Mumbai Latest News Live Update : लोकसत्ता ऑनलाइन’वर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई-पुण्यातल्याच नव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम ‘लोकसत्ता ऑनलाइन’ करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेडिंग, क्रीडा, राशिभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन ‘लोकसत्ता ऑनलाइन’वर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडीओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरूपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेअर बाजार यासंबंधीच्या बातम्या ‘अर्थसत्ता’ सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहनविषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टेक्नॉलॉजीविषयीच्या बातम्या टेक् सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून ते थेट हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर ‘चतुरा’ हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलीवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरूपात माहिती सादर केली जाते. राशिभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्यूमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादींची माहिती देण्यात येते.

Live Updates

Marathi News Live Update : महाराष्ट्रासह देश, विदेशातील घडामोडी एका क्लिकवर जाणून घ्या…

18:42 (IST) 3 Apr 2023
“उद्धव ठाकरेंनी १०० जन्म घेतले तरी बाळासाहेब ठाकरे होऊ शकत नाही”, भाजपा नेत्याचं विधान

“आम्ही विश्वासघाताचा बदला घेतला आहे. भाजपा एकाद्यावेळी एकपाऊल मागे येईल. पण, विश्वासघात सहन करू शकणार नाही. १०० जन्म उद्धव ठाकरेंनी घेतले, तरी ते बाळासाहेब ठाकरे होऊ शकत नाही,” असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.

17:12 (IST) 3 Apr 2023
“संजय शिरसाटांना गल्लीतले काळं कुत्रेही…”, सुषमा अंधारेंची घणाघाती टीका

शिवसेना ( शिंदे गट ) आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. मात्र, कोठेही संजय शिरसाट यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून घेण्यात आला नाही. त्यामुळे सुषमा अंधारेंनी न्यायालयात धाव घेतली आहे. अंधारेंनी पुणे न्यायालयात शिरसाटांविरुद्ध ३ रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. यानंतर ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना अंधारेंनी शिरसाटांवर टीका केली आहे.

वाचा सविस्तर…

16:53 (IST) 3 Apr 2023
नवी मुंबई : महापालिकेच्या वाशी सार्वजनिक रुग्णालयात अद्ययावत डायलेसीस सुविधा

नवी मुंबई : कोविड प्रभावित कालावधीनंतर डायलेसीस करणे आवश्यक असणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या दृष्टीने सर्वसामान्य नागरिकांना डायलेसीस सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने सकारात्मक पाऊले उचलले असून महानगरपालिकेच्या वाशी रुग्णालयासोबतच ऐरोली व नेरुळ रुग्णालयात बाह्य यंत्रणेव्दारे डायलेसीस सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

सविस्तर वाचा..

16:48 (IST) 3 Apr 2023
“बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय पुरूष, कुटुंबापुरते…”, शंभूराज देसाईंची उद्धव ठाकरेंवर टीका

“छत्रपती संभाजीनगर येथील सभेत भाजपा आणि शिवसेना ( शिंदे गट ) यांच्यावर टीका, टोमणे याशिवाय काही नव्हतं. राज्याच्या हिताचं काय होते? त्यांच्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीत काय केलं, याची माहिती दिली का? शिवसेना आणि भाजपाच्या द्वेषाने पछाडलेली सभा, याच्या व्यतिरिक्त काही बोललं नाही. बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरेंचं वडिल जरूर असतील. पण, ते राष्ट्रीय पुरूष आहेत. एका ठाकरे परिवारापुरते ते मर्यादित नाहीत. संपूर्ण हिंदुस्तानातील हिंदूंचे बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यांना कुटुंबापुरते मर्यादित ठेऊ नका,” असं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.

16:10 (IST) 3 Apr 2023
रायगड : मंत्री उदय सामंत यांच्या बोटीला मांडवा येथे अपघात

अलिबाग – उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या स्पीड बोटीला मांडवा येथे अपघात झाला. चालकाचे बोटीवरील नियंत्रण सुटल्याने स्पीड बोट जेटीच्या खांबाना जाऊन धडकली. बोटीचा वेग कमी असल्याने यावेळी सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही.

