर पोलिसांच्या मदतीने उल्हासनगरातील खेमानी परिसरात धाड टाकली असता हा प्रकार समोर आला. सविस्तर वाचा…

16:15 (IST) 18 Mar 2025

बेपत्ता मुलींचे पालक 'एसपी' कार्यालयावर धडकले!

बुलढाणा : मोताळा तालुक्यातील पिंपरी गवळी सारख्या लहान गावातून गेल्या वर्षभरात पाच ते सहा मुली बेपत्ता झाल्या आहेत. याच गावातून गेल्या महिन्यात एका १६ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले. मुलीचे वडील तक्रार देऊन आले असले तरीही पोलीस प्रशासन कुठलीही ठोस कारवाई करताना दिसून आलेले नाही. या प्रकाराला राज्य सरकारच्या गृह मंत्रालयाचे समर्थन आहे का? असा खडा सवालच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी विचारला आहे.

सविस्तर वाचा...

16:08 (IST) 18 Mar 2025

माथेरान बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद… बाजारपेठ बंद, रस्त्यांवर शुकशुकाट…

माथेरान मध्ये येणाऱ्या पर्यटकांचे वाढते फसवणुकीचे प्रकार रोखण्याच्या मागणीसाठी मंगळवारपासून माथेरान बेमुदत बंदची हाक देण्यात आली होती. माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने केलेल्या या आवाहनाला माथेरानकरांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला. सविस्तर वाचा…

15:56 (IST) 18 Mar 2025

धक्कादायक! पत्नीचे सौभाग्याचं लेणं वाचवतांना पतीचा दुर्दैवी अंत

अकोला : पत्नीचे सौभाग्याचं लेणं वाचवतांना पतीचा दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यात घडली. रेल्वेस्थानकावर गाडीच्या खिडकीतून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने पळवले. सतर्क पतीने सिनेस्टाईल त्या चोरट्याचा जीवाच्या आकांताने धावत पाठलाग केला. काही अंतरावर चोरट्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये चोरट्याने दगडाने पतीचा चेहरा ठेचला. यात गंभीर जखमी झालेल्या पतीचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सविस्तर वाचा...

15:45 (IST) 18 Mar 2025

वीज जोडणीसाठी महावितरणच्या अभियंत्यांना धमकी, गुन्हा दाखल

आजच्या आज वीज जोडणी द्या नाहीतर बघून घेईन, अशी धमकी देऊन ‘महावितरण’चे घनसावंगी येथील कनिष्ठ अभियंता अनिल जंगम यांच्या कार्यालयीन कामात अडथळा आणला, अशा आरोपावरून योगेश प्रकाश बांदल याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

सविस्तर वाचा…

15:40 (IST) 18 Mar 2025
समाज माध्यमांवरील अफवांवर पोलिसांचे लक्ष

ठाणे : औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरमध्ये दोन गटात वाद झाल्यानंतर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणे जिल्ह्यासह सर्वच क्षेत्रातील पोलिसांच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. ठाणे जिल्ह्यात पोलिसांकडून सलोख राखण्याचे आवाहन पोलीस करत करत आहेत. समाजमाध्यमांवर अफवा पसरण्याचे प्रमाण अधिक आहे.

सविस्तर वाचा

15:20 (IST) 18 Mar 2025

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत ७५० ज्येष्ठ अयोध्येकडे रवाना

सामाजिक न्याय विभागाच्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत जिल्ह्यातील ७५० हून अधिक ज्येष्ठ नागरिक मंगळवारी दुपारी अयोध्या येथे दर्शनासाठी विशेष रेल्वेगाडीने रवाना झाले. स्थानक परिसर यावेळी जय श्रीरामच्या घोषणांनी दुमदूमला. सविस्तर वाचा…

15:09 (IST) 18 Mar 2025

अंबडचा उपविभागीय जलसंधारण अधिकारी सापळ्यात; देयक काढण्यासाठी ५० हजारांची मागणी

जालना - सिमेंट नाला बंधाऱ्याचे पूर्ण झालेल्या कामाच्या देयकावर सही करण्यासाठी ५० हजारांची मागणी करून तडजोडअंती ४५ हजार रुपये स्वीकारताना जालना जिल्हा परिषदेच्या अंबड येथील उपविभागीय जलसंधारण अधिकारी मुजाहेद वलिमिया शेख (वय ३०, रा. वाळूज, छत्रपती संभाजीनगर) यांना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी सायंकाळी येथे पकडले. याप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेच्या वार्षिक योजनेंतर्गत सिमेंट नाला बंधारा कामासाठी तक्रारदाराने बांधकाम साहित्याचा पुरवठा केला होता. त्याचे देयक १४ लाख ६४ हजार २७३ रुपये झाले होते. हे देयके मंजूर करण्यासाठी मुजाहेद शेख यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यावर सही करण्यासाठी शेख यांनी ५० हजारांची मागणी केली. तडजोडीअंती ४५ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यासंदर्भातील तक्रार जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. या विभागाचे पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर व त्यांच्या पथकाने जालना येथील बस स्थानक मार्गावरील दीपाली पेट्रोल पंपासमोर सापळा रचला. तेथे मुजाहेद शेख तक्रारदाराकडून ४५ हजार रुपये घेताच पथकाने पकडले. यावेळी शेख यांची घेतलेल्या अंगझडतीत त्यांच्याकडे मोबाईल फोनसह रोख ७५ हजार रुपयेही आढळल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सांगण्यात आले.

15:08 (IST) 18 Mar 2025

भाजपचे ‘पूर्व’ला झुकते माप, पश्चिम विदर्भात खदखद; विधान परिषदेच्या संधीवरून नाराजीचा सूर

भाजपमध्ये नेत्यांना संधी देण्याच्या मुद्द्यावरून विदर्भामध्येच प्रादेशिक असमतोल निर्माण झाला. पद देतांना पूर्व विदर्भाला कायम झुकते माप देण्यात येत असल्याने पश्चिम विदर्भात भाजपांतर्गत असंतोषाची भावना आहे. सविस्तर वाचा…

14:47 (IST) 18 Mar 2025

‘एकच’ जिल्हाध्यक्ष नियुक्तीच्या सूचनेवरुन नांदेड काँग्रेसमध्ये वाद; दोन जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीची रचना कायम ठेवण्याची मागणी

नांदेड: जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी काँग्रेस पक्षाने एकच जिल्हाध्यक्ष नियुक्त करावा, अशी मागणी पक्षाच्या केंद्रीय नेत्यांकडे करण्यात आल्यानंतर त्यावरून नांदेड जिल्हा काँग्रेसमधील वाद समोर आला आहे. सध्याची दोन जिल्हाध्यक्षांची रचना कायम ठेवण्याची मागणी राहुल ब्रिगेडचे सक्रिय कार्यकर्ते संदीपकुमार देशमुख बारडकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडे केली आहे.

सविस्तर वाचा

14:45 (IST) 18 Mar 2025

कुऱ्हाडीने वार झालेले डीसीपी निकेतन कदम यांच्याशी मुख्यमंत्री फडणवीसांनी साधला संवाद

नागपूर येथील कालच्या घटनेत जखमी झालेले पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला आणि लवकर बरे होण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1901923385330073788

14:34 (IST) 18 Mar 2025

महिलांना शिलाई यंत्रे, घरघंटी वाटपात दलाली; आमदार किसन कथोरेंची विधानसभेत लक्ष्यवेधी, चौकशीची मागणी

बदलापूरः कुळगाव बदलापूर नगरपालिका, महिला व बालकल्याण विभाग आणि प्रधानमंत्री खजीन क्षेत्र योजनेअंतर्गत महिलांना शिलाई यंत्रे आणि घरघंटीचे वाटप करण्यात आले होते. मात्र या कामात आर्थिक देवाण घेवाण करत दलालांच्या मार्फत काही महिलांचे अर्ज बाद केल्याचा खळबळजनक आरोप मंगळवारी आमदार किसन कथोरे यांनी विधानसभेत केला. याप्रकरणी चौकशी करून कारवाई करणार का असा प्रश्न त्यांनी लक्ष्यवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला.

सविस्तर वाचा

14:23 (IST) 18 Mar 2025

विरार सुटकेसमधील कवटी प्रकरण: ‘त्या’ महिलेचे धड नाल्यातून केले हस्तगत

वसई- विरार मध्ये सुटकेस मध्ये आढळलेल्या महिलेच्या कवटी प्रकरणात त्या महिलेचे धड मांडवी पोलिसांनी मंगळवारी नाल्यातून हस्तगत केले. सुमारे ४ तासा नाल्यात शोधमोहिमेनंतर हे धढ मिळाले. ८ जानेवारी रोजी या महिलेच्या पतीने तिची हत्या करून धड आणि शीर वेगळे केले होते. १४ मार्च रोजी हा प्रकार समोर आला होता.

सविस्तर वाचा

14:04 (IST) 18 Mar 2025

उल्हासनगरमधील बस अपघातातील जखमीला एक कोटी ३९ लाखाची भरपाई

कल्याण - कल्याण-अहिल्यानगर रस्त्यावरील मुरबाड जवळील टोकावडे गाव हद्दीतील सावर्णे येथे सात वर्षापूर्वी एका खासगी बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे उल्हासनगर मधील एका नोकरदार प्रवाशाला आपला हात गमवावा लागला होता. या अपघातप्रकरणी बाधित प्रवाशाने मोटार अपघात गुन्हे न्यायधिकरणाकडे दावा दाखल केला होता.

सविस्तर वाचा

14:02 (IST) 18 Mar 2025

बांधकाम परवानगी, भू अभिन्यास प्रस्ताव ऑफलाइन; आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी नाशिक महापालिकेतर्फे तात्पुरती मुभा

ऑनलाइन प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळे प्रस्ताव सादर करणे वा मंजूर करण्यात अडचणी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर, महापालिकेने बांधकाम परवानगी, भोगवटा दाखला, भू अभिन्यास प्रस्ताव १६ ते २६ मार्च या कालावधीत ऑफलाइन दाखल करण्यास मान्यता दिली आहे. सविस्तर वाचा

13:45 (IST) 18 Mar 2025

औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांचा मालमत्ता कर वसुलीला मुख्यमंत्र्याची स्थगिती

लातूर- औद्योगिक वसाहतीच्या हद्दीतील उद्योजकांनी महापालिकेच्या मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी महापालिकेने नोटीसा बजावल्या मात्र वसुलीसाठी पालिकेच्या पथकाला थेट मुख्यमंत्र्याचा फोन आल्याने आलेले वसुली पथक परतले आता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या संबंधात बैठक घेऊन तोडगा निघाल्यानंतरच  वसुलीचा प्रश्न निकाली निघणार आहे.

सविस्तर वाचा

13:42 (IST) 18 Mar 2025

सोलापुरात ‘बर्ड फ्ल्यू’ प्रसार; पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी ,चिकन विक्रीवर निर्बंध

सोलापूर : सोलापुरात छत्रपती संभाजी तलाव आणि किल्ला बाग परिसरात कावळे, घारी, बदकांना बर्ड फ्ल्यूची बाधा झाल्याचे आढळून आल्यानंतर तेथे बर्ड फ्ल्यू प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी हाती घेतलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे सक्त आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रशासनाला दिले आहेत.

सविस्तर वाचा

13:27 (IST) 18 Mar 2025

कल्याण पूर्वेतील पानटपरीवरून लाखोचा प्रतिबंधित पानमसाला जप्त; टपरी चालकाला अटक

कल्याण - कल्याण पूर्वेतील सूचकनाका भागातील एका पानटपरीवरून कोळसेवाडी पोलिसांनी शनिवारी एक लाख १२ हजाराचा प्रतिबंधित पान मसाल्याचा साठा जप्त केला. या पानटपरी चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या विरुध्द अन्न व सुरक्षा मानक कायद्याने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा

13:23 (IST) 18 Mar 2025

कल्याणमध्ये बालकाला घराबाहेर काढुन महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

कल्याण - कल्याण पश्चिमेतील वालधुनी भागात अशोकनगरमध्ये शनिवारी दुपारी एका ३८ वर्षाच्या महिलेने आपल्या आठ वर्षाच्या बालकाला घराबाहेर काढले. घराचा दरवाजा आतून बंद करून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. महात्मा फुले पोलीस ठाण्यात याप्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

13:20 (IST) 18 Mar 2025

कल्याणमध्ये बालकाला घराबाहेर काढुन महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

कल्याण - कल्याण पश्चिमेतील वालधुनी भागात अशोकनगरमध्ये शनिवारी दुपारी एका ३८ वर्षाच्या महिलेने आपल्या आठ वर्षाच्या बालकाला घराबाहेर काढले. घराचा दरवाजा आतून बंद करून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. महात्मा फुले पोलीस ठाण्यात याप्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

13:14 (IST) 18 Mar 2025

चंद्रकांत पाटलांचा रोख कोणाकडे ?

भाजपचे जेष्ठ नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष निवडून आलेल्या काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील यांना भाजप प्रवेशाची खुली ऑफर जाहीरपणे दिली. पक्ष प्रवेशाचे हे खुले आवाहन खुद्द खासदार पाटील यांनी नाकारले असले तरी दादांचा रोख प्रत्यक्ष कुणाकडे आहे याचीच चर्चा सुरू झाली. सविस्तर वाचा…

13:03 (IST) 18 Mar 2025

औरंगजेबाचे समर्थन करणारे देशद्रोहीच; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात

डोंबिवली - छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या रयतेच्या राज्याला डंख लावण्याचा प्रयत्न करणारा. संभाजी महाराजांना अतिशय क्रूरतेने मारणारा औरंगजेब हा क्रूर होता. अशा औरंगजेबाचे कोणी गोडवे गात असतील, त्यांचे समर्थन करत असतील तर त्यांना आम्ही निलंबनाच्या माध्यमातून बाहेरचा रस्ता दाखवलाच. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला.

सविस्तर वाचा

13:02 (IST) 18 Mar 2025

कचरा संकलनास सुरूवात पण, अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग कायम;  कचरा समस्येमुळे पालिकेवर टिकेचा भडीमार

ठाणे येथील सी पी तलाव परिसरातील कचरा हस्तांतरण केंद्रावरील कचरा टाकण्यास स्थानिकांनी विरोध केल्यामुळे गेल्या चार दिवसापासून ठप्प झालेले घरोघरी कचरा संकलनाचे काम सुरू झाले असले तरी, ठाणे, घोडबंदर, नौपाडा भागातील गृहसंकुलांबाहेरील कचऱ्याने भरलेले डब्बे दिसून येत आहेत. याशिवाय, घंटागाडी सेवा ठप्प झाल्यामुळे रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रकार वाढले असून यामुळे शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत.

सविस्तर वाचा

12:41 (IST) 18 Mar 2025

सोलापूर: शिक्षण कायद्यातील विसंगतीविरुद्ध प्राथमिक शिक्षकांचे धरणे आंदोलन

सोलापूर : १५ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार मागील २०२४-२५ शैक्षणिक वर्षात शिक्षक संच मान्यता अंतिम करण्यात आली आहे. शिक्षण कायद्यातील विसंगत तरतुदींमुळे आगामी काळात शाळांमध्ये शिक्षकच राहणार नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

सविस्तर वाचा

12:41 (IST) 18 Mar 2025

मनपा शिक्षण विभागातील १५ केंद्रप्रमुखांची नियुक्ती रद्द ; विहित कार्यपद्धतीचा अवलंब न केल्याचा ठपका

उचलबांगडी झालेले महानगरपालिकेतील वादग्रस्त शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांच्या कार्यकाळात विहित कार्यपद्धतीचा अवलंब न करता १५ निकटवर्तीय मुख्याध्यापक, शिक्षकांना दिलेल्या केंद्रप्रमुखांच्या नियुक्ती रद्द करण्यात आल्या आहेत. सविस्तर वाचा…

Maharashtra News Live Today, 18 March 2025 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा

Story img Loader