Latest Marathi News Updates : औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरण तापलं आहे. ही कबर काढून टाकावी अशी अनेकांनी मागणी केली आहे. विश्व हिंदू परिषदेने यासाठी काल (१७ मार्च) मोठं आंदोलन पुकारलं. मात्र, या आंदोलनाला गालबोट लागलं असून दंगलसदृष्य स्थिती निर्माण झाली. परिणामी आजही नागपुरातील काही भागात तणावपूर्ण शांतता असून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संदर्भात राज्यसभेत खासदार रेणुका चौधरी यांनी स्थगन प्रस्ताव मांडला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आज विधानसभेत निवेदन सादर करणार आहेत. यावरून आज राज्यात घमासान होण्याची शक्यता आहे. यासह राज्यातील इतर घडामोडी वाचा.
Maharashtra News Live Today, 18 March 2025 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा
कल्याणमध्ये रुक्मिणीबाई रुग्णालयाजवळील ‘बीओटी’ प्रकल्पाच्या जागेत बेकायदा वाहनतळ
कल्याण पूर्वेत कल्याण जिल्हा न्यायालयासमोरील आणि पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाजवळील मोक्याच्या जागेवर वीस वर्षापूर्वी ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्वावर एका सुविधा प्रकल्पाची उभारणी पालिकेच्या नियंत्रणाखाली करण्यात येणार होती. सविस्तर वाचा…
औरंगजेबाची कबर पाडण्यासाठी हिंदूत्ववादी संघटनांची निदर्शने
सोलापूर : छत्रपती संभाजी नगरातील मोगल बादशहा औरंगजेबाची कबर पाडावी, या मागणीसाठी सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात एका शिष्टमंडळाने जाऊन प्रशासनाला निवेदनही सादर केले.
या आंदोलनात बोलताना विश्व हिंदू परिषदेचे विभाग सहमंत्री विजयकुमार पिसे यांनी सांगितले की, औरंगजेबाची कबर हटविण्याची मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने केली आहे. त्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. शासनाने औरंगजेबाची कबर न हटविल्यास कारसेवा करून ती कबर पाडून टाकली जाईल. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने एखादी गोष्ट मनावर घेतली म्हणजे ती पूर्ण करते. यापूर्वी ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत वादग्रस्त बाबरी मशिदीच्या ढाचा कारसेवा करून पाडून टाकला होता. त्याची पुनरावृत्ती औरंगजेबाची कबर पाडण्यात होईल, असा इशारा पिसे यांनी दिला. या आंदोलनात विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री संजयकुमार जमादार, बजरंग दलाचे सहसंयोजक नागेश बंडी, शीतल परदेशी, पुरूषोत्तम उडता आदींचा सहभाग होता.
विजेअभावी शेतकऱ्यांचेही व्यवस्थापन बिघडले,पाण्याचे चक्र बिघडले, रोपवाटिका शेतकरीही चिंतेत
बदलापूरः बदलापूर आणि परिसरात सुरू विजेच्या लपंडावाचा बदलापूर शहराच्या वेशीवर असलेल्या तसेच अंबरनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांना, शेतघरांना आणि रोपवाटिका शेतकऱ्यांनाही फटका बसतो आहे. प्रायोगिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे पिकांना पाणी देण्याचे चक्र बिघडते आहे. वाढत्या तापमानात पाण्याचा माराही अधिक करावा लागत असताना विजेअभावी हे पाणी देताना रोपवाटिका शेतकऱ्यांची तारांबळ उडते आहे.
Maharashtra News LIVE Updates :
एक इथून बाहेर गेलाय, तो आता बाहेरही दिसणार नाही, असं म्हणत एकनाथ शिंदे यांची अबू आझमींवर टीका
औरंग्या तुमचा कोण लागतो? औरंगजेब हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे.
४० पोलीस जखमी झाले, कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करण्याऐवजी तुम्ही पोलिसांवर अत्याचार करताय? तुमचे हर्षवर्धन सपकाळ मुख्यमंत्र्यांची तुलना औरंगजेबाशी करतात? औरंगजेब हा देशद्रोही होता. त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची अनन्वित छळ केला. मुख्यमंत्र्यांनी त्यांची जीभ छाटली की डोळे काढले? तुम्ही कोणाशी तुलना कोणाशी करताय? तुमचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे. अन्यथा त्यांनी केलेलं कृत्य औरंगजेबाचं समर्थन करत आहेत. म्हणजे तेही देशद्रोही आहेत. त्यांच्यावरही आम्ही देशद्रोहाचा खटला दाखल करावा का? – एकनाथ शिंदे
DCM Eknath Shinde : “नागपुरातील घटना पूर्वनियोजित कट?”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना संशय, म्हणाले, “या भागात रोज…”
नागपुरात घडलेल्या हिंसाचारामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. औरंगजेबाची कबर काढून टाकण्यासाठी झालेल्या आंदोलनाला वेगळं वळण लागलं अन् १७ मार्च रोजी रात्री नागपुरातील महाल परिसरात दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. या घटनेत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून पोलीस आणि इतर काही नागरिक जखमी झाले आहे. दरम्यान, ही घटना पूर्वनियोजित होती, असा संशय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ते आज विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलत होते.
धनगर समाजाबाबत शासनाकडून शिफारस यायला हवी; केंद्रीय आदिवासी कार्यमंत्री जुएल ओराम यांचे वक्तव्य
सांगली : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याबाबत राज्य शासनाकडून शिफारस व्हायला हवी. मात्र, राज्य शासनाकडून अशी कोणतीही शिफारस प्राप्त झाली नसल्याची माहिती केंद्रीय आदिवासी कार्यमंत्री जुएल ओराम यांनी सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना लेखी पत्राद्वारे दिली आहे.
बेकायदा बांधकामांना कर आकारणी नको; कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांचे आदेश
कल्याण – कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत बसुमार पद्धतीने वाढत असलेल्या बेकायदा बांधकामांना यापुढे कोणत्याही प्रकारची कर आकारणी केली जाऊ नये असा महत्वपुर्ण निर्णय महापालिका आयुक्त डाॅ. इंदुमती जाखड यांनी घेतला आहे. मालमत्ता कर विभाग आणि प्रभाग स्तरावरील सर्व साहाय्यक आयुक्तांना यासंबंधी आदेश नुकतेच देण्यात आले आहेत.
१४ गावांवरून राजकारण तापले; राजकारणापेक्षा ग्रामस्थांचे विकासाला प्राधान्य
नवी मुंबई, कल्याण : कल्याण तालुक्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिका हद्दीत समावेश नको या मागणीसाठी वनमंत्री गणेश नाईक एकीकडे आक्रमक झाले असताना या मुद्दयावरुन कल्याण लोकसभा मतदारसंघातील राजकारणाही तापू लागले आहे. नाईक यांनी या प्रश्नावर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नवी मुंबईकरांसाठी हा निर्णय हिताचा नाही अशी भूमीका घेतली.
पदपथ फेरिवाल्यांनी अडविले, शहरासह, घोडबंदर भागातील पथपथांवरही फेरिवाल्यांचा विळखा
ठाणे– रेल्वे स्थानक परिसरासह आता, शहरातील विविध भागातील पदपथांवर फेरीवाल्यांचा विळखा वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. खाद्यपदार्थांच्या गाड्या, विविध साहित्यासह ठाण मांडून बसलेल्या या फेरीवाल्यांमुळे पदपथ अडविला जात आहे. या फेरीवाल्यांमुळे नागरिकांना पदपथावरून चालणे शक्य होत नसून नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत.
Maharashtra Live Blog : विधानभवन परिसरात सुरक्षारक्षकांकडून पत्रकारांना धक्काबुक्की
विधानभवन परिसरात सुरक्षारक्षकांकडून पत्रकारांना धक्काबुक्की
महिला पत्रकारांनाही धमकावलं
विधानभवन परिसरात पत्रकारांनी पुकारलं आंदोलन
दख्खन जत्रेतून बचत गट महिलांच्या हक्काची बाजारपेठ; चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
सांगली : दख्खन जत्रेच्या माध्यमातून स्वयंसाहाय्यता बचत गटांतील महिलांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळाली असून, या माध्यमातून स्वयंसाहाय्यता बचत गटाच्या महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास प्रोत्साहन मिळणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
सविस्तर वाचा
Sanjay Raut : “सरकारने जाऊन कबर उद्ध्वस्त करावी”, संजय राऊतांचं आवाहन, RSS चा उल्लेख करत म्हणाले…
औरंगजेबाच्या कबरीवरून राज्याक घमासान सुरू असून यावरून नागपुरात दंगल उसळली होती. राज्यात भाजपाचं सरकार असतानाही दंगली होत असल्याने विरोधकांनी सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे. तसंच, आता संजय राऊत यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे.
टिटवाळा बनेली, वैष्णव देवी, बालाजी मंदिराजवळील बेकायदा ६१ बांधकामे उध्वस्त
कल्याण – टिटवाळा बनेली, वैष्णव देवी माता मंदिर, बालाजी मंदिर भागातील जुन्या पायवाटा, या भागातील गृहसंकुलांचे रस्ते बंद करून बांधण्यात आलेली ६१ बेकायदा बांधकामे पालिकेच्या अ प्रभागाच्या तोडकाम पथकाने जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केली. या कारवाईमुळे या भागातील गृहसंकुलांमधील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.
गांधी विचार विस्म़ृतीत गेलेल्या कॉग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी सर्वाेदय शिबीर
चंद्रपूर : पदाधिकाऱ्यांना सर्वाेदय विचारांचे धडे देण्यासाठी कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी २३ व २४ मार्च असे दोन दिवस निवासी सर्वोदय संकल्प शिबिराचे आयोजन राजुरा येथे केले आहे. या शिबिराच्या माध्यमातून गांधी विचार विस्म़ृतीत गेलेल्या कॉग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांना गांधी विचारांची उजळणी करून दिली जाणार आहे.
“मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी जाऊन…”; ठाकरे गटाची बोचरी टीका
मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी हातात कुदळ फावडे घेऊन जावं आणि लोकांच्या इच्छा पूर्ण कराव्यात. – संजय राऊत</p>
नागपूर हिंसाचाराचे संसदेत पडसाद, राज्यसभेत स्थगन प्रस्ताव
Budget session of Parliament | Congress MP Renuka Chowdhury gives Suspension Motion notice in Rajya Sabha to discuss Nagpur violence
— ANI (@ANI) March 18, 2025
Maharashtra News Live Today, 18 March 2025 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा