Maharashtra News Updates Today :  राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. पुरेसे संख्याबळ नसतानाही छोटे पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने भाजपाने तीन जागा जिंकल्या असून महाविकास आघाडाचा एक उमेदवार पराभूत झाला आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकावर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. त्यामुळे आजदेखील राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. तर या विजयामुळे भाजपाला स्फूरण चढले असून विधानपरिषदेच्या निवडणुकीतही आम्ही अशीच कमाल करुन दाखवू असा विश्वास भाजपा नेते व्यक्त करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राष्ट्रीय पातळीवरही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु असून प्रादेशिक पक्षांना महत्त्व आले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या निवडणुकीच्या तयारीसाठी येत्या १५ जून रोजी दिल्लीत विरोधकांची बैठक बोलावली आहे. ममता बॅनर्जी यांनी बिगर भाजपाशाशित राज्यांचे मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षांना पत्रे लिहून या बैठकीस उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे राष्ट्रपतीपदाची निवडणूकदेखील चुरशीची होण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे मुंबईमध्ये मोसमी पावसाचे आगमन झाले असून मान्सूनने मुंबईसोबतच, ठाणे, उपनगरे आणि पुण्यापर्यंतचा काही भाग व्यापला आहे. कोकणातही मान्सून दाखल झाला असून शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. मराठवाड्यातही सध्या काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून आज मान्सूनची आणखी प्रगती होण्याची शक्यता आहे.

Live Updates

Maharashtra Latest News Updates : राज्यासह देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक अपडेट!

23:07 (IST) 12 Jun 2022
मुंडे समर्थकांकडून केंद्रीय मंत्री कराडांच्या कार्यालयावर दगडफेकीची अफवा; एका कार्यकर्त्याला बेदम मारहाण

औरंगाबाद – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा ताफा अडवून त्यांच्या क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कार्यालयावर दगडफेक केल्याची अफवा रविवारी (१२ जून) सायंकाळी शहरात पसरली. मात्र, या दोन्ही घटनांचे क्रांती चौक पोलिसांनी खंडण केले. “डॉ. कराड हे गोव्यात असल्याने त्यांच्या वाहनांचा ताफा अडवण्याचा प्रश्नच नाही. या प्रकरणी गोंधळ घालणाऱ्या एका कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे,” अशी माहिती क्रांती चौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणपत दराडे यांनी दिली.

सविस्तर बातमीसाठी क्लिक करा…

20:42 (IST) 12 Jun 2022
गौतम गंभीरसह भाजपाच्या नेत्यांनी नुपूर शर्मा यांना दर्शवला पाठिंबा; ट्वीट करत म्हणाले…

प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भारतीय जनता पार्टीच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरुद्ध देशभर निदर्शने केली जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील याचे पडसाद उमटले आहेत. यानंतर भाजपाने नुपूर शर्मा यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं आहे. शर्मा यांना देशभरातून विरोध होत असताना, माजी क्रिकेटपटू आणि भाजपाचे खासदार गौतम गंभीर यांनी नुपूर शर्मा यांना पाठिंबा दर्शवला आहे. तसेच त्यांना दिल्या जाणाऱ्या धमक्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे. सविस्तर बातमी

19:22 (IST) 12 Jun 2022
वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच तरुणीनं संपवलं जीवन; अकोल्यातील हृदयद्रावक घटना

अकोला शहरातील गुडधी रेल्वे गेट परिसरात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. याठिकाणी एका १७ वर्षीय मुलीनं रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली आहे. रविवारी आत्महत्येची ही घटना समोर आल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सविस्तर बातमी

18:38 (IST) 12 Jun 2022
“भाजपाच्या दहडपशाहीपुढे झुकणार नाही”; काँग्रेसची देशभरातील ईडी कार्यालयासमोर आंदोलनाची घोषणा

“केंद्रातील भाजपा सरकारने राजकीय द्वेषातून सोनिया गांधी व राहुल गांधी यांना नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीची नोटीस पाठवली आहे. या प्रकरणात एका पैशाचाही गैरव्यवहार झालेला नाही. नॅशनल हेरॉल्डशी संबंधित कोणत्याही संचालकाला लाभांश अथवा पैसे मिळालेले नाहीत. २०१५ साली बंद झालेले हे प्रकरण पुन्हा उकरून काढण्यामागे केवळ गांधी कुटुंबाला नाहक त्रास देण्याचा प्रकार आहे. परंतु, काँग्रेस पक्ष भाजपा सरकारच्या या दडपशाहीसमोर झुकणार नाही. भाजपच्या या दडपशाहीविरोधात काँग्रेस सोमवारी (१३ जून) देशभरात ईडी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे,” अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली.

सविस्तर बातमीसाठी क्लिक करा…

18:37 (IST) 12 Jun 2022
पुण्यातील ३,५०० गुंडांची झाडाझडती; पिस्तुले, काडतुसांसह शस्त्रसाठा जप्त, गुन्हे शाखेची विशेष मोहीम

पुणे शहरातील गुंडांची झाडाझडती घेण्यासाठी मध्यरात्री गुन्हे शाखा तसेच पोलीस ठाण्यांमधील पथकांनी विशेष मोहीम राबविली. या कारवाईत पोलिसांनी शहरातील साडेतीन हजार सराईत गुंडाची झाडाझडती घेतली. त्यापैकी ६८५ गुन्हेगार मूळ पत्त्यावर राहत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी दोन पिस्तुलांसह, काडतुसे, तलवारी, कोयते जप्त केले. चंदननगर भागातील एका हुक्का पार्लरवरही कारवाई करण्यात आली.

सविस्तर बातमीसाठी क्लिक करा…

18:36 (IST) 12 Jun 2022
“विरोधात असूनही आम्ही मविआची ८-९ मतं फोडली, त्यामुळे…”; नारायण राणेंचा हल्लाबोल

राज्यसभा निवडणुकीत भाजपाने पुरेसं संख्याबळ नसतानाही तिसरा उमेदवार निवडून आणला. त्यानंतर रविवारी (१२ जून) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. “सत्तेत असूनही शिवसेनेला जेवढी मतं मिळायला हवी होती तेवढीही मिळाली नाही. आम्ही विरोधात असूनही मविआची ८-९ मतं फोडली,” असं नारायण राणे म्हणाले. ते सिंधुदुर्गमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

सविस्तर बातमीसाठी क्लिक करा…

18:17 (IST) 12 Jun 2022
धनंजय महाडिक यांचं कराडमध्ये जंगी स्वागत, कोल्हापुरातील सत्तांतराबाबत मोठं वक्तव्य

‘राज्यसभा तो झाकी है, विधान परिषद अभी बाकी है’ असा राज्यातील महाविकास आघाडीला इशारा देताना विधान परिषदेच्या निवडणुकीत आणि त्यानंतर बरेच काही घडणार असल्याचे सुतोवाच भाजपाचे नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक यांनी कराड येथे माध्यमांशी बोलताना दिले. राज्यसभेवरील निवडीचा विजयी गुलाल घेऊन कोल्हापूरकडे रवाना होणारे खासदार महाडिक यांचा कराडच्या प्रवेशद्वारावर भाजपाचे कार्यकर्ते व हितचिंतकांनी जोरदार स्वागत व अभिनंदन केले. सविस्तर बातमी

17:38 (IST) 12 Jun 2022
शरद पवार यांच्या मनात नेमकं काय चालतं? बच्चू कडू म्हणाले

राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले असले तरी पवार जेव्हा कुणाचे कौतुक करतात तेव्हा त्यांचा निशाणा कुठे असतो हे सांगता येत नाही, असे मत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले. वाचा सविस्तर

17:20 (IST) 12 Jun 2022
‘दुर्धर आजाराने ग्रस्त असूनही…’ धनंजय महाडिकांनी मानले लक्ष्मण जगतापांचे आभार

भारतीय जनता पार्टीचे आमदार लक्ष्मण जगताप हे गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. नुकताच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून राज्यसभा निवडणुकीच्या मतदानासाठी ते रुग्णवाहिकेतून मुंबईत दाखल झाले होते. त्यांच्या याच धाडसामुळे आणि धैर्यामुळं मी खासदार झालो आहे, असं नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक यांनी म्हणत जगताप कुटुंबीयांचे आभार मानले. सविस्तर बातमी

16:45 (IST) 12 Jun 2022
हरियाणामध्ये काँग्रेसची धूळधाण उडवणारे कार्तिकेय शर्मा कोण आहेत?

हरियाणामध्ये दोन जागांसाठी राज्यसभेची निवडणूक पार पडली. यातील एका जागेसाठी चुरशीची लढत झाली. या जागेवर काँग्रेसचे दिग्गज नेते अजय माकन यांना पराभूत करुन अपक्ष असलेल्या कार्तिकेय शर्मा यांनी विजय प्राप्त केला. विशेष म्हणजे कार्तिकेय शर्मा यांनी ही पहिलीच निवडणूक लढवली असून राज्यसभेवर जात त्यांनी आपल्या राजकारणाला सुरुवात केली आहे. वाचा सविस्तर

16:38 (IST) 12 Jun 2022
मान्सून आगमनासाठी मराठवाड्यात पोषक हवामान; पुढील ३ तासात ‘या’ जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस

शनिवारी (११ जून) मुंबईसह दक्षिण कोकणातील काही जिल्ह्यांत मान्सूनचं आगमन झालं आहे. काल दिवसभरात मुंबई, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहे. आज मान्सूनच्या रेषेत कोणताही बदल झाला नाही. मात्र, मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी महाराष्ट्रासह आसपासच्या प्रदेशात पोषक हवामान तयार झालं आहे. सविस्तर बातमी

15:21 (IST) 12 Jun 2022
पुण्यात मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार ज्येष्ठाचा मृत्यू, संगणक अभियंता महिलेवर गुन्हा

भरधाव मोटारीच्या धडकेने दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील पाषाण रस्त्यावर घडली. या प्रकरणी मोटार चालक महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. अनिल जोशी (वय ७३, रा. बाणेर रस्ता, बालेवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. सविस्तर बातमी

13:57 (IST) 12 Jun 2022
पुणे : गु्न्हे शाखेचा वातानुकूलित जुगार अड्डयावर छापा, पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

मंगळवार पेठेत पहाटेपर्यंत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पहाटे छापा टाकून ३६ जणां विरोधात गुन्हा दाखल केला. याच जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने महिनाभरापूर्वी छापा टाकून कारवाई केली होती. पोलिसांची कारवाई झाल्यानंतर पुन्हा तेथेच जुगार अड्डा सुरू झाला. मध्यरात्री उशीरा सुरू होणाऱ्या जुगार अड्ड्यात वातानुकुलून यंत्रणा होती तसेच पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

वाचा सविस्तर…

13:40 (IST) 12 Jun 2022
‘राऊत हे मातोश्रीचे अन् वडेट्टीवार हे सोनिया गांधींकडे घरगडी’, भाजपा आमदार संजय कुटे यांची बोचरी टीका

राज्यसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेनं अपक्ष आमदारांना बोलावून निधी देण्यावरून धमक्या दिल्याचा आरोप महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केला होता. याच मुद्द्यावरून जळगाव मतदार संघाचे भाजपा आमदार संजय कुटे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे. सविस्तर बातमी

13:37 (IST) 12 Jun 2022
राज्यसभा निवडणुकीनंतर नारायण राणे आक्रमक, केली राजीनाम्याची मागणी

राज्यसभा निवडणुकीनतर भाजपाचे अनेक नेते महाविकास आघाडीवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. ते सिंधुदुर्गमध्ये बोलत होते. वाचा सविस्तर

12:47 (IST) 12 Jun 2022
…तर शरद पवार यांच्या नावाला आमचा पाठिंबा- नाना पटोले

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शरद पवार यांचे नाव समोर येत असेल तर आमचा त्यांना पाठिंबा राहील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत. ते आज पत्रकारांशी बोलत होते. वाचा सविस्तर

12:25 (IST) 12 Jun 2022
१०० दिवसांत युक्रेनच्या १० हजार सैनिकांचा मृत्यू; राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या सल्लागाराकडून खुलासा

सध्या रशिया आणि युक्रेन या दोन देशांत युद्ध सुरू आहे. हे युद्ध सुरू होऊन आज १०९ दिवस उलटले आहेत, तरीही युद्ध थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. या युद्धात रशिया आणि युक्रेन दोन्ही देशांना मोठा फटका बसला आहे. दररोज निष्पाप नागरिकांसह आणि अनेक सैनिक मारले जात आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून प्रथमच युक्रेनच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यानं युद्धात मृत पावलेल्या सैनिकांबाबत मोठा खुलासा केला आहे. सविस्तर बातमी

11:47 (IST) 12 Jun 2022
माहितीच्या अधिकाराखाली खंडणी मागणाऱ्याला अटक

बांधकाम व्यवसायिकांच्या कामांसंबंधात माहितीच्या अधिकाराचा अर्ज करून त्यानंतर हा अर्ज मागे घेण्यासाठी खंडणी उकळणाऱ्या महेश कणकिया याला ठाणे पोलिसांनी नुकतेच अटक केले आहे. या प्रकरणात आता ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागातील अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांच्याकडे केली आहे. त्यामुळे आता शहर विकास विभागातील अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. वाचा सविस्तर

11:26 (IST) 12 Jun 2022
‘संजय राऊतांनी आचारसंहितेचा भंग केला,’ किरीट सोमय्यांचा आरोप

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काही आमदारांची नावे घेत त्यांनी आम्हाला मते दिली नाही, असा आरोप केला. राऊतांनी आमदारांची नावे जाहीर करण्यावर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेतला असून राऊतांनी निवडणुकीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. तसेच निवडणूक आयोगाने याबद्दल योग्य कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. वाचा सविस्तर

10:59 (IST) 12 Jun 2022
लोकलने प्रवास करत डोंबिवलीत येऊन करायच्या चोरी, जेजुरीतून तीन बहिणींना अटक

डोंबिवलीतील एका नोकरदार महिलेच्या बंद घराचा दरवाजा तोडून घरातील लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेणाऱ्या तीन बहिणींना कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातून जेजुरी येथून अटक केली. त्यांच्याकडून चोरीचे २३ तोळे सोने, रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

सविस्तर बातमी

10:56 (IST) 12 Jun 2022
संभाजीराजेंच्या समर्थनार्थ शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी

संजय पवार यांच्या पराभवामुळे संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांनीही जल्लोष साजरा केला आहे. त्यांच्या समर्थकांनी मुंबईच्या शिवसेना भवनासमोर छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणाऱ्या आमदारांचे आभार अशा आशयाचे बॅनर लावले आहे. याच बॅनरबाजीनंतर खुन्नस म्हणून कोणाच्याही कार्यालयासमोर अशी कृती करणे, हे माझ्या तत्त्वात बसत नाही, असं संभाजी छत्रपती म्हणाले आहेत. वाचा सविस्तर

10:50 (IST) 12 Jun 2022
पंकजा मुंडेंना एकटे पाडायचे भाजपाचे धोरण; सामनामधील टीकेला चंद्रकांत पाटलांचं उत्तर; म्हणाले “त्या मोदींच्या लेक…”

विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांना भाजपने पुन्हा डावलले. गोपीनाथ मुंडे व पंकजा मुंडे यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवाऱ्या द्यायच्या, सत्तेची पदे द्यायची, पण पंकजा मुंडे यांना एकटे पाडायचे असे भाजपचे धोरण दिसते असा आरोप शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी सामनामधून केला आहे. संजय राऊतांच्या या आरोपावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. चंद्रकांत पाटील देहूत आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने त्यांनी मंदिर परिसराची पाहणी केली, त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सविस्तर बातमी

10:48 (IST) 12 Jun 2022
“४८ तासांसाठी ईडी आमच्या हातात दिली तर”…. संजय राऊत यांचा टोला

राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर पराभव झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. तसेच भाजपा नेत्या पंकज मुंडेंवरही त्यांनी भाष्य केले आहे.

सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

10:05 (IST) 12 Jun 2022
भाजपा जिंकला, पण तो विजय खरा आहे काय?; सामना ‘रोखठोक’मधून संजय राऊतांचा सवाल

राज्यसभा निवडणुकीत पुरेसं संख्याबळ नसतानाही भाजपाने तीन जागा जिंकल्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी सामनाधून जोरदार टीका केली आहे. “राज्यसभा निवडणुकांचे निकाल लागले. विधान परिषदाही होत आहेत. सहाव्या जागेवर भाजपा जिंकला, पण तो विजय खरा आहे काय?,” अशी विचारणा संजय राऊतांनी केली आहे. 41 विरुद्ध 39 असा हा सामना झाला. पहिल्या पसंतीची सर्वाधिक 33 मते शिवसेना उमेदवाराने घेतली, पण विजय भाजपास मिळाला. केंद्रीय यंत्रणांनाही निवडणुकीच्या व्यापारी तराजूवर बसवण्याचे प्रकार या वेळी दिसले अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.

सविस्तर बातमी

09:49 (IST) 12 Jun 2022
Gold- Silver Price Today: आज सोने-चांदीच्या दरात झाली वाढ

उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. १० ग्रॅम २२ कॅरेट आणि १० ग्रॅम २४ कॅरेटची महाराष्ट्रातील आजची किंमत जाणून घ्या. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

09:48 (IST) 12 Jun 2022
Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात आज जास्त बदल नाही; जाणून घ्या आजचा भाव

महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे डिझेलचे नवीन दर जारी केले जातात. महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

MAHARASHTRA LIVE NEWS UPDATE