Marathi News LIVE Updates : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेला प्रवेश नाकारण्यात आल्याने प्रसुतीदरम्यान तिचा मृत्यू झाला. तिने जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. या सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीने रविवारी ईश्वरी भिसे यांच्या घरी जाऊन त्यांच्या नातेवाइकांचे जबाब नोंदविले. ईश्वरी यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आले त्या दिवशी नेमके काय घडले, हे समितीने नातेवाइकांकडून जाणून घेतले, अशी माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर एका पत्रकाराच्या वृत्ताचा हवाला देत आरोप केलेत. या आरोपांवरून दोन्ही नेत्यांमध्ये द्वंद्व सुरू आहे.

Live Updates

Mumbai-Maharashtra News Live Today, 7 April 2025 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा

20:59 (IST) 7 Apr 2025
कुडाळ मध्ये पोलिस हवालदाराने गळफास घेऊन केली आत्महत्या
पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार सुरज अनंत पवार हे कुडाळ पोलीस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत होते. …Read Full Details
20:53 (IST) 7 Apr 2025
नाशिक तापले…पारा ४०.३ अंशांवर
अतिवृष्टी, कडाक्याची थंडी अनुभवल्यानंतर नाशिकची वाटचाल आता तीव्र उन्हाळ्याकडे झाली आहे. …Read Full Details
20:48 (IST) 7 Apr 2025
भाईंदर : माझी वसुंधरा महोत्सवात नियोजनाचा अभाव, विद्यार्थ्यांना गैरसोयींचा फटका
पंचतत्वावर आधारित असलेल्या मूल्यांची जनजागृती करण्यासाठी मिरा भाईंदर महानगरपालिकामार्फत ‘माझी वसुंधरा २०२५’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. …Read Full Details
20:41 (IST) 7 Apr 2025
शेतकरी कर्जमाफीसाठी येवल्यात बैलगाडी मोर्चा
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी येवला तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. …Read Full Details
20:38 (IST) 7 Apr 2025
पिंपरी-चिंचवड: एक हात, पाय आणि मुंडकं नसलेला मृतदेह; अवयव शोधण्यासाठी ड्रोनची मदत
दगडाच्या खाणीत एक हात, पाय आणि मुंडक नसलेला मृतदेह पोलिसांना आढळला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. …Read Full Details
20:27 (IST) 7 Apr 2025
वसई : शोभायात्रेवर अंडीफेकीनंतर तणाव निवळला, ४ संशयित ताब्यात
विरार मध्ये सकल हिंदू समाजाद्वारे रविवारी संध्याकाळी रामनवमीनिमित्ताने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. …Read More
20:22 (IST) 7 Apr 2025
श्री काळाराम मंदिराच्या अध्यक्षांना हटविण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
साधारणत: अडीच दशकांपूर्वी न्यायालयाने नैवेद्य मंदिराचे विश्वस्त मंडळ अथवा पुजाऱ्यांनी करावा, असे सूचित केले होते. …Read Full Details
19:18 (IST) 7 Apr 2025
बोरिवलीत बेस्ट बस खाली चिरडून तीन वर्षीय मुलीचा मृत्यू
बोरिवली येथे सोमवारी दुपारी बेस्ट बस खाली तीन वर्षांची चिमुरडी चिरडली. या अपघातात गंभीर जखमी मुलीला कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. …Read More
19:14 (IST) 7 Apr 2025
‘आरे वाचवा’ आंदोलनातून मुंबईच्या बदलत्या वातावरणाकडे बोट; कांचा गचिबोवली वृक्षतोड प्रकरणीही आवाज उठविला
आरेमध्ये होणाऱ्या बांधकामांवर योग्य ती कारवाई व्हावी, तसेच आरे जंगलाचा होणारा ऱ्हास थांबवावा यासाठी पर्यावरणप्रेमी दर रविवारी ‘आरे वाचवा’ ही मोहीम राबवित आहेत. …Read Full Details
19:09 (IST) 7 Apr 2025
जळगावमध्ये सोने दरातील घसरण सुरूच
सोने दराने एक एप्रिलला प्रतितोळा ९४ हजार ३४८ रुपयांपर्यंत मजल मारत नवा उच्चांक केला होता. …Read More
18:27 (IST) 7 Apr 2025
गडकरींच्या जिल्ह्यात कचरा, प्लास्टिकपासून रस्त्याचे बांधकाम…
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्यात कचरा- प्लास्टिकपासून रस्ता निर्मिती केली गेली. …Read More
18:21 (IST) 7 Apr 2025
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदवार्ता! पुणे-नागपूरदरम्यान अतिरिक्त…
उन्हाळ्यातील प्रवाशांची मोठ्या प्रमाणातील गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने पुणे ते नागपूर दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. …Learn More
18:12 (IST) 7 Apr 2025
मुंबई पोलीस दल झाले अद्ययावत; मुंबई पोलिसांच्या सायबर प्रयोगशाळेसह विविध उपक्रमांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
सायबर प्रयोगशाळेसह मुंबई पोलिसांच्या विविध उपक्रमांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी लोकार्पण करण्यात आले. भविष्यात सायबर गुन्हे रोखणे व सायबर गुन्हेगारांना पकडण्याचे मोठ्या आव्हान आहे. …Learn More
18:12 (IST) 7 Apr 2025
मंदिर प्रवेशासाठी सोवळे आणि जानवे खरंच आवश्यक आहे का? आध्यात्मिक महत्त्व, नियमाबद्दल मंदिर महासंघाची भूमिका काय…
तुम्ही सोवळे (पवित्र धोतर) घातलेले नाही, जानवे नाही, नेहमीच्या वस्त्रात दर्शन शक्य नाही, असे कारण देत भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांना मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली. …Read Full Details
18:09 (IST) 7 Apr 2025

रुग्णाची माहिती रुग्णालयाने सार्वजनिक केली? दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाने केला खुलासा

माध्यमांना जो अहवाल दिला, त्यामध्ये रुग्णाची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.अहवाल शासनाला पाठवला आहे. माध्यमांना जी माहिती दिली तो घटनाक्रम सांगितलेला आहे. आता मेडिकल उपचार काय दिली गेली हे शासनाच्या अहवालात आहे. पूर्वीचे काय आजार आहेत ते सांगितलेलं नाही – डॉ. धनंजय केळकर

शासनाने आम्हाला पत्र पाठवलं की डेली मेलमध्ये आलेल्या वृत्ताला उत्तर द्या. त्यावर आम्ही उत्तर दिलं होतं. त्यातील मेडिकल पार्ट काढून उत्तर दिलं – डॉ. धनंजय केळकर

18:09 (IST) 7 Apr 2025
पत्राचाळीमधील एकाही घराचा ताबा सोमवारी देता आला नाही; इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतरच घराचा ताबा घेऊ- रहिवासी ठाम
गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगर (पत्राचाळ) पुनर्विकासाअंतर्गत मूळ ६६३ भाडेकरूंच्या घरांची सोडत शुक्रवार, ४ एप्रिल रोजी काढण्यात आली. …Read Full Details
17:54 (IST) 7 Apr 2025
११० किलो वजनाच्या महिलेवर दुर्मिळ ह्रदयशस्त्रक्रिया!
पहाटे दोनच्या सुमारास पायात प्रचंड दुखत असल्याने २९ वर्षांची सुमारे ११० किलो वजनाची महिला रुग्णालयात आली. …Read Full Details
17:50 (IST) 7 Apr 2025
धोकादायक इमारतीचा भाग शेजारील घरावर कोसळला; जीवितहानी टळली पण महिला जखमी
एका इमारतीचा काही भाग शेजारच्या घरावर कोसळल्याने एक महिला जखमी होऊन घराचे नुकसान झाले आहे. उल्हासनगरच्या कॅम्प तीन भागात पार्वती प्लाझा या इमारतीच्या घराच्या गॅलरीचा काही भाग कोसळला. …Read More
17:44 (IST) 7 Apr 2025
Tanisha Bhise Death Case : “होय डॉक्टरांनी डिपॉझिट मागितले होते”, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाची कबुली; म्हणाले, “त्या दिवशी…”
भिसे कुटुंबियांना अनामत रक्कम भरण्यास सांगण्यात आले होते का? डॉक्टर अशा पद्धतीने डिपॉझिट भरण्यास सांगू शकतात का? असे प्रश्न डॉ. धनंजय केळकर यांना विचारण्यात आले होते. …Read More
17:41 (IST) 7 Apr 2025
कांदिवलीमध्ये दोन वृद्ध महिलांना टेम्पोची धडक; एका महिलेचा मृत्यू, आरोपी चालकाला अटक
घिवाला काही वस्तू खरेदी करण्यासाठी शनिवारी सायंकाळी घरातून बाहेर पडल्या. …Read Full Details
17:34 (IST) 7 Apr 2025
बागेश्वर बाबामुळे आयोजक अडचणीत; आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजकांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम भिवंडीत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात रात्री ११ पर्यंत ध्वनीक्षेपक सुरू ठेवल्याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. …Learn More
17:34 (IST) 7 Apr 2025
वसईतून ११ कोटींचे अमली पदार्थ जप्त, एका चावीने उघडला अमली पदार्थांचा खजिना
आरोपी व्हिकटर हा मागील १० वर्षांपासून नालासोपारा येथे वास्तव्य करत आहे. २०२४ मध्ये त्याच्याविरोधात मुंबईच्या आझाद मैदान पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रकरणात (एनडीपीएस ॲक्ट) गुन्हा दाखल आहे. …Read Full Details
17:32 (IST) 7 Apr 2025
पालघर : मोखाड्यात माकडाचा आठवड्याभरापासून उच्छाद, १४ नागरिकांना चावा घेत केले जखमी
गेल्या काही दिवसांपासून पवारपाडा ते जव्हार फाटा दरम्यान एक मोठे माकड (लाल तोंडाचे) फिरत असून हे कदाचित जंगलातून रस्ता चुकल्याने भरकटले आहे. …Read Full Details
17:29 (IST) 7 Apr 2025
नॅशनल स्टाॅक एक्सचेंज ऑफ इंडियाच्या मुख्यालयाचा विस्तार करणार; बीकेसीतील ५,५०० चौरस मीटर भूखंड ७५७.९० कोटी रुपयात एनएसईला
भारतातील एक महत्त्वाची वित्तीय संस्था म्हणून ओळख असलेल्या नॅशनल स्टाॅक एक्सचेंजचे (एनएसई) मुख्यालय वांद्रे – कुर्ला संकुल येथील जी ब्लाॅकमध्ये आहे. …Read Full Details
17:18 (IST) 7 Apr 2025
मुंबई : अधिकारी कारवाई केव्हा करणार ? कांजूरमार्ग दुर्गंधीप्रकरणी संतप्त नागरिकांचा सवाल
दुर्गंधीमुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याच्या भितीने येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. दुर्गंधीमुळे संसर्गजन्य आजार बळाविण्याची भिती व्यक्त केली जात आहे. …Learn More
17:15 (IST) 7 Apr 2025

होय डॉक्टरांनी डिपॉझिट मागितले होते”, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची कबुली; म्हणाले, “त्या दिवशी…”

आमच्याकडे डिपॉझिट मागायची पद्धत डॉक्टरांना नाही. खर्चाचे अंदाजपत्रक प्रत्येक रुग्णाला दिला जातो. डिपॉझिट लिहायची पद्धतच नाही. त्यादिवशी कोणत्या कारणाने राहू केतू काय डोक्यात मध्ये आला, त्या डॉक्टरांनी चौकोनात १० लाखांचं डिपॉझिट लिहिलंय आहे. ही गोष्ट खरी आहे. यापैकी तुम्ही कोणालाही विचारू शकता. आजवर मी अगणित शस्त्रक्रिया केल्या आहेत, पण आतापर्यंत कोणालाही असं लिहून दिलं नाही – डॉ. धनंजय केळकर,

17:11 (IST) 7 Apr 2025
पाण्यासाठी त्र्यंबकेश्वर पंचायत समितीत आदिवासींचा ठिय्या
जाेपर्यंत वाडीवर टँकर येत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील, असा इशारा आंदोलकांनी दिला. …Read More
17:08 (IST) 7 Apr 2025
सायबर जनजागृतीसाठी पोलीस दलाचे विविध उपक्रम, वाढते गुन्हे रोखण्यासाठी प्रयत्न
सायबर गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता पोलीस दलाकडून विविध उपक्रम जिल्ह्यात सुरू आहेत. …Read More
17:01 (IST) 7 Apr 2025
कल्याण पूर्व कोळसेवाडी विभागाचा वीज पुरवठा मंगळवारी सात तास बंद
कल्याण पूर्व कोळसेवाडी भागातील अनेक नागरिकांचा व्यवसाय वीजेवर अवलंबून आहे. …Read Full Details
17:00 (IST) 7 Apr 2025
गोदा प्रदूषणावरून मनसे आक्रमक- आंदोलनाचा इशारा
प्रशासनाच्या कार्यशैलीमुळे गोदावरीचे पावित्र्य संकटात सापडले असून गोदावरी प्रदूषणाच्या मुद्यावरून शेतकरी, साधू-संत यांना बरोबर घेऊन आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे. …Read More

महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन

Mumbai-Maharashtra News Live Today, 7 April 2025 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा