Mumbai News Hightlights : काश्मीरच्या पहलगामधील दहशतवादी हल्ल्याबाबत देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्रातील सहा पर्यटक या हल्ल्यात ठार झाले आहेत, तर पाच जण जखमी झाले आहेत. यासह महाराष्ट्रातील शेकडो पर्यटक काश्मीरमध्ये अडकले आहेत. त्यापैकी काही पर्यटकांना राज्य सरकारने विशेष विमानाने मुंबईत आणलं आहे, तर काही पर्यटक आज मुंबईत दाखल होतील. या सर्व घडामोडींचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेऊ. दुसऱ्या बाजूला, शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी दहशतवादाचा बिमोड करण्याच्या चर्चेवर विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे. तर, दहशतवाद्यांना धडा शिकवल्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वस्थ बसणार नाहीत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यासह इतर महत्त्वाच्या राजकीय व सामाजिक घडामोडींवर आपलं लक्ष असेल.
Mumbai-Pune News Live Today 25 April 2025 : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्या.
अंधेरीचा गोखले पूल लवकरच सुरू होणार, मेच्या पहिल्या आठवड्यात पूल पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता
महाबोधी महाविहार मुक्तीसाठी चंद्रपुरात भव्य शांतीमार्च
तडीपार गुन्हेगाराची पोलिसांवर तलवारीने हल्ला करण्याची धमकी, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Maharashtra News LIVE Updates : “शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असतील तर..”, धर्मरावबाबा आत्राम यांचे मोठे विधान
‘अंबादेवी शैलाश्रय’ भारतातील अश्मयुगीन काळातील सर्वात प्राचीन ज्ञात भित्तीचित्रे!
जलकरार स्थगित करुन काहीच होणार नाही, आमदार संजय गायकवाड म्हणतात, ‘गृहविभाग भ्रष्ट व अकार्यक्षम…’
पहलगाम दहशतवादी हल्ला: सरकारने घेतलेल्या निर्णयांना सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला - शरद पवार
दहशतवादी हल्ल्यामुळे टूर आयोजक चिंतेतअनेक पर्यटकांकडून माघार
परिमंडळ १ बनले स्मार्ट; पोलीस ठाण्याचे नूतनीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
दहा हजार जवानांनी घेरलेल्या टेकडीवर लपून बसलेला नक्षल कमांडर हिडमा कोण आहे?
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पालघर सागरी सुरक्षेत वाढ
"आपले सैनिक बदला घेतील हे प्रत्येक भारतीयांच्या.."- अजित पवार
पूर्ण कर भरा आणि विमानात उडा, स्मार्ट ग्रामपंचायतीच्या स्मार्ट प्रस्तावामुळे….
Pahalgam Terror Attack: पहलगाम अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ अमरावतीत कडकडीत बंद…
नांदेड : नोकरीचे प्रलोभन दाखवत फसवणूक; दोघांवर गुन्हा, किनवट परिसरात तरुणांना १ कोटींचा गंडा
‘भाऊराव चव्हाण’च्या अध्यक्षपदी नरेन्द्र चव्हाण यांची निवड
संत्री उत्पादक क्षेत्राचा नदीजोड प्रकल्पात समावेश का नाही? अनिल देशमुखांचा सवाल
तारापूर मधील दोन रासायनिक कारखान्यांवर उत्पादन बंदीची कारवाई
हवाई दलाचे महाराष्ट्रातील पहिले संग्रहालय नागपुरात
पतीचा दावा, ‘बायको पॉर्न व्हिडिओत’, न्यायालय म्हणाले, ‘पुरावे कुठे?’…
मुलगा अमली पदार्थ तस्करीत अडकल्याने पित्याने केली आत्महत्या
फ्लेमिंगोंची ज्वेल ऑफ नवी मुंबईलाही पसंती
महाराष्ट्र सरकारही अॅक्शन मोडवर! "पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत राज्य सोडण्याच्या सूचना, अन्यथा...", फडणवीसांचं वक्तव्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची यादी आम्ही मिळवली आहे. त्यांच्याबद्दल आम्ही सर्व पोलीस ठाण्यांना सूचना दिल्या आहेत. पाकिस्तानी नागरिकांना सांगण्यात आलं आहे की ४८ तासांच्या आत देशातून बाहेर पडावं. राज्यात थांबू नये. आम्ही त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहोत. लवकरच त्यांना राज्याबाहेर काढू. हे लोक ४८ तासांच्या आत भारताबाहेर न गेल्यास कारवाई करू.