Marathi News Updates : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेला प्रवेश नाकारण्यात आल्याने प्रसुतीदरम्यान तिचा मृत्यू झाला. तिने जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. या सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीने रविवारी ईश्वरी भिसे यांच्या घरी जाऊन त्यांच्या नातेवाइकांचे जबाब नोंदविले. ईश्वरी यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आले त्या दिवशी नेमके काय घडले, हे समितीने नातेवाइकांकडून जाणून घेतले, अशी माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर एका पत्रकाराच्या वृत्ताचा हवाला देत आरोप केलेत. या आरोपांवरून दोन्ही नेत्यांमध्ये द्वंद्व सुरू आहे.
Mumbai-Maharashtra News Today, 7 April 2025 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा
रुग्णाची माहिती रुग्णालयाने सार्वजनिक केली? दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाने केला खुलासा
माध्यमांना जो अहवाल दिला, त्यामध्ये रुग्णाची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.अहवाल शासनाला पाठवला आहे. माध्यमांना जी माहिती दिली तो घटनाक्रम सांगितलेला आहे. आता मेडिकल उपचार काय दिली गेली हे शासनाच्या अहवालात आहे. पूर्वीचे काय आजार आहेत ते सांगितलेलं नाही – डॉ. धनंजय केळकर
शासनाने आम्हाला पत्र पाठवलं की डेली मेलमध्ये आलेल्या वृत्ताला उत्तर द्या. त्यावर आम्ही उत्तर दिलं होतं. त्यातील मेडिकल पार्ट काढून उत्तर दिलं – डॉ. धनंजय केळकर
होय डॉक्टरांनी डिपॉझिट मागितले होते”, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची कबुली; म्हणाले, “त्या दिवशी…”
आमच्याकडे डिपॉझिट मागायची पद्धत डॉक्टरांना नाही. खर्चाचे अंदाजपत्रक प्रत्येक रुग्णाला दिला जातो. डिपॉझिट लिहायची पद्धतच नाही. त्यादिवशी कोणत्या कारणाने राहू केतू काय डोक्यात मध्ये आला, त्या डॉक्टरांनी चौकोनात १० लाखांचं डिपॉझिट लिहिलंय आहे. ही गोष्ट खरी आहे. यापैकी तुम्ही कोणालाही विचारू शकता. आजवर मी अगणित शस्त्रक्रिया केल्या आहेत, पण आतापर्यंत कोणालाही असं लिहून दिलं नाही – डॉ. धनंजय केळकर,
महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन
Mumbai-Maharashtra News Today, 7 April 2025 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा