Mumbai News Hightlights : काश्मीरच्या पहलगामधील दहशतवादी हल्ल्याबाबत देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्रातील सहा पर्यटक या हल्ल्यात ठार झाले आहेत, तर पाच जण जखमी झाले आहेत. यासह महाराष्ट्रातील शेकडो पर्यटक काश्मीरमध्ये अडकले आहेत. त्यापैकी काही पर्यटकांना राज्य सरकारने विशेष विमानाने मुंबईत आणलं आहे, तर काही पर्यटक आज मुंबईत दाखल होतील. या सर्व घडामोडींचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेऊ. दुसऱ्या बाजूला, शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी दहशतवादाचा बिमोड करण्याच्या चर्चेवर विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे. तर, दहशतवाद्यांना धडा शिकवल्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वस्थ बसणार नाहीत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यासह इतर महत्त्वाच्या राजकीय व सामाजिक घडामोडींवर आपलं लक्ष असेल.
Mumbai-Pune News Live Today 25 April 2025 : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्या.
हवामान बदलामुळे वसईत फुलशेती उत्पादनात घट उत्पादन निम्म्यावर ; शेतकरी चिंतेत
ट्रेनमध्ये तुमच्या सीटखाली बेकायदेशीर वस्तु सापडली तर तुम्ही गुन्हेगार? न्यायालयाने दिला हा निर्णय….
डोंबिवलीत हेदुटणे येथे खिल्लार बैलांच्या सहभागातून दहशतवादी हल्ल्याचा निषेध, बैलगाडा संघटनांचे तीव्र आंदोलन
नागपूर हिंसाचारातील आरोपींच्या दुकानाला सील लावण्याचे अधिकार कुणी दिले? उच्च न्यायालयाचा पोलिसांना थेट सवाल….
अतिरेक्यांविरोधातील लढाईत सर्व विरोधीपक्ष केंद्र सरकारबरोबर; शरद पवारांचं वक्तव्य
शरद पवार म्हणाले, काश्मीरमध्ये जे काही झालं आहे त्यानंतर देशातील सर्व जनतेने, राजकी पक्षांनी एका विचाराने सरकारबरोबर असायला हवं. इथे राजकारण आणायचं नाही. सरकार अतिरेक्यांविरोधात जी काही कारवाई करेल त्यात आपण सरकारबरोबर असायला हवं. यासंदर्भात केंद्र सरकारने नुकतीच सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. आमच्या पक्षाकडून खासदार सुप्रिया सुळे या सर्वपक्षीय बैठकीला हजर होत्या. यावेळी सर्व पक्षांनी केंद्र सरकारच्या बाजूने उभं राहायचं ठरवलं आहे. सर्व पक्षांनी सहकार्याची भूमिका घेतल्याचं पाहून मला आनंद झाला.
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांत अग्रवालची शिक्षा रद्द होणार? उच्च न्यायालयाकडून….
डोंबिवलीत फडके रोडवर झाड कोसळले
कल्याणमध्ये दहशतवाद्यांच्या नायनाटासाठी राष्ट्रपतींना निवेदन, भ्याड हल्ल्याच्या निषेधासाठी मेणबत्ती मोर्चा
जिल्हाध्यक्ष निवडीसाठी भाजपाची काटेकोर अहर्ता ! नांदेड जिल्ह्यातून अनेक इच्छुक बाद, महिलांसह इतरांना संधी
विवाहाच्या आमिषाने बुधवार पेठेतील कुंटणखान्यात आसाममधील तरुणीची पाच लाख रुपयात विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, एका अनाेळखी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका २५ वर्षीय तरुणीने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, शफीऊल आबुल नसूर वाहीद आलम (रा. आसाम), पापा शेख, अधुरा शिवा कामली (दोघे रा. बुधवार पेठ), तसेच एका अनोळखी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शफीऊल मूळचा आसाममधील आहे. त्याने जानेवारी महिन्यात विवाहाचे आमिष दाखवून पीडित तरुणीला आसाममधून पळवून आणले. त्याने बुधवार पेठेतील कुंटणखान्यात पाच लाख रुपयात तरुणीची विक्री केली.
डोंबिवलीतील शनिवारचा चतुरंग प्रतिष्ठानचा कार्यक्रम भ्याड हल्ल्याच्या निषेधासाठी रद्द
ठाणे : वर्षभरापूर्वी नेलेला कूलर खराब झाल्याने विक्रेत्यांना बेदम मारहाण
जळगावमध्ये ३२७ पाकिस्तानी नागरिकांची पोलिसांकडून चौकशी
मुंबई उच्च न्यायालयाकडून कुणाल कामराला अटकेपासून संरक्षण; पोलिसांनाच चेन्नईला जाऊन जबाब नोंदवण्याचे आदेश
एकनाथ शिंदेविरोधातील विडंबनात्मक गाण्याचे प्रकरण, याचिका निकाली निघेपर्यंत कुणाल कामराला अटकेपासून संरक्षण, चेन्नई येथे जाऊन त्याचा जबाब नोंदवण्याचे उच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश
#BREAKING Bombay HC Directs Mumbai Police Not To Arrest Kunal Kamra In FIR Over Alleged Remarks On Eknath Shinde, But Probe May Continue
— Live Law (@LiveLawIndia) April 25, 2025
Trial court shall not take cognizance of chargesheet, the HC further directed.@kunalkamra88 @MumbaiPolice https://t.co/za6onJJhjC
आज २३२ पर्यटकांना मुंबईत आणणार : फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्य सरकारच्या वतीने विशेष विमानांची व्यवस्था केली जात आहे. २३२ पर्यटकांना घेऊन इंडिगोचे तिसरे विशेष विमान आज दुपारी श्रीनगर येथून निघेल आणि सायंकाळी मुंबईत पोहोचेल. काल दोन विशेष विमानांनी १८४ पर्यटक मुंबईत पोहोचले होते. सुमारे ५०० पर्यटक आतापर्यंत परतले आहेत.