Maharashtra Breaking News Update : आज महाराष्ट्रासह देशभरात राम नवमीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. रामनवमीनिमित्त संपूर्ण राज्यात विविधकार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. नागपूर, नाशिक, सातारा, शिर्डी, शेगाव, मुंबईसह राज्यभरातील राम मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी बघायला मिळते आहे. दरम्यान, दरवर्षी प्रमाणे यंदाही शिर्डीत रामनवमी उत्साहात साजरी करण्यात येत आहे. राज्यभरातून शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. याबरोबरच छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्री दोनच्या सुमाराम दोन गटात राडा झाला. यावेळी अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. अखेर जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना गोळीबार व अश्रुधूर नळकांड्याचा वापर करावा लागला. यामध्ये एक जण जखमी झाल्या असल्याचे वृत्त आहे. येथील परिस्थिती सध्या नियंत्रणात असली, यावरून दिवसभर राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. याकडेही आपलं लक्ष असणार आहे.