Mumbai Pune Latest News Live Update: ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाण प्रकरणाचे तीव्र पडसाद सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात उमटताना पाहायला मिळत आहेत. त्यातच राहुल गांधींच्या खासदारकी प्रकरणावरूनही राज्यात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या मविआच्या संयुक्त सभेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगू लागल्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसत आहे.
Marathi News Update: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
पुणे : पैशासाठी पतीनेच पत्नीला वेश्याव्यवसाय करयासाठी भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मित्रांकडून पैसे घेत त्यांच्यासोबत संबंध ठेवण्यास पत्नीला भाग पडले. याप्रकरणी पतीसह त्याच्या तीन मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका विवाहित महिलेने तक्रार दिली आहे.
पुणे : पुण्यातील मावळमधील शिरगाव ग्रामपंचायतचे सरपंच प्रवीण गोपाळे यांच्या हत्येप्रकरणी मुख्य मारेकरी आरोपींना शिरगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांना आज वडगाव न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. विशाल उर्फ किरण सुनील गायकवाड (वय २५), संदीप उर्फ अण्णा छगन गोपाळे (वय ३१) आणि ऋतिक शिवाजी गोपाळे (वय २२) सर्व राहणार शिरगाव, अशी मारेकऱ्यांची नावे आहेत. यापैकी विशाल गायकवाड हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. अद्याप या हत्येचे मूळ कारण समोर आले नाही.
पुनर्विकास प्रकल्पांना मंजुरी देण्याची जबाबदारी महापालिकेकडून काढून घेऊन ती म्हाडावर सोपविल्यानंतर नियोजन प्राधिकरण म्हणून म्हाडाने जलद निपटारा केल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत साडेतीन हजार विविध प्रकारच्या प्रस्तावांना म्हाडाने मंजुरी दिली असून त्यातून साडेतीन हजार कोटींचा महसूल जमा केला आहे.
म्हाडा कोकण मंडळाच्या ४,६५४ (१४ भूखंडांसह) घरांना अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने सोडतपूर्व प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची वेळ कोकण मंडळावर आली आहे. तर दुसरीकडे इच्छुकांना सोडतीकडे आकर्षित करण्यासाठी सोडतपूर्व प्रक्रियेत बदल करण्यात आले आहेत. सविस्तर वाचा…
नागपूर- अमरावती महामार्गावर नागपूरहून अमरावती जाणाऱ्या एसटीच्या शिवशाही बसला मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास कोंढाळी जवळील साई मंदिराजवळ अचानक आग लागली. बसमधील चालकाने प्रसंगावधान राखून गाडीला ब्रेक लावून सूचना केल्याने प्रवासी वेळीच खाली उतरले व अनुचित प्रकार टाळला. सविस्तर वाचा…
येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात घडलेल्या घडामोडींनी सर्वत्र चिंतेचा सूर उमटला.रामनवमीच्या कार्यक्रमाचे निमित्त वाद निर्माण करणारे ठरले. डाव्या व हिंदू विचारसरणीच्या दोन विद्यार्थी गटात वाद झडले.आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर मोर्चेही निघाले.या तणावामुळे पोलीसांना पाचारण करण्यात आले. सविस्तर वाचा…
जिल्ह्यातील मुदत संपलेल्या १२ कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय रणधुमाळीला सुरुवात होत आहे. १२ बाजार समितीच्या २१६ जागांसाठी सोमवारी अखेरच्या दिवशी ८२९ नामांकन दाखल केले. बुधवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर २८ एप्रिल २०२३ रोजी मतदान होणार आहे.
‘एसटी’ने बऱ्याच वर्षांपासून चालक-वाहकांना गणवेश दिला नसताना आता महामंडळ गणवेश नसलेल्यांवर कारवाई करणार आहे. याशिवाय चालक- वाहकांची नियमित मद्य तपासणीही होणार आहे. त्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संताप असून आम्हाला मद्यपी समजता का, असा प्रश्न त्यांच्याकडून विचारला जात आहे. सविस्तर वाचा…
जिल्ह्यात काँग्रेसने जिल्हा परिषद, पदवीधर, शिक्षक मतदारसंघात भाजपला धूळ चारली आहे. सर्वत्र हरल्यावरही नागपूर जिल्हा भाजपचा गड कसा, असा सवाल माजी मंत्री व काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी महाविकास आघाडीतर्फे केला. सविस्तर वाचा…
आंघोळ करीत असलेल्या महिलेची स्नानगृहाच्या खिडकीतून एका युवकाने भ्रमणध्वनीने चित्रफीत काढली. यादरम्यान, महिलेचा पती घरी आला. त्याने युवकाला चोप देत पोलिसांत तक्रार दिली. गोलू ऊर्फ कमलेश हजारे (२३, मौदा) असे आरोपीचे नाव आहे.
कल्याण – कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचा आगामी आर्थिक वर्षाचा ३६ कोटी ८३ लाखाचा अर्थसंकल्प बाजार समितीचे सभापती कपील थळे यांनी सादर केला. ४३ लाखांची शिल्लक अंदाजपत्रकात दाखविण्यात आली आहे. समितीने प्रथमच शिलकीचे अंदाजपत्रक सादर केले आहे.
पिंपरी : अवैध बांधकामावरील शास्तीकर सरसकट माफीच्या शासन निर्णयापूर्वी प्रामाणिकपणे शास्ती रकमेचा भरणा करणाऱ्या १४ हजार २५४ मालमत्ताधारकांची २०५ कोटी ३४ लाखांची रक्कम त्यांच्या मालमत्ताकराच्या २०२३-२४ च्या देयकात समायोजित होणार आहे. त्यामुळे दंड भरणाऱ्या या मालमत्ताधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण झाल्याच्या प्रकरणावरून राजकारण तापत असतानाच उद्धव ठाकरे स्वत: पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह ठाण्याला जाणार असून मारहाण झालेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत.
पुणे : ‘डोंगर माथा, डोंगर उतारा’चे आरक्षण कायम ठेवण्यात यावे, मंजूर झालेल्या अभिन्यासाचे नकाशे (कमिटेड डेव्हलपमेन्ट) वगळण्यात यावेत, पायाभूत सुविधांसाठी आरक्षणांची संख्या कायम ठेवावी, अशा २३ हून अधिक शिफारशी केलेला प्रारूप विकास आराखडा हा राज्य सरकारने हरकती आणि सूचनांवरील सुनावणीसाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीने सादर केला आहे. या समितीकडून हा आराखडा पीएमआरडीएकडे पाठविण्यात येणार आहे.
डोंबिवली – डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक पाचवर सोमवारी संध्याकाळी एक मुक महिला आपली पर्स विसरली होती. जागुरूक प्रवाशामुळे तिला तिची पर्स परत मिळाली. सविस्तर वाचा..
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. १० मे ला कर्नाटकातील २२४ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. तर, १३ मे विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहे. कर्नाटकात सत्तेवर येण्यासाठी ११३ चे बहुमत असण्याची गरज आहे. अशातच कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीवरून हल्लाबोल केला आहे. संजय राऊतांच्या विधानानंतर त्यांच्यावर राजकीय स्तरातून टीकास्र डागलं जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे.
ठाण्यात ठाकरे गट आणि शिंदे गटात झालेल्या हाणामारी प्रकरणाचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटत असून त्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे.
संजय राऊत म्हणतात, ” ठाण्यात आम्हालाही घुसता येतं. ठाण्यात तुम्हाला स्वत:ला घरात कोंडून घ्यावं लागेल. त्यामुळे हे…!”
संजय राऊत म्हणतात, “नरेंद्र मोदी तेजस्वी सूर्य आहेत. देशात प्रकाश मोदींमुळेच पडलाय. संध्याकाळी शीतल चांदणं मोदींमुळेच पडतं. नद्या…!”
सोमवारी संध्याकाळच्या सुमारास ठाण्यात ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला गंभीर जखम झाली असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार चालू आहेत.