Maharashtra Breaking News LIVE Updates: पुण्यातील स्वारगेट एसटी बस आगारात एका युवतीवर बुधवारी पहाटे बलात्काराची घटना घडली. या घटनेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधकांनी सरकारवर आरोप करत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. पोलिसांकडून आरोपीला पकडण्यासाठी अनेक पथके स्थापन करण्यात आली असून अद्याप आरोपी मोकाट आहे. या घटनेवर आज दिवसभरात अनेक पडसाद उमटण्याची शक्यता आहे. तसेच बीडमधील मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी आज आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे. कालच सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आज जागतिक मराठी भाषा दिन आहे. सरकार आणि काही संघटनांकडून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Live Updates

Maharashtra News Highlights Today, 27 February 2025 | महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट्स

11:42 (IST) 27 Feb 2025

गुजरातचा ठकसेन, वर्ध्यातील डॉक्टर; रशियातील बनावट प्रवेश अन् लाखोची फसवणूक

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर आणखी चौकशी करण्यात आली. तेव्हा या विद्यापीठात समन्वयक असल्याचे सांगणाऱ्या पटेल याने त्या विद्यापीठात काही विद्यार्थ्यांचे पैसेच भरले नव्हते.

सविस्तर वाचा…

11:36 (IST) 27 Feb 2025

बेपर्वाईमुळे रोगराईचा धोका, बोरिवलीत फुटलेल्या मलनि:स्सारण वाहिनीकडे महापालिकेचे दुर्लक्ष

संबंधित ठिकाणी खणलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शनिवारी फुटलेल्या मलनि:स्सारण वाहिनीची अद्यापही दुरुस्ती झाली नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

सविस्तर वाचा…

11:36 (IST) 27 Feb 2025

बोरिवलीत रस्त्यांची धूळधाण, काँक्रीटीकरण कामांची संथगती; खोदलेल्या रस्त्यांमुळे स्थानिकांची प्रचंड गैरसोय

महानगरपालिकेने दोन टप्प्यात रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे हाती घेतली आहेत. अनेक ठिकाणी कामांना वेग देण्यात आला आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही कामे संथ गतीने सुरू आहेत.

सविस्तर वाचा…

11:33 (IST) 27 Feb 2025

ठाणे : म्हाडा वसाहतींचा क्लस्टर योजनेत समावेश नकोच, सावरकरनगरमधील रहिवाशांचा विकास आराखडा सुनावणीदरम्यान सूर

म्हाडा वसाहतींचा क्लस्टर योजनेत समावेश नकोच, असा सूर रहिवाशांनी यावेळी लगावला. त्यावर पालिका प्रशासन आता काय भुमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सविस्तर वाचा

11:33 (IST) 27 Feb 2025

मेगा पदभरती, कृषी विद्यापीठामध्ये गट ‘ड’ संवर्गातील ‘एवढी’ पदे भरली जाणार…

पदभरतीमध्ये प्रवर्गनिहाय सामाजिक व समांतर आरक्षण लागू राहणार आहे. प्रयोगशाळा परिचरचे एकूण ३९ पदे भरली जाणार असून वेतन श्रेणी एस ६ १९९०० – ६३२०० राहील.

सविस्तर वाचा…

11:32 (IST) 27 Feb 2025

ठाणे : क्रीडा कार्यक्रमांसाठी शहरात पोलिसांकडून वाहतूक बदल

महाराष्ट्र राज्य क्रीडा स्पर्धा २२ फेब्रुवारीपासून शहरातील साकेत मैदान, पोलीस कवायत मैदान, सिद्धी सभागृहात सुरू आहेत.

सविस्तर वाचा…

11:32 (IST) 27 Feb 2025

एमए शिक्षण घेणाऱ्यांची अतिरिक्त वेतनवाढ बंद, ठाणे महापालिकेचा निर्णय

कला पदव्युत्तर पदवी (एमए -मराठी) शिक्षण घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अतिरिक्त वेतनवाढ बंद करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे.

सविस्तर वाचा…

11:30 (IST) 27 Feb 2025

कुसुमाग्रजांवरील प्रेमासाठी…मराठी भाषेच्या प्रसारासाठी; नाशिकमधील कुसुमाग्रज मराठी विचार मंचचा उपक्रम, पाच हजार विद्यार्थी सन्मानित

मराठी भाषा गौरव दिन हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित राहू नये, तर मराठी भाषेचा रोजच गौरव होण्याची सध्याची गरज आहे.

सविस्तर वाचा…

11:29 (IST) 27 Feb 2025

मुंबई : शिवाजी पार्क मैदानात अनधिकृत वाहनतळ, गाड्या न हटवल्यास खासगी कार उभ्या करण्याचा रहिवाशांचा इशारा

शिवाजी पार्क मैदानावर आता बेकायदा पद्धतीने उभ्या केल्या जाणाऱ्या गाड्यांचा विषय चर्चेत आला आहे. गेल्या रविवारी या मैदानावर मोठ्या संख्येने गाड्या उभ्या करण्यात आल्या होत्या.

सविस्तर वाचा…

11:29 (IST) 27 Feb 2025

मुंबई : महानगरपालिकेत मराठी भाषा पंधरवड्याला सुरुवात, यंदा ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांची प्रमुख वक्ते म्हणून निवड

मराठी भाषेचा प्रसार अणि प्रचार व्हावा, यासाठी महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाच्या वतीने दरवर्षी भित्तिपत्रके प्रकाशित केली जातात.

सविस्तर वाचा…

11:05 (IST) 27 Feb 2025

Pune Rape case Update: स्वारगेट बलात्कार प्रकरणाच्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे आंदोलन

स्वारगेट एसटी डेपोमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेचे पडसाद उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. काही दिवासंपूर्वीच स्वारगेट बस आगारात तृतीयपंथी, चोर यांच्या सुळसुळाट झाल्याचे पत्र देण्यात आले होते. मात्र त्यावर योग्य ती कारवाई न झाल्यामुळेच बलात्कारासारखी गंभीर घटना घडली, असा आरोप प्रशांत जगताप यांनी केला.

10:46 (IST) 27 Feb 2025

Maharashtra Live News Update: गृहखातं लाडक्या बहिणींसाठी वापरलं तर राज्यावर उपकार होतील – संजय राऊत

शिवशाही बसमधील प्रकार दिल्लीतील निर्भया कांड सारखा आहे. सुदैवाने पीडितेचे प्राण वाचले. स्वारगेटला आमच्या शिवसैनिकांनी प्रखर आंदोलन केले. वसंत मोरे, संजय मोरे आणि महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यांच्यावर आता गुन्हे दाखल होतील. पुण्यातील मोकाट सुटलेल्या गँगना कायद्याचा धाक उरलेला नाही. गृहमंत्री राजकीय कार्यासाठी गृहखाते वापरत आहेत. यातून विरोधकांना त्रास दिला जात आहे. पण गृहखाते लाडक्या बहिणींच्या संरक्षणासाठी वापरले, तर महाराष्ट्रावरती उपकार होतील, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

आरोपीला पकडण्यासाठी १३ पथके तैनात (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)