Marathi News Updates : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेला प्रवेश नाकारण्यात आल्याने प्रसुतीदरम्यान तिचा मृत्यू झाला. तिने जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. या सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीने रविवारी ईश्वरी भिसे यांच्या घरी जाऊन त्यांच्या नातेवाइकांचे जबाब नोंदविले. ईश्वरी यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आले त्या दिवशी नेमके काय घडले, हे समितीने नातेवाइकांकडून जाणून घेतले, अशी माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर एका पत्रकाराच्या वृत्ताचा हवाला देत आरोप केलेत. या आरोपांवरून दोन्ही नेत्यांमध्ये द्वंद्व सुरू आहे.

Live Updates

Mumbai-Maharashtra News Today, 7 April 2025 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा

10:14 (IST) 7 Apr 2025
Shobha Fadnavis: “..तर लोक भाजपाची काँग्रेस झाली म्हणतील”, मुख्यमंत्र्यांच्या काकू शोभा फडणवीसांची आगपाखड; चंद्रपुरातील अंतर्गत वादावर नाराजी!
Shobha Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काकू शोभा फडणवीस यांची पक्षांतर्गत वादावर नाराजी! …Read Full Details
09:38 (IST) 7 Apr 2025
“माझं नाव घेऊन…”, महिला IAS अधिकाऱ्याशी संबंध असल्याच्या प्रकरणावरून खडसेंचा महाजनांवर पलटवार

एका महिला अधिकाऱ्याशी गिरीश महाजनांचं बोलणं झालं, हा आरोप मी केलेला नाही. हा आरोप गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी केला आहे. अमित शाहांच्या सीडीआरचा उल्लेख करत हा आरोप केला आहे. त्यामुळे उगाचच गिरीश महाजनांनी माझ्या नाव घेऊन आदळआपट करण्याची आवश्यक नाही. त्यांना काही सांगायचं असेल तर त्यांनी अनिल थत्तेंकडे मागावेत. नाथाभाऊचे नाव कशाला घेता, मी आरोप केलेले नाहीत. अनिल थत्तेंच्या चॅनेलचा हवाला देऊन मी बोललो. यामागचं सत्य काय आहे ते सांगा अन्यथा अनिल थत्तेंवर कारवाई करा – एकनाथ खडसे

महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन

Mumbai-Maharashtra News Today, 7 April 2025 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा