Mumbai News Today : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरमध्ये तणाव निर्माण झाला आहे, तर देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. या घटनेवर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. तसेच महाराष्ट्रासह देशभरातील पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवण्यात आलं आहे. यासंबंधीच्या घडामोडींचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत. तसेच निवडणुकीआधी लाडक्या बहिणींना दर महिन्याला २,१०० रुपये देण्याची घोषणा करणारी महायुती आता आपल्याच घोषणेवरून मागे हटल्याचं दिसत आहे. लाडक्या बहिणींना २,१०० रुपये देऊ असं कोणीही म्हटलेलं नाही, असं मंत्री नरहरी झिरवळ यांनी म्हटलं आहे. यावरून आता विरोधक महायुती सरकारवर टीका करत आहेत. शिवसेनेने (ठाकरे) यावरून महायुतीला ‘महालबाड युती’ म्हटलं आहे. यावर इतर विरोधी पक्षांच्या टिप्पण्या देखील येतील. याविषयीच्या बातम्यांवरही आपलं लक्ष असेल.
Mumbai-Pune News Live Today 28 April 2025 : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एकाच क्लिकवर.
कार्यकर्त्यांची ‘ठेकेदारी’ आणि अधिकाऱ्यांची ‘टक्केवारी’, उपमुख्यमंत्री पवारांचा परभणी दौरा राहिला चर्चेत
फा अडवून त्यावर चुन्याच्या डब्या फेकल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा परभणी दौरा चर्चेत आला असला तरी याच दौऱ्यात अधिकाऱ्यांची टक्केवारी आणि कार्यकर्त्यांची ठेकेदारी या बाबींचीही चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. जिल्हाधिकारीच ‘पीए’ मार्फत टक्केवारी घेतात असा खासदार संजय जाधव यांनी आढावा बैठकीत केलेला थेट आरोप आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना कार्यकर्त्यांनी ठेकेदारी करू नये असा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला कानमंत्र यामुळे हा दौरा चर्चेत राहिला आहे.
"पाकिस्तानचं पाणी बंद करायला २० वर्षे लागतील", वडेट्टीवारांचा मोदी सरकारला टोला
उन्हाळी सुट्ट्यांमुळे प्रवाशांसाठी जादा बससेवा; संभाजीनगर, धुळे, नंदुरबारसाठी दर अर्ध्या तासाने बस
"दहशतवाद्यांकडे लोकांचा धर्म विचारायला…", विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य; म्हणाले, "सरकार लोकांना भरकटवतंय"
"हा मूर्खपणा आहे", दहशतवाद्यांबाबत वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर फडणवीसांचा संताप; म्हणाले, "मृतांचे नातेवाईक माफ करणार नाहीत"
अजित पवार गटाच्या मंगल कलश यात्रेचे मंगळवारी नाशिक जिल्ह्यात आगमन
जळगावमध्ये केळी भावात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
जळगावमध्ये ग्राहकांना दिलासा… सोने दरात ६१८ रुपयांची घट
ईडीच्या कार्यालयाला आग, महत्त्वाच्या कागदपत्रांबाबत फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य; म्हणाले, "त्या आगीने…"
मुंबईतील सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयाला आग लागल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेवरून विरोधक संशय व्यक्त करत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे की ईडीच्या कार्यालयाला आग लागली असली तरी तिथली कागदपत्रे सुरक्षित आहेत. फडणवीस म्हणाले, "मी मुंबईतील ईडीच्या अधिकाऱ्यांशी बोललो त्यांनी मला सांगितलं आहे की कार्यालयातील प्रत्येक कागद सुरक्षित आहे. त्या कागदपत्रांचे मिरर इमेजिंग स्टोरेज देखील आहे. या आगीमुळे कार्यालयातील कुठल्याही कागदाला धक्का लागलेला नाही."
Mumbai BEST Fare Hike : "बेस्ट दुप्पट दरवाढीला आमचा विरोध", ठाकरेंच्या शिवसेनेची थेट भूमिका; आदित्य ठाकरे म्हणाले, "मुंबईकरांंना..."
"दहशतवादी हल्ला करतेवेळी लोकांशी बोलत बसतात का? वडेट्टीवारांचा प्रश्न
"दहशतवादी हल्ला करतेवेळी लोकांशी बोलत बसतात का? धर्म विचारत बसतात का?" असे प्रश्न काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केले आहेत. तसेच ते म्हणाले की "काही पर्यटक सांगत आहेत की दहशतवाद्यांनी गोळ्या झाडण्यापूर्वी लोकांना धर्म विचारला तर काहीजण सांगतायत की असं काही घडलंच नाही."
झिरवळांच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाचा टोला
विधानसभा निवडणुकीआधी प्रचारादरम्यान महायुतीने लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम वाढवण्याची घोषणा केली होती. सत्तेत आल्यावर लाडक्या बहिणींना दर महिन्याला २१०० रुपये देऊ असं आश्वासन महायुतीतील नेत्यांनी दिलंहोतं. त्यांच्या जाहीरनाम्यातही हे आश्वासन होतं. मात्र महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याच्या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना २,१०० रुपये कधी मिळणार? याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं आहे. असं असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा मंत्री नरहरी नरहरी झिरवळ यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. लाडक्या बहिणींना २,१०० रुपये देऊ असं कोणीही म्हटलेलं नाही, असं झिरवळ यांनी म्हटलं आहे. तसेच लाडक्या बहिणी १,५०० रुपयांमध्ये खूश असल्याचंही झिरवाळांनी म्हटलंय. यावरून शिवसेनेने (ठाकरे महायुतीवर टीका केली आहे. त्यांनी नरहरी झिरवाळ यांचा आणि २,१०० रुपयांची घोषणा करतानाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ शेअर करत महायुतीला चिमटा काढला आहे. तसेच ही महायुती नसून महालबाड युती असल्याचं ठाकरे गटाने म्हटलं आहे.