Maharashtra Breaking News LIVE Updates: पुण्यातील स्वारगेट एसटी बस आगारात एका युवतीवर बुधवारी पहाटे बलात्काराची घटना घडली. या घटनेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधकांनी सरकारवर आरोप करत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. पोलिसांकडून आरोपीला पकडण्यासाठी अनेक पथके स्थापन करण्यात आली असून अद्याप आरोपी मोकाट आहे. या घटनेवर आज दिवसभरात अनेक पडसाद उमटण्याची शक्यता आहे. तसेच बीडमधील मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी आज आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे. कालच सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आज जागतिक मराठी भाषा दिन आहे. सरकार आणि काही संघटनांकडून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
Maharashtra News Highlights Today, 27 February 2025 | महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट्स
संतोष देशमुख हत्या, वाल्मीक कराडकडून खंडणी प्रकरणामध्ये दोषारोपपत्र दाखल
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या, वाल्मीक कराडकडून अवादा कंपनीकडे मागण्यात आलेली २ कोटींची खंडणी, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी (मकोका) या तिन्ही प्रकरणातील सुमारे १४०० पानांचे दोषारोपपत्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून विशेष मकाेका न्यायालयात दाखल केले.
मुंबई : कोकण रेल्वेवरील ब्लॉकमुळे रेल्वेगाड्या विलंबाने धावणार
कोकण रेल्वेवरील मुल्की स्थानकादरम्यान तांत्रिक आणि पायाभूत कामानिमित्त शनिवारी आणि रविवारी ब्लाॅक घेण्यात आला आहे.
‘नाटकात व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य हवे’, नाट्यसंमेलनानिमित्त आयोजित परिसंवादात रंगकर्मींचे एकमत
सचिन शिंदे संवादित या परिसंवादात आलोक राजवाडे, प्रतीक्षा खासनीस, युगंधर देशपांडे आणि योगेश्वर बेंद्रे यांचा सहभाग होता.
“कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज एसटी महामंडळातील अधिकाऱ्यासोबत महत्वाची बैठक घेतली. यावेळी मी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदनाद्वारे काही मागण्या केल्या होत्या. त्यापैकी जवळपास सर्वच मागण्या मान्य झाल्या आहे, याबद्दल मी मा. प्रताप सरनाईक यांचे समस्त लाडक्या बहिणींकडून आभार मानते… ST तील महिला मुलींचा प्रवास सुखकर व सुरक्षीत व्हावा यासाठी सुरक्षेची नविन SOP सरकारकडून तयार करण्यात आलीये ज्यात आता
• सर्व बसमध्ये CCTV कॅमेरा, ट्रॅकिंग सिस्टिम कंपल्सरी करण्याचे निर्देश देण्यात आले
• बंद पडलेल्या बस 15 एप्रिल पर्यंत स्क्रॅपमध्ये टाकण्याचे आदेश
• आगारात उभी असलेली सर्व भंगार वाहने हटवण्यात येणार
• सुरक्षेच्या दृष्टीने बसचे नियमित ऑडिट करण्याचे आदेश • सुरक्षा रक्षकांमध्ये महिलांची संख्या वाढवण्यात येणार
• सुरक्षेच्या दृष्टीने अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार
• एसटी महामंडळात आयपीएस अधिकारी नेमावा, अशी मागणी राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्याकडे करण्यात आली
एसटी बसमध्ये महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण निर्णय घेतले त्याबद्दल आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र जी यांचे तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे मी मनापासून आभार मानते… ,” अशी पोस्ट भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.
कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ…
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 27, 2025
मुख्यमंत्री माननीय @dev_Fadanvis ji यांच्या नेतृत्वाखाली परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज एसटी महामंडळातील @msrtcofficial अधिकाऱ्यासोबत महत्वाची बैठक घेतली. यावेळी मी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदनाद्वारे काही मागण्या केल्या… pic.twitter.com/KRIySg0zJJ
शेअर बाजारातील नुकसानीमुळे पेटवून घेत युवकाचा मृत्यू
शेअर बाजारातील गुंतवणुकीत १६ लाख रुपयांपेक्षा अधिकचे नुकसान झाल्याने नैराश्यातून येथे २८ वर्षाच्या युवकाने बुधवारी अंगावर पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवून घेतले.
स्वारगेट बलात्कार प्रकरण: पोलिसांकडून आरोपीच्या शिरुर तालुक्यातील गावात ड्रोन, श्वान पथकाच्या माध्यमांतून शोध सुरू
पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास बलात्काराची घटना घडली.
मुंबई : दुर्मिळ आजाराच्या पाच हजार मुलांवर वाडिया रुग्णालयात उपचार!
मुलांमध्ये दुर्मिळ आजारांच्या वाढत्या घटना लक्षात घेता, बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रनने अशा आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे.
नाशिकमध्ये जीबीएससदृश आजाराने बाधित पहिला रुग्ण
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी १० दिवसांपूर्वी कांजण्यासदृश आजाराने त्रस्त झाला. त्यामुळे त्यास आश्रमशाळेतून घरी पाठवण्यात आले.
यंदाच्या नालेसफाईत मुंबई महापालिकेने घातली महत्त्वपूर्ण अट, रस्त्याच्या कडेच्या गटारामधील गाळ काढण्याचेही चित्रीकरण होणार
मुंबईत पावसाळ्यात पाणी तुंबू नये म्हणून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नदी व नाल्यांमधील गाळ काढण्याची कामे केली जातात.
कुसुमाग्रजांचे शिरवाडे वणी गाव ‘कवितांचे गाव’ म्हणून घोषित
“मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि ग्रामपंचायत शिरवाडे वणी यांच्या संयुक्त विद्यमाने कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे गाव शिरवाडे वणी हे गाव “कवितांचे गाव” म्हणून घोषित करण्यात आले. तसेच, कवितेच्या एका दालनाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. या विशेष कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा मला सन्मान लाभला. यावेळी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांना अभिवादन करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. विशेषतः, शालेय विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती कार्यक्रमाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करणारी होती.”
“शिरवाडे वणी आता ‘कवितांचे गाव’ म्हणून ओळखले जाणार असल्याने गावकऱ्यांचे मनःपूर्वक कौतुक केले. त्यांनी हाती घेतलेला हा नाविन्यपूर्ण उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श ठरेल, असे मला वाटते. साहित्यिकांसाठीही ही एक प्रेरणादायी गोष्ट असून, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर पहिल्याच वर्षी असा उपक्रम राबविला गेला, हे मराठी भाषा मंत्री म्हणून माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. या प्रसंगी मंत्री दादाजी भूसे, दिलीपकाका बनकर, शोभा बच्छाव, हेमंत टकले, भाऊ चौधरी तसेच कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची नात पियू शिरवाडकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते,” अशी पोस्ट राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांन एक्सवर केली आहे.
कुसुमाग्रजांचे शिरवाडे वणी गाव “कवितांचे गाव" म्हणून घोषित
— Uday Samant (@samant_uday) February 27, 2025
मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि ग्रामपंचायत शिरवाडे वणी यांच्या संयुक्त विद्यमाने कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे गाव शिरवाडे वणी हे गाव “कवितांचे गाव” म्हणून घोषित करण्यात आले. तसेच, कवितेच्या एका दालनाचे… pic.twitter.com/2Dox17daen
कामगार कल्याण विभागाचा जलतरण तलाव पाच वर्षांपासून बंद… जलतरणपटूंच्या एका पिढीचे नुकसान…
नागपूर : कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी रघुजीनगर, सक्करदरा येथील जलतरण गेल्या पाच वर्षांपासून बंद आहे. ज्या पद्धतीने डागडूजीचे काम सुरू आहे ते बघता जलतरण तलाव पुन्हा कामगारांच्या उपयोगी कधी पडेल ते सांगणे कठीण आहे.सर्वसामान्यांचे कोणतेही प्रश्न असो शासन व प्रशासन स्वत:हून सोडवण्याची तसदी घेत नसल्याचे अनेक उदाहरण आहे. त्यास कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी रघुजीनगर, सक्करदरा येथील जलतरण तलाव अपवाद ठरले असते तर नवलच. करोना काळात बंद करण्यात आलेल्या हे स्वीमिंग पूल डागडूजीच्या दिरंगाईमुळे बंद आहे.
प्रस्तावित वीज दरवाढीमुळे स्थानिक उद्योग परराज्यात जाण्याची भीती, उच्च न्यायालयात दाद मागण्याची औद्योगिक संघटनांची तयारी
सर्व औद्योगिक संघटनांनी वीज दरवाढीच्या विरोधात एकत्रितरीत्या काम करावे, प्रत्येक ग्राहकाने दरवाढीस विरोध करावा, असे आवाहन करण्यात आले.
नाशिक : इलेक्ट्रिक वाहनांसाठी लवकरच मनपाचे चार्जिंग केंद्र, प्रतियुनिट १६ रुपये ६० पैसे दर निश्चित
राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती कार्यक्रमांतर्गत महापालिकेने विविध ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला होता.
मुंबई : कर्करोगावर संशोधनाच्या निमित्ताने ९ कोटींची फसवणूक
कर्करोगावरील संशोधनात गुंतवणूक करण्याच्या नावाखाली जोगेश्वरी येथील महिलेची ९ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
कवठापासून लोणचे, मिठाई, आईस्क्रिम, सरबतही; ‘केटीएचएम’ विद्यार्थ्यांकडून फळास व्यावसायिक दृष्टीकोन देण्याचा प्रयत्न
कवठ हे जंगली फळ मानले जाते. औषधी गुणधर्म, आयुर्वेदिक उपयोग आणि पौष्टिकता यामुळे प्राचीन काळापासून त्याचे महत्व आहे.
Maharashtra News LIVE Updates: माजी आमदार अशोक पवार यांच्या बॅनरवर स्वारगेट बलात्कार प्रकरणाच्या आरोपीचा फोटो; आमदार म्हणाले…
पुण्यातील स्वारगेट बस आगारात २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे याचा शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांच्या बॅनरवर फोटो असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते अशोक पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. अशोक पवार म्हणाले की, त्याचा मोबाइल ताब्यात घेऊन चौकशी केली पाहीजे. उज्जैनला यात्रा काढली असताना तो या यात्रेत सामील झाला होता. या यात्रेत सामील झाल्यावर त्याने काही गुन्हे केले आहेत का? याचीही चौकशी झाली पाहीजे.
नाशिकच्या दोन तरुणांची लष्करात अधिकारी प्रशिक्षणासाठी निवड
भारतीय लष्करातर्फे शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेक्निकल ब्रांचच्या ६४ व्या अधिकारी प्रशिक्षण तुकडीसाठीची अंतिम गुणवत्ता यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली.
प्रशांत कोरटकर मध्यप्रदेशात बसलाय लपून? नागपूर पोलिसांचे पथक शोधासाठी रवाना
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह बोलून इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना अश्लिल शिवीगाळ करणाऱ्या तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर याने अटक होण्याच्या भीतीपोटी मध्यप्रदेशात पलायन काढल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीवरील पुस्तकाच्या लेखिका म्हणाल्या, “सावरकरांचे लिखाण…”
नागपूर : छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर महाराज आणि त्यांची पत्नी येसूबाई पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहे. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा आणि पत्नी येसूबाई यांनी त्यांना दिलेली साथ यामुळे आदर्श जोडी म्हणून त्यांना संबोधित केले जात आहे.
पलावा ठरतोय सर्वात उष्ण परिसर, ठाणेपल्याड पारा ३९ अंश सेल्सियसपार
बदलापूर : बुधवारी महाशिवरात्रीनिमित्त एकीकडे शिवमंदिरांमध्ये भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. तर त्याचवेळी दुसरीकडे तापमानाचा पारा हा ठाणे जिल्ह्यात सरासरी ३९ अंश सेल्सियस पार गेल्याचे चित्र होते. विशेषतः ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीजवळ पलावा परिसरात पारा ४० अंश सेल्सियसपर्यंत पोहोचल्याची नोंद खासगी हवामान अभ्यासकांनी केली आहे.
आज जागतिक मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने ठाण्यात मराठीची गळचेपी होत असल्याची बातमी समोर आली. ज्या कर्मचाऱ्यांनी मराठीतून एमएचे शिक्षण घेतले आहे, त्यांना वेतनवाढ मिळणार नाही, असा आदेश मनपा अधिकाऱ्याने काढला. या विरोधात आता मनसेने आक्रमक पवित्रा घेतला असून अविनाश जाधव यांनी मनपा कार्यालयात आंदोलन केले. मराठी भाषा वाढावी, मराठीतून शिक्षण घेतले जावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत असताना मनपाचा हा निर्णय धक्कादायक आहे. याबाबत मनपाच्या अतिरिक्त आयुक्तांना आम्ही जाब विचारला, असे अविनाश जाधव म्हणाले.
प्रशांत कोरटकरच्या घरावर कोल्हापूर पोलिसांचा छापा, दोन दिवसांपूर्वीच…
ब्राह्मण समाजाचा द्वेष केल्याचा आरोप करीत तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर याने फोन करून थेट धमकी दिली, असा दावा सावंत यांनी केला आहे.
विद्यार्थिनीला वारंवार कॉल आणि मॅसेज, शिक्षकाविरोधात तक्रार
भंडारा : शिक्षकाच्या प्रतिमेला तडा देण्याचे काम एका शिक्षकाने केले आहे. शिकवणी वर्गातील एका विद्यार्थिनीला वारंवार कॉल आणि मॅसेज करून त्रास देणाऱ्या शिक्षकाच्या विरोधात अखेर विद्यार्थिनीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
अकोला रेल्वेस्थानकावर ‘गती शक्ती टर्मिनल’, रेल्वे मंत्र्यांचे सूतोवाच; खासदार अनुप धोत्रेंकडून अहवाल…
अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी रेल्वेमंत्र्यांची दिल्ली येथे भेट घेऊन रेल्वे प्रकल्पांसंदर्भात सविस्तर अहवाल सादर केला.
Maharashtra Live News Update: कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपूरला पोहोचताच प्रशांत कोरटकर नॉट रिचेबल
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना शिवीगाळ केल्याचा आरोप असलेल्या प्रशांत कोरटकरची चौकशी करण्यासाठी कोल्हापूरचे पोलीस पथक नागपूरमध्ये दाखल झाले. परंतु कोरटकर आपल्या निवासस्थानी नसल्याचे लक्षात आल्यामुळे पोलिसांना मोकळ्या हाती परत जावे लागले. तसेच कोरटकर यांचा फोनही नॉट रिचेबल आहे.
ओबीसी समाज पुन्हा आक्रमक, आमच्या मतांमुळे सरकार आले असले तरी…
ओबीसींच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा संविधान चौकातील आंदोलनादरम्यान देण्यात आला.
ठाणे : वर्षभरात १३०० हून अधिक वाहन चोरी, दुचाकीचे प्रमाण सर्वाधिक
ठाणे आयुक्तालय क्षेत्रात २०२४ या वर्षभराच्या कालावधीत १ हजार ३०० हून अधिक वाहनांची चोरी झाली आहे.
पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात बलात्काराची घटना घडल्यानंतर आता आणखी एक विनयभंगाची घटना उघडकीस आली आहे. आयटी कंपनीत काम करणारी एक तरुणी कॅबमधून जात असताना कॅब चालकाने मिररमध्ये पाहून अश्लिल चाळे केले. यामुळे घाबरलेल्या तरूणीने कॅबमधून उडी घेतली. दोन किमी धावत गेल्यानंतर पीडित तरुणीने खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कॅब चालक उत्तर प्रदेशचा रहिवासी असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
मुंबई : सोबत दारू प्यायला आला नाही म्हणून मित्रावर कोयत्याने हल्ला
ॲन्टॉपहिल परिसरातील ए. ए. इंटरप्रायझेस दुकानासमोर हा प्रकार घडला. तक्रारदार शेख ॲन्टॉप हिल येथील महाराष्ट्र नगर परिसरातील रहिवासी आहे.
नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा १७ मार्चपासून; ३० जूनपर्यंत…
नागपूर विद्यापीठाच्या जवळपास बाराशे उन्हाळी परीक्षा असतात. पहिल्या टप्प्यामध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जातात.
आरोपीला पकडण्यासाठी १३ पथके तैनात (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)