Maharashtra Breaking News शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या वाद निर्माण झाला आहे. त्यावर संजय राऊतांनी टीका केल्यानंतर त्यासंदर्भात सर्वच पक्षातील नेतेमंडळी प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. एकीकडे या मुद्द्यावर राजकारण रंगत असताना दुसरीकडे यापुढे मंत्र्यांचे पीए, ओएसडी यांच्या नेमणुकांवर मुख्यमंत्री कार्यालयाची बारीक नजर असणार आहे. यासंदर्भात विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं जात आहे.

Live Updates

Maharashtra 25 February 2025 : महाराष्ट्रातील सर्व राजकीय घडामोडींचा धावता आढावा!

11:01 (IST) 25 Feb 2025

Massajog Protest: मस्साजोगमध्ये ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन सुरू

सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांवर अद्याप कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ बीडच्या मस्साजोगमध्ये ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे.

10:46 (IST) 25 Feb 2025

खालापुर तालुक्यातील तीन डान्सबारवर पोलिसांची कारवाई, ३२ बारबालासह ४० आरोपीवर गुन्हे दाखल

अलिबाग : खालापुर पोलीस ठाणे हद्दीत तीन डान्सबार रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) छापा टाऊन कारवाई केली. या कारवाईत ३२ बारबालासह ४० आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.खालापुर पोलीस ठाणे हद्दीत डान्सबारमध्ये बारबाला अश्लील हावभाव, संगिताचे तालावर बीभत्स नृत्य करतात. या बारमध्ये बांगलादेशी व अल्पवयीन बारबाला आहेत माहितीत पोलिसांना मिळाली होती.

सविस्तर वाचा…

10:45 (IST) 25 Feb 2025

१.४ अब्ज डॉलर्सच्या कर वसुलीचे प्रकरण : स्कोडा फोक्सवॅगनच्या युक्तिवादावर उच्च न्यायालय सकृतदर्शनी असमाधानी

मुंबई : आयातीबाबत दिशाभूल करणारी माहिती दिल्याबद्दल सीमाशुल्क विभागातर्फे बजावण्यात आलेल्या १.४ अब्ज डॉलर्सच्या कर वसुली नोटिशीप्रकरणी स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाने केलेला युक्तिवाद सकृतदर्शनी असमाधानी असल्याचे मत उच्च न्यायालयाने सोमवारी नोंदवले.

सविस्तर वाचा….

10:44 (IST) 25 Feb 2025

रायगड एकात्मिक बाल विकास विभागातही ४ कोटींचा अपहार, नाना कोरडे यांच्या अन्य सह दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल

अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेतील अपहार प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. पाणी पुरवठा विभागापाठोपाठ आता एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प योजनेतही ४ कोटी १२ लाख रुपयांचा अपहार झाल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी अपहार प्रकरणाचा मुख्य सुत्रधार नाना कोरडे यांच्या समवेत अन्य दोन कर्मचाऱ्यांवर अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

10:43 (IST) 25 Feb 2025

माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन, पालिकेच्या ३९ अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

वसई : वसई विरार महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन केले जात असल्याचे उघड झाले आहे. वेळेत माहिती न देणे, चुकीची आणि अपूर्ण माहिती देणे असे प्रकार घडत आहे. माहिती अधिकार कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन केल्या प्रकरणी वसई-विरार महापालिकेच्या ३९ अधिकाऱ्यांवर माहिती आयोगाने दंडात्मक (शास्ती) कारवाई केली आहे.

सविस्तर वाचा…

10:42 (IST) 25 Feb 2025

शाळा १ एप्रिल नव्हे; जूनमध्येच सुरू; शिक्षण राज्यमंत्र्यांच्या ‘माहिती’वर शिक्षण आयुक्तांचे स्पष्टीकरण!

पुणे : शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे शिक्षण राज्यमंत्र्यांनी दोनच दिवसांपूर्वी सांगितलेले असताना, शिक्षण आयुक्तांनी मात्र येत्या शैक्षणिक वर्षात प्रचलित पद्धतीनुसार शाळा जूनमध्येच सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.‘आगामी शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू करण्याचा प्रयत्न असून, याबाबत अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून काम सुरू केले आहे,’ असे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी नुकतेच पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले होते.

सविस्तर वाचा…

10:41 (IST) 25 Feb 2025

विरार मध्ये तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार, आरोपी फरार

वसई : मित्राच्या मुलीसह तिच्या दोन मैत्रीणीवर एका इमसाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना विरार येथे घडली आहे. या तिन्ही मुली अल्पवयीन असून त्यातील दोन मुली या सख्ख्या बहिणी आहेत. या प्रकरणी तक्रार दाखल होताच आरोपी फरार झाला आहे.

सविस्तर वाचा…

10:40 (IST) 25 Feb 2025

सहाशे कोटी कूट चलन गैरव्यवहार; ईडीकडून मुंबई, दिल्ली व जयपूरमध्ये छापे

मुंबई : सहाशे कोटी रुपयांच्या कूटचलन(क्रिप्टोकरन्सी) गैरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने दिल्ली, मुंबई आणि जयपूर येथे छापे टाकले. ही कारवाई परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) अंतर्गत करण्यात आली. संशयीत कूट चलनाचे भारतीय चलनात रूपांतरण आणि भारतीय कूट चलन एक्सचेंजच्या माध्यमातून बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांना मदत केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती ईडीकडून देण्यात आली

सविस्तर वाचा…

10:40 (IST) 25 Feb 2025
Sanjay Raut on CM Devendra Fadnavis: मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो – संजय राऊत

अजित पवारांना त्यांच्या मर्यादा माहिती आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांचा ते आदर राखतात. अजित पवार हे काही पाप धुवायला प्रयागराजला गेलेले नाहीत. काहींनी तर गेल्या अडीच वर्षांत इतकं पाप केलंय, की गेल्या अडीच वर्षांत या पापाचा कडेलोट झालाय. या सर्व मंत्र्यांच्या पीएंना रोखल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करतो. आमच्यात जरी राजकीय मतभेद असले, तरी राज्याच्या हितासाठीच्या अशा निर्णयांना आम्ही पाठिंबा देतो – संजय राऊत

10:39 (IST) 25 Feb 2025

मुंबईत आज उष्णतेची लाट; शहरासह उपनगरे, रायगड, रत्नागिरीही तापणार

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबई व परिसरात जाणवणाऱ्या उष्म्यात सोमवारी वाढ झाली. आजही अशीच स्थिती कायम राहील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यानुसार मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा…

10:38 (IST) 25 Feb 2025

बालभारती – पौडफाटा रस्त्याबाबत महापालिकेने घेतला महत्वाचा निर्णय !

पुणे : वाहतुकीची कोंडी सोडविण्याासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणाऱ्या बालभारती ते पौड फाटा या रस्त्याला पुन्हा न्यायालयीन प्रक्रियेचा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी महापालिका सतर्क झाली आहे. या रस्त्याच्या कामाला स्थगिती देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात पर्यावरणवाद्यांनी दाद मागितल्यास न्यायालयाने महापालिकेची बाजू ऐकून न घेता कोणताही निर्णय देऊ नये, यासाठी महापालिकेने ‘कॅव्हेट’ दाखल केले आहे.

सविस्तर वाचा…

10:38 (IST) 25 Feb 2025
Sanjay raut on minister pa and osd issue – माझ्याकडे त्या सर्व मंत्र्यांची नावं आहेत – संजय राऊत

मंत्र्यांकडून जी यादी आली पीए, ओएसडीसाठी, त्यातले १६ जण दलाल आणि फिक्सर होते. माझं मुख्यमंत्र्यांना आणि राज्याच्या मुख्य सचिवांना आव्हान आहे की कोणत्या मंत्र्यांनी आपले ओएसडी किंवा पीए म्हणून अशा फिक्सर्सची नावं पाठवली, त्यांची नावं तुम्ही जाहीर करा. जनहितासाठी तुम्ही हे जाहीर करा. माझ्या माहितीप्रमाणे हे मंत्री शिंदे गटाचे आहेत. नाहीतर मी नावं देईन. माझ्याकडे १६ मंत्र्यांची नावं आहेत. त्यात १३ मंत्री शिंदेंचे आणि उरलेले मंत्री अजित पवार गटाचे आहेत. – संजय राऊत

10:34 (IST) 25 Feb 2025

Sanjay Raut: “संजय राऊत दिल्लीत काय दिवे लावतात आम्हाला माहिती आहे”

संजय राऊत आकाशातून उतरलेलं विमान आहे. त्यांना कधी काय साक्षात्कार होईल काही सांगता येत नाही. ते रोज उठून एक आकाशवाणी करत असतात. ते नीलम गोऱ्हेंविषयी बोलले. एक महिला राजकारणात उच्चपदावर आहेत. संजय राऊत दिल्लीत काय दिवे लावतात हे आम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यामुळे संजय राऊतांनी शिवसेनेची कळ काढू नये. संजय राऊतानी उरला-सुरला पक्ष संपुष्टात आणायचा निर्णय घेतला असेल. संजय राऊत जेव्हा बोलतात, तेव्हा आमच्याकडे चार माणसं आणखी वाढतात.

धैर्यशील माने, शिवसेना नेते

नीलम गोऱ्हे यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राचं राजकारण कसं ढवळून निघालं? (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

Maharashtra Live News Update Today, 25 February 2025 : जाणून घ्या राज्यभरातली बित्तंबातमी एका क्लिकवर!