सविस्तर वाचा..

15:42 (IST) 3 Apr 2023
अधिकाऱ्यांच्या आंदोलनामुळे महसूल विभागाचे ‘काम बंद’; अधिकारी बाहेर, कर्मचारी कार्यालयात

दररोज हजारो नागरिकांची कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांनी शासनाविरुद्ध  एल्गार पुकारला असून  यामुळे महसूल विभागाचे कामकाज प्रभावित झाले. आज, ३ एप्रिलपासून सुरू झालेल्या बेमुदत ‘काम बंद’ आंदोलनात जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी, तहसीलदार व नायब तहसीलदार सहभागी झाले आहेत. सविस्तर वाचा…

15:41 (IST) 3 Apr 2023
पुण्यात ओला कॅबचालकाचे प्रवासी महिलेशी अश्लील चाळे; कॅबचालकाविरुद्ध गुन्हा

पुणे : ओला कॅब चालकाने प्रवासी महिलेची छेड काढून अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी कॅब चालकाविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा..

15:41 (IST) 3 Apr 2023
‘गांधी’विरोधी सावरकर गौरव यात्रेचा प्रारंभ आणि समारोप ‘गांधी’ चौकातच; यात्रेसाठी ‘गांधीं’चाच आधार घेत असल्याच्या चर्चा

दररोज हजारो नागरिकांची कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांनी शासनाविरुद्ध  एल्गार पुकारला असून  यामुळे महसूल विभागाचे कामकाज प्रभावित झाले. आज, ३ एप्रिलपासून सुरू झालेल्या बेमुदत ‘काम बंद’ आंदोलनात जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी, तहसीलदार व नायब तहसीलदार सहभागी झाले आहेत. सविस्तर वाचा…

15:41 (IST) 3 Apr 2023
पुणेकरांची सर्वाधिक पसंती दुचाकींना!

पुणे : पुणे हे आता दुचाकींचे शहर बनले आहे. शहरातील एकूण वाहनांमध्ये दुचाकींचे प्रमाण ७५ टक्क्यांहून अधिक आहे. मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षातही पुणेकरांचा कल दुचाकी खरेदीकडे राहिल्याचे समोर आले आहे. मागील आर्थिक वर्षात दुचाकी विक्री १ लाख ८५ हजार ६६६ आहे. त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत त्यात सुमारे ८५ हजारांनी वाढ झाली आहे.

सविस्तर वाचा..

15:10 (IST) 3 Apr 2023
दहिसर आणि मालाड येथील पालिकेचे जलतरण तलाव नागरिकांसाठी खुले, उदघाटन न करता लोकार्पण

पश्चिम उपनगरातीलनागरिकांसाठी दोन तरण तलाव खुले झाले आहेत. दहिसर आणि मालाड येथील या तलावांचे उदघाटनाशिवाय लोकार्पण करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी या दोन्ही तलावात पोहायला सुरुवात केली आहे. मुंबईत पालिकेचे सध्या एकूण सहा तरण तलाव आहेत. आणखी सात ठिकाणी जलतरण तलाव बांधण्याचे काम सुरू आहे.

सविस्तर वाचा…

14:59 (IST) 3 Apr 2023
“आमदार संजय शिरसाट यांच्या विरोधात तीन रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार”; ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

पुणे : “शिंदे गटाचे आमदार शिरसाठ यांच्याकडून महिलांविरोधात सतत बेताल वक्तव्य होत आहे. त्याविरोधात राज्यातील कोणत्याही पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होत नाही. त्यामुळे न्यायालयाच्या माध्यमातून गुन्हा दाखल केला जावा आणि शिरसाठ यांच्या विरोधात तीन रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा न्यायालयामध्ये दाखल करणार,” अशी भूमिका ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मांडली.

सविस्तर वाचा..

14:57 (IST) 3 Apr 2023
“रिक्षावाल्याच्या हाताखाली…”, शरद पवारांचा उल्लेख करत सावंतांनी केलेल्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

शिवसेना (ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत यांनी केलेल्या एका विधानामुळे चर्चांना उधाण आले आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापने वेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करायचे का? असा प्रश्न विचारल्याचा गौप्यस्फोट अरविंद सावंतांनी केला आहे. तसेच, मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवारांनीच उद्धव ठाकरेंना गळ घातली होती, असे अरविंद सावंत यांनी सांगितले. अरविंद सावंत यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

वाचा सविस्तर…

14:56 (IST) 3 Apr 2023
धीरेंद्र शास्त्रींनी साईबाबांबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून अजित पवारांनी ठणकावलं; म्हणाले, “या बाबा लोकांचे…”

गेल्या काही दिवसांपासून बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री आपल्या विधानांमुळे चर्चेत असतात. अलीकडेच संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. अशातच धीरेंद्र शास्त्रींनी शिर्डीचे साईबाबा यांना देव मानण्यास नकार दिला. धीरेंद्र शास्त्रींच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.

वाचा सविस्तर…

14:16 (IST) 3 Apr 2023
सांगली : महापालिका आयुक्तांवर बूट फेकण्याचा प्रकार; पालिका कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

सांगली : लोकशाही दिनानिमित्ताने तक्रार देण्यासाठी आलेल्या व्यक्तीने सांगली महापालिकेच्या आयुक्तांच्या दिशेने बूट फेकून मारण्याचा प्रकार सोमवारी घडला. या प्रकारामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले असून, मुख्यालयासमोर ठिय्या मारला आहे.

सविस्तर वाचा..

13:49 (IST) 3 Apr 2023
मुंबई : १५ हजार गृहप्रकल्पांवरील महारेराच्या नोटिशीकडे विकासकांचा कानाडोळा!

रेरा कायद्यातील तरतुदीनुसार सर्व तपशील पुरविण्यात अपयशी ठरलेल्या १९ हजार गृहप्रकल्पांपैकी १५ हजार प्रकल्पांतील विकासकांनी महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाच्या (महारेरा) नोटिशीला उत्तर देण्याचे साधे सौजन्यही दाखविलेले नाही. त्यामुळे या प्रकल्पांवर पुन्हा नोटिसा बजावण्यात येणार आहेत. सविस्तर वाचा…

13:46 (IST) 3 Apr 2023
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा अन् वादाला तोंड; कोण बाजी मारणार, आ. पंकज भोयर की समीर कुणावार?

शासनाने अकरा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांची घोषणा केली अन् जिल्ह्यात वादालाच जणू तोंड फुटले. शासनाने घोषणा करतानाच महाविद्यालयाची जागाही निश्चित करून टाकली. वर्धेलगत सातोडा येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारले जाणार आहे.

सविस्तर वाचा…

13:44 (IST) 3 Apr 2023
राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेस नेत्यांची ‘सुरतेवर स्वारी’!, पण सीमेवर रोखले; यशोमती ठाकूर म्हणतात, “त्यावेळी अशीच…”

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्‍या समर्थनार्थ सुरत येथे जात असलेल्‍या काँग्रेसच्या नेत्‍यांची आणि कार्यकर्त्‍यांची पोलिसांकडून अडवणूक होत असल्‍याचा आरोप आमदार यशोमती ठाकूर यांनी केला आहे. वलसाड येथील नाक्‍यावर आपले वाहन अडवण्‍यात आले आणि चौकशी करण्‍यात आली. सविस्तर वाचा…

13:32 (IST) 3 Apr 2023
कुनोतील चित्त्याची गावाकडे कूच, शेतात मुक्काम हलवला; मानव-चित्ता संघर्षाची नांदी !

नागपूर : चित्त्यांच्या व्यवस्थापनातील हयगय एका नव्या संघर्षाची नांदी ठरू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती आणि ती आता खरी ठरू पहात आहे. कुनोतील ‘ओबान’ या चित्त्याने उद्यानाबाहेर गावाचा रस्ता धरल्याने मानव-चित्ता संघर्षाची नांदी तर नाही ना, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

सविस्तर वाचा…

13:23 (IST) 3 Apr 2023
‘माळढोक’ने पार केला मैलाचा दगड; जैसलमेरच्या कृत्रिम प्रजनन केंद्रात दोन पिल्लांचा जन्म

नागपूर : नामशेष होण्याच्या मार्गावरील माळढोकने त्याच्या राज्यात म्हणजेच राजस्थानमधील जैसलमेरच्या कृत्रिम प्रजनन केंद्रात पहिल्यांदाच पिलांना जन्म दिला आहे. भारतात हे पक्षी १५० च्या संख्येत असून त्यांना वाचवण्यासाठी कृत्रिम प्रजनन केंद्राची मदत घेतली जात आहे.

सविस्तर वाचा..

13:23 (IST) 3 Apr 2023
गोंदिया : नक्षलवाद्यांसाठी स्फोटके नेत असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या, टिपागड दलमच्या नक्षल सदस्याला अटक

गोंदिया : नक्षलवाद्यांसाठी स्फोटके घेऊन जात असलेल्या टिपागड दलमच्या नक्षल सदस्यास पोलिसांनी नागनडोह जंगल परिसरात अटक केली. त्याच्याजवळून एक डेटोनेटर आणि एक जिलेटीनची कांडी जप्त करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा..

13:01 (IST) 3 Apr 2023
२०१४ ला नरेंद्र मोदींची पदवी पाहून निवडून दिलं का? अजित पवारांचं विधान

“२०१४ साली नरेंद्र मोदी यांची पदवी पाहून लोकांनी निवडून दिलं होतं का? त्यांनी २०१४ साली स्वत:चा करिश्मा निर्माण केला होता. जो भाजपाचा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत नव्हता. त्याचं सर्वस्व श्रेय नरेंद्र मोदींना दिलं पाहिजे. लोकशाहीत बहुमताचा आदराला महत्व आहे. देशात ५४३ खासदार ज्यांच्याकडे आहेत, तो पंतप्रधान होतो. तर, राज्यात १४५ चं बहुमत असेल तर तो मुख्यमंत्री होतो,” असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितलं आहे.

12:57 (IST) 3 Apr 2023
घाटकोपर येथून बांग्लादेशी नागरिकाला अटक; भारतात बेकायदेशीर वास्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

मुंबईः घाटकोपर येथून एका संशयित बांग्लादेशी नागरिकाला पोलिसांनी अटक केली. तो गेल्या सात वर्षांपासून नवी मुंबईतील घणसोली येथे बेकायदेशिररित्या राहत होता. त्यासाठी त्याला एका व्यक्तीने मदत केल्याचे चौकशीतून समोर आले.

सविस्तर वाचा…

12:23 (IST) 3 Apr 2023
उद्धव ठाकरेंनी मराठवाड्याबरोबर बेईमानी केली, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

“संभाजीनगरमध्ये येण्याचा उद्धव ठाकरेंना काय अधिकार आहे? सत्तेत आल्यावर उद्धव ठाकरेंनी मराठवाड्याबरोबर बेईमानी करत, वॉटर ग्रीड योजना रद्द केली. संभाजीनगरचा निर्णय केंद्र सरकारला घ्यायचा होता. केंद्रा सरकारमध्ये उद्धव ठाकरे आहेत का? एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यानंतर संभाजीनगर नावास मंजूरी मिळाली. हे सांगतात आमच्यामुळे संभाजीनगर झालं,” अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

12:19 (IST) 3 Apr 2023
खळबळजनक! इमारतीच्या आठव्या मजल्यावरून पडलेली सळई तरुणाच्या शरीरातून गेली आरपार, बदलापूर येथील घटना

बदलापूरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इमारतीचे बांधकाम सुरू असताना, वरून पडलेली सळई तरुणाच्या शरीराच्या आरपार गेली होती. या घटनेनंतर कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती. घटना घडल्यावर तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर तरुणावर शस्त्रक्रिया पार पडली असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.

वाचा सविस्तर…

12:11 (IST) 3 Apr 2023
महाबळेश्वरमध्ये ऐन उन्हाळ्यात पारा घसरल्याने दाट धुके आणि थंडी

वाई : ऐन उन्हाळ्यात महाबळेश्वरमध्ये हवामानात मोठा बदल झाला आहे. महाबळेश्वरच्या वेण्णालेक परिसरात पारा घसरल्याने येथे दाट धुके आणि थंडी पसरली आहे. वेण्णालेक जेट्टीसह वेण्णालेक परिसरात मोठ्या प्रमाणात दवबिंदू पडल्याचे पाहावयास मिळाले. वेण्णालेक परिसराचे तापमान सहा अंशावर, तर महाबळेश्वर नऊ अंशावर असल्याचे स्थानिकांनी सांगितले. अचानक घसरलेल्या तापमानामुळे पर्याटकांसह स्थानिकही गारठल्याचे दिसून आले.

सविस्तर वाचा..

11:54 (IST) 3 Apr 2023
सौर उर्जा वापरात कल्याण-डोंबिवली पालिका देशात अव्वल, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांची माहिती

कल्याण – अपारंपारिक उर्जा स्रोतांचा प्रभावी वापर करा. या केंद्र शासनाच्या धोरणानुसार कल्याण डोंबिवली पालिकेने पालिका हद्दीत मागील १३ वर्षांत नवीन इमारतींवर एक हजार ८१९ सौर उर्जेची सयंत्रे बसवून दररोज एक कोटी सात लाख ९७ हजार ८५ लीटर गरम पाणी पालिका हद्दीत तयार होत आहे. ६१ इमारतींवर सौर उर्जा सयंत्रे बसवून एक हजार किलो वॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत, अशी माहिती कल्याण डोंबिवली पालिका विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.

सविस्तर वाचा..

11:41 (IST) 3 Apr 2023
मुनगंटीवार म्हणतात,“गुजरातमधील अहमदाबादचे नाव सावरकर नगर करायचे असेल तर पंतप्रधानांना…”

स्वातंत्र्यवीर सावरकर अनेकांचे प्रेरणास्थान होते. मात्र, ज्यांनी भारतीय विद्यापीठात शिक्षणच घेतले नाही, त्यांना सावरकर यांचा इतिहास काय कळणार, अशी टीका वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता केली. सविस्तर वाचा…

11:40 (IST) 3 Apr 2023
नागपूर : मोकळ्या भूखंडांवर भूमाफियांचा डोळा! महापालिकेचे फलक नसल्याने अनेक अडचणी

महापालिकेच्या अंतर्गत असलेल्या अनेक मोकळ्या भूखंडांबाबत गेली अनेक वर्षे चर्चा होत आहे. भूखंड शोधून त्यावर महापालिकेचे नाव लावण्यासाठी अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, शहरातील ४०० पेक्षा अधिक मोकळे भूखंड कोणाच्या मालकीचे आहे, याबाबत महापालिकेत नोंद नाही. सविस्तर वाचा…

11:39 (IST) 3 Apr 2023
मागासवर्गीयांचा ३० हजार कोटींचा निधी अखर्चित; अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या विकासाला खीळ

राज्यातील सामाजिक न्याय विभागाने मागील १० वर्षात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती घटक योजनेतील ३० हजार कोटी निधी खर्च केलेला नाही. त्यामुळे या समाजाच्या विकासाला खीळ बसली असून समाजात असंतोष निर्माण झाला आहे. सविस्तर वाचा…

11:38 (IST) 3 Apr 2023
लय भारी! सोळा शासकीय सेवा मिळणार आपल्याच घरी… , राज्यातील पहिलाच ‘सेवादुत’ उपक्रम वर्ध्यात

विविध प्रकारच्या सोळा शासकीय सेवा घरपोच देणारा ‘सेवादुत’ हा नाविण्यपूर्ण उपक्रम प्रशासनाने सुरू केला असून राज्यात असा हा पहिलाच उपक्रम असल्याचा दावा केला आहे. प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाचा सेवादुत कर्मचारी पूर्व सुचनेवर लाभार्थ्यांच्या घरी जात सेवा देईल. सविस्तर वाचा…

देशातील पदवीधार तरुणांना नोकरी मिळत नाही. दुसरीकडे पंतप्रधानांची पदवी दाखवा म्हटलं, तर २५ हजारांचा दंड ठोठावला जातो. अशी कोणत्या महाविद्यालयाची पदवी पंतप्रधानांकडे आहे?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.