Maharashtra Political Crisis Updates, 17 November 2022 : मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. याच कारणामुळे काँग्रेसचे राज्यातील सर्व नेते ही यात्रा यशस्वी करण्यात व्यस्त आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्यानंतर राज्यात नवे राजकीय समीकरण उदयास येणार का? असा प्रश्न विचारला जातोय. शिंदे आणि उद्धव ठाकरे गटातील नेतेही एकमेकांवर कठोर टीका करताना दिसत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दुसरीकडे मूळच्या वसई येथील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या सर्व घडामोडींसह जगभरातील इतरही अन्य घडामोडींचा आढावा एका क्लिकवर!
Marathi News Today, 17 November 2022 : महाराष्ट्रासह देश आणि जगातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर
ज्ञानवापी मशिदीत आढळलेल्या कथित शिवलिंगाच्या पूजेची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्याचा निर्णय वाराणसी न्यायालयाने घेतला आहे. तसेच या याचिकेला आव्हान देणाऱ्या मुस्लीम पक्षाची याचिकादेखील न्यायालयाने फेटाळली आहे. या प्रकरणी आता पुढील सुनावणी २ डिसेंबर रोजी होईल. वाचा सविस्तर
काँग्रेसची भारत जोडो यात्रा थांबवण्यात यावी, अशी मागणी शिंदे गटातील नेते राहुल शेवाळे यांनी केली आहे. शेवाळे यांच्या याच मागणीवर काँग्रेसेचे खासदार राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना भारत जोडो यात्रा रोखायची असेल तर त्यांनी जरूर रोखावी. प्रत्येकाने आपापले मत मांडावे. सरकारला ही यात्रा रोखायची असेल, तर त्यांनी तो प्रयत्न करावा, असे राहुल गांधी म्हणाले. ते आज (१७ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत बोलत होते. वाचा सविस्तर
राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीकात्मक विधान केले आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत काही कादगपत्रे दाखवली आहेत. वाचा सविस्तर
खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. या यात्रेत तरुण-तरुणी तसेच ग्रामीण भागातील लोकांनीदेखील सहभाग नोंदवला. वाचा सविस्तर
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीकात्मक भाष्य केल्यामुळे राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. भाजपा, शिंदे गट आणि मनसेने राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. मनसेने तर राहुल गांधी यांच्याविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मनसेने राहुल गांधींविरोधात घोषणाबाजी केली आहे. मनसेचे कार्यकर्ते शेगावकडे रवाना झाले आहेत.
कौटुंबिक वादातून दाखल खावटीच्या खटल्यावेळी न्यायमंदिर आवारात पती-पत्नीमध्ये पुन्हा वाद झाल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये हाणामारी झाली. त्यात पती जखमी झाला. शहरातील शनिपेठ परिसरातील शिरीनबी यांचा विवाह फातेमानगर परिसरातील सय्यद अफसर सय्यद अख्तर यांच्याशी झाला आहे. बातमी वाचा सविस्तर…
पुणे : भारत जोडो यात्रे दरम्यान काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी स्वा.सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केल्याने भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना राज्यभरात आक्रमक झाली आहे. बातमी वाचा सविस्तर…
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेचे पडसाद आता राज्यभर उमटत आहेत. सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजपा-शिंदे गट आणि ठाकरे गटात टीका टीप्पणी सुरू असताना यावरून आता मनसेही आक्रमक झाल्याचे बघायला मिळते आहे. अशाच भारत जोडो यात्रा उद्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे पोहोचणार आहे. याठिकाणी राहुल गांधी यांची जाहीर सभाही आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे राहुल गांधींना प्रत्युत्तर देण्यासाठी आता राज्यभरातील मनसैनिकांना शेगाव पोहोचण्याची निर्देश राज ठाकरे यांनी दिले असल्याची माहिती पुढे आहे. यासंदर्भात मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सविस्तर वाचा –
अकोला (पातूर) : अकोला जिल्ह्यात राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सोलापूरहून कार्यकर्ते आयात करण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे. पश्चिम विदर्भात राहुल गांधी यांची पदयात्रा दाखल झाल्यानंतर त्याला प्रतिसाद मिळण्यासाठी थेट पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर येथून ६ हजार कार्यकर्ते पातूर येथे दाखल झाले आहेत. बातमी वाचा सविस्तर…
पुणे शहर पाेलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांना मोफत पीएमपी बस प्रवास बंद करण्यात आला आहे. पीएमपीएल प्रशासनाकडून याबाबतचे आदेश देण्यात आले आहे. या आदेशामुळे पोलिसांना पीएमपी बसमधून प्रवास करण्यासाठी तिकिट काढावे लागणार आहे.
पुण्यातील कोथरुड येथील आशिष गार्डन जवळील श्रावणधारा सोसायटीच्या आठव्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली आहे. सोसायटीमधील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ५ गाड्या आणि एक पाण्याचा टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. बातमी वाचा सविस्तर…
पुणे : राज्यातील अंशत: ढगाळ वातावरणाची स्थिती निवळली असल्याने विदर्भ आणि मराठवाड्यापाठोपाठ आता राज्याच्या सर्वच भागांत थंडीचा कडाका काही प्रमाणात वाढणार आहे. बातमी वाचा सविस्तर…
ठाणे : जगातील सर्वांत उंच आणि कठिणातील कठीण असलेला माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प (५३६४ मीटर) ठाण्यातील आठ वर्षीय गृहिता विचारे या छोट्या हिरकणीने यशस्वीरित्या सर केला आहे. गृहिता ही राज्यातील पहिली सर्वात लहानगी आहे, जिने हे बेस कॅम्प ट्रेक पूर्ण केले आहे. बातमी वाचा सविस्तर…
पुणे : पुण्यातील धानोरी भागात राहणार्या १७ वर्षीय तरुणीवर वडील आणि चुलत्याने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. तर आजोबांनी तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे धानोरी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बातमी वाचा सविस्तर…
खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये गर्दीत धक्का लागून काँग्रेस नेत्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर खाली पडल्या. यात ठाकूर किरकोळ जखमी झाल्या. मात्र, त्यांनी न थांबता पदयात्रेत चालणे सुरूच ठेवले. ही घटना गुरुवारी सकाळी घडली.
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन असून यानिमित्ताने पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदे गट-भाजपा आमने-सामने आहेत. स्मृतीदिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी एक मोठी मागणी केली असून हे स्मृतीस्थळ सरकारने ताब्यात घेतलं पाहिजे असा सल्ला दिला आहे. दरम्यान त्यांच्या या मागणीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.
ट्विटर, मेटानंतर आता अॅमेझॉननेही कर्मचाऱ्यांची कपात करण्यास सुरुवात केली आहे. नोकरीवरुन काढून टाकण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना मेलद्वारे याबाबतची पूर्वसुचना देण्यात आली आहे. दुसरी नोकरी शोधण्यासाठी कंपनीकडून या कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.
काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मंदिरांच्या आकाराचा केक कापल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. केक कापतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपाकडून कमलनाथ यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे. हा प्रकार हिंदूंचा अपमान असल्याचं भाजपानं म्हटलं आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींना जाऊन मिठी मारणाऱ्या आदित्य ठाकरेंचं शुद्धीकरण नक्की कसं करणार? असा सवाल ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी विचारला आहे. “शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना तिलांजली देऊन राहुल गांधी यांच्या मांडीला मांडी लावून बसल्याबद्दल युवराजांना या पापातून मुक्त करण्यासाठी गोमुत्राने अंघोळच घालावी लागेल”, असा टोला म्हात्रे यांनी लगावला आहे.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून सातत्याने भाजपावर टीका करण्यात येत आहे. या टीकेचा भाजपा नेते आशिष शेलार यांनी समाचार घेतला आहे. “तुम्ही तुमचं नाव सुषमा अंधारेंऐवजी सुषमा आगलावे करा” असा खोचक सल्ला शेलार यांनी अंधारेंना दिला आहे.
मुंबई : मालेगाव येथे २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोटाशी संबंधित खटल्यात दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) माजी अधिकाऱ्याला समन्स बजावल्यानंतरही तो साक्षीसाठी बुधवारी उपस्थित झाला नाही. त्यामुळे विशेष न्यायालयाने त्याच्या नावे जामीनपात्र वॉरंट बजावले. बातमी वाचा सविस्तर…
पुणे : पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून नऱ्हे, आंबेगाव येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’च्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर येणार आहेत. येत्या रविवारी सकाळी साडेअकरा वाजता हा कार्यक्रम होईल. शिवसृष्टीची संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी बाबासाहेब पुरंदरे यांनी स्थापन केलेल्या महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान संस्थेचे विश्वस्त जगदीश कदम यांनी ही माहिती दिली. बातमी वाचा सविस्तर…
सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येत असलेले फलक, बॅनर्स व पोस्टर्समुळे शहर सौंदर्यीकरणाला बाधा निर्माण होत असल्याने अशा तात्पुरत्या स्वरूपातील जाहिराती लावण्यासाठी महापालिकांना जागा निश्चित करून द्यावी लागणार आहे. बातमी वाचा सविस्तर…
नागपूर : महाठग अजित पारसेने अनेकांचा ‘हनिट्रॅप’ करून फसवणूक केल्यानंतर अनेकांकडून कोट्यवधींमध्ये खंडणीची रक्कम उकळली. ती रक्कम अद्यापपर्यंत पोलिसांच्या तपासात समोर आली नाही. त्यामुळे अजित पारसेच्या संपर्कात असलेल्या अनेक महिला, तरुणींच्या बँक खात्यात ती रक्कम असण्याची शक्यता आहे. बातमी वाचा सविस्तर…
नागपूर: नागपुरातील वेस्ट हायकोर्ट मार्गावरील प्रसिद्ध व अर्धशतकाहून अधिक काळ नागपूरची महत्त्वाची खूण ठरलेले सुदामा चित्रपटगृह (सुदामा टॉकीज) लवकरच नवीन बहुमजली व्यापारी संकुलात रूपांतरित होणार आहे. १९७१ मध्ये राजेश खन्ना यांच्या आनंद या चित्रपटाच्या प्रदर्शनाने या चित्रपट गृह प्रथम उघडले. पूर्वी हे चित्रपटगृह सरोज टॉकीज म्हणून ओळखले जात होते. बातमी वाचा सविस्तर…
दृष्टिदोषामुळे काम करण्यास अक्षम असल्याने डॉ. धनराज माने यांची उच्च शिक्षण संचालक पदावरून अधिसंख्य पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. माने यांच्याकडे आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीची जबाबदारी सोपवण्यात आली असून, डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्याकडे उच्च शिक्षण संचालक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बातमी वाचा सविस्तर…
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील आपल्याच सहकारी प्राध्यापकांची फसवणूक करून खंडणी वसूल करण्यासाठी डॉ. धर्मेश धवनकर यांनी सावकाराकडून व्याजाने पैसे काढून देण्याचे आमिष दाखवल्याची नवीन माहिती समोर आली आहे. बातमी वाचा सविस्तर…
मुंबई : कौटुंबिक समस्या दूर करण्यासाठी पतीला वश करण्याच्या नावाखाली विवाहित महिलेची सुमारे ५९ लाख रुपयांची फसवणूक करणार्याला तिघांपैकी एकाला पवई पोलिसांनी अटक केली. प्रसाद दर्जी गाला ऊर्फ परेश गडा असे अटक आरोपीचे नाव असून या गुन्ह्यात तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. बातमी वाचा सविस्तर…