Maharashtra Breaking News Updates : सामजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्याचे भासवून निधी मंजूरीचा जीआर काढल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. मात्र हे आरोप धनंजय मुंडे यांनी फेटाळून लावले असून न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. याबरोबरच राजन साळवी यांनी पक्ष सोडल्यानंतर उद्धव ठाकरे हे आज त्यांच्या पक्षाच्या आमदारांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. याबरोबरच राज्यात मुंबई आणि पुणे येथे गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस)च्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. यासह राज्यातील वेगवेगळ्या राजकीय घडामोडींच्या अपडेट आपण येथे पाहाणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Live Updates

Maharashtra News Live Update Today, 20 February 2025 : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

20:23 (IST) 20 Feb 2025

विभागीय मंडळांतर्गत ६४४ परीक्षा केंद्र, दहावीची परीक्षा उद्यापासून

छत्रपती संभाजीनगर : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षा शुक्रवारपासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी छत्रपती संभाजीनगर विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळांतर्गत येत असलेल्या पाच जिल्ह्यांसाठी ६४४ परीक्षा केंद्र आहेत. तर १ लाख ८८ हजार ७७७ नियमित विद्यार्थी असल्याची माहिती मंडळाकडून मिळाली.

वाचा सविस्तर…

20:21 (IST) 20 Feb 2025

शिर्डीत भिक्षेकरी धरपकड मोहीम, ७२ भिकाऱ्यांवर कारवाई

शिर्डीतील घडलेल्या दुहेरी हत्याकांड नंतर पोलिस प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून गुरुवारी सकाळीच पोलीस, शिर्डी नगरपंचायत व साईबाबा संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने भिक्षेकर धरपकड मोहीम दिवसभर राबविण्यात आली.

वाचा सविस्तर…

19:36 (IST) 20 Feb 2025

पालघर : जिल्ह्यात अनेक गोष्टी खटकणाऱ्या, जनता दरबारात प्रशासकीय यंत्रणेच्या कामकाजावर पालकमंत्र्यांची नाराजी

पालकमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबारात पालघर प्रशासकीय कामकाजावर नाराजी व्यक्त केली.

वाचा सविस्तर…

19:10 (IST) 20 Feb 2025

नक्षलवाद्यांना गावात येण्यास मनाई, गडचिरोलीतील अतिदुर्गम पोयारकोठी आणि मरकणारच्या ग्रामस्थांकडून…

गडचिरोली : अतिदुर्गम भागातील गावांनी नक्षलवाद्यांना गावात येण्यास मनाई केली आहे. भामरागड तालुक्यातील पोयारकोठी आणि मरकणारच्या ग्रामस्थांनी ठराव घेत गावबंदी केली. यामुळे पुन्हा एकदा नक्षलवाद्यांना धक्का बसला आहे.

वाचा सविस्तर…

18:51 (IST) 20 Feb 2025

एका कुटुंबाचा वर्षभरात आरोग्यावर खर्च किती? अर्थ व सांख्यिकी संचालनालय करणार सर्वेक्षण

प्रत्येक कुटुंबाच्या आरोग्यावर होणाऱ्या खर्चाचे सर्वेक्षण अर्थ व सांख्यिकी संचालनालय करणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विषयक योजनांची आखणी करतांना त्याचा उपयोग केला जाणार असल्याची माहिती आहे.

वाचा सविस्तर…

18:50 (IST) 20 Feb 2025

सूनेला पेटवून देणाऱ्या सासू-नणंदेला जन्मठेप

पुणे : स्वयंपाक करण्यावरुन झालेल्या वादातून सुनेला शिवीगाळ, तसेच अंगावर रॉकेल ओतून पेटवून देणाऱ्या सासू आणि नणंदेला अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रभाकर जाधव यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मूत्यूपूर्व जबाब, तसेच साक्ष, पुरावे ग्राह्य धरुन न्यायालयाने सासू आणि नणंदेला दोषी ठरविले.

वाचा सविस्तर…

18:46 (IST) 20 Feb 2025

दादरच्या भागोजी कीर हिंदू स्मशानभूमीत प्रार्थनागृह, स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी; महानगरपालिका आयुक्तांचे आदेश

मुंबई : दादर येथील कै. भागोजी बाळूजी कीर हिंदू स्मशानभूमीमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या प्रार्थनागृहांची आणि स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी. तसेच, स्मशानभूमी परिसरामध्ये हिरवळीसह उत्तम नागरी सेवा – सुविधा पुरवाव्यात, असे आदेश महानगरपालिका आयुक्त तसेच प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत.

वाचा सविस्तर…

18:44 (IST) 20 Feb 2025

शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी १२ मार्चला मुंबईत मोर्चा- सतेज पाटील

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाला ठराविक शेतकऱ्यांचा विरोध आहे असे सांगून राज्य शासनाकडून दिशाभूल केली जात आहे. कोल्हापूर सह सर्व १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा या कंत्राटदारधार्जिण्या प्रकल्पास प्रखरपणे विरोध आहे.

वाचा सविस्तर…

18:40 (IST) 20 Feb 2025

होळीनिमित्त कोकणवासीयांसाठी विशेष रेल्वेगाड्या

मुंबई : कोकण पट्ट्यात शिमगा आणि गणेशोत्सव या सणांना विशेष महत्त्व आहे. मुंबईस्थित कोकणवासीय होळीनिमित्त कोकणातील मुळगावी जाण्याच्या तयारीत आहेत. मुंबईस्थित कोकणवासीयांची रेल्वेगाडीचे तिकीट आरक्षित करण्यासाठी लगबग सुरू आहे.

वाचा सविस्तर…

18:39 (IST) 20 Feb 2025

“मंत्री धनंजय मुंडेंवर आरोपांची मालिका सुरू”, मंत्री आदिती तटकरे काय बोलून गेल्या?

पिंपरी- चिंचवड : मंत्री अदिती तटकरे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या बाबत विधान केलं आहे. धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांची मालिका सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एक चौकशी करत आहेत. आरोप सिद्ध झाल्यास राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. असं अदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.

वाचा सविस्तर…

18:39 (IST) 20 Feb 2025

लोणी काळभोर भागातील गावठी दारू अड्ड्यावर छापा

पुणे : लोणी काळभोर भागातील रामदरा परिसरात असलेल्या गावठी दारू तयारी करणाऱ्या अड्ड्यावर गुन्हे शाखने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी दीड हजार लिटर दारू, २० हजार लिटर रसायन, तसेच अन्य साहित्य असा अकरा लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

वाचा सविस्तर…

18:37 (IST) 20 Feb 2025

शिवसेना ठाकरे गटाला खिंडार! एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत उद्या…

नागपूर : आज पुन्हा एकदा एक मोठा धक्का ठाकरे गटाला बसला आहे. शिवसेना ठाकरे गटातून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राजू हरणे ते त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह शुक्रवारी शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कन्हान येथील सभेदरम्यान प्रवेश करणार आहेत.

सविस्तर वाचा…

18:37 (IST) 20 Feb 2025

२०० नवीन विमानांची ऑर्डर, देशाला ८ ते १० हजार पायलटची गरज – माजी मंत्री रूडी

आतापासूनच प्रशिक्षित वैमानिक घडविणे आवश्यक असले तरी प्रत्यक्षात प्रशिक्षणासाठी लागणारे विमान तुलनेने कमी असल्याने येत्या काळात प्रशिक्षण विमांनाची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती अ‍ॅरो फ्लाँईंग क्लबचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री खासदार राजीव प्रताप रूडी यांनी दिली.

वाचा सविस्तर…

18:36 (IST) 20 Feb 2025

धक्कादायक! बारावीच्या परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना मोबाईल नेऊ दिले…

नागपूर : नागपुरातील एका परीक्षा केंद्राबाहेर गुरुवारी काही पालकांनी गोंधळ घातला. परीक्षा केंद्रामध्ये काही विद्यार्थ्यांना भ्रमनध्वनी घेऊन जाताना पकडण्यात आल्याचा दावा पालकांनी केला. काही विद्यार्थ्यांना भ्रमनध्वनी नेण्यास सुविधा देण्यात आली असा आरोप पालकांचा आहे.

18:02 (IST) 20 Feb 2025

ठाण्यात भाजप आमदारांचाही जनता दरबार, आमदार आपल्या भेटीला उपक्रमातून आमदार भेटणार नागरिकांना

ठाणे : राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात शतप्रतिशत भाजपाची घोषणा करत जनता दरबार आयोजित केल्याने शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपच्या नेत्यांमध्ये शीतयुद्ध रंगले असतानाच, ठाण्यातील भाजपचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनीही आमदार आपल्या भेटीला उपक्रमांतून एकप्रकारे जनता दरबार भरविण्याचे ठरविले आहे.

सविस्तर वाचा…

17:53 (IST) 20 Feb 2025

बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकारांत छत्रपती संभाजीनगर विभाग आघाडीवर… किती गैरप्रकार उघडकीस?

पुणे : राज्य मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षेत कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र, आतापर्यंत राज्यभरात ३९ परीक्षा केंद्रांवर १५४ गैरप्रकार उघडकीस आले आहेत.

वाचा सविस्तर…

17:18 (IST) 20 Feb 2025

विधानसभाध्यक्ष कोकाटेंबाबत तत्परता दाखवतील काय? केदारांची तिसऱ्याच दिवशी आमदारची रद्द….

नागपूर : काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांना शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तिसऱ्या दिवशी केदार यांची आमदारची रद्द केली होती. आता हीच तत्परता नार्वेकर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासंदर्भात दाखवतील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना ५ वर्षांची शिक्षा झाली होती

सविस्तर वाचा…

17:01 (IST) 20 Feb 2025

ठाणे जिल्ह्यात कर्करोग रुग्णांसाठी ‘मोबाईल बस’ दिवसाला १०० हून अधिक नागरिकांची होतेय कर्करोग तपासणी

ठाणे : कर्करोगाचे निदान झाल्यानंतर मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये किंवा मुंबईतील टाटा रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांना धावाधाव करावी लागते. परंतू, ग्रामीण आणि आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांना खासगी रुग्णालयाचा खर्च परवडणारा नसतो तसेच ते मुंबईत टाटा रुग्णालयातही उपचारासाठी जाण्यास टाळाटाळ करतात. ग्रामीण भागातील कर्करुग्णांना प्राथमिक उपचार मिळावे यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने कर्करोग निदान मोबाईल बस गेल्याकाही दिवसांपासून सुरु केली आहे.

सविस्तर वाचा…

16:32 (IST) 20 Feb 2025
“शेतकऱ्यांना भिकारी म्हणणारे कृषिमंत्री…”, कोकाटेंना दोन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर काँग्रेसची मोठी मागणी

“आरोपीचे नाव : माणिकराव कोकाटे पद: महायुती सरकारमध्ये कृषी मंत्री झालेली शिक्षा: २ वर्ष कारावास, ५०,००० रुपयांचा दंड. गुन्हा: कागदपत्रांची फेरफार करून आर्थिक फसवणूक. शेतकऱ्यांना भिकारी म्हणणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने २ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. आता तरी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा! 1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर करण्यात आला आहे. यात मंत्री माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे, 50 हजार रूपयांचा दंडही कोर्टाकडून ठोठावण्यात आला आहे. इतके उद्योगी आणि तेजस्वी लोक महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात आहेत की दररोज सरकारची लाज निघत आहे. दररोज आरोप होत आहे, कोर्टाकडून शिक्षेचे आदेश निघत आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आरोपी मंत्र्यांना स्वतः क्लिनचीट देऊन त्यांची पाठराखण करत आहे!”

16:29 (IST) 20 Feb 2025

उन्हाच्या तलखीमुळे बाळाच्या शांत झोपेसाठी कसारा लोकलमध्ये झोळी

कल्याण : उन्हाचा चटका सकाळपासून वाढू लागला आहे. दुपारच्या वेळेत या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असते. अशातच दुपारच्या वेळेत कसारा लोकलमधून प्रवास करत असलेले आईच्या कडेवरील एक बाळ उन्हाची तलखी, गरम हवा यामुळे अस्वस्थ होऊन रडत होते. बाळाला हरतऱ्हेने शांत करण्याचा आई-वडिलांचा प्रयत्न सुरू होता. अखेर पालकांंनी एक नामी शक्कल लढवली. लोकलमध्ये पिशव्या ठेवण्याच मंच आणि हात दांड्याला जवळील चादरीची झोळी करून त्यात बाळाला झोपविले.

सविस्तर वाचा…

16:15 (IST) 20 Feb 2025

अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू, भिवंडीतील घटना

ठाणे : भिवंडी येथील जुन्या मुंबई-आग्रा रोडवर टँकरच्या धडकेत एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी नारपोली पोलीस ठाण्यात टँकर चालका विरोधात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा…

16:00 (IST) 20 Feb 2025

नाशिकरोडच्या नवले चाळ परिसरात खून, पोलिसांकडून तपास सुरू

नाशिकरोडच्या नवले चाळ परिसरात आज (२० फेब्रुवारी) एक खून झाल्याची घटना उजेडात आली आहे. येथे स्थानिकांना एका मोकळ्या जागेत एक मृतदेह आढळला असून अजय शंकर भंडारी असे मृताचे नाव आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. तसेच पोलिस घटनेचा तपास करत आहेत.

15:25 (IST) 20 Feb 2025

उत्तरप्रदेशातील जमिनीच्या वादातून कल्याणमध्ये भावाची हत्या, गोळीबार करणारा अटकेत

कल्याण : उत्तरप्रदेशातील जोनपूर येथील जमिनीच्या वादातून कल्याण पूर्वेतील नाना पावशे चौकातील एका इमारतीत एका इसमाने आपल्या चुलत भावाला गोळीबार करून ठार केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी तात्काळ तपास करून गोळीबार करणाऱ्या इसमाला अटक केली आहे.

सविस्तर वाचा…

15:09 (IST) 20 Feb 2025

डोंबिवलीत गणेशनगरमध्ये जलवाहिनी दुरुस्तीच्या खड्ड्यामुळे वाहतूक कोंडी

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेत रेल्वे मैदानाजवळील गणेशनगरमध्ये मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर एक महिन्यापासून एका भूमिगत जलवाहिनीमधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी खड्डा खोदून ठेवण्यात आला आहे. या खड्ड्यामुळे एक महिन्यापासून या भागात दररोज वाहन कोंडी होत आहे.

सविस्तर वाचा…

14:46 (IST) 20 Feb 2025

भीषण चकमकीत ४ महिला नक्षली ठार, हॉकफोर्स व बालाघाट जिल्हा पोलिसांची कारवाई

गोंदिया : बालाघाट जिल्ह्यात हॉकफोर्स आणि बालाघाट जिल्हा पोलीस दलाला नक्षलवादी कारवायांविरोधात मोठे यश मिळाले आहे.मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जंगल परिसरात शोध मोहीम राबविताना ठाणे गढीच्या सूपखार वन परिक्षेत्राच्या रोंडा फॉरेस्ट कॅम्पजवळ हॉकफोर्स, बालाघाट जिल्हा पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये बुधवारी १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या चकमकीत ४ महिला नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा…

14:39 (IST) 20 Feb 2025
‘इंडियाज गॉट लॅलेंट’ वाद प्रकरणात महाराष्ट्र सायबर सेलने नोंदवले ‘या’ तिघांचे जबाब

‘इंडियाज गॉट लॅलेंट’ शोमध्ये वादग्रस्त विधान केल्या प्रकरणा प्रकरणात महाराष्ट्र सायबर सेलने अभिनेता रघु राम, कॉमेडियन देवेश दीक्षित आणि युट्यूबर शाश्वत माहेश्वरी यांचे जबाब नोंदवले आहेत. याबद्दल महाराष्ट्र सायबर सेलकडून माहिती देण्यात आली आहे.

14:24 (IST) 20 Feb 2025

जिल्ह्यातील ७५८ अंगणवाडी सेविका, मदतनीसांची भरती

पुणे : जिल्ह्यात ७५८ अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची भरती केली जाणार असून, त्याबाबतची प्रक्रिया जिल्हा परिषदेकडून सुरू करण्यात आली आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता किमान १२ वी उत्तीर्ण अशी आहे. भरतीची जाहिरात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या कार्यालयासमोर लावण्यात आली आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

वाचा सविस्तर…

14:23 (IST) 20 Feb 2025

होळीपूर्वीच फुग्यावरून उल्हासनगरात राडा; दुकानात घुसून दोघांना बेदम मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

उल्हासनगर : पाण्याचा फुगा मारल्याच्या रागात एका दुकानात घुसून ७ ते ८ जणांच्या टोळीने दोघांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार उल्हासनगर शहरात समोर आला आहे. उल्हासनगरच्या कॅम्प पाचच्या दुकानात हा प्रकार झाला असून ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

सविस्तर वाचा…

14:23 (IST) 20 Feb 2025

पुण्यात महापालिकेचे पाणीही पिण्यास अयोग्य! तपासणीत जीवाणूंसह विषाणू आढळले

पुणे : सिंहगड रस्ता परिसरात गुइलेन बॅरे सिंड्रोमचा उद्रेक झाल्यानंतर महापालिकेने पाणी तपासणी मोहीम हाती घेतली. या परिसरातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी विविध ठिकाणी पाठविण्यात आले. यातून आता महापालिकेच्या पाणीपुरवठ्यासह खासगी टँकर आणि रिव्हर्स ऑस्मोसिस (आरओ) प्रकल्पांचे पाणीही पिण्यास अयोग्य असल्याचे समोर आले आहे.

वाचा सविस्तर…

14:23 (IST) 20 Feb 2025

हिंजवडी आयटी पार्कसह उद्योग क्षेत्राच्या वाहतूक कोंडीमुक्तीच्या दिशेने पाऊल

हिंजवडी आयटी पार्कसह पुण्यातील विविध एमआयडीसीमध्ये वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. वाढते नागरीकरण आणि उद्योगांचा विस्तार होऊनही पायाभूत सुविधा न वाढल्यामुळे वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अखेर ही समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक पाऊल पडले आहे.

वाचा सविस्तर…

महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट्स

Maharashtra News Live Update Today, 20 February 2025 : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर