Maharashtra Breaking News शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या वाद निर्माण झाला आहे. त्यावर संजय राऊतांनी टीका केल्यानंतर त्यासंदर्भात सर्वच पक्षातील नेतेमंडळी प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. एकीकडे या मुद्द्यावर राजकारण रंगत असताना दुसरीकडे यापुढे मंत्र्यांचे पीए, ओएसडी यांच्या नेमणुकांवर मुख्यमंत्री कार्यालयाची बारीक नजर असणार आहे. यासंदर्भात विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं जात आहे.

Live Updates

Maharashtra 25 February 2025 : महाराष्ट्रातील सर्व राजकीय घडामोडींचा धावता आढावा!

18:53 (IST) 25 Feb 2025

सिंधुदुर्गातील नऊ ई सेवा (सेतू सुविधा) केंद्र गुजरात इन्फोटेक कंपनी चालवणार

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ तालुक्यांसह सिंधुदुर्ग नगरी मधील ई सेवा (सेतू सुविधा) केंद्र गुजरात कंपनी चालविणार आहे. तसा जिल्हा सेतू समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी कार्यारंभ आदेश काढला आहे.

वाचा सविस्तर…

17:06 (IST) 25 Feb 2025

संघटनेचे गुरुवारी राज्यभर आंदोलन, सरकारी ठेकेदारांची हजारो कोटींची देयके थकली

अहिल्यानगर : ठेकेदारांची सरकारी कामांची राज्यात हजारो कोटी रुपयांची देयके थकली आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातही १५०० कोटीहून अधिक देयके प्रलंबित आहेत. वारंवार निवेदन देऊनही निर्णय होत नसल्यामुळे आता सरकारी काम करणारे ठेकेदार आक्रमक झाले असून २७ फेब्रुवारीला राज्यभर आंदोलनाचा निर्णय बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाने घेतला आहे.

सविस्तर वाचा…

16:54 (IST) 25 Feb 2025

मुलीच्या छेडछाडीतून कुटुंबावर हल्ला; दोन गंभीर भूम तालुक्यातील बावी येथील प्रकार; गाव बंद ठेवून निषेध

छत्रपती संभाजीनगर : धाराशिवच्या भूम तालुक्यातील बावी येथे मुलीला केलेल्या छेडछाडीचा जाब विचारणाऱ्या कुटुंबावर हल्ला झाल्याची घटना २३ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली असून, यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले. तर घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी २५ फेब्रुवारीला गाव बंद ठेवून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.याप्रकरणी बावी येथील भागवत राजेंद्र उभे यांनी भूम पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

सविस्तर वाचा…

16:39 (IST) 25 Feb 2025

गोदापात्रातील मॅकेनिकल दरवाजांचे काम थांबवा, विभागीय आयुक्तांकडे मागणी

नाशिक : अहिल्यादेवी होळकर पुलाखाली गोदावरी नदीपात्रात निळ्या पूररेषेत सुरू असलेले मॅकेनिकल दरवाजे (गेट) बसविण्याचे काम तातडीने थांबवावे आणि आहे ती स्थिती कायम ठेवावी, अशी मागणी याचिकाकर्ते निशिकांत पगारे यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.नाशिक स्मार्ट सिटी योजनेंतर्गत गोदावरी नदीपात्रात मॅकेनिकल दरवाजे बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

सविस्तर वाचा…

16:39 (IST) 25 Feb 2025
Prajakta Mali tryambkeshwar Program: कार्यक्रमाला विरोध करणाऱ्यांना प्राजक्ता माळीचं उत्तर

महाशिवरात्रीनिमित्त होणार हा कार्यक्रम पूर्णपणे शास्त्रीय-उपशास्त्रीय संगीतावर आधारित नृत्याचा कार्यक्रम आहे. अपुऱ्या माहितीवर आधारित कुणाचा गैरसमज झाला असेल, तर त्यांनी त्यांच्या मनातले गैरसमज काढून टाकावेत आणि समाजाची दिशाभूल करू नये अशी मी त्यांना विनंती करते. एक गोष्ट आवर्जून नमूद करू इच्छिते, की देवाच्या दारात कुणीही सेलिब्रिटी नसतं. सगळे भक्त असतात. त्याच भक्तीभावानं मी माझ्या नृत्याच्या माध्यमातून माझी सेवा नटराजाच्या चरणी रुजू करणार आहे – प्राजक्ता माळी

संदर्भ: अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला त्र्यंबकेश्वरच्या माजी विश्वस्तांनी विरोध केला आहे. “महाशिवरात्रीचा अतिशय पवित्र दिवस आहे. येथे धार्मिकच कार्यक्रम झाले पाहिजेत. प्राजक्ता माळी शिवस्तुती सादर करणार असतील, तरी त्याचा पुनर्विचार झाला पाहिजे. कारण मी स्वतः या मंदिराची माजी विश्वस्त आहे. शास्त्रीय नृत्य, कथ्थक नृत्य ठेवलं पाहिजे. पण सेलिब्रिटिंना आणून येथे एक वेगळाच पायंडा त्र्यंबकेश्वर देवस्थानने सुरू केलाय. हे चुकीचं घडतंय”, असा आक्षेप मंदिराच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी घेतला आहे.

16:25 (IST) 25 Feb 2025

नंदुरबारमध्ये मराठा आरक्षणासाठी आत्मदहनाचा प्रयत्न

नंदुरबार : वारंवार निदर्शने आणि उपोषण करुनही मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने मंगळवारी नंदुरबार जिल्ह्यातील मराठा समाजाचे आंदोलक गुलाब मराठे यांनी पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच त्यांच्या हातातील पेट्रोलची बाटली हिसकावल्याने अनर्थ टळला

सविस्तर वाचा…

16:20 (IST) 25 Feb 2025

Suicide Attempt at Mantralaya: मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालयातील जाळीवर उडी मारून एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सुरक्षेसाठी तैनात पोलिसांनी तातडीने जाळीवर उतरून या तरुणाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मंत्रालयातील या जाळीवर अशा प्रकारे नागरिकांनी उडी मारून आपला निषेध व्यक्त करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

15:44 (IST) 25 Feb 2025

गणपतीपुळेत ४७ सागरी कासव पिल्लांनी घेतली समुद्रात झेप

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर राबविण्यात येणाऱ्या सागरी कासव संरक्षण आणि संवर्धन मोहिमेंतर्गत कासव मित्रांच्या विशेष सहकार्याने ४७ सागरी कासव पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या अंडी उबवणी केंद्रात सुमारे १३७ समुद्री कासवांची अंडी संरक्षित करण्यात आली होती.

सविस्तर वाचा…

15:35 (IST) 25 Feb 2025

पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या जनता दरबारात साडेसहाशे तक्रार अर्जांचा पाऊस

परभणी : पालकमंत्री श्रीमती मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या जनता दरबारात तब्बल ६५० अर्जदारांनी आपल्या तक्रारी सादर केल्या. एवढ्या प्रचंड प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद जनता दरबाराला मिळाल्यानंतर पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी अधिकाऱ्यांना सर्व प्रलंबित अर्जाबाबत तात्काळ निर्णय घेण्यास सांगितले.

सविस्तर वाचा…

15:30 (IST) 25 Feb 2025

खड्ड्यामुळे युवा डॉक्टरचा मृत्यू, उल्हासनगरातील घटना, २८ वर्षीय डॉक्टरच्या मृत्यूने संताप

उल्हासनगरः एका खड्ड्यात दुचाकी आदळल्याने झालेल्या अपघातात एका २८ वर्षीय डॉक्टरचा उल्हासनगरात मृत्यू झाला आहे. उल्हासनगरच्या १७ सेक्शनच्या हिरा घाट परिसरात हा अपघात झाला असून खड्ड्यामुळे तरूण डॉक्टरचा मृत्यू झाल्याने संताप व्यक्त होतो आहे.

सविस्तर वाचा….

15:23 (IST) 25 Feb 2025

आंतरजातीय प्रेमीयुगुलाच्या मदतीला उच्च न्यायालय, राज्यात पहिल्यांदाच ‘सेफ हाऊस’ मध्ये हलविले…

नागपूर : पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाणाऱ्या महाराष्ट्रात आजही आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना समाज स्वीकारत नाही. सैराट चित्रपटातील कथानकाप्रमाणे खऱ्या आयुष्यातही प्रेमात पडणाऱ्या प्रेमीयुगुलांना जीवाचा धोका असतो. नागपूरमध्ये घडलेल्या एका अशाच प्रकरणात आंतरजातीय विवाह करणाऱ्या प्रेमी जोडप्याच्या मदतीसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ पुढे आले.

सविस्तर वाचा…

14:57 (IST) 25 Feb 2025

वैद्यकीय महाविद्यालयात पहिली चेहरा पुनर्रचना शस्त्रक्रिय, अपघातग्रस्त बारा वर्षीय अक्षताचा चेहरा झाला पुर्ववत

धाराशिव : अपघातामुळे चेंदामेंदा झालेल्या चेहर्‍याला पुर्ववत करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पहिली चेहरा पुनर्निमाण शस्त्रक्रिया बेंगलोर येथील तज्ञांच्या मदतीने यशस्वी झाली आहे.

सविस्तर वाचा…

14:37 (IST) 25 Feb 2025

एक अनोळखी कॉल; आणि बालविवाह थांबला, उल्हासनगर शहरात बालविवाह रोखला

ठाणे – जिल्हा महिला बालविकास विभागाच्या वतीने सोमवारी उल्हासनगर शहरात धडक कारवाई करून एका १६ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखण्यात आला आहे. उल्हासनगर शहरातील भाटिया हॉल येथे एक बालविवाह सुरू असल्याची माहिती एका अनोळखी संपर्क क्रमांकावरून बाल संरक्षण विभागाला देण्यात आली.

सविस्तर वाचा….

14:07 (IST) 25 Feb 2025

कल्याणमधील माणेरे येथे बेकायदा चाळी उभारणाऱ्या इसमांवर फौजदारी गुन्हे दाखल

कल्याण पूर्व भागातील आय प्रभाग हद्दीत एकही बेकायदा चाळ, प्रदुषणकारी जीन्सचा कारखाना उभा राहणार नाही यासाठी विशेष नियोजन आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी केले आहे. या कारवाईचा भाग म्हणून बेकायदा चाळी उभारणाऱ्यांवर आता फौजदारी गुन्हे दाखल करण्यास अधिकाऱ्यांनी सुरूवात केली आहे.

वाचा सविस्तर…

14:01 (IST) 25 Feb 2025
Amol Kolhe on Swarajya rakshak sambhaji serial – ऐतिहासिक विषय हाताळताना नैतिकता पाळावी लागते – अमोल कोल्हे

गेल्या काही दिवसांत संभाजी महाराज मालिकेचा शेवट दबावापोटी गुंडाळण्यात आला असा अपप्रचार केला जातोय. तसं कुणाला वाटत असेल तर त्यासंदर्भातल्या मार्गदर्शक नियमांची संबंधितांनी माहिती घ्यायला हवी. आपण मालिका करतो, तेव्हा या माध्यमाच्या मर्यादा समजून घेणं गरजेचं आहे. पण हे राजकीय हेतूने करण्यात आलं हा अपप्रचार काही मंडळींकडून केला गेला. अशा ऐतिहासिक विषयांवर मालिका करताना काय नैतिकता पाळावी लागते हे लक्षात घेणं आवश्यक आहे – अमोल कोल्हे, अभिनेते-खासदार

संदर्भ : गेल्या काही दिवसांत स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेच्या शेवटी संभाजी महाराजांवर औरंगजेबानं शेवटच्या दिवसांमध्ये केलेल्या अत्याचारांची दृश्य मालिकेत जाणूनबुजून दाखवली नसल्याचा आरोप अमोल कोल्हेंवर करण्यात येत आहे.

14:01 (IST) 25 Feb 2025

रातोळीकरांनी जोपासले ‘रक्ताच्या नात्यापलीकडचे नाते’ एक हजार मुलींना दिला ‘सुकन्या समृद्धी’चा लाभ

नांदेड : केंद्र सरकारने सुरु केलेल्या सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत पोस्टात मुलींचे खाते काढून देण्याचा आपण सुरु केलेला उपक्रम कधीही बंद पडू देणार नाही, या योजनेच्या माध्यमातून माझे वडील स्व.बालाजीराव पाटील रातोळीकर (पोलीस पाटील) यांच्या पुण्यस्मरणार्थ सामाजिक बांधीलकी जोपासण्याचा माझा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार राम पाटील रातोळीकर यांनी केले. रातोळी ता.नायगाव येथे सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत 1 हजार मुलींना पोस्टाचे पासबूक वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.

सविस्तर वाचा…

13:59 (IST) 25 Feb 2025

पर्यावरणपूरक मूर्तींबाबत आता गणेश मंडळांच्या अभिप्रायाची प्रतीक्षा

मुंबई : गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तींना बंदी घालण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून गणेशोत्सवाशी संबंधित सर्वच घटकांमध्ये वातावरण ढवळून निघाले आहे. मूर्तीकारांच्या संघटना, गणेशोत्सव साजरा करणारी सार्वजनिक मंडळे, गणेशोत्सव समन्वय समिती हे सारेच या निर्णयामुळे सध्या संभ्रमात आहे.

सविस्तर वाचा….

13:52 (IST) 25 Feb 2025

घरांच्या प्रश्नावरून गिरणी कामगार आक्रमक, गिरणी कामगारांचा ६ मार्चला मोर्चा

राज्य सरकार गिरणी कागमारांच्या घरांच्या प्रश्नाबाबत गंभीर नसून कामगारांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप करीत सरसकट गिरणी कामगारांना मुंबईतच घरे द्यावीत या मागणीसाठी गिरणी कामगार ६ मार्चला आझाद मैदानावर धडकणार आहेत. ‘गिरणी कामगार एकजूट’तर्फे ६ मार्चला मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

वाचा सविस्तर…

13:30 (IST) 25 Feb 2025

समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाचे वाढीव मूल्यांकन केल्याचा ठपका, कृषी विभागाचे सात जण निलंबित

परभणी : समृद्धी द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनादरम्यान येणाऱ्या विहिरी, फळबागा, शेततळे, घरांचे चुकीच्या पद्धतीने वाढीव मूल्यांकन केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. हे सर्व अधिकारी- कर्मचारी कृषी विभागातील आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्याच्या प्रशासकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. जालना- नांदेड असा समृद्धी द्रुतगती मार्ग परभणी जिल्ह्यातून जात आहे.

सविस्तर वाचा…

13:14 (IST) 25 Feb 2025

उड्डाणपूल खचला; गडकरींच्या गृह जिल्ह्यातच वाहतूक कोंडी!

नागपूर : बुटीबोरी शहर आणि एमआयडीसीला जोडणाऱ्या चौकातील उड्डाणपूल खचला असून या चौकात जडवाहनांमुळे वाहतूक कोंडी होत आहे.परिणामी, गावकरी, विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे.भारतीय राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील बुटीबोरी उड्डाणपुलास २४ डिसेंबर २०२४ रोजी तडे गेल्याचे दिसून आले.

सविस्तर वाचा…

12:57 (IST) 25 Feb 2025

स्थायी समिती सदस्य होण्यासाठी माझ्याकडे संजय राऊतानी 25 लाखांची केली होती मागणी; शिवसेना पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे

पुणे : दिल्लीत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना दरम्यान ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमा दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की, एक पद मिळायचं, अस वादग्रस्त विधान शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रविवारी केल.या विधानाच्या निषेधार्थ ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी पुण्यातील शिवाजीनगर भागातील मॉडेल कॉलनी येथील उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थाना बाहेर आंदोलन केले.

सविस्तर वाचा…

12:38 (IST) 25 Feb 2025

…अन् अचानक ट्रॅक्टरसमोर आला वाघ…

नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प आणि वाघांचे किस्से ऐकायला आले नाही असे कधी होत नाही. भारतातील जेवढ्या व्याघ्रप्रकल्पात घडत नसतील एवढे किस्से या व्याघ्रप्रकल्पात घडतात आणि सोशल मीडियावर व्हायरल होतात. अशाच एका छायाचित्राने सगळ्यांचे लक्ष वेधले आणि स्वतः राज्याच्या वनखात्याने त्यांच्या फेसबुक पेजवर हे छायाचित्र प्रसिद्ध केले.

सविस्तर वाचा…

12:25 (IST) 25 Feb 2025

स्नॅपचॅटवरील मित्राने अल्पवयीन मुलीला धमकावले, नाशिकमधील तरुणाला अटक

मुंबई : स्नॅपचॅटवर झालेल्या मैत्रीनंतर मुलीला तिच्या अश्लील छायाचित्रांद्वारे धमकावणाऱ्या २३ वर्षीय तरूणाला निर्मल नगर पोलिसांनी सोमवारी अटक केली. गेल्या वर्षभरापासून आरोपी पीडित मुलीला धमकावत होता, अखेर त्रासाला कंटाळून तिने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली.

सविस्तर वाचा…

12:20 (IST) 25 Feb 2025

वाळव्यात आढळली काताळशिल्पे

सांगली : सजृनशीलतेची प्रतिके असलेली कातळशिल्पे वाळवा तालुक्यातील विविध भागात आढळत असून अशाच पध्दतीची कातळशिल्पे मानवी उत्क्रांतीमधील महत्वाचा टप्पा मानली जात आहेत.सचिन भगवान पाटील हे युवा संशोधक या काताळशिल्पाबरोबरच चक्रव्यूहांचा अभ्यास करत आहेत.

सविस्तर वाचा…

12:17 (IST) 25 Feb 2025

डोंबिवलीतील बेकायदा बांधकामांचा म्होरक्या ठाण्यात, मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांची टीका

ठाणे : मनसे नेते राजू पाटील यांच्या टीकेचा सर्व रोख कल्याण-डोंबिवली शहरांवर नियंत्रण ठेवणाऱ्या ठाण्यातील दोन नेत्यांवर आहे.

सविस्तर वाचा….

11:48 (IST) 25 Feb 2025

संतोष देशमुख हत्या प्रकरणी मस्साजोग ग्रामस्थांचे आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरू

छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामस्थांनी आजपासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला सातवा आरोपी कृष्णा आंधळे याला तत्काळ अटक करावी, या हत्येप्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी, आदी प्रमुख मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा मागील आठवड्यात देण्यात आला होता.

सविस्तर वाचा…

11:44 (IST) 25 Feb 2025

दुर्मीळ संकल्प ! आईचे देहदान हुकले, आता मुलं व सुनेचा मरणोत्तर देहदानाचा निर्णय

वर्धा : मातृभक्तीची उदाहरणे आता या काळात तशी दुर्मीळच. उलट आईवडीलास वृद्धाश्रमात सोडून देणारेच अधिक. म्हणून हे उदाहरण डोळ्यात पाणी आणणारेच ठरावे. आर्वी तालुक्यातील पिंपळखुटा या गावातील मुलंच नव्हे दुसऱ्या घरातून काही दिवसांपूर्वीच सून म्हणून आलेल्या मुलीनेही सासूला अनोखी श्रद्धांजली वाहण्याचा तत्पर संकल्प सोडला आहे.

सविस्तर वाचा…

11:44 (IST) 25 Feb 2025

Ravindra Dhangekar on Joining Shivsen: रवींद्र धंगेकर खरंच शिवसेनेत जाणार?

काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यासंदर्भात खुद्द रवींद्र धंगेकरांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे. “मी काँग्रेसमध्ये चांगलं काम करतो, पक्षाशी माझा संवाद चांगला आहे. अध्यक्षांशीही मी बोललो. मध्यंतरी शिवजयंतीच्या दिवशी मिरवणुकीत भगवा घातलेला माझा फोटो चांगला आला. पण त्यात काहीही नव्हतं. त्यावरून अशीच चर्चा सुरू झाली”, असं ते म्हणाले. “फक्त कुणाची गाठभेट घेतली म्हणजे लगेच त्या पक्षात जाणार असं नसतं”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

11:40 (IST) 25 Feb 2025

सत्तर लाख रुपयांच्या गुंतवणूक फसवणुकीचे प्रकरण, ठाणे येथील शाळेच्या माजी मुख्याध्यापिकेला उच्च न्यायालयाकडून जामीन

मुंबई : सत्तर लाख रुपयांच्या गुंतवणुकीशी संबंधित फसवणूक प्रकरणात मृत पतीला मदत केल्याचा आरोप असलेल्या ठाणे येथील आंतरराष्ट्रीय मंडळाच्या शाळेच्या माजी मुख्याध्यापिकेला उच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला.

सविस्तर वाचा….

11:16 (IST) 25 Feb 2025

डोंबिवली : एमबीबीएसला प्रवेश मिळवून देतो सांगून १६ लाखाची फसवणूक

डोंबिवली – आम्ही शिक्षण क्षेत्रातील उच्चपदस्थ आहोत. आपल्या मुलीला आम्ही शासकीय कोट्यातून एम. बी. बी. एस. या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून देतो, असे सांगून बदलापूर आणि उल्हासनगरमधील तीन जणांनी डोंबिवली एमआयडीसीत राहणाऱ्या एका नागरिकाकडून १६ लाख ८० हजार रूपये उकळले.

सविस्तर वाचा…

नीलम गोऱ्हे यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राचं राजकारण कसं ढवळून निघालं? (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

Maharashtra Live News Update Today, 25 February 2025 : जाणून घ्या राज्यभरातली बित्तंबातमी एका क्लिकवर!