Maharashtra Breaking News Updates : सामजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्याचे भासवून निधी मंजूरीचा जीआर काढल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. मात्र हे आरोप धनंजय मुंडे यांनी फेटाळून लावले असून न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. याबरोबरच राजन साळवी यांनी पक्ष सोडल्यानंतर उद्धव ठाकरे हे आज त्यांच्या पक्षाच्या आमदारांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. याबरोबरच राज्यात मुंबई आणि पुणे येथे गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस)च्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. यासह राज्यातील वेगवेगळ्या राजकीय घडामोडींच्या अपडेट आपण येथे पाहाणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Live Updates

Maharashtra News Live Update Today, 20 February 2025 : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

14:10 (IST) 20 Feb 2025

विमानातून निघाला धूर, इमरजन्सी लँडिग…

नागपूर : ढाकाहून दुबईकडे ४०० प्रवाशांना घेऊन निघालेल्या विमानातून अचानक धूर निघू लागला.वैमानिकाला आग लागल्याचा संशय आल्याने विमान नागपूरकडे वळण्यात आले. रात्री साडेदहाच्या सुमारास इमरजन्सी लँडिग करण्यात आले.

सविस्तर वाचा…

13:51 (IST) 20 Feb 2025

बारावीचा पेपर फुटला ? परीक्षा केंद्राबाहेर छायांकित प्रत, देवरी येथील प्रकार

नागपूर : गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथील एका परीक्षा केंद्रावर बारावी भौतिकशास्त्राचा पेपर बाहेर आला असून सर्व प्रश्न उत्तरांची छायांकित प्रत बाहेर आली आहे. बारावी परीक्षेदरम्यान केंद्रावर सर्रास कॉपी सुरू असल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला.

सविस्तर वाचा…

13:50 (IST) 20 Feb 2025

औद्योगिक वसाहतीमधील आंतरराष्ट्रीय परिषद सभागृहाची मागणी गुंडाळली, मंत्री पीयूष गोयल यांच्यासमोरील चर्चेचा सूर नकारात्मक

आंतरराष्ट्रीय परिषद सभागृहाच्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करण्यास सांगितले आहे. मात्र, सर्व शक्यता तपासून यावर निर्णय घेतला जाईल असे उत्तर गोयल यांनी पत्रकार बैठकीमध्ये दिले.

सविस्तर वाचा…

13:49 (IST) 20 Feb 2025

प्रदूषणांच्या परवानग्यांवरुन वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे तक्रारी, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंना प्रश्न सोडविण्याचे निर्देश

पर्यावरण मंत्री पद भाजपकडे असल्याने या सगळ्या प्रक्रियेमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी असल्याच्याही उद्योजकांच्या तक्रारी आहेत.

सविस्तर वाचा…

13:49 (IST) 20 Feb 2025

उद्यापासून दहावीची परीक्षा, १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थी परीक्षा देणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या माध्यमांतून राज्यभरात उद्या २१ फेब्रुवारी २०२५ पासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे.

सविस्तर वाचा…

13:48 (IST) 20 Feb 2025

पुणे : महापालिका म्हणते, जलपर्णी काढा अन् जलसंपदा विभाग म्हणतो, तुम्हीच काढा!

आरोग्य विभागाने कीटकनाशक औषधांची फवारणी बेबी कॅनॉलमध्ये सुरू केली. मात्र, जलपर्णीमुळे औषधफवारणीचा फारसा उपयोग होत नसल्याचे निदर्शनास आले.

सविस्तर वाचा…

13:46 (IST) 20 Feb 2025

कल्याण डोंबिवली पालिकेला ३४ भंगार बस विक्रीतून ८३ लाखाची रक्कम प्राप्त

कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमातील ३४ भंगार बस आणि इतर तीन लहान वाहने लिलाव प्रक्रियेच्या माध्यमातून विकून कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाला ८३ लाख ९२ हजार ७५८ रूपयांची रक्कम प्राप्त झाली आहे, सविस्तर वाचा…

13:35 (IST) 20 Feb 2025

स्कूलव्हॅन उलटली, चालकासह विद्यार्थी जखमी; सुदैवाने जिवीतहानी टळली

नागपूर : विद्यार्थ्यांना शाळेत पोहचवून देण्यासाठी उशिर होत असल्यामुळे भरधाव जाणाऱ्या स्कूलव्हॅनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वळणावर स्कूलव्हॅन उलटली. या अपघातात सहाही विद्यार्थी आणि व्हॅनचालकही जखमी झाला. हा अपघात गुरुवारी सकाळी नवीन कामठीतील गरुड चौकात झाला.

सविस्तर वाचा…

13:19 (IST) 20 Feb 2025

गंभीर आजारी असलेल्या बाळासह आईची तातडीने कारागृहातून सुटका करा, उच्च न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश

मुंबई : गेल्या ऑगस्ट २०२४ मध्ये अटक झाल्यापासून कारागृहात बंदिस्त असलेल्या याचिकाकर्त्या महिलेसह तिच्या गंभीर आजारी असलेल्या एक वर्षाच्या बाळाची तातडीने सुटका करा, असे आदेश उच्च न्यायालयाने भायखळा कारागृह प्रशासनाला दिले.

सविस्तर वाचा…

13:06 (IST) 20 Feb 2025

शिळफाटा रस्त्यावर उलट मार्गिकेतून येणाऱ्या ७१ वाहन चालकांवर गुन्हे, उलट मार्गिकेतील वाहनांमुळे दररोज वाहन कोंडी

कल्याण शिळफाटा रस्त्यावर वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी बहुतांशी वाहन चालक उलट मार्गिकेतून वाहने चालवितात. यामुळे सरळ मार्गाने येणाऱ्या वाहनांच्या मार्गात अडथळा येऊन वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. सविस्तर वाचा

12:42 (IST) 20 Feb 2025

सांगलीत माजी खासदार संजयकाका पाटील स्वगृही परतणार ?

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून मैदानात उतरलेले माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या घरवापसीचे संकेत मिळत असून पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमाला हजेरी न लावणार्या काकांनी कोल्हापुरात झालेल्या भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठकीस आवर्जुन हजेरी लावली. सविस्तर वाचा…

12:41 (IST) 20 Feb 2025

विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी या शिक्षिकेने विकले स्वत:चे दागिने

स्त्री आणि दागिना यांचे एकमेकांवर असलेले प्रेम जगजाहीर आहे. स्वत:च्या कुटुंबाच्या अडीअडचणीच्या काळात दागिने विकणं वेगळं आणि समाजासाठी दागिने विकणं वेगळं. स्वत:चे दागिने विकून विद्यार्थीरुपी हिऱ्यांना पैलू पडणाऱ्या अन्नपूर्णा मोहन या शिक्षिकेची प्रेरणादायक कहाणी. सविस्तर वाचा…

12:41 (IST) 20 Feb 2025

निसर्गलिपी : आर्किड्सची मनोहारी दुनिया

आर्किड्सना भरपूर प्रकाश, थंड सावली आणि आर्द्रता मानवते. कडक उन त्यांना अजिबात चालत नाही, त्यामुळे घरात उन येत नाही तर कोणती झाडं लावायची? असा प्रश्न असेल तर इनडोअरपेक्षा आर्किड्सचा पर्यय निवडावा. सविस्तर वाचा…

12:40 (IST) 20 Feb 2025

रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा; पनवेल शहरातील अंतर्गत मुख्य रस्ते लवकरच प्रशस्त होणार

पनवेल शहरामधील अरुंद रस्त्यांमुळे रहिवाशांना सततच्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी मुख्य रस्त्यांच्या रुंदीकरणाकडे लक्ष वेधले आहे. सविस्तर वाचा…

12:39 (IST) 20 Feb 2025

सिडकोच्या नवीन सोडतीत ‘त्या’ अर्जदारांना अर्जाशिवाय संधी; पसंतीप्रमाणे घरे न मिळालेल्या १,८८१ अर्जदारांना विशेष पर्याय

शिवजयंतीच्या मुहूर्तावर बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सिडकोच्या ‘माझ्या पसंतीचे सिडकोचे घर’ योजनेची सोडत जाहीर करण्यात आली. सविस्तर वाचा…

12:39 (IST) 20 Feb 2025

निसर्गाच्या सानिध्यात या म्हणता पण निसर्ग कुठे आहे…? नव ठाणे हवे पण शिस्तबद्ध; अभिनेता संतोष जुवेकर यांचे ठाम प्रतिपादन

वीस ते पंचवीस वर्षांपुर्वी ठाणे खूप वेगळे होते. निसर्गाच्या सानिध्यात राहता-राहता आता निसर्गच राहिलेला नाही. सध्या मिळेल त्या जागी बांध इमारत असे प्रकार सुरू असून याचा कुठेतरी विचार व्हायला हवा, असे सांगत आपले ठाणे आपणच जपले पाहिजे, असे मत अभिनेता संतोष जुवेकर यांनी व्यक्त केले. सविस्तर वाचा…

12:38 (IST) 20 Feb 2025

शेकडो बदलापूरकरांच्या उपस्थितीत शिवआरती; अश्वारूढ पुतळ्याला अभिवादनासाठी बदलापूरकरांची गर्दी

बदलापूर पश्चिमेत उल्हास नदीकिनारी नुकत्याच अनावरण झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या शिव आरतीसाठी शिवजयंतीनिमित्त बुधवारी सायंकाळी शेकडो बदलापूरकरांनी गर्दी केली. एक ताल सुरत रंगलेल्या आरतीत लहान वृद्ध दंग झाले.

सविस्तर वाचा…

12:37 (IST) 20 Feb 2025

वाढीव पाण्यासाठी पालिकेचा जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा; सुर्या, देहरजे धरणमधून प्रत्येकी शंभर तर, स्टेम आणि एमआयडीसीकडून प्रत्येकी ५० दशलक्षलीटर पाण्याची मागणी

ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी तसेच पुढील ३० वर्षांतील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पालिकेने चार स्त्रोतांमधून तीनशे दशलक्षलीटर वाढीव पाणी मिळविण्यासाठी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

सविस्तर वाचा…

12:37 (IST) 20 Feb 2025

‘चॅम्पीयन ट्रॉफी’ सुरु होताच क्रिकेट सट्टेबाज सक्रिय

क्रिकेट जगतातील ‘मिनी वल्डकप’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘चॅम्पीयन ट्रॉफी’चा पहिला सामना सुरु होताच क्रिकेट सट्टेबाज सक्रिय झाले आहेत. भारत संघाविरुद्ध होणाऱ्या प्रत्येक सामन्यावर कोट्यवधीचा सट्टा नागपुरातून लागणार असून त्यासाठी बहुतेक बुकींनी ग्रामीणमध्ये मोर्चा वळवला आहे. सविस्तर वाचा…

12:35 (IST) 20 Feb 2025

रसायनशास्त्र विकासाचा ‘एनसीएल’च्या संग्रहालयातून वेध

अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भविष्यासाठी उत्तम माहिती स्रोत विकसित करणे, तरुण आणि विद्यार्थ्यांसाठी विज्ञान शिक्षण, वैज्ञानिक माहिती देण्याच्या उद्देशाने संग्रहालयाची निर्मिती करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

12:35 (IST) 20 Feb 2025

नसबंदी आणि बिबट्याची ऊसाच्या मळ्यात धाव..

बिबट्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी बिबट्याच्या नसबंदीची मागणी जोर धरू लागली आहे. तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकाळात यासंदर्भातील एक प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला होता. सविस्तर वाचा…

12:35 (IST) 20 Feb 2025

वैद्यकीय व्यवसाय ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेतच! सर्वोच्च न्यायालयाने केले शिक्कामोर्तब

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने जुलै २०२४ मध्ये, वकील हे ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत येत नसल्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला होता.

सविस्तर वाचा…

12:34 (IST) 20 Feb 2025

धस – मुंडे मनोमीलनाच्या प्रयत्नामुळे बावनकुळे अडचणीत

धस-मुंडे भेट हा जसा मराठा समाजाला धक्का होता तसाच तो हे प्रकरण लावून धरणारे आणि यानिमित्ताने मराठा समाजाची सहानुभूती मिळवणारे धस यांच्यासाठीही होता.

सविस्तर वाचा...

12:32 (IST) 20 Feb 2025

अधिकाऱ्यांच्या शिफारसींमुळेच निधी, महापालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण !

स्वीकृत नगरसेवकांना निधी मिळवून देण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून चक्क महापालिका आयुक्तांचीच फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सविस्तर वाचा…

12:31 (IST) 20 Feb 2025

कृत्रिम बुध्दीमत्ते मुळे व्यवसाय, रोजगाराचे स्वरुप बदलणार : लेखक अच्युत गोडबोले

कृत्रिम बुध्दीमत्तेमुळे जग बदलणार आहे. रोजगाराचे, व्यवसायाचे स्वरुप बदलणार असून  जे नवीन शिकणार नाहीत ते बाहेर फेकले जातील असा इशारा लेखक अच्युत गोडबोले यांनी दिला. सविस्तर वाचा…

12:30 (IST) 20 Feb 2025

आता ‘प्लॅटफॉर्म’ तासभर आधीच निश्चित; रेल्वे प्रशासनाचे नक्की काय आहे व्यवस्थापन ?

रेल्वे स्थानकावरून प्रवास करताना निर्धारित वेळेनुसार येणारी गाडी कोणत्या ‘प्लॅटफॉर्म’वर येणार आहे, याची कल्पना आता रेल्वे प्रवाशांना एक तास अगोदर समजणार आहे.

सविस्तर वाचा…

12:30 (IST) 20 Feb 2025
महायुती सरकार ‘लाडकी बहिण’च्या लाभार्थ्यांची संख्या ही २५ टक्क्यांपर्यंत आणणार, वडेट्टीवारांचा आरोप

“निवडणुकीपूर्वी मत विकत घेण्यासाठी सरसकट महिलाना पैसे देण्यात आले, आता सरकार आल्यावर मात्र विविध अटी लावून लाभार्थी महिलांची संख्या कमी केली जात आहे. लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या ही २५ टक्के पर्यंत आणण्याचे पाप महायुती सरकार करणार आहे,” असा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

12:29 (IST) 20 Feb 2025

वायूवरील शवदाहिनीची प्रतीक्षा महिनाभरात संपुष्टात, उरण नगरपरिषदेच्या प्रदूषणविरहित वाहिनीचे काम पूर्ण

उरण नगरपरिषदेकडून पहिलाच वायुवरील शवदाहिनी प्रकल्प उभारण्यात आला आहे. एक कोटी खर्चाच्या वायू शवदाहिनी प्रकल्पामुळे वेळ, पैशाचीही मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे.

वाचा सविस्तर…

12:23 (IST) 20 Feb 2025
रेखा गुप्ता यांची दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्याबद्दल संजय राऊतांची खोचक टीका; म्हणाले, ” ज्यांनी दिल्ली महापालिकेत….”

रेखा गुप्ता यांची दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे, “एका महिलेची नियुक्ती होणे ही चांगली बाब आहे. त्या एबीव्हीपीची भाजपा कार्यकर्ता आहेत ज्यांनी दिल्ली महापालिकेत तोडफोड आणि गोंधळ घातला होता, तेथील महापौरांसमोर मोठा गोंधळ घातला होता…. त्यामळे जर अशा नेत्याला मुख्यमंत्री बनवले गेले तर ते भाजपाची चांगली निवड आहे आणि भाजपाच्या विचारधारेला धरून ही निवड आहे. एका सामान्य कार्यकर्त्याला हे पद मिळालं याचं मी स्वागत करतो. “

12:17 (IST) 20 Feb 2025

Video : शिळफाटा रस्त्यावर उलट मार्गिकेतून येणाऱ्या ७१ वाहन चालकांवर गुन्हे

शिळफाटा रस्त्यावर दररोज वाहन कोंडी होते. ही कोंडी झाली की अनेक वाहन चालक उलट मार्गिकेतून येऊन या अरूंद रस्त्यामधून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडत आहे.

वाचा सविस्तर…

महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट्स

Maharashtra News Live Update Today, 20 February 2025 : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर