Mumbai Pune Latest News Live Update: ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाण प्रकरणाचे तीव्र पडसाद सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात उमटताना पाहायला मिळत आहेत. त्यातच राहुल गांधींच्या खासदारकी प्रकरणावरूनही राज्यात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या मविआच्या संयुक्त सभेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगू लागल्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसत आहे.
Marathi News Update: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
कोल्हापूर : “देशातील ४४ कोटींहून अधिक पॅनकार्ड ग्राहकांना आधारकार्डशी लिंक करण्याचा निर्णय प्राप्तीकर विभागाने घेतलेला आहे. या प्रक्रियेसाठी दरडोई १ हजार रुपयाचा जिजीया कर आकारला आहे. यामुळे देशातील जनतेवर ४४ हजार कोटींचा दरोडा पडणार असून, या विरोधात आवाज उठवण्यात यावा”, अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी केली.
अजित पवार, नाना पटोले उद्धव ठाकरेंचं कधीही समर्थन करणार नाहीत. कारण ते प्रगल्भ आहेत – बावनकुळे
कोल्हापूर : दख्खनचा राजा श्री. जोतिबा देवाची उद्या बुधवारी चैत्र पौर्णिमा यात्रा होत आहे. जोतिबा डोंगरावर मंगळवार रात्रीपर्यंत तीन लाख भाविक दाखल झाले आहेत. चांगभलंच्या गजरात सासनकाठ्या दाखल होत आहेत.
उद्धव ठाकरेंची काय औकात आहे देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करायची? यांचं काय कर्तृत्व आहे? ते मोदींबद्दल बोलतात. मोदींचं सोडा, देवेंद्रजींच्या टाचणीचीही ते बरोबरी करू शकत नाहीत – बावनकुळे
जर उद्धव ठाकरे पुन्हा देवेंद्र फडणवीसांवर बोलले, तर आम्हाला मातोश्रीच्या बाहेरही जावं लागेल. तुम्ही सरकारवर टीका करा. पण व्यक्तिगत टीका करू नका. तुम्ही व्यक्तिगत टीका करणार असाल, तर महाराष्ट्र भाजपा झोपलेली नाहीये – बावनकुळे
आज मी जाहीरपणे कबूल करतो. त्यांनी संस्कार वगैरे बाजूला ठेवून आकसबुद्धीने राजकारण करायला हवं असं आम्हाला वाटतं. आम्ही त्यांना विचारतो तर ते म्हणतात माझ्या आई-वडिलांनी मला हेच संस्कार दिले आहेत. पण आता देवेंद्र फडणवीसांबद्दल कुणी काही बोललं तर आम्ही सोडणार नाही कुणाला – बावनकुळे
पुणे : मृत आईचे सातबारा उताऱ्यावरील नाव कमी करण्यासाठी दोन हजारांची लाच मागणाऱ्या पुरंदर तालुक्यातील चांबळी गावच्या महिला तलाठ्यासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. या प्रकरणी महिला तलाठ्यासह दोघांविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जनाची नाही तर मनाची तरी ठेवा. देवेंद्रजींनी उद्धव ठाकरेंना ज्या पद्धतीने मान-सन्मान केला, भावापेक्षा जास्त प्रेम त्यांनी उद्धव ठाकरेंना दिलं. एकवेळ भाजपा कार्यकर्त्यांनी सांगितलेलं काम बाजूला ठेवलं. पण उद्धव ठाकरेंनी सांगितलेली एकेक गोष्ट त्यांनी पूर्ण केली. आणि हा घरकोंबडा देवेंद्रजींना बेईमान होतोय. पाच वर्षं आठवा उद्धवजी. देवेंद्रजी बोलायला लागले, तर याचं घरातून बाहेर निघणं अवघड होऊन जाईल – बावनकुळे
देवेंद्र फडणवीस नेमकं काय करतील, ही यांना भीती आहे. त्यांच्यापैकी कोण कुठल्या चौकशीला सामोरा जाईल आणि किती घबाड निघेल याची भीती वाटतेय यांना. देवेंद्रजी त्यांचा स्वभाव बदलत नाही हा प्रश्न आहे. त्यांनी स्वभाव बदलला ना, आणि त्यांनी काढणं सुरू केलं ना तर उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात राहाणं मुश्किल होईल. इतकी सामग्री देवेंद्रजींकडे आहे. कशाला बोलता तुम्ही? काय तुमची उंची आहे? काय कर्तृत्व आहे तुमचं? – बावनकुळे
उद्धव ठाकरे जसं वागतायत, काँग्रेस-राष्ट्रवादीही उद्या त्यांना सोडेल. खरंतर ते यांना कंटाळले आहेत. पण एकमेकांवाचून जमत नाही म्हणून एकत्र आहेत. पण उद्धव ठाकरेंचं नेतृत्व कुणीच मान्य करू शकत नाही. हा शून्य कर्तृत्वाचा व्यक्ती आहे. धनुष्यबाण, नाव गेलं तरी सुधरत नाही. मी आणि माझा परिवार एवढंच कर्तृत्व शिल्लक राहिलंय – बावनकुळे
बावचळलेल्या, अत्यंत निराश झालेला व्यक्ती जसा असतो, आत्महत्या करण्यासाठी तो निघतो त्याप्रमाणे या पद्धतीची असंस्कृतीक भाषा वापरून राजकीय आत्महत्या करण्यासाठी उद्धव ठाकरे निघाले आहेत. त्यांची अशी वागणूक राहिली, तर भाजपा त्यांना सोडणार नाही. जर उद्धव ठाकरेंबद्दल ते काही अपशब्द बोलले, तर भाजपा रस्त्यावर उतरेल. आज त्यांना शेवटची संधी दिली आहे. यानंतर काही बोललात तर लक्षात ठेवा. धमकीच समजा. यानंतर आपण आमच्या नेत्यांबद्दल बोलायचं नाही. तुम्हाला तो अधिकार नाही – बावनकुळे
नागपुरी भाषेत जर उद्धव ठाकरेंना बोलायला लागलं, तर हा घरकोंबडा आणि ज्यांनी फेसबुक लाईव्ह शिवाय काहीच केलं नाही. इतकं वाईट सरकार चालवलं. दाऊदशी संबंध असलेल्या लोकांना तुम्ही मंत्रीमंडळात ठेवलं. त्यांची लाळ चाटली – बावनकुळे
मोदींचे फोटो लावून निवडून आल्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत त्यांची लाळ पुसून मुख्यमंत्रीपद मिळवणे एवढंच त्यांचं कर्तृत्व. अशा शून्य कर्तृत्वाच्या उद्धव ठाकरेंनी अष्टपैलू कर्तृत्वाचे धनी असलेले फडणवीस यांच्याबद्दल बोलणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे – चंद्रशेखर बावनकुळे
अंबरनाथ : कल्याणपल्याड अंबरनाथ, बदलापूरच्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी महत्वाच्या असलेल्या रेल्वेच्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेच्या कामाला अखेर गती मिळणार आहे. यासाठी आवश्यक जमिनीच्या भूसंपादन प्रक्रियेसाठी आता राज्य सरकारने आपला वाटा दिला असून ८९ कोटी रुपये भूसंपादन अधिकाऱ्यांकडे वर्ग केले आहेत. त्यामुळे भूसंपादन प्रक्रियेला गती मिळणार आहे. तिसरी चौथी रेल्वे मार्गिका अंबरनाथ, बदलापूर यासारख्या शहरातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासा देणारी ठरणार आहे.
नागपूर : तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशभर हिसंक आंदोलन पेटले. त्यावेळी आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले. नागपुरातही अनेक ठिकाणी आंदोलने झालीत. अनेकांवर गुन्हे दाखल झाले होते. त्याचा खटला आता तब्बल ३८ वर्षांनंंतर चालवण्यात येत आहे.
पुणे : जिल्ह्याने गेल्या आर्थिक वर्षात १०० टक्के निधी खर्चाचे उद्दिष्ट गाठले असून, याद्वारे जिल्ह्यातील अनेक विकासाची कामे मार्गी लागणार आहेत. सन २०२३-२४ जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सर्वसाधारण योजनेच्या विकास आराखड्यासाठी गतवर्षापेक्षा १३० कोटींची भरीव वाढ मिळविण्यात आली असून आता हा आराखडा १००५ कोटी रुपयांचा असणार आहे.
जळगाव – यावल तालुक्यातील अट्रावल येथे शनिवारी झालेल्या दंगलप्रकरणी वेगवेगळ्या तक्रारींवरून २०५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यांपैकी ॲट्रॉसिटीविरोधी कायद्यान्वये नऊ तसेच इतर गुन्ह्यांतील आठ, अशा १७ संशयितांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सविस्तर वाचा…
नाशिक येथील काळाराम मंदिरातील वादग्रस्त वेदोक्त प्रकरणाचा काँग्रेसने अभिनव पद्धतीने निषेध करून रामचंद्राला साकडे घातले. स्थानिक गर्दे वाचनालय परिसरात सोमवारी संध्याकाळी अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव तथा माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभिनव आंदोलन करण्यात आले. सविस्तर वाचा…
सांताक्रुझ पूर्व येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात महिला रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टर आणि रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षकांच्या तक्रारीवरून वाकोला पोलिसांनी आरोपी नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी वाकोला पोलीस अधिक तपास करीत आहेत. सविस्तर वाचा…
गोवंडी पूर्व परिसरातील देवनार व्हिलेज रोड येथील मुंबई महानगरपालिकेच्या दत्ताराम गणपत पाटील मनोरंजन मैदानात मियावाकी वन साकारण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने या मैदानात कदंब, तामण, बदाम करंज, सीता अशोक, शिरीष, रतन आदी सुमारे साडेतीन हजार देशी झाडांची लागवड केली आहे.
दिवसेंदिवस लोकलमधील वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पश्चिम रेल्वेवर ५ एप्रिलपासून विनावातानुकूलित १२ डबा लोकलच्या अतिरिक्त ११ फेऱ्या धावणार आहेत. यामध्ये लोकलच्या अप दिशेला पाच, तर डाऊन दिशेला सहा फेऱ्या होणार आहेत. सविस्तर वाचा…
‘शेतमालाला रास्त भाव मिळालाच पाहिजे’ अशी मागणी करत विविध शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून चळवळीत कार्य करणाऱ्या शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांना के. चंद्रशेखरराव यांच्या ‘भारत राष्ट्र समिती’ची भुरळ पडल्याचे दिसून येत असून शेतकरी संघटनांमध्ये कार्यरत असणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी गेल्या दोन महिन्यांत या पक्षात प्रवेश केला आहे. सविस्तर वाचा…
यांना मुख्यमंत्री म्हणायचं का गुंडमंत्री म्हणायचं हे लोक ठरवतील. त्यांनी जाहीर करावं, मंत्रीमंडळाच्या विस्तारात एक खातं निर्माण करावं आणि गुंडमंत्री असं पद निर्माण करून गुंड पोसण्याचं काम त्या मंत्र्याकडे द्यावं – उद्धव ठाकरे
वादाचे दुसरे नाव म्हणजे आमदार रणजीत कांबळे होय, या निष्कर्षावर पक्का शिक्का मारावा, अशी प्रतिक्रिया सार्वत्रिक उमटत आहे. वाद ओढवून घेणे, वादाला फोडणी देणे, वादंग निर्माण करणे, वादग्रस्त वक्तव्य करणे, असे वादाचे सर्व ते प्रकार आ. कांबळे यांनी जनतेला दाखवून दिले आहे. सविस्तर वाचा…
उद्धव ठाकरे म्हणतात, “त्यांच्या पक्षातल्या लोकांवर मिंधे गटाकडून हल्ले झाले, तर तिथे ही फडणवीसी दाखवण्याची त्यांची हिंमत नाहीये. एकूणच…!”
ठाणे : कासारवडवली भागात शिवसेनेच्या (शिंदे गट) कार्यकर्त्यांच्या मारहाणीत जखमी झालेली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवती सेनेच्या पदाधिकारी रोशनी शिंदे या गर्भवती नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. तसेच त्यांना गंभीर इजा झालेली नसून, मुका मार लागलेला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“आम्ही कुठेही मारहाण केलेली नाही. ती सांगतेय म्हणून अशी विधानं होतायत. सीसीटीव्ही फूटेज पाहिलं तर त्यात असं काहीही दिसत नाहीये. तिला समजवायला गेल्यानंतर ती उलट-सुलट बोलायला लागली. शिवीगाळ करायला सुरुवात केली. तेव्हा थोडी धक्काबुक्की झाली. पण नंतर तिला पुन्हा वर घेऊन गेले. तिला कुणीही मारलं नाही. असे खोटे आरोप करणाऱ्यांवरही मग कारवाई करावी लागेल”, असाही दावा शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांनी केला आहे.
रोशनी शिंदे यांना मारहाण झाल्याचा प्रकार घडल्यानंतर उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल झाले.
आपली लेव्हल सोडून ज्या मुली वारंवार बोलतायत. त्यांना समज देण्याचं आमचं काम आहे. ते वारंवार सांगतायत की १०० लोकांच्या जमावाने तिच्या पोटावर लाथ मारली. ती जिवंतही राहिली नसती असं काही झालं असतं तर. ती स्वत:च्या पायांवर चालत पोलीस स्टेशनला गेली – शिंदे गट महिला पदाधिकारी मीनाक्षी शिंदे
नागपूर : एकाच दिवशी घडलेल्या तीन लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी उपराजधानी हादरली. यामुळे शहरातील मुली व महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या तीनही घटना सोमवारी उघडकीस आल्या. याप्रकरणी एका नराधमाला पोलिसांनी अटक केली, तर दुसरा फरार आहे